रविवार, ३० जून, २०१३

नामदार नारायण राणे : शिवसेनेत असताना 'कोकणचा वाघ' अन् आता काँग्रेसवासी झाल्यावर 'कोणचा वाघ'...


काही दिवसांपुर्वी युनेस्कोने पश्चिम घाटाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिल्याने समस्त कोकणवासियांची मान अभिमानाने उंचावली कारण यापुढे पश्चिम घाटाचा समावेश ताजमहल सारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांसमवेत केला जाणार आहे. पण काँग्रेसचे नारायण राणेँसारखे जे तथाकथित नेते जैतापुर अणुप्रकल्पासारखे विनाशकारी प्रकल्प निसर्गरम्य कोकणवर लादु पाहत होते त्यांचे मात्र या बातमीन धाबे दणादणले. शेवटी आपले रोजचे विकासाचे तुणतुणे वाजवत नारायण राणेँनी गरळ ओकली. पश्चिम घाटाला जागतिक वारसास्थळांचा दर्जा दिल्यास कोकणातील विकास पुर्णपणे थांबेल अशी बोँबाबोँब करत राणेँनी या ऐतिहासिक घटनेला कडाडुन विरोध केला. राणेँनी एका प्रश्नाचे जाहीरपणे उत्तर द्यावे की पश्चिम घाटाला हेरिटेज दर्जा देणे नक्की कोकणच्या विकासाला मारक आहे की राणेँच्या स्वतःच्या विकासाला मारक आहे...? उद्या जर पश्चिम घाट जागतिक वारसास्थळ म्हणुन घोषित झाले तर राणेँनी पैसा कमवण्यासाठी कळण्यात अवैध मायनिँगला पाठिँबा देत सिँधुदुर्गच्या निसर्गाचा जो सत्यानाश चालवला आहे ते मायनिँग कायमस्वरुपी बंद पडेल. राणेँच्या घरात हप्त्यांरुपी वाहणारा पैशांचा धबधबा कायमस्वरुपी बंद पडेल. एरव्ही एकमेकांकडे तोँड फिरवुन बसणारे भ्रष्टाचारमहर्षी शरदचंद्र पवार राणेँच्या मदतीला धावुन आले आहेत कारण पश्चिम घाटाला हेरिटेज दर्जा दिल्यास जो जैतापुरचा विनाशकारी प्रकल्प राणे आणि पवार संघनमताने कोकणवर लादु पाहत आहेत तो बंद करावा लागेल आणि या दोघांचे राजकीय स्वार्थ आणि पैसे खड्ड्यात जातील. परिणामी कोकणच्या निसर्गाचा विनाश थांबेल आणि राणे-पवार द्वयीँचा आर्थिक विकास थांबेल. त्यामुळेच यांची पोटदुखी वाढली आहे. भाबड्या जनतेला पश्चिम घाट जागतिक वारसास्थळ झाल्यास यापुढे कोकणात घरे बांधता येणार नाहीत किँवा उद्योगधंदे उभारता येणार नाही अशी खोटारडी भीती दाखवत आहेत. एरव्ही या दोघांनाही जनतेची किती काळजी आहे किँवा या दोघांनी एकत्रितपणे जनतेचा (की स्वतःचा?) किती विकास केलाय हे लोकांना चांगल्याप्रकारे माहिती आहे. आयुष्यभर पर्यावरणाचा अभ्यास करणा-या माधव गाडगीळांचा अहवाल खोटा ठरवताना धड दहावी देखील पास नसणारे नारायण राणे आपला अडाणीपणा लोकांसमोर आणत आहेत. ज्या गोष्टीचा समस्त कोकणी लोकांना अभिमान आहे त्याच गोष्टीला विरोध करुन राणेँनी आपली राजकीय तिरडी अजुन घट्टपणे बांधली आहे. नारायण राणे ये पब्लिक है, सब जानती है...!
 काँग्रेसच्या स्वार्थी राजकरणात राणे आता एवढे आकंठ बुडालेले आहेत की कोणे एके काळी शिवसेनेत असताना त्यांनी सिँधुदुर्गला प्रयत्नांची शिकस्त करुन "पर्यटन जिल्हा" म्हणुन घोषित केले होते ही गोष्ट देखील ते जाणीवपुर्वक विसरलेले दिसतात. शिवसेनेत असतना कोकणचा पर्यटनाने विकास करायचा निर्धार राणेँनी केला होता पण काँग्रेसवासी झाल्यावर कोकणचा विकास बाजुलाच ठेवुन कोकणच्या निसर्गरम्य पर्यावरणाचा विनाश करण्याचा एककलमी कार्यक्रम राणेँनी हाती घेतला आहे आणि त्यांचे पश्चिम घाटासंबंधी वक्तव्य याचेच फलित म्हणावे लागेल. पश्चिम घाट जागतिक वारसास्थळ म्हणुन घोषित झाले तर माथेरान किँवा महाबळेश्वर पेक्षाही कितीतरी पटीने जास्त पर्यटक जगभरातुन कोकणात येतील आणि कोकणचा पर्यटनाने विकास होईल पण राणेँचा मुळी त्या विकासालाच विरोध आहे. ज्या जैतापुर प्रकल्पामुळे कोकणचा विनाश निश्चित आहे परंतु राणेँचा वैयक्तिक आर्थिक विकास होणार आहे तोच प्रकल्प राणे कोणत्याही परिस्थितीत रेटु पाहत आहेत. आंबा बागायतदरांच्या प्रश्नांवर फार मोठी तळमळ असल्याचा आव आणताना सध्या राणे दिसतायेत पण जैतापुर प्रकल्पाला पाठिँबा देऊन आंबा बागायतदारांचा कर्दनकाळही तेच बनत आहेत. मग हा विरोधाभास कशासाठी...? संपुर्ण कोकणात राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणारे नारायण राणे आज कोकणी लोकांच्या मनातुन एवढे खाली उतरले की धड सिँधुदुर्गात देखील आपलं अस्तित्व, आपला प्रभाव ते स्पष्टपणे दाखवु शकत नाही याला कारणीभुत त्यांच्या वागण्यातील हा दुटप्पीपणा आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर वाढत गेलेली स्वार्थी व्रुत्ती आहे.
 नारायण राणे शिवसेनेत असताना एक काळ असा होता की माझ्यासारखे कित्येक कोकणवासी त्यांचे कट्टर समर्थक होते कारण विरोधकांनी राजकीय हत्या, अपहरण असे कितीही आरोप राणेँवर केले तरी त्यावेळी कोकणातल्या सामान्य लोकांचे राणेँनी कधीही वाईट चिँतीले नव्हते.... अवघ्या 8 महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत राणेँनी मागासलेल्या सिँधुदुर्गाला रस्ते, पाणी, रोजगार इत्यादी सर्वच मुलभुत गरजांच्या बाबतीत प्रगतीपथावर नेले. राणे त्यावेळी खरोखरच "कोकणचे वाघ" होते. अशा या आमच्या वाघाला शिवसेना आणि उद्धव ठाकरेँनी डिवचल्यावर सगळा कोकण राणेँच्या मागे खंबीरपणे उभा राहिला कारण कोकणवासियांचा शिवसेनेपेक्षा राणेँवर जास्त विश्वास होता. पोटनिवडणुकीमध्ये साक्षात बाळासाहेबांनी सभा घेऊन देखील परशुराम उपरकरांची अनामत रक्कम वाचु शकली नाही कारण शिवसेनेने या आमच्या लाडक्या नेत्याच्या रुपाने कोकणी लोकांचा स्वाभिमान ठेचण्याचा प्रयत्न केला होता. राणेँसोबत त्यांचे जे समर्थक आमदार त्यांच्यासोबत बाहेर पडले त्यांना देखील कोकणवासियांनी भरघोस मतांनी विजय मिळवुन दिला.
 आमचे लाडके 'दादा' कोणत्याही पक्षामध्ये गेले तरी फक्त कोकणच्याच विकासाचा विचार करतील असा 100% विश्वास त्यावेळी कोकणच्या लोकांना होता. लवकरच 'कोकणचा स्वाभिमान' काय असतो याची प्रचिती काँग्रेसवाल्यांना देखील आली. ज्या मुख्यमंत्रीपदाची ग्वाही देऊन सोनिया गांधीने राणेँना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता ते पद मिळत नाही म्हटल्यावर "कोकणच्या वाघा"ची डरकाळी दिल्लीमध्ये ऐकु आली. काँग्रेसच्या आजपर्यँतच्या इतिहासात जे करायची हिँमत कोणा खासदाराला झाली नव्हती ती किमया कोकणच्या एका आमदाराने म्हणजेच राणेँनी केली. दिल्लीत जाऊन त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिँग आणि अहमद पटेलांना पत्रकार परिषद घेऊन संपुर्ण देशासमोर त्यांची लायकी काढली आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. साहजिकच एक कोकणचा रहिवासी म्हणुन छाती आभिमानाने फुगुन आली.
एरव्ही आपल्या सभांमध्ये राणेँना न चुकता शिव्या देणा-या बाळासाहेबांना देखील राणेँचे हे दिल्लीतील रौद्ररुप पाहुन थोड्या वेळापुरता का होईना आपल्या तालमीत तयार झालेला शिष्य म्हणुन अभिमानच वाटला असणार. बाळासाहेब मनातल्या मनात पुटपुटले असतील "शाब्बास रे पठ्ठ्या...!!!"
त्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी राणेँनी ज्या प्रकारे त्या इटालियन बाईचे पाय चाटले, वारंवार दिल्लीत जाऊन लाचारी पत्करली त्यावेळी मात्र मान शरमेने खाली झुकली. काँग्रेसची नालायक संस्क्रुती जमत नसल्याने राणेँनी एखादा नवीन पक्ष काढला असता तर त्याला देखील आम्ही भरभरुन प्रतिसाद दिला असता पण या लाचारीनंतर राणे नजरेतुन पहिल्यांदा उतरले. त्या दिवसापासुन त्यांचे समर्थन करणे सोडुन दिले मात्र त्यांना विरोध कधीच केला नव्हता कारण शेवटी कितीही झाले तरी बाकीच्या पक्षांनी राणेँना प्रवेश देणे नाकारल्यावर नाईलाजापोटी राणेँनी केलेली ती एक "राजकीय तडजोड" होती. कालांतराने काँग्रेसी डुकरांच्या सहवासात राहुन SLOW POISONING झाल्याप्रमाणे राणेँमध्ये स्वार्थाचे विष हळुहळु भिनु लागले. म्हणतात ना- ढवळ्याशेजारी बांधला पवळा, गुण नाही पण वाण लागला. इतके दिवस कोकणच्या लोकांच्या भल्याचा विचार करणारा आमचा नेता आता स्वतःचा आणि आपल्या स्वार्थी पक्षाचा प्रथम विचार करु लागला. याची पहिली प्रचिती कळणे मायनिँगच्या वेळी आली.
लोकांनी एखाद्या प्रकल्पाला विरोध केल्यावर कधीही लोकांच्या भल्याचा विचार करत मागे हटणा-या राणेँनी कळणेत मात्र पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावुन लढणा-या लोकांना पोलिँसाकरवी मारहाण केली आणि आंदोलकांवर खोटे आरोप लावुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांनी भरभरुन प्रेम, आशिर्वाद दिले त्याच मायबाप जनतेवर अमानुष लाठीमार करवणा-या या माणसाविषयी मनात एक वेगळीच सणक निर्माण झाली आणि मनात जो होता-नव्हता तो आदर देखील संपला. आता राणेँचा मी एक कट्टर विरोधक बनलो होतो. राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर निसर्गाची देणगी लाभलेला कळणेचा निसर्गरम्य पट्टा मायनिँग करत त्यांनी ओसाड करुन टाकला. काँग्रेसचा निर्लज्जपणा आणि सत्तेचा माज राणेँच्या स्वभावात आता जाणवु लागला होता. त्याच वेळी काँग्रेसने 10000.M.W. च्या विनाशकारी अणुऊर्जाप्रकल्पासाठी कोकणातील जैतापुर ही जागा निवडली. देशातील इतर कोणत्याही भागात या प्रकल्पाला कडाडुन विरोध झाला असता त्यामुळे दादागिरी करण्यासाठी प्रसिद्ध असणा-या नारायण राणेँना आमिष दाखवुन कोकणच्या लोकांवर हा विनाशकारी प्रकल्प लादण्याची चाल पांढ-या पायांच्या इटालियन बाईने खेळली.
 जैतापुरमधील गरीब मच्छिमार आणि शेतकरी या प्रकल्पाविरुद्ध एकवटुन संघर्ष करु लागले पण आता काँग्रेसमध्ये राहुन लोकांचे नाही तर स्वतःचे हित पाहण्याची सवय लागलेल्या राणेँनी कोकणच्या विकासाच्या नावाखाली गुंडगिरी करुन हा प्रकल्प कोकणवर लादायला सुरुवात केली. विरोध करणा-या गरीब लोकांना भरसभेत मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या सोज्वळ आणि संयमी खासदारपुत्रासमवेत धमक्या दिल्या. राणे कुटुंबाची सभ्यता फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या देशाला कळाली. कारणही तसेच होते. जैतापुरचा विनाशकारी प्रकल्प थोडाथोडका नाही तर तब्बल 2 लाख कोटीँचा होता. कमीत कमी 2-3% जरी पैसे खायला मिळाले तरी ते 400-600 कोटी रुपये होतात. त्यासाठी भविष्यात कोकणचे लोक जपानसारखे किरणोत्साराने मेले तरी राणेँच काहीच बिघडणार नव्हत. शिवसेनेच्या वेळी लोक राणेँना प्रेमाने मते द्यायचे पण आता आपल्या कुकर्माँची कुठेतरी जाणीव झाल्याने असेल किँवा पैशांचा माज आल्याने, राणेँनी निवडणुकांच्या आदल्या दिवशी पैसा आणि दारुवाटप करुन निवडणुका जिँकण्याचे नवीन तंत्र शोधुन काढले. क्षणिक सुखांना भुलणारी कोकणची भाबडी जनता देखील प्रथमतः या प्रलोभनाला बळी पडली.
 जी गोष्ट प्रेमाने कायमस्वरुपी मिळवता येते तीच गोष्ट पैशाने काही काळापुरतीच मर्यादित राहते हा साधा संदर्भ राणे विसरले होते. एव्हाना चिँटु शेखवर गोळीबार करणा-या आपल्या चिरंजीवांना राणे राजकरणात घेऊन आले. मुळातच (अ)स्वाभिमानी असलेल्या या पुत्रने आणि त्यांच्या सहका-यांनी वेँगुर्ल्यात नगरपालिका निवडणुकांच्या वेळी असे काही झेँडे रोवले की राणेँना एकच ओळ म्हणायची वेळ आली,
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिहिलोकी झेँडा..."
आजपर्यँत राणेँनी राजकरणात कितीही गुंडगिरी केली तरी कधी सामान्य लोकांवर हात उचलला नव्हता पण त्यांच्या दिवट्यांने ही उणीव देखील भरुन काढली. वेँगुर्ल्यातील नितेशच्या या उन्मतगिरीनंतर राणेँनी कितीही सारवासारव केली तरी गप्प बसेल ती कोकणी जनता कसली...? नगरपालिका निवडणुकांमध्ये सावंतवाडी आणि वेँगुर्ला नगरपालिकेत एकत्रित मिळुन 35 पैकी 1 जागा निवडुन देत शेवटी जनताच मायबाप असते हा संदेश निवडणुक निकालातुन चपराक लगावत सिँधुदुर्गातील लोकांनी राणेँना दिला.
लगेचच जिल्हा परिषद निवडणुका होत्या पण राणेँच नशीब खुपच ताठ होत कारण राणेँना त्यांच्या तोडीच विरोधकच मिळाले नाहीत. कितीतरी मुद्दे असताना विरोधकांनी फक्त एकच दहशतवाद हा मुद्दा उचलुन धरला आणि सवयीप्रमाणे तोँडावर आपटले. जि.प.निवडणुकांच्या निकालनंतर राणेँनी मिडीयासमोर कितीही आनंद व्यक्त केला तरी मनातुन ते हादरले होते कारण ज्या जिल्हा परिषदेत एकेकाळी 50 पैकी 45 जागांवर त्यांचे वर्चस्व होते त्याच जिल्हा परिषदेवर आता फक्त 33 जागा मिळाल्या होत्या.
जैतापुरचा विनाशकारी प्रकल्प देवगडच्या नजीकच होतोय. उद्या या प्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर किरणोत्सारामुळे बाधित झाल्याने देवगडमधील आंबा उत्पादक शेतकरी आणि मच्छिमार यांना जगात बाजारपेठच उपलब्ध होणार नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ते देशोधडीला लागणार आहेत परंतु त्यांना अद्यापही या गोष्टीची कोणतीच कल्पना नाही. राणेँना ही गोष्ट माहित असली तरी आळीमाळी गुपचिळी अशी भुमिका घेत त्यांनी देवगडातील जिल्हा परिषद निवडणुकीत सगळ्याच्या सगळ्या जागा जिँकल्या आणि या महत्वपुर्ण मुद्द्याबद्दल काहीच भाष्य न करता विरोधक निवडणुकीत हात हलवत घरी आले.
शिवसेनेत असताना नारायण राणेँना संपुर्ण कोकणवर त्यांच्या समर्थक आमदारांचे वर्चस्व असल्याने "कोकणचा वाघ" ही उपाधी दिली जायची. कोकणातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या ताब्यात होत्या आणि या सगळ्यांपेक्षा अतिमहत्वाचे आमच्यासारख्या सामन्य लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद भरभरुन त्यांच्या पाठीशी होते. काँग्रेसमध्ये गेल्यावर स्वार्थापायी कोकणच्या विकासाच्या नावाखाली त्यांनी कोकणच्या अतिसुंदर निसर्गाचा जो विनाश केला त्यामुळे लोकांच्या मनातील जागा गमावत आज ते संपुर्ण कोकण सोडाच पण सिँधुदुर्गात देखील आपल्या अस्तित्वासाठी झगडाताना दिसतातयेत. एकेकाळी संपुर्ण कोकणात राणेसमर्थक आमदारांची खैरात असायची पण आता स्वतः राणे सोडले तर दुसरा कोणताही काँग्रेसचा आमदार कोकणात दिसत नाही. जो सिँधुदुर्ग राणेँच्या हातातुन कधीच सुटणार नाही अशी धारणा होती त्या सिँधुदुर्गातील तिन्ही नगरपालिका आज राणेँच्या हातुन निसटल्या आहेत फक्त विरोधकांच्या मुर्खपणामुळे जिल्हा परिषद तेवढी हातात शिल्लक आहे. "कोकणचा वाघ" ही उपाधी दुर जात आता फक्त "कोणचा वाघ" ही उपाधी शिल्लक राहिली आहे.
2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी अजुन 2 वर्षाँचा कालावधी शिल्लक आहे. आपल्या सिँधुदुर्गात आज आपली एवढी बिकट अवस्था का झाली याचा राणेँनी पुन्हा एकदा विचार करावा. काँग्रेसच्या आमिषांना बळी न पडता एकदा आत्मपरिक्षण करावे. सिँधुदुर्ग आणि कोकणातील तमाम जनतेला पुर्वीप्रमाणे लोककल्याणाचे निर्णय घेणारे दादा हवे आहेत. विरोधकांनी सुद्धा विचार करायची योग्य वेळ आली आहे. नसलेल्या दहशतवादाचे गंजलेले अस्त्र घेऊन राणेँना विरोध करणार आहात की राणे लादु पाहत असलेल्या जैतापुरच्या विनाशकारी प्रकल्पाचे निवडणुकीमध्ये ब्रम्हास्त्रात रुपांतर करुन राणेँना कायमचा शह देणार आहात...? आता जर जैतापुर प्रकल्प हा विषय रत्नागिरीपुरता मर्यादित ठेवलात तर तुमच्या या मुर्खपणाला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल. जैतापुरच्या विषयाचे येत्या निवडणुकांमध्ये ब्रम्हास्त्रात रुपांतर करायचे असेल तर आतापासुनच तयारी करावी लागेल. कोणताही विषय आपोआप भडकत नाही. आग लावायची असेल तर ठिणगी पाडावीच लागते. मात्र ठिणगी पाडायचे कष्ट कोणाला तरी घ्यावेच लागतात अन्यथा यशाची गोड फळे चाखता येत नाही. एक गोष्ट नीट ध्यानात घ्या की कळणेतील मायनिँगप्रश्नी सुरुवातीला आर्थिक लाभापायी आक्रमक असलेले राणे सध्या मात्र लोकांच्या कडाडुन होणा-या विरोधाला घाबरुन कोलांटी उडी मारत मायनिँगला विरोध करत आहेत कारण त्यांना मतांपायी पैशांवर पाणी सोडणे शक्य आहे. परंतु जैतापुरप्रश्नी उद्या सिँधुदुर्गातील लोक जरी भडकले तरी केँद्रातुन येणा-या पक्षीय दबावामुळे जैतापुरप्रश्नी कोलांटीउडी मारणे राणेँना शक्य नाही. ते पुर्णपणे कोँडीत सापडतील आणि तिथेच त्यांचा चेकमेट होईल.
 जैतापुरच्या अणुप्रकल्पाने आपली पोरं वेगवेगळी व्यंग घेऊन जन्माला येतील हे पटवुन दिल्यावर उद्या कोणती स्त्री राणेँच्या बाजुने मतदान करेल...?
तीच गत देवगडातील आंबा उत्पादकांची आहे. जैतापुरच्या अणुप्रकल्पाने संपुर्ण कोकणातील उष्णता वाढुन आंब्याचे उत्पादन घटेल आणि त्यातही जे आंबे उत्पादित होतील ते किरणोत्सारबाधित असल्याने जागतिक बाजारपेठेत ते खरेदी करुन कोणीही खाण्याचा प्रयत्न करणार नाही, ही गोष्ट सप्रमाण पटवुन दिल्यावर आंबा बागायतदार राणेँना मत देतील का...?? मच्छिमारांची परिस्थिती काही वेगळी नाही. जैतापुर प्रकल्पातुन सोडल्या गेलेल्या गरम पाण्याने सगळ्या समुद्राचे तापमान खुप मोठ्या प्रमाणात वाढुन मासे आणि त्यांची अंडी मरतील. माशांची पैदास कित्येक पटीने कमी होईल. जे मासे उरतील त्यातील बहुतांशी किरणोत्सारबाधित असल्याने लोक ते विकत घेऊन कँन्सरसारख्या आजाराला निमंत्रण द्यायचा मुर्खपणा करणार नाहीत. थोडक्यात काय तर सिँधुदुर्गातील आंबा उत्पादक आणि मच्छिमार या प्रकल्पामुळे कंगाल होऊन कायमस्वरुपी बरबाद होतील. आता मला सांगा एवढ सगळ माहित झाल्यावर मच्छिमार राणेँना मत देतील...??? नक्कीच नाही...!!!
 राणेँविरुद्ध कोणत्याही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला की विरोधक राणेँनी निवडणुकीत पैसा आणि दारु वाटप करुन मते मिळवली अशी एकच ओरड मारताना दिसतात पण त्यांना पाडुन घालण्यासाठी कोणताही नवीन मुद्दा शोधण्याचा साधा प्रयत्न सुद्धा करत नाहीत किँवा ज...ैतापुर प्रकल्पासारखा राणेँसाठी "चेकमेट" असणारा मुद्दा सुद्धा काही न बोलताच सोडुन देतात. राणेँकडे एवढा अमाप पैसा आहे की आता सर्व पक्ष त्यांच्या विरोधात एकवटले तरी त्या सर्वाँकडे मिळुन तेवढा पैसा नसेल. त्यामुळे राणेँप्रमाणे लोकांना निवडणुक काळात पैसा पुरवुन विरोधक त्यांना हरवु शकत नाही. कटु असले तरी ते सत्य आहे. फक्त पैसा हाच निवडणुक निकालासाठी निकष असता तर नगरपालिका निवडणुकीत राणे कधी पडलेच नसते याचा विचार विरोधकांनी करायला हवा. विरोधक नकारात्मक विचार करुन राणेँविरुद्ध कधीच जिँकु शकणार नाहीत पण सकारात्मक विचाराने जैतापुर प्रकल्पासारखे नवीन मुद्दे जनतेसमोर आणतील तर 2014 निवडणुकांमध्ये राणेपर्वाचा अस्त नक्कीच होईल.
 जर जैतापुरचा वणवा देवगड आणि विजयदुर्ग या प्रामुख्याने आंबा उत्पादक आणि मच्छिमार यांच्या पट्ट्यात भडकवला तर तो विझवणे राणे किँवा अन्य कोणालाच शक्य नाही. विरोधकांनो तुमच्या भात्यात जैतापुररुपी ब्रम्हास्त्र असताना तुम्ही अजुनही कित्येक वर्षे त...सेच राहुन गंजलेले दहशतवादासारखे मुद्दे काढुन आपलाच वार बोथट करत आहात.रवंथ करुन कंटाळलेल्या दहशतवादाच्या मुद्द्यावर राणेँविरुद्ध मत द्यायला जनता आता मुर्ख राहिली नाही. आता आलेल्या सुवर्णसंधीचा फायदा घ्यायचा की नेहमीप्रमाणे संधी दवडुन पराभव पत्करायचा याचा निर्णय फक्त आणि फक्त तुम्हीच घ्यायचा आहे. पर्यावरणाची काळजी असणारा कोकणचा लोकप्रतिनिधी असावा त्याचप्रमाणे आपल्या स्वार्थापायी कोकणच्या हिरव्यागार निसर्गाचा विनाश करु पाहणा-या राणेँसारख्या नेत्यांचा कोकणच्या राजकीय पटलावरुन कायमचा अस्त व्हावा यासाठी अगदी पोटतिडकीने हा लेख लिहीला आहे. जैतापुरच्या विनाशकारी प्रकल्पापासुन कोकणचा निसर्ग वाचवण्याची तुमची तयारी असेल तर तुम्हाला मदतीचा हात देण्यास आम्ही नेहमीच तयार आहोत. सरतेशेवटी देव विरोधकांना सुबुद्धी देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना...!!!
॥ जय कोकण ॥
काही दिवसांपुर्वी युनेस्कोने पश्चिम घाटाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिल्याने समस्त कोकणवासियांची मान अभिमानाने उंचावली कारण यापुढे पश्चिम घाटाचा समावेश ताजमहल सारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांसमवेत केला जाणार आहे. पण काँग्रेसचे नारायण राणेँसारखे जे तथाकथित नेते जैतापुर अणुप्रकल्पासारखे विनाशकारी प्रकल्प निसर्गरम्य कोकणवर लादु पाहत होते त्यांचे मात्र या बातमीन धाबे दणादणले. शेवटी आपले रोजचे विकासाचे तुणतुणे वाजवत काल नारायण राणेँनी गरळ ओकली. पश्चिम घाटाला जागतिक वारसास्थळांचा दर्जा दिल्यास कोकणातील विकास पुर्णपणे थांबेल अशी बोँबाबोँब करत राणेँनी या ऐतिहासिक घटनेला कडाडुन विरोध केला. राणेँनी एका प्रश्नाचे जाहीरपणे उत्तर द्यावे की पश्चिम घाटाला हेरिटेज दर्जा देणे नक्की कोकणच्या विकासाला मारक आहे की राणेँच्या स्वतःच्या विकासाला मारक आहे...? उद्या जर पश्चिम घाट जागतिक वारसास्थळ म्हणुन घोषित झाले तर राणेँनी पैसा कमवण्यासाठी कळण्यात अवैध मायनिँगला पाठिँबा देत सिँधुदुर्गच्या निसर्गाचा जो सत्यानाश चालवला आहे ते मायनिँग कायमस्वरुपी बंद पडेल. राणेँच्या घरात हप्त्यांरुपी वाहणारा पैशांचा धबधबा कायमस्वरुपी बंद पडेल. एरव्ही एकमेकांकडे तोँड फिरवुन बसणारे भ्रष्टाचारमहर्षी शरदचंद्र पवार राणेँच्या मदतीला धावुन आले आहेत कारण पश्चिम घाटाला हेरिटेज दर्जा दिल्यास जो जैतापुरचा विनाशकारी प्रकल्प राणे आणि पवार संघनमताने कोकणवर लादु पाहत आहेत तो बंद करावा लागेल आणि या दोघांचे राजकीय स्वार्थ आणि पैसे खड्ड्यात जातील. परिणामी कोकणच्या निसर्गाचा विनाश थांबेल आणि राणे-पवार द्वयीँचा आर्थिक विकास थांबेल. त्यामुळेच यांची पोटदुखी वाढली आहे. भाबड्या जनतेला पश्चिम घाट जागतिक वारसास्थळ झाल्यास यापुढे कोकणात घरे बांधता येणार नाहीत किँवा उद्योगधंदे उभारता येणार नाही अशी खोटारडी भीती दाखवत आहेत. एरव्ही या दोघांनाही जनतेची किती काळजी आहे किँवा या दोघांनी एकत्रितपणे जनतेचा (की स्वतःचा?) किती विकास केलाय हे लोकांना चांगल्याप्रकारे माहिती आहे. आयुष्यभर पर्यावरणाचा अभ्यास करणा-या माधव गाडगीळांचा अहवाल खोटा ठरवताना धड दहावी देखील पास नसणारे नारायण राणे आपला अडाणीपणा लोकांसमोर आणत आहेत. ज्या गोष्टीचा समस्त कोकणी लोकांना अभिमान आहे त्याच गोष्टीला विरोध करुन राणेँनी आपली राजकीय तिरडी अजुन घट्टपणे बांधली आहे. नारायण राणे ये पब्लिक है, सब जानती है...!
 काँग्रेसच्या स्वार्थी राजकरणात राणे आता एवढे आकंठ बुडालेले आहेत की कोणे एके काळी शिवसेनेत असताना त्यांनी सिँधुदुर्गला प्रयत्नांची शिकस्त करुन "पर्यटन जिल्हा" म्हणुन घोषित केले होते ही गोष्ट देखील ते जाणीवपुर्वक विसरलेले दिसतात. शिवसेनेत असत...ाना कोकणचा पर्यटनाने विकास करायचा निर्धार राणेँनी केला होता पण काँग्रेसवासी झाल्यावर कोकणचा विकास बाजुलाच ठेवुन कोकणच्या निसर्गरम्य पर्यावरणाचा विनाश करण्याचा एककलमी कार्यक्रम राणेँनी हाती घेतला आहे आणि त्यांचे पश्चिम घाटासंबंधी कालचे वक्तव्य याचेच फलित म्हणावे लागेल. पश्चिम घाट जागतिक वारसास्थळ म्हणुन घोषित झाले तर माथेरान किँवा महाबळेश्वर पेक्षाही कितीतरी पटीने जास्त पर्यटक जगभरातुन कोकणात येतील आणि कोकणचा पर्यटनाने विकास होईल पण राणेँचा मुळी त्या विकासालाच विरोध आहे. ज्या जैतापुर प्रकल्पामुळे कोकणचा विनाश निश्चित आहे परंतु राणेँचा वैयक्तिक आर्थिक विकास होणार आहे तोच प्रकल्प राणे कोणत्याही परिस्थितीत रेटु पाहत आहेत. आंबा बागायतदरांच्या प्रश्नांवर फार मोठी तळमळ असल्याचा आव आणताना सध्या राणे दिसतायेत पण जैतापुर प्रकल्पाला पाठिँबा देऊन आंबा बागायतदारांचा कर्दनकाळही तेच बनत आहेत. मग हा विरोधाभास कशासाठी...? संपुर्ण कोकणात राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणारे नारायण राणे आज कोकणी लोकांच्या मनातुन एवढे खाली उतरले की धड सिँधुदुर्गात देखील आपलं अस्तित्व, आपला प्रभाव ते स्पष्टपणे दाखवु शकत नाही याला कारणीभुत त्यांच्या वागण्यातील हा दुटप्पीपणा आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर वाढत गेलेली स्वार्थी व्रुत्ती आहे.
 नारायण राणे शिवसेनेत असताना एक काळ असा होता की माझ्यासारखे कित्येक कोकणवासी त्यांचे कट्टर समर्थक होते कारण विरोधकांनी राजकीय हत्या, अपहरण असे कितीही आरोप राणेँवर केले तरी त्यावेळी कोकणातल्या सामान्य लोकांचे राणेँनी कधीही वाईट चिँतीले नव्हते.... अवघ्या 8 महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत राणेँनी मागासलेल्या सिँधुदुर्गाला रस्ते, पाणी, रोजगार इत्यादी सर्वच मुलभुत गरजांच्या बाबतीत प्रगतीपथावर नेले. राणे त्यावेळी खरोखरच "कोकणचे वाघ" होते. अशा या आमच्या वाघाला शिवसेना आणि उद्धव ठाकरेँनी डिवचल्यावर सगळा कोकण राणेँच्या मागे खंबीरपणे उभा राहिला कारण कोकणवासियांचा शिवसेनेपेक्षा राणेँवर जास्त विश्वास होता. पोटनिवडणुकीमध्ये साक्षात बाळासाहेबांनी सभा घेऊन देखील परशुराम उपरकरांची अनामत रक्कम वाचु शकली नाही कारण शिवसेनेने या आमच्या लाडक्या नेत्याच्या रुपाने कोकणी लोकांचा स्वाभिमान ठेचण्याचा प्रयत्न केला होता. राणेँसोबत त्यांचे जे समर्थक आमदार त्यांच्यासोबत बाहेर पडले त्यांना देखील कोकणवासियांनी भरघोस मतांनी विजय मिळवुन दिला.
 आमचे लाडके 'दादा' कोणत्याही पक्षामध्ये गेले तरी फक्त कोकणच्याच विकासाचा विचार करतील असा 100% विश्वास त्यावेळी कोकणच्या लोकांना होता. लवकरच 'कोकणचा स्वाभिमान' काय असतो याची प्रचिती काँग्रेसवाल्यांना देखील आली. ज्या मुख्यमंत्रीपदाची ग्वाही दे...ऊन सोनिया गांधीने राणेँना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता ते पद मिळत नाही म्हटल्यावर "कोकणच्या वाघा"ची डरकाळी दिल्लीमध्ये ऐकु आली. काँग्रेसच्या आजपर्यँतच्या इतिहासात जे करायची हिँमत कोणा खासदाराला झाली नव्हती ती किमया कोकणच्या एका आमदाराने म्हणजेच राणेँनी केली. दिल्लीत जाऊन त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिँग आणि अहमद पटेलांना पत्रकार परिषद घेऊन संपुर्ण देशासमोर त्यांची लायकी काढली आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. साहजिकच एक कोकणचा रहिवासी म्हणुन छाती आभिमानाने फुगुन आली.
एरव्ही आपल्या सभांमध्ये राणेँना न चुकता शिव्या देणा-या बाळासाहेबांना देखील राणेँचे हे दिल्लीतील रौद्ररुप पाहुन थोड्या वेळापुरता का होईना आपल्या तालमीत तयार झालेला शिष्य म्हणुन अभिमानच वाटला असणार. बाळासाहेब मनातल्या मनात पुटपुटले असतील "शाब्बास रे पठ्ठ्या...!!!"
त्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी राणेँनी ज्या प्रकारे त्या इटालियन बाईचे पाय चाटले, वारंवार दिल्लीत जाऊन लाचारी पत्करली त्यावेळी मात्र मान शरमेने खाली झुकली. काँग्रेसची नालायक संस्क्रुती जमत नसल्याने राणेँनी एखादा नवीन पक्ष...काढला असता तर त्याला देखील आम्ही भरभरुन प्रतिसाद दिला असता पण या लाचारीनंतर राणे नजरेतुन पहिल्यांदा उतरले. त्या दिवसापासुन त्यांचे समर्थन करणे सोडुन दिले मात्र त्यांना विरोध कधीच केला नव्हता कारण शेवटी कितीही झाले तरी बाकीच्या पक्षांनी राणेँना प्रवेश देणे नाकारल्यावर नाईलाजापोटी राणेँनी केलेली ती एक "राजकीय तडजोड" होती. कालांतराने काँग्रेसी डुकरांच्या सहवासात राहुन SLOW POISONING झाल्याप्रमाणे राणेँमध्ये स्वार्थाचे विष हळुहळु भिनु लागले. म्हणतात ना- ढवळ्याशेजारी बांधला पवळा, गुण नाही पण वाण लागला. इतके दिवस कोकणच्या लोकांच्या भल्याचा विचार करणारा आमचा नेता आता स्वतःचा आणि आपल्या स्वार्थी पक्षाचा प्रथम विचार करु लागला. याची पहिली प्रचिती कळणे मायनिँगच्या वेळी आली.
लोकांनी एखाद्या प्रकल्पाला विरोध केल्यावर कधीही लोकांच्या भल्याचा विचार करत मागे हटणा-या राणेँनी कळणेत मात्र पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावुन लढणा-या लोकांना पोलिँसाकरवी मारहाण केली आणि आंदोलकांवर खोटे आरोप लावुन आंदोलन दडपण्याचा ...प्रयत्न केला. ज्या लोकांनी भरभरुन प्रेम, आशिर्वाद दिले त्याच मायबाप जनतेवर अमानुष लाठीमार करवणा-या या माणसाविषयी मनात एक वेगळीच सणक निर्माण झाली आणि मनात जो होता-नव्हता तो आदर देखील संपला. आता राणेँचा मी एक कट्टर विरोधक बनलो होतो. राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर निसर्गाची देणगी लाभलेला कळणेचा निसर्गरम्य पट्टा मायनिँग करत त्यांनी ओसाड करुन टाकला. काँग्रेसचा निर्लज्जपणा आणि सत्तेचा माज राणेँच्या स्वभावात आता जाणवु लागला होता. त्याच वेळी काँग्रेसने 10000.M.W. च्या विनाशकारी अणुऊर्जाप्रकल्पासाठी कोकणातील जैतापुर ही जागा निवडली. देशातील इतर कोणत्याही भागात या प्रकल्पाला कडाडुन विरोध झाला असता त्यामुळे दादागिरी करण्यासाठी प्रसिद्ध असणा-या नारायण राणेँना आमिष दाखवुन कोकणच्या लोकांवर हा विनाशकारी प्रकल्प लादण्याची चाल पांढ-या पायांच्या इटालियन बाईने खेळली.
 जैतापुरमधील गरीब मच्छिमार आणि शेतकरी या प्रकल्पाविरुद्ध एकवटुन संघर्ष करु लागले पण आता काँग्रेसमध्ये राहुन लोकांचे नाही तर स्वतःचे हित पाहण्याची सवय लागलेल्या राणेँनी कोकणच्या विकासाच्या नावाखाली गुंडगिरी करुन हा प्रकल्प कोकणवर लादायला सुरु...वात केली. विरोध करणा-या गरीब लोकांना भरसभेत मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या सोज्वळ आणि संयमी खासदारपुत्रासमवेत धमक्या दिल्या. राणे कुटुंबाची सभ्यता फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या देशाला कळाली. कारणही तसेच होते. जैतापुरचा विनाशकारी प्रकल्प थोडाथोडका नाही तर तब्बल 2 लाख कोटीँचा होता. कमीत कमी 2-3% जरी पैसे खायला मिळाले तरी ते 400-600 कोटी रुपये होतात. त्यासाठी भविष्यात कोकणचे लोक जपानसारखे किरणोत्साराने मेले तरी राणेँच काहीच बिघडणार नव्हत. शिवसेनेच्या वेळी लोक राणेँना प्रेमाने मते द्यायचे पण आता आपल्या कुकर्माँची कुठेतरी जाणीव झाल्याने असेल किँवा पैशांचा माज आल्याने, राणेँनी निवडणुकांच्या आदल्या दिवशी पैसा आणि दारुवाटप करुन निवडणुका जिँकण्याचे नवीन तंत्र शोधुन काढले. क्षणिक सुखांना भुलणारी कोकणची भाबडी जनता देखील प्रथमतः या प्रलोभनाला बळी पडली.
 जी गोष्ट प्रेमाने कायमस्वरुपी मिळवता येते तीच गोष्ट पैशाने काही काळापुरतीच मर्यादित राहते हा साधा संदर्भ राणे विसरले होते. एव्हाना चिँटु शेखवर गोळीबार करणा-या आपल्या चिरंजीवांना राणे राजकरणात घेऊन आले. मुळातच (अ)स्वाभिमानी असलेल्या या पुत्राने आणि त्यांच्या सहका-यांनी वेँगुर्ल्यात नगरपालिका निवडणुकांच्या वेळी असे काही झेँडे रोवले की राणेँना एकच ओळ म्हणायची वेळ आली,
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिहिलोकी झेँडा..."
आजपर्यँत राणेँनी राजकरणात कितीही गुंडगिरी केली तरी कधी सामान्य लोकांवर हात उचलला नव्हता पण त्यांच्या दिवट्यांने ही उणीव देखील भरुन काढली. वेँगुर्ल्यातील नितेशच्या या उन्मतगिरीनंतर राणेँनी कितीही सारवासारव केली तरी गप्प बसेल ती कोकणी जनता कसली...? नगरपालिका निवडणुकांमध्ये सावंतवाडी आणि वेँगुर्ला नगरपालिकेत एकत्रित मिळुन 35 पैकी 1 जागा निवडुन देत शेवटी जनताच मायबाप असते हा संदेश निवडणुक निकालातुन चपराक लगावली. लगेचच जिल्हा परिषद निवडणुका होत्या पण राणेँच नशीब खुपच ताठ होत कारण राणेँना त्यांच्या तोडीच विरोधकच मिळाले नाहीत. कितीतरी मुद्दे असताना विरोधकांनी फक्त एकच दहशतवाद हा मुद्दा उचलुन धरला आणि सवयीप्रमाणे तोँडावर आपटले. जि.प.निवडणुकांच्या निकाल...ानंतर राणेँनी मिडीयासमोर कितीही आनंद व्यक्त केला तरी मनातुन ते हादरले होते कारण ज्या जिल्हा परिषदेत एकेकाळी 50 पैकी 45 जागांवर त्यांचे वर्चस्व होते त्याच जिल्हा परिषदेवर आता फक्त 33 जागा मिळाल्या होत्या.
जैतापुरचा विनाशकारी प्रकल्प देवगडच्या नजीकच होतोय. उद्या या प्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर किरणोत्सारामुळे बाधित झाल्याने देवगडमधील आंबा उत्पादक शेतकरी आणि मच्छिमार यांना जगात बाजारपेठच उपलब्ध होणार नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ते देशोधडीला लागणार आहेत परंतु त्यांना अद्यापही या गोष्टीची कोणतीच कल्पना नाही. राणेँना ही गोष्ट माहित असली तरी आळीमाळी गुपचिळी अशी भुमिका घेत त्यांनी देवगडातील जिल्हा परिषद निवडणुकीत सगळ्याच्या सगळ्या जागा जिँकल्या आणि या महत्वपुर्ण मुद्द्याबद्दल काहीच भाष्य न करता विरोधक निवडणुकीत हात हलवत घरी आले.
शिवसेनेत असताना नारायण राणेँना संपुर्ण कोकणवर त्यांच्या समर्थक आमदारांचे वर्चस्व असल्याने "कोकणचा वाघ" ही उपाधी दिली जायची. कोकणातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या ताब्यात होत्या आणि या सगळ्यांपेक्षा अतिमहत्वाचे आमच्यासारख्या साम...ान्य लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद भरभरुन त्यांच्या पाठीशी होते. काँग्रेसमध्ये गेल्यावर स्वार्थापायी कोकणच्या विकासाच्या नावाखाली त्यांनी कोकणच्या अतिसुंदर निसर्गाचा जो विनाश केला त्यामुळे लोकांच्या मनातील जागा गमावत आज ते संपुर्ण कोकण सोडाच पण सिँधुदुर्गात देखील आपल्या अस्तित्वासाठी झगडाताना दिसतातयेत. एकेकाळी संपुर्ण कोकणात राणेसमर्थक आमदारांची खैरात असायची पण आता स्वतः राणे सोडले तर दुसरा कोणताही काँग्रेसचा आमदार कोकणात दिसत नाही. जो सिँधुदुर्ग राणेँच्या हातातुन कधीच सुटणार नाही अशी धारणा होती त्या सिँधुदुर्गातील तिन्ही नगरपालिका आज राणेँच्या हातुन निसटल्या आहेत फक्त विरोधकांच्या मुर्खपणामुळे जिल्हा परिषद तेवढी हातात शिल्लक आहे. "कोकणचा वाघ" ही उपाधी दुर जात आता फक्त "कोणचा वाघ" ही उपाधी शिल्लक राहिली आहे.
2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी अजुन 2 वर्षाँचा कालावधी शिल्लक आहे. आपल्या सिँधुदुर्गात आज आपली एवढी बिकट अवस्था का झाली याचा राणेँनी पुन्हा एकदा विचार करावा. काँग्रेसच्या आमिषांना बळी न पडता एकदा आत्मपरिक्षण करावे. सिँधुदुर्ग ...आणि कोकणातील तमाम जनतेला पुर्वीप्रमाणे लोककल्याणाचे निर्णय घेणारे दादा हवे आहेत. विरोधकांनी सुद्धा विचार करायची योग्य वेळ आली आहे. नसलेल्या दहशतवादाचे गंजलेले अस्त्र घेऊन राणेँना विरोध करणार आहात की राणे लादु पाहत असलेल्या जैतापुरच्या विनाशकारी प्रकल्पाचे निवडणुकीमध्ये ब्रम्हास्त्रात रुपांतर करुन राणेँना कायमचा शह देणार आहात...? आता जर जैतापुर प्रकल्प हा विषय रत्नागिरीपुरता मर्यादित ठेवलात तर तुमच्या या मुर्खपणाला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल. जैतापुरच्या विषयाचे येत्या निवडणुकांमध्ये ब्रम्हास्त्रात रुपांतर करायचे असेल तर आतापासुनच तयारी करावी लागेल. कोणताही विषय आपोआप भडकत नाही. आग लावायची असेल तर ठिणगी पाडावीच लागते. मात्र ठिणगी पाडायचे कष्ट कोणाला तरी घ्यावेच लागतात अन्यथा यशाची गोड फळे चाखता येत नाही. एक गोष्ट नीट ध्यानात घ्या की कळणेतील मायनिँगप्रश्नी सुरुवातीला आर्थिक लाभापायी आक्रमक असलेले राणे सध्या मात्र लोकांच्या कडाडुन होणा-या विरोधाला घाबरुन कोलांटी उडी मारत मायनिँगला विरोध करत आहेत कारण त्यांना मतांपायी पैशांवर पाणी सोडणे शक्य आहे. परंतु जैतापुरप्रश्नी उद्या सिँधुदुर्गातील लोक जरी भडकले तरी केँद्रातुन येणा-या पक्षीय दबावामुळे जैतापुरप्रश्नी कोलांटीउडी मारणे राणेँना शक्य नाही. ते पुर्णपणे कोँडीत सापडतील आणि तिथेच त्यांचा चेकमेट होईल.
 जैतापुरच्या अणुप्रकल्पाने आपली पोरं वेगवेगळी व्यंग घेऊन जन्माला येतील हे पटवुन दिल्यावर उद्या कोणती स्त्री राणेँच्या बाजुने मतदान करेल...?
तीच गत देवगडातील आंबा उत्पादकांची आहे. जैतापुरच्या अणुप्रकल्पाने संपुर्ण कोकणातील उष्णता वाढुन आंब्या...चे उत्पादन घटेल आणि त्यातही जे आंबे उत्पादित होतील ते किरणोत्सारबाधित असल्याने जागतिक बाजारपेठेत ते खरेदी करुन कोणीही खाण्याचा प्रयत्न करणार नाही, ही गोष्ट सप्रमाण पटवुन दिल्यावर आंबा बागायतदार राणेँना मत देतील का...?? मच्छिमारांची परिस्थिती काही वेगळी नाही. जैतापुर प्रकल्पातुन सोडल्या गेलेल्या गरम पाण्याने सगळ्या समुद्राचे तापमान खुप मोठ्या प्रमाणात वाढुन मासे आणि त्यांची अंडी मरतील. माशांची पैदास कित्येक पटीने कमी होईल. जे मासे उरतील त्यातील बहुतांशी किरणोत्सारबाधित असल्याने लोक ते विकत घेऊन कँन्सरसारख्या आजाराला निमंत्रण द्यायचा मुर्खपणा करणार नाहीत. थोडक्यात काय तर सिँधुदुर्गातील आंबा उत्पादक आणि मच्छिमार या प्रकल्पामुळे कंगाल होऊन कायमस्वरुपी बरबाद होतील. आता मला सांगा एवढ सगळ माहित झाल्यावर मच्छिमार राणेँना मत देतील...??? नक्कीच नाही...!!!
 राणेँविरुद्ध कोणत्याही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला की विरोधक राणेँनी निवडणुकीत पैसा आणि दारु वाटप करुन मते मिळवली अशी एकच ओरड मारताना दिसतात पण त्यांना पाडुन घालण्यासाठी कोणताही नवीन मुद्दा शोधण्याचा साधा प्रयत्न सुद्धा करत नाहीत किँवा ज...ैतापुर प्रकल्पासारखा राणेँसाठी "चेकमेट" असणारा मुद्दा सुद्धा काही न बोलताच सोडुन देतात. राणेँकडे एवढा अमाप पैसा आहे की आता सर्व पक्ष त्यांच्या विरोधात एकवटले तरी त्या सर्वाँकडे मिळुन तेवढा पैसा नसेल. त्यामुळे राणेँप्रमाणे लोकांना निवडणुक काळात पैसा पुरवुन विरोधक त्यांना हरवु शकत नाही. कटु असले तरी ते सत्य आहे. फक्त पैसा हाच निवडणुक निकालासाठी निकष असता तर नगरपालिका निवडणुकीत राणे कधी पडलेच नसते याचा विचार विरोधकांनी करायला हवा. विरोधक नकारात्मक विचार करुन राणेँविरुद्ध कधीच जिँकु शकणार नाहीत पण सकारात्मक विचाराने जैतापुर प्रकल्पासारखे नवीन मुद्दे जनतेसमोर आणतील तर 2014 निवडणुकांमध्ये राणेपर्वाचा अस्त नक्कीच होईल.
 जर जैतापुरचा वणवा देवगड आणि विजयदुर्ग या प्रामुख्याने आंबा उत्पादक आणि मच्छिमार यांच्या पट्ट्यात भडकवला तर तो विझवणे राणे किँवा अन्य कोणालाच शक्य नाही. विरोधकांनो तुमच्या भात्यात जैतापुररुपी ब्रम्हास्त्र असताना तुम्ही अजुनही कित्येक वर्षे तसेच राहुन गंजलेले दहशतवादासारखे मुद्दे काढुन आपलाच वार बोथट करत आहात.रवंथ करुन कंटाळलेल्या दहशतवादाच्या मुद्द्यावर राणेँविरुद्ध मत द्यायला जनता आता मुर्ख राहिली नाही. आता आलेल्या सुवर्णसंधीचा फायदा घ्यायचा की नेहमीप्रमाणे संधी दवडुन पराभव पत्करायचा याचा निर्णय फक्त आणि फक्त तुम्हीच घ्यायचा आहे. पर्यावरणाची काळजी असणारा कोकणचा लोकप्रतिनिधी असावा त्याचप्रमाणे आपल्या स्वार्थापायी कोकणच्या हिरव्यागार निसर्गाचा विनाश करु पाहणा-या राणेँसारख्या नेत्यांचा कोकणच्या राजकीय पटलावरुन कायमचा अस्त व्हावा यासाठी अगदी पोटतिडकीने हा लेख लिहीला आहे. जैतापुरच्या विनाशकारी प्रकल्पापासुन कोकणचा निसर्ग वाचवण्याची तुमची तयारी असेल तर तुम्हाला मदतीचा हात देण्यास आम्ही नेहमीच तयार आहोत. सरतेशेवटी देव विरोधकांना सुबुद्धी देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना...!!!

२ टिप्पण्या:

  1. Hello. I liked your honest opinions. I am from Kharepatan (Tal-kankavli). May I request you please to write something about the education system and the educational needs in Konkan? Once again.. thank you for your writing. I am not inclined towards any political party. but your writing gives me great understanding of ground situation. Thank you.
    Regards.

    उत्तर द्याहटवा
  2. सरतेशेवटी देव विरोधकांना सुबुद्धी देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना...!!!
    ANI MATADARANASUDHDHHA.

    उत्तर द्याहटवा