सोमवार, २२ जुलै, २०१३

वेँगुर्ल्यात काढलेली लोकशाहीची धिँड...!

5 डिसेँबर,2011...! याच दिवशी वेँगुर्ल्यात लोकशाहीच्या अधःपतनाची सुरुवात झाली. राजकीय वैमनस्यातुन विलास गावडेंच्या अनुपस्थितीत त्यांची बायका-पोरं घरी असताना नितेश राणेँच्या स्वाभिमान समर्थकांनी  घरावर हल्ला चढवला आणि इतके दिवस राजकीय दहशतीविरोधात लोकांच्या मनात धुमसत असणा-या ज्वालामुखीचा असा काही विस्फोट झाला की वेँगुर्ला नगरपालिकेत काँग्रेस पक्ष औषधालाच शिल्लक राहिला. निवडुन आलेले विरोधी पक्षाचे उमेदवार फार मोठे कर्तुत्ववान नसले तरी ते फक्त काँग्रेसविरोधी आहेत आणि दहशतवादाला खतपाणी घालणा-या काँग्रेसला यावेळी पाडुनच घालायचे, या उग्र भावनेने लोकांनी मतदान केले. फक्त वेँगुर्ल्यातच नव्हे तर सावंतवाडी आणि मालवण नगरपालिकेतही लोकांनी काँग्रेसला अद्दल घडवली. पुढे जिल्हा परिषद निवडणुकांवेळी आकडेवारी देऊन सिँधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा सांगली आणि पुणे जिल्ह्यात दहशतवाद कसा जास्त आहे, हे पटवुन देण्याचे आटोकाट प्रयत्न काँग्रेसच्या नेतेमंडळीँनी केले पण दुस-यावर चिखलफेक करुन आपणाला स्वच्छ होता येत नाही, ही मुलभुत गोष्ट ते विसरले. सिँधुदुर्ग जिल्हा सुरुवातीपासुनच सभ्य, सुसंस्क्रुत लोकांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे चोरी, दरोडे, बलात्कार यांचे प्रमाण इकडे मुळातच कमी आहे आणि म्हणुनच सांगली किँवा पुण्याशी तुलना करुन सिँधुदुर्गात दहशवाद नाही म्हणणे चुकीचे ठरेल. तुलना दोन समांतर गोष्टीँची होऊ शकते आणि इकडे विषय दहशतवादाचा नाही तर 'राजकीय दहशतवादा'चा आहे. राजकीय नेतेमंडळी आणि त्यांच्या समर्थकांच्या क्रुपाशीर्वादाने जो दहशतवाद चालतो त्याला 'राजकीय दहशतवाद' म्हणतात आणि तुलना करायचीच असेल तर मधु दंडवते, नाथ पै यांच्या काळात सिँधुदुर्गात किती राडे किँवा राजकीय हत्या झाल्या आणि आता काँग्रेसच्या काळात किती झाल्या, याची तुलना करा. तुम्हाला आपोआप उत्तर मिळेल.

असो, तर वेँगुर्ला नगरपालिकेत लोकांनी धुडकारलेल्या काँग्रेसने, निवडुन आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांपैकी, काहीँना हाताशी धरत राष्ट्रवादी काँग्रेसचाच आपल्या मर्जीतील नगराध्यक्ष बसवला. त्यानंतर त्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाची काँग्रेसतर्फे काढलेली शहरातील मिरवणुक म्हणजे काँग्रेसविरोधी मतदान केलेल्या लोकांच्या जखमेवर चोळलेल्या मीठासारखी होती. जनतेने दिलेल्या जनादेशाची, त्यांच्या विरोधी मताची आम्हाला काडीचीही किँमत नाही आणि काँग्रेसविरोधी निवडुन आलेल्या उमेदवारांनाही आम्ही पुढे विकत घेऊन नगरपालिकेची सत्ता हातात घेऊ शकतो, हाच संदेश काँग्रेस वेँगुर्ल्यातील जनतेला, नगराध्यक्षपदाच्या निमित्ताने देत होती. लोकशाहीतील हा किळसवाणा प्रकार लोकशाहीवर मनापासुन श्रद्धा असणा-या बाबु इनामदारांच्या वर्मी लागला आणि भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत इनामदारांनी आपल्या भावना तरुण भारत वर्तमानपत्रात शब्दाद्वारे व्यक्त केल्या. सिँधुदुर्गात लोकशाहीची कत्तलच करु पाहणा-या काँग्रेसला एका सामान्यातील सामान्य माणसाने त्यांच्या पक्षविरोधी बोलणे कदापि मान्य नव्हते. मग काय खड्ड्यात गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ते नागरिकांना बहाल करणारे डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान...! अरे हो, आंबेडकरांवरुन दोनच महिन्यांपुर्वी आंबेडकरी विचारांवर व्याख्यान देणा-या आदरणीय नारायण राणे साहेबांची आठवण झाली. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांनी राजकरणात घातलेले धुमशान पाहुन आंबेडकरी साहित्याचे सखोल अभ्यासक  असलेले आपले दादा व्यथित होऊन म्हणाले की,

"रिपब्लिकन पक्षाचे राजकरण पाहुन बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा तडफडत असेल."

राणे साहेबांची व्यथा समजण्यासारखी होती आणि त्यात तथ्थ्य होते. राणे साहेब, मग संविधानाची पायमल्ली करत वेँगुर्ल्यातील एका सामान्य नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी धिँड पाहुन बाबासाहेब आंबेडकर तडफडत नसतील का...? ज्या काँग्रेस पक्षाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता, तो 125 वर्षाँची परंपरा असलेला महात्मा गांधी, पंडित नेहरु, लालबहादुर शास्त्री, राजीव गांधी अशा कित्येक महापुरुषांचा पक्ष आहे. मग त्याच पक्षाच्या तिकीटावर निवडुन आलेल्या सभापती महोदया सौ. प्रियांका गावडे आपल्या समर्थकांना घेऊन डाँ. प्रभाकर पवारांची अमानुष मारहाण कशी काय करु शकतात...? डाँ. पवार मुजोर आहेत आणि म्हणुनच लोकांच्या सेवेसाठी आम्ही त्यांना मारहाण केली असे स्पष्टीकरण देत काँग्रेसची नेतेमंडळी आपलीच पाठ थोपटुन घेत आहेत. डाँ. पवार मुजोर आहेत का नाहीत हा संशोधनचा विषय आहे. काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीँना कोणी मुजोर आहेत का नाहीत, हे प्रमाणपत्र द्यायचा अधिकार कोणत्या कायद्याने अथवा संविधानाने दिला...? मुळात काँग्रेसचे प्रियांका गावडेँसारखे लोकप्रतिनिधी मुजोर नाहीत, हे कोणी ठरवायचे...? लोकांनी मत देऊन निवडुन दिले म्हणजे पुढची पाच वर्षे कोणालाही मुजोर म्हणत मारझोड करायचा परवाना किँवा आपल्याविरोधी मतप्रदर्शन करणा-याची धिँड काढण्याचा अधिकार या संविधानाने तर आपल्याला नक्कीच दिलेला नाही. बहुतांश वेळा मतांच्या घाणेरड्या राजकरणात जे होते, ते नेहमीच खरे नसते.
काही वेळासाठी राणेसमर्थकांच्या म्हणण्याप्रमाणे डाँ. पवार हे मुजोरच आहेत असे ग्रुहित धरु. अगदी तरीसुद्धा अशा मुजोर वैद्यकीय अधिका-याची वरिष्ठ अधिका-याकडे तक्रार करण्याचा अधिकार सभापतीँना आहे, जनतेचे प्रश्न रेँगाळत ठेवणा-या मुजोर डाँक्टरला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी म्हणुन सभापती गावडे प्रयत्नशील राहु शकल्या असत्या, पण समोरचा मुजोर आहे मग लोकप्रतिनिधीही सगळ्या नितीमुल्यांना तिलांजली देत तिथे राडा घालायचा, ही नेमकी कोणती संस्क्रुती...? जुलमी ब्रिटीशांचेही ह्रुदयपरिवर्तन करु पाहणारी महात्मा गांधीची संस्क्रुती काँग्रेसने अंगीकारली आहे.   मग काँग्रेसचेच लोकप्रतिनिधी त्या संस्क्रुतीला हरताळ का फासत आहेत...?
2005 मध्ये जेव्हा शिवसेनेच्या भगव्याला जय महाराष्ट्र करत राणे साहेब गांधीटोपी घालुन काँग्रेसवासी झाले तेव्हा निव्रुत्त न्यायाधीश बी जी कोळसेपाटील म्हणाले होते की, "गांधीटोपी घालुन कोणी महात्मा गांधी होत नसतो." पुढच्या काळात मुळच्या स्वभावाला आवर घालत राणे साहेब काँग्रेसमध्ये ब-यापैकी रुळले पण समर्थकांना 'गांधीटोपी' कधीच मानवली नाही. आता आपल्या राणेसमर्थकांचे बेजबाबदार वर्तन पाहुन गांधीजीँच्या आत्म्याचे स्वर्गात काय हाल होत असतील, याचा विचार राणे साहेबांनी करावा. गांधीजी खुप दुर राहिले पण सिँधुदुर्गची ओळख संपुर्ण देशात बँ.नाथ पै, मधु दंडवते यांसारख्या तत्वांचे पुजारी असलेल्या विद्वान नेत्यांचा मतदारसंघ अशी व्हायची पण आज नाथ पै, दंडवतेँच्याच जिल्ह्यात लोकप्रतिनिधीँनी घातलेला राडा किँवा वेँगुर्ल्यात एका व्रुद्धाची काढलेली धिँड पाहुन त्या दोन महान आत्म्यांचा 'आत्मा' लाखो वेळा मरण पावला असेल.व्रुद्धांचा चरणस्पर्श करुन उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेणारी सिँधुदुर्गाची संस्क्रुती, एका व्यथित व्रुद्धाला धिँड काढण्यापर्यँत कलुषित होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते पण आज काँग्रेसच्या या समाजकंटकांनी 'त्या' संस्क्रुतीचेच धिँडवडे उडवले. धिँड कोण काढतात आणि कशापायी काढतात याची तरी जाणीव त्यांना असायला हवी होती. आपल्या दिवाळखोर वागणुकीमुळे जे समाजासमोवर स्वतःच नागवे झाले आहेत, ते दुस-या कोणाला धिँड काढुन त्याला काय नागव करणार...?
एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा राजकीय आकसापोटी केलेला खुन परवडला कारण समोरची व्यक्ती त्याच क्षणी मरते, निदान पुढील परिणाम भोगण्यासाठी ती जिवंत तरी नसते पण आयुष्यभर आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहिलेल्या निरपराध व्यक्तीची जेव्हा विनाकारण तुम्ही व्रुद्धापकाळात धिँड काढता, तेव्हा त्या धिँडीतुन होणारी बदनामी त्यापेक्षाही भयानक असते. त्या व्यक्तीचेच नव्हे तर त्याच्या परिवाराचेही तुम्ही मानसिक खच्चीकरण करता. बाबु इनामदारांची धिँड असो किँवा डाँ.प्रभाकर पवारांवरील हल्ला, 'समजुतदारपणा' हा शब्द काँग्रेस कार्यकर्त्याँच्या डिक्शनरीतुन हरवलेला दिसतोय. दमबाजीने प्रश्न कधी सुटत नसतात, उलट ते वाढतात. समजुतदारपणा दाखवल्यानेच प्रश्न सुटु शकतात आणि हा समजुतदारपणा ज्याच्या अंगी आहे, तो जनावरांपेक्षा वेगळा आहे, म्हणुनच त्याला 'माणुस' म्हणतात, या माणुसकीच्या व्याख्येची जाणीव काँग्रेसवाल्यांना करुन देणे निकडीचे बनले आहे. सत्तेच्या धुंदीत मस्त झाल्याने सहजासहजी ती होईल असे वाटत नाही. सामान्य सिँधुदुर्गवासी तोँडातुन चकार शब्द काढला तर आपला देखील 'बाबु इनामदार' होऊन काँग्रेस कार्यकर्ते धिँड काढतील या भितीने बिळात दडुन बसलेत, तथाकथित विद्वांनांनी आपली लेखणी केव्हाचीच गहाण ठेवली आहे. अशा परिस्थितीत आपण माणसांच्या वस्तीत जगतो का जिवंत मढ्यांमध्ये वावरतो, हा यक्षप्रश्न मला नेहमीच पडतो. जिवंतपणे मेलेली ही मढी विधानसभा-लोकसभा निवडणुकीपुरती तरी जिवंत होऊन 'माणुस' बनुन माणुसकीच्या शत्रुविरुद्ध मतदान करतील आणि अमानवीपणे एका गरीब व्रुद्धाची विनाकारण धिँड काढुन सिँधुदुर्गात लोकशाहीचा खुन पाडणा-या काँग्रेसला त्यांची योग्य ती जागा दाखवतील, अशी अपेक्षा करतो.काँग्रेस कार्यकर्त्याँच्या पाशवी अत्यांचारांची साक्ष म्हणुन 19 जुलै,2013 हा दिवस सिँधुदुर्गच्या इतिहासात नेहमीच 'काळा दिवस' म्हणुन गणला जाईल. लेखाच्या शेवटी महान तत्ववेत्ता कार्लाइलच्या त्या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण करुन देत थांबतो-

"खुज्या माणसांच्या सावल्या मोठ्या व्हायला लागल्या की सूर्यास्त जवळ आला असे समजावे."
मित्रहो, सिँधुदुर्गात खुज्या लोकांच्या सावल्या अगोदरच इतक्या वाढल्या आहेत की आपण आता अस्ताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो आहोत मात्र 'सिँधुदुर्गास्त' होऊ देणे आपल्यापैकी कोणालाच परवडणार नाही.

शुक्रवार, १९ जुलै, २०१३

वैद्यकीय अधिका-याला मारझोड करणारी राणेसमर्थकांची 'काँग्रेसी लोकशाही'...!

सिँधुदुर्गात निरवडे प्राथमिक आरोग्य केँद्राचे अधिकारी प्रभाकर पवार यांना मारहाण केल्यानंतर राणेसमर्थक सभापती प्रियांका गावडे यांनी जी सारवासारव केली ती ऐकुन मला 'डोंबिवली फास्ट'मधील माधव आपटे आठवला. फरक फक्त इतकाच होता की, माधव आपटेची तळमळ असहाय्य अशा व्रुद्ध जोडप्याला रुग्णालयात योग्य ते उपचार मिळावेत यासाठीच होती आणि इकडे सभापती महोदया प्रियांका गावडे यांची धडपड खोट्या अहंकाराला जपण्यासाठी होती.

अगदी डोँबिवली फास्टमध्ये जेव्हा माधव आपटेची भुमिका साकारणारा संदिप कुलकर्णी डाँक्टरच्या डोक्याला पिस्तुल लावुन गरीब आजी-आजोबांचे काम करायला सांगतो, तेव्हा त्याच्या या क्रुत्याने चिडलेली आजीच त्याला जे सांगते, ते खरच प्रियांका गावडेँसारख्या सत्तेचा माज येऊन मुजोर बनलेल्या सभापतीँनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
"ज्या डाँक्टरला आम्ही देव मानतो, त्यालाच तु धमकी देतोयस...? परमेश्वरानंतर नाडीवर बोट ठेवणारा फक्त डाँक्टरच असतो. जीव वाचवणा-यालाच तु जीवे मारण्याची धमकी कशी काय देऊ शकतोस...?"आजीच्या या संतापानंतर माधव आपटेच्या चेह-यावर आलेले अपराधीपणाचे भाव पाहुन बाजुला उभे असलेले आजोबा त्याची समजुत घालताना म्हणतात-
"तुमचा राग बरोबर आहे पण मार्ग चुकीचा होता. दमबाजीन प्रश्न निकालात निघतील अस वाटत पण ते फक्त वाटतच. प्रत्यक्षात त्यामुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात. समजुतदारपणा दाखवल्यानेच प्रश्न सुटु शकतात आणि हा समजुतदारपणा ज्याच्या अंगी आहे, तो जनावरांपेक्षा वेगळा आहे ,म्हणुन त्याला 'माणुस' म्हणतात."

आता डोँबिवली फास्ट आणि निरवडे आरोग्य केँद्रातील प्रकरणाची तुलना होऊ शकत नाही कारण माधव आपटे अन्यायाने पेटुन उठलेला एक सामान्य तरुण होता तर प्रियांका गावडे या सावंतवाडीच्या सभापती आहेत. एका लोकप्रतिनिधीकडुन असे बेजबाबदार वर्तन अपेक्षित नसते, नव्हे ते अक्षम्यच आहे. त्यासाठीच या घटनेची पार्श्वभुमी जाणुन घेणे महत्वाचे आहे.
"निरवडे प्राथमिक आरोग्य केँद्रातील डाँ.प्रभाकर पवार हे आठ दिवस रजेवर असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. लोकांनी सभापती प्रियांका गावडे यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी डाँ.पवार यांना मोबाईलवर संपर्क साधला."
इथपर्यँत सभापतीँनी जे केले ती एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीस साजेस आहे आणि त्यासाठी त्या कौतुकास पात्र आहेत.

त्यानंतर डाँ. पवारांनी मोबाईलवर उद्धट उत्तरे दिली, असे सभापतीँचे म्हणणे आहे. (त्यात तथ्थ्य किती हा संशोधनाचा विषय आहे.)
दरम्यानच्या काळात डाँ. पवार आरोग्यकेँद्रात आले तेव्हा सभापती गावडे डाँक्टरांच्या खुर्चीत बसल्या होत्या आणि डाँक्टरांनी त्यांना तात्काळ आपल्या खुर्चीवरुन उठण्यास सांगितले. त्यामुळे अपमानित झालेल्या प्रियांका गावडेँनी काँग्रेस समर्थकांना सांगुन डाँ. पवारांना मारहाण केली.
डाँ. पवारांनी पोलिसात तक्रार नोँदवताच, प्रकरण अंगावर शेकेल याची जाणीव झाल्याने, आपण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच  अशी मारहाण केल्याचे सभापती म्हणाल्या.
काही वेळासाठी मान्य करु की प्रियांका गावडे यांच्या म्हणण्याप्रमाणे डाँ. पवार त्यांच्याशी मोबाईलवर उद्धटपणे बोलले किँवा स्वभावतःच हा माणुस उर्मट आहे, तरी देखील काही प्रश्न अनुत्तरीत राहतात.

1) उर्मट वर्तन करणा-या डाँ.पवारांची सभापती वरिष्ठांकडे तक्रार करु शकल्या असत्या. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी किँवा बडतर्फ केले जावे, अशी मागणी केली असती तर ती देखील रास्त म्हणता येऊ शकली असती. पण वैद्यकीय अधिकारी उद्धटपणे वागला म्हणुन सभापती देखील सगळ्या लोकशाही मुल्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारणार का...?
जर काँग्रेस कार्यकर्ते डाँ. पवारांना उद्धट म्हणणार असतील तर त्यांनी मारामार करुन कोणत्या सभ्यतेचे प्रदर्शन केले आहे...??
की आपण राणेसमर्थक आहोत, आपल्याला सिँधुदुर्गात कोणाच्या बापाची भिती नाही, अशीच स्वतःची समजुत काँग्रेसच्या कार्यकर्त्याँनी करुन घेतली आहे...???
तसे असेल तर येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सिँधुदुर्गातील जनताच तुम्हाला तुमची खरी लायकी दाखवेल. दादागिरी करणा-यांचे काय हाल होतात याचा प्रत्यय वेँगुर्ला नगरपालिका निवडणुकीत आलाच असेल.

2) जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गेलेल्या सभापतीँना वैद्यकीय अधिका-याच्या खुर्चीत बसायचे कारणच काय...?
वैद्यकीय अधिकारी म्हणजे कार्यालयातला शिपाई नव्हे तर तो एक राजपात्रित अधिकारी असतो आणि पंचायत समितीचा सभापती म्हणजे भारताचा राष्ट्रपती नसतो. सभापतीपदावर असताना आपण कोणत्या खुर्चीत बसावे आणि कोणत्या खुर्चीत बसु नये या गोष्टीँची जर माहिती नसेल तर अशा व्यक्तिला सभापतीपद देणा-या काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. अगोदर स्वतःच चुकीच्या खुर्चीवर बसायचे आणि नंतर कोणी उठवले की अवमान झाला म्हणुन बोँब मारत फिरायचे, याला काय अर्थ आहे...?
मुळात प्रश्न हाच आहे की सभापतीला मान-अवमान हा प्रश्नच कुठे येतो...? तुम्ही सभापती असाल, आमदार वा खासदार परंतु लोकांनी निवडुन दिलेले सेवकच आहात. पाच वर्षाँनी लोकांकडे मतांची भिक मागताना तुम्हाला मान-अपमान बरे नाही आठवत...?? याला मान-अपमान नाही तर सत्तेचा माज म्हणतात आणि सिँधुदुर्गातील सुशिक्षित जनताच तो उतरवणार.

3) वैद्यकीय अधिकारी प्रभाकर पवार यांनी खाजगी कामासाठी 8 दिवस रजा घेतली, त्यात त्यांनी कोणती चुक केली...?
वैद्यकीय अधिका-यांनी रजा न घेता अविरत कामच करत राहावे असा नियम राणेसमर्थकांनी बनवला आहे का...??
निरवडेच नव्हे तर सिँधुदुर्गातील कित्येक आरोग्यकेँद्रात अपु-या कर्मचा-यांमुळे रुग्णांना तात्काळत राहावे लागत आहे आणि रुग्णांच्या गैरसोयीला डाँ. पवार जबाबदार नसुन सत्ताधारी काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. आता कुठे गेले उठसुठ सिँधुदुर्गाच्या विकासाच्या बाता मारणारे कोकणचे तथाकथित विकासपुरुष...?? शासकीय रुग्णालयात 30% जागा रिक्त आहेत, लोकांची पावलापावलावर गैरसोय होतेय, मग कसला डोँबलाचा विकास केलात...???
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या लोकांच्या मुलभुत गरजा आहेत आणि त्या पुर्ण करण्यात काँग्रेस आणि नामदार नारायण राणे साहेब अपयशी ठरणार असतील तर खड्ड्यात गेला तो विकास...!

इकडे प्रश्न कोणा एका प्रभाकर पवारांचा नाही तर सिँधुदुर्गात बळावत चाललेल्या राडासंस्क्रुतीचा आहे, त्यांना मारणा-या प्रव्रुत्तीचा आहे. नामदार नारायण राणेँसारख्या ताकदवान व्यक्तीचा पाठिँबा असेल तर आम्ही जिल्ह्यात कोणालाही लाथाबुक्यांनी तुडवु हिच प्रव्रुत्ती यामागे दिसुन येते. नाथ पै, दंडवतेँच्या कारकिर्दीत सिँधुदुर्ग जिल्हा विद्वान लोकांचा मतदारसंघ म्हणुन ओळखला जायचा आणि आज राणेसमर्थकांनी केलेल्या राडेबाजीमुळेच सिँधुदुर्गची तुलना बिहारशी केली जातेय. महाराष्ट्रात नक्षलवाद्यांनी त्रस्त असलेला गडचिरोलीसारखा जिल्हा सोडला तर दहशदीच्या बाबतीत सिँधुदुर्गचाच नंबर लागतो आणि हा साधासुधा दहशतवाद नसुन 'राजकीय दहशतवाद' आहे. देवाला प्रतिवर्षी बक-याचा बळी द्यावा त्याप्रमाणे कोणी अंकुश राणे प्रत्येक निवडणुकीला बकरा ठरतोय, विधानसभा निवडणुकीदिवशी विरोधी उमेदवार वैभव नाईकवर बंदुक रोखली जातेय. अजुनपर्यँत हा दहशतवाद राजकीय आखाड्यापुरताच मर्यादित असायचा परंतु आता त्याची झळ सामान्य लोकांनाही बसतेय. वेँगुर्ल्यासारख्या सुसंस्क्रुत शहरात स्वाभिमान उतु गेल्यानेच विलास गावडे घरी नसुन त्यांची बायकापोरे आणि व्रुद्ध आईवडील घरात असताना दारावर लाथा मारल्या गेल्या. आता वैद्यकीय अधिकारी प्रभाकर पवारांवर खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठीच हल्ला केला गेला.
मला कीव येते ती जिल्हाधिका-यांवर मुकमोर्चा काढणा-या डाँक्टर्सची...! दोन दिवस या मारहाणीच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिका-यांनी कामबंद आंदोलन केले गेले आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन कोणत्याही ठोस कारवाईशिवाय आंदोलन का मागे घेण्यात आले...? कोणतीही नितीमत्ता नसलेल्या सभापती प्रियांका गावडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतील अशी अपेक्षा करणेच मुर्खपणाचे आहे पण वैद्यकीय अधिका-यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही...?? आजच्या वर्तमानपत्रात डाँक्टर्स फँटर्निटी क्लब व इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे सर्व राजकीय पक्षांना प्रोटोकाँलबाबत माहिती द्यावीत अशा सुचना देण्यात आल्या, ही बातमी वाचुन हसाव की रडाव तेच कळेना. सिँधुदुर्गात काँग्रेससारख्या राजकीय पक्षांना राजकरणातील प्रोटोकाँलच माहित नसतील तर ते राजकरणात झग मारायला आलेत का...??
बर या डाँक्टर्स असोसिएशनमध्ये डाँ.जयेँद्र परुळेकर आणि डाँ.मिलिँद कुलकर्णीँचा समावेश आहे. यातील डाँ.परुळेकर आता काँग्रेसचे अधिक्रुत प्रवक्तेच आहेत आणि डाँ. कुलकर्णीँच्या राणेभक्तीबाबत मी वेगळ लिहायची गरज नाही. ज्या लोकांनी आपली मते, आपले विचार, आपली निष्ठा काँग्रेस आणि राणेँना विकली आहे, अशा लोकांकडुन जिल्ह्यातील डाँक्टर्सना न्याय मिळणे म्हणजे पाकिस्तान दाऊद किँवा डी कंपनीवर कारवाई करील, अशी अपेक्षा ठेवण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत सामान्य लोकांनी डाँक्टर्सच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे गरजेचे होते पण कोणालाच त्यांच्याशी काही देणेघेणे नाही.
अजुन किती दिवस असा निमुटपणे लाथाबुक्यांचा मार खाणार आहात...??? आज डाँ. प्रभाकर पवारांवर जी वेळ आली तीच वेळ तुमच्या-आमच्या पैकी कोणावरही येऊ शकते आणि ते टाळायचे असेल तर काँग्रेस कार्यकर्त्याँच्या आणि राणेसमर्थकांच्या या मुजोरीला विरोध व्हायलाच हवा. सगळीकडुन मार्ग बंद झाले आहेत तरीही सिँधुदुर्गातील सुज्ञ मतदारांनी या राजकीय दहशतवादाला खतपाणी न घालता येत्या निवडणुत अद्दल घडवणे गरजेचे आहे. आता येणारा काळच ठरवेल की दंडवते, नाथ पै यांच्याकडुन शिकलेल्या लोकशाही मुल्यांची आजही आपणाला जाणीव आहे, अभिमान आहे की काळाच्या ओघात आपण कोकणच्या स्वाभिमानालाही तिलांजली दिली आहे...???

शनिवार, ६ जुलै, २०१३

"क्रुषी, ग्रामीण व पर्यावरणपुरक विकासात गुजरातचे योगदान..." * लेखक- नरेँद्र मोदी (मा.मुख्यमंत्री, गुजरात)

'वनराई'चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मोहन धारियाजी यांच्या उत्साहाचा मी नेहमीच अनुभव घेत आलो आहे. गुजरातबद्दल काही चांगले ऐकले की त्वरीत त्यांचा मला फोन येत असतो. अभिनंदन करणे, उत्साह वाढविणे, सार्वजनिक जीवनात चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करणे, प्रेरणा देणे ही सर्व त्यांच्या जीवनाची विभिन्न अंगे आहेत. मोहन धारियाजी पुण्याचे किँवा महाराष्ट्राचे नाहीत असे मी म्हणु शकत नाही पण एवढे निश्चित सांगु शकतो की ते गुजराथीही आहेत. मुडासा येथे त्यांचे पूर्वज राहत होते.मोहन धारियाजी यांच्या नेत्रुत्वाखाली वनराई संस्था पर्यावरण आणि ग्रामीण विकासामध्ये खुप मोठे काम करीत आहे. वनराई संस्थेच्या माध्यमातुन महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वनराई बंधा-याची चळवळ चालते, त्याप्रमाणे आमच्याकडे गुजरातेत 'बोरी बांध' अशी एक चळवळ चालते. बोरी बांधच्या चळवळीत मे-जुन महिन्यात सिँमेटच्या रिकाम्या पोत्यात दगड, वाळू, माती भरुन पाणी अडविण्याचे काम केले जाते आणि ते सुद्धा लाखोच्या संख्येने. काही नद्या अशा आहेत ज्यांच्यावर आम्ही दोन-दोन कि.मी. वर लहान-लहान बोरी बांध बनविले आहेत. त्यामुळे आठ-आठ, दहा-दहा कि.मी. हुन अधिक साठवलेले पाणी जवळ जवळ जानेवारी-फेब्रुवारीपर्यँत वापरता येते. याद्वारे आता ब-याच ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्यामुळे अनेक प्रश्न सुटले आहेत.

* वर्षा जलसंचय-संरक्षण

गुजरातने 'वर्षा जलसंचय-संरक्षण व सिँचन' यामध्ये खुप काम केले आहे. यासाठी सहा लाखांहुन अधिक बांधकामे गेल्या 10 वर्षात उभी केली आहेत. मजेची गोष्ट अशी की, या सर्व चळवळी, सर्व कामे सरकारी आणि खासगी या दोघांच्या भागीदारीने चालली आहेत. यामध्ये 60% सरकार गुंतवते व 40% लोक गुंतवतात. लोकांच्याच हाताने, त्यांच्याच देखरेखेखाली व त्यांच्याच गावात काम होत असते. गुजरातमध्ये 10 वर्षातील 7 वर्षे दुष्काळच असतो. त्यामुळे साहजिकच पाण्याचाही मोठा अभाव असतो. येथे नर्मदा नदीशिवाय बारा महिने वाहणारी दुसरी कोणतीही नदी नाही. असे असूनही जलसंचयामुळे गुजरातचा क्रुषी विकासदर 11 टक्के आहे. भारताचा क्रुषी विकासदर 3 टक्के आहे. गेले 20 वर्षे भारताचा क्रुषी विभाग 4 टक्के क्रुषी विकासदराचे उद्दिष्ट निश्चित करत आहे. यासाठी प्रत्येक वेळी योजना बनविली जाते परंतु आजपर्यँत 3 टक्क्यांच्या पुढे विकासदर जाऊ शकलेला नाही. गुजरात याला अपवाद आहे. देशातील क्रुषी प्रधान मानल्या गेलेल्या राज्यांमध्ये गुजरातचे नाव कधीच नव्हते. यात पंजाब, हरियाणा, गंगा-यमुनेचे किँवा गोदावरी क्रुष्णेलगतचे प्रदेश येत होते परंतु आज संपुर्ण देशात गुजरात हरितक्रांतीचे नेत्रुत्व करत आहे. त्याचे एक कारण वर्षा जलसंचय संरक्षण.

*ठिबक सिँचनाची चळवळ

आमच्याकडे गेल्या 40-50 वर्षात ठिबक सिँचनाचे काम केवळ हजार-दीड हजार हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. आपले अधिकांश पाणी पाटाच्या जलप्रवाह सिँचन पद्धतीमुळे खर्च होते. जलप्रवाह सिँचन पद्धती थांबविल्याशिवाय आणि सुक्ष्म सिँचनाशिवाय आपण पाणी वाचवू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्याने ठिबक सिँचनाची चळवळ सुरु केली. याद्वारे 20 वर्षात सुमारे चार लाख एकरापर्यँत आम्ही पोहोचलो आहोत. आपल्या देशात अशी समजूत होती की, उसाचे पीक जलप्रवाह सिँचनपद्धती शिवाय घेता येणार नाही. मात्र आम्ही उसाचे पीक पुर्णपणे तुषार सिँचनाने पाणी देऊन घेत आहोत. आमच्याकडे उत्पादित होणा-या उसात साखरेचे प्रमाण अधिक आहे.या सर्व गोष्टीँचा आम्हाला खुप फायदा झाला आहे.

* नदीजोड प्रकल्प-:

आमच्याकडील साबरमती नदी आपण पाहिली असेल. शाळेतील एखाद्या मुलाला साबरमती नदीवर निबंध लिहावयास सांगितले तर तो काय लिहिल...?तो लिहिल- 'नदीत वाळु असते. नदीत सर्कस येते. नदीत क्रिकेट खेळण्यासाठी चांगले मैदान असते.' कारण नदीत पाणी असल्याचे त्याने कधी पाहिलेले नाही. साबरमती नदीची ही भयावह अवस्था होती. आम्ही नदीजोडचा प्रयोग केला. नर्मदा नदीचे पाणी साबरमतीला जोडले. आज आपण अहमदाबादला आलात तर 365 दिवस, 24 तास साबरमती नदी पाण्याने भरलेली दिसेल मात्र या नदीतील पाणी नर्मदेचे आहे. साबरमती नदी आता पुर्णपणे वाहत आहे. एवढेच नाही तर त्याचा परिणामही पाहण्यासारखा आहे. या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही 'इंडियन इन्स्टिट्युट आँफ मँनेजमेँट'ला सांगितले. त्यांनी या भागाचा सामाजिक आर्थिक व राजकीय सर्व्हे केला. या अभ्यासातुन मोठे आश्चर्यकारक परिणाम समोर आले. नर्मदेचे पाणी साबरमतीत सोडल्याने अहमदाबादेच्या सभोवताली सर्वत्र वाँटर टेबल तयार झाले. अहमदाबाद म्युनिसिपल काँर्पोरेशनला शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पाणी खेचण्याचा जो एका वर्षाचा 15 करोड रुपये वीज खर्च करावा लागत होता,तो पाण्याची पातळी वर आल्यामुळे कमी झाला. वर्षाला 15 कोटीची बचत! एवढेच नाही तर लहान-लहान हौसिँग सोसायट्यांच्या स्वतःच्या ट्युबवेलचे वीज बिल जे पुर्वी दोन हजार किँवा अडीच हजार येत होते, ते बिल आज पाण्याची पातळी वर आल्यामुळे 400, 500, 600 रुपये येऊ लागले. अहमदाबादला दुसरे नाँर्थ गुजरातचे पाणी आहे. आम्ही 2500 पी.एच. पाणी पितो. साबरमतीत नर्मदेचे आलेले पाणी सुमारे 100 पी.एच. बिसलरीसारखे शुद्ध व नैसर्गिक आहे. शुद्ध पाण्यामुळे थोड्याफार प्रमाणाक रोगप्रतिकारक शक्ती वाढुन त्याचा आरोग्यासाठी फायदा होत आहे.

* स्वच्छ व शुद्ध पाण्यामुळे आरोग्य रक्षण-:
आमच्या राज्यात कधी चार-पाच दिवस सतत पाऊस झाला तर प्रत्येक गरिबाच्या घरी, झोपडपट्टीत आजारांची रांग लागत असे. वर्तमानपत्रात फोटो छापुन येत की, हाँस्पिटलमध्ये रुग्णांना झोपायला जागा नाही. लोक गँलरीत पडुन आहेत. एकेकाळी ही परिस्थिती होती. मात्र या शुद्ध पाण्यामुळे गेल्या आठ वर्षात एकही साथीचा रोग पसरला नाही. आजारी लोकांच्या रांगा लागल्याचा किँवा हाँस्पिटलमध्ये खाली झोपावे लागल्याचा एकही फोटो एकाही वर्तमानपत्रात छापुन आला नाही. 

* स्वतंत्र हवामान बदल विभाग-:
गुजरातने नैसर्गिक साधनसामग्रीची विशेष काळजी घेऊन भरपुर काम केले आहे. सध्या भारतात गुजरात हे असे एकमेव राज्य आहे की, जेथे स्वतंत्र 'हवामान बदल विभाग' आहे. जगात अशी केवळ चार सरकारे आहेत. हवामान बदल विभाग असणा-या जगातील या चारांपैकी गुजरात एक असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राज्याचा स्वतंत्र हवामान बदल विभाग असल्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीकडे पर्यावरणपूरक विकासाच्या द्रुष्टीकोनातून पाहतो. त्याचा एक परिणाम असा दिसून आला की गेल्या तीन वर्षाँपासुन भारत जो कार्बन क्रेडिट मिळवितो, त्याच्या 70-80 टक्के कार्बन क्रेडिट एकटा गुजरात मिळवितो.

* स्थलांतराची समस्या : गुजरातचा प्रयोग

मोहन धारियाजीँनी सार्वजनिक जीवनाला नवीन वळण दिले आहे. सतत संशोधन करणे, प्रयोग करणे, गावांना व लोकांना जाग्रुत करणे हे त्यांनी केलेले फार मोठे कार्य आहे. 'गावातून शहराकडे होणारे स्थलांतर' ही आमच्या येथीलही समस्या असली तरी गुजरातमध्ये आता एक नवीन वातावरण तयार होत आहे कारण आम्ही 'ज्योतिग्राम' या नावाची योजना आणली आहे. या योजनेद्वारे आम्ही प्रत्येक गावात 24 तास वीज पुरवतो. संपुर्ण देशात गुजरात कदाचित एकटे राज्य आहे, जेथे वीज बंद पडत नाही. 24 तास वीज उपलब्ध झाल्यामुळे येथील ग्रामीण जीवनमानात मोठा फरक पडला आहे. याद्वारे गावातुन शहराकडे जाणा-यांची संख्या 30 टक्क्यांनी घटली आहे. तसेच ग्रामीण भागातही आता आम्ही 'ब्राँडब्रँड' जोडणी केली आहे. इंटरनेट व टी.व्ही सारख्या गोष्टी उपलब्ध झाल्यामुळे पुर्वी गावात न राहणारे डाँक्टर्सही आता गावातच राहु लागले आहेत. एकुणच जीवनाचा दर्जा बदलल्यामुळे ग्रामीण भागात सर्व सुख सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आता आम्ही ग्रामीण भागात एक नवी सेवा देणार आहोत. 'दुर शिक्षण योजना'.याद्वारे गावातील मुलांना त्यांच्या गावातच चांगले शिक्षण मिळु शकेल. या दुर शिक्षण योजनेद्वारे शहरातील उत्तमात उत्तम शिक्षक व्हिडिओ काँन्फरन्सच्या माध्यमातुन गावातील मुलांनासुद्धा शिकवतील.

* सोलर पाँलिसी-:

सोलर पाँलिसी म्हणजेच सौर योजना आणणारे देशातील आमचे पहिले राज्य आहे. वीज साधारणपणे साडेतीन ते साडेचार रुपये युनिटप्रमाणे मिळते. असे असताना या योजनेद्वारे आम्ही लोकांना आश्वासन दिले की तुम्ही सौर ऊर्जा निर्माण केलीत तर आम्ही तुमच्याकडुन 13 रुपये दराने वीज खरेदी करण्यास तयार आहोत. सध्या प्रसारमाध्यमांचे युग आहे, हे आपण जाणताच. अशा परिस्थितीत ही 13 रुपयांची गोष्ट जाहीर करताच माझ्यावर किती आणि कशी टिका झाली असेल, कल्पना करा. मोदी स्वतःला काय समजतात? 13 रुपयांनी वीज घेणार, आता गुजरातचे दिवाळे निघेल. असे बरेच काही बोलले गेले; परंतु आपणास भावी पिढीला वाचवायचे असेल तर काही कठोर पावले उचलावीच लागतील हे मी जाणुन होतो. कारण जे आपले आहे ते खाण्याचा अधिकार आपणास आहे; परंतु भावी पिढीच्या हिश्श्याचे गिळंक्रुत करण्याचा अधिकार ईश्वराने आपणास दिलेला नाही.भावी पिढीसाठी नैसर्गिक संसाधने राखून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. ती ईश्वरदत्त जबाबदारी आहे आणि आपण ती पुर्णपणे पार पाडली पाहिजे. या भावनेतुन आम्ही कठोर पावले उचलली आणि सौर योजना राबविली.

* आशियातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती-:

माझे दुर्भाग्य की आमच्यानंतर भारत सरकारने सोलार पाँलिसी आणली. आम्ही 13 रुपये म्हणालो होतो, भारत सरकारने तो दर 19 रुपये केला. त्यामुळे आम्ही त्रस्त झालो की आता 13 रुपयांमध्ये वीछ द्यायला आमच्याकडे कोण येईल? जेथे 19 रुपये मिळतील, सर्व लोक तिकडे म्हणजेच भारत सरकारकडेच जातील, असा आम्ही विचार केला; परंतु आपणास आश्चर्य वाटेल की अधिक पैसे देण्याच्या प्रस्तावानंतरसुद्धा संपुर्ण देशात भारत सरकारच्या नेत्रुत्वाखाली सौर ऊर्जानिर्मिती 120 M.W. होत आहे. याऊलट कमी पैसे देत असुन सुद्धा गुजरातची सौर ऊर्जा निर्मिती 650 M.W. आहे. ही सौरऊर्जेद्वारा होणारी आशियातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती आहे.

* गुजरात : सौर राजधानी-:

नजीकच्या काळात तर गुजरात जगात सौर राजधानी मानली जाईल. आम्ही 3000 M.W. सौर शक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. मोबाईल फोनची सेवा आपल्याकडे उपलब्ध झाली तेव्हा एक काळ असा होता, एका मिनिटासाठी 16 रुपये, 18 रुपये, 20 रुपये दर द्यावा लागत असे, आज 18 पैसे सुद्धा लागत नाहीत. सौर ऊर्जा क्षेत्रात गुजरातने मोठे धाडस दाखविले आहे. यामुळे ऊर्जेच्या क्षेत्रातील एक मोठी अडचण दुर झाली आहे. उपकरणे-सामग्री यात वाढ झाली असून, साधनसामग्रीच्या किमती ब-याच खाली आल्या आहेत. तंत्रज्ञानात संशोधन झाले आहे. या सर्वाँचा सर्वँकष परिणाम असा की कदाचित 2013 येता येता आम्ही जी खरेदी 13 रुपये व भारत सरकारने 19 रुपये युनिटने सुरु केली होती, ती कदाचित आम्ही 8 व 9 रुपयांच्या मध्ये आणू शकु. हे ऊर्जा क्षेत्रातील फार मोठे योगदान असेल. ज्या पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत, त्याने 2014 च्या शेवटी किँवा 2015 पर्यँत कदाचित गँस किँवा कोळशाने औष्णिक वीज पाच रुपयात तर सौर शक्तीने सहा रुपयात मिळेल, असे द्रुश्य मी पाहतो आहे. ही फार मोठी क्रांती होणार आहे.

* सौर ऊर्जेत भारताने पुढाकार का घेऊ नये...?
जी-7 शिखर परिषदेच्या वेळी मी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. या परिषदेत जग ऊर्जा संकटावर चर्चा करणार होते. जगातील सर्व प्रमुख राष्ट्रे एकत्र आली होती. त्या परिषदेला पंतप्रधान चालले होते, तेव्हा जाण्यापुर्वी त्यांना एक प्रस्ताव द्यावा असे मला वाटले. कारण जगात देशांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत. पेट्रोलियम उत्पादन करणा-या देशांच्या ओपेक कंट्री, सार्क कंट्री. जी-7 शिखर परिषद असे अनेक प्रकारचे वेगवेगळे गट बनले आहेत. ते आपाआपल्या द्रुष्टीने महत्वाच्या असणा-या मुद्द्यांवर उहापोह करतात. म्हणुन मी असे सुचविले की सौर ऊर्जेच्या क्षेत्रात आता भारताने का पुढाकार घेऊ नये? आपण जेथे सर्वात जास्त सौर विकिरण (रेडिएशन) आहे, अशा देशांची एक संघटना बनवावी. या देशांचे एक निगम (कार्पोरेशन) बनवावे. आपण सौर आणि रेडिओ लहरी ऊर्जा क्षेत्रात संशोधन करावे. जगात आपल्या जवळ ही ताकद आहे. ज्यांच्या जवळ पेट्रोलिअम आहे ते पेट्रोलियमच्या बळावर उड्या मारतात मग आपण सौर ऊर्जेच्या बळावर उड्या का मारु शकत नाही...? मी पंतप्रधानांना याबाबतीत खुप आग्रह केला पण असो.आपण पुढाकार घेऊ शकतो अशी अनेक क्षेत्रे आहेत. भारतीय लोकांना नैसर्गिक वस्तुंचा परिचय करुन देण्यासाठी आपणास अतिरिक्त कष्ट पडणार नाहीत. अनेक शतकांपासुन या गोष्टी आपल्या रक्तात भिनलेल्या आहेत. आपण थोडेसे मार्गच्युत झालो आहोत. आपल्याला मुख्य मार्गावर यायचे आहे. गुजरातमध्ये मला या क्षेत्रात खुप सफलता मिळत आहे. आदरणीय धारियाजी माझ्याकडे अनेक वेळा आले आहेत. त्यांनी फार बारकाईने या गोष्टीँचे निरिक्षण केले आहे. त्यांच्याकडुन गुजरातला भेट देण्यासाठी बरेच लोक आले आहेत, वारंवार येतात, त्यांनी प्रत्येक गोष्ट स्वतः पाहिली आहे.
गाव वाचविण्यासाठी, गावाला सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा भरपुर उपयोग केला जाऊ शकतो आणि यातुन फार मोठे परिवर्तन केले जाऊ शकते. या दिशेने आम्ही प्रयत्न करीत आहोत.मला पुर्ण विश्वास आहे की धारियाजीँची तपश्चर्या, त्यांचे संशोधन यामुळे भविष्यात लोकांना त्यांच्या विचारसरणीची एक फार मोठी ताकद मिळेल. समाजासाठी हे त्यांचे फार मोठे योगदान असेल. या वयातील त्यांचा उत्साह, त्यांचे सदा हसतमुख राहणे या गोष्टी फार मोठी प्रेरणा देणा-या आहेत. माझा विश्वास आहे की, मुलभुत उद्दिष्टांना धरुन आपण सर्वाँनी एकत्रित वाटचाल केली तर याचा निश्चितच फार मोठा फायदा होईल. धारियाजीँना व त्यांच्या वनराईच्या कार्याला माझ्या खुप खुप शुभेच्छा...!

गुरुवार, ४ जुलै, २०१३

हिँदु लोकांच्या अंत्यविधीसाठी विद्युतदाहिनीचा वापर केला तर...

आज मी जो लेख लिहीतोय त्याच्याकडे धार्मिक नजरेने न पाहता पर्यावरणाच्या नजरेने पाहाल तर माझ म्हणण तुम्हाला नक्की पटेल.

     आपल्या हिँदु धर्मात एखादी व्यक्तीच्या निधनानंतर तिचे अंत्यसंस्कार करताना तिला स्मशानात नेऊन तिचे दहन करण्यात येते. दहन करताना अर्थातच लाकडांची गरज असल्याने झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येते. फक्त एखाद्या व्यक्तीला दहन करण्यासाठी लागणा-या लाकडांची गरज एवढ्या संकुचित द्रुष्टीकोनातुन या घटनेकडे पहाल तर तुम्हाला ती लाकुडतोड शुल्लक वाटेल पण सर्व हिंदुंच्या दहनासाठी होणा-या लाकुडतोडीकडे पहाल तेव्हा तुम्हाला माझ्या मुद्द्यातील गांभीर्य लक्षात येईल. पुण्यासारख्या शहरात एका वर्षात केवळ लोकांच्या पार्थिवाचे दहन करण्यासाठी 1300 टन लाकुड जाळले जाते.

हिँदु धर्माचे कट्टर समर्थक सांगतात की, अंत्यविधीसाठी जे संस्कार पार पाडले जातात त्यावेळी म्रुत व्यक्तीबरोबर सामान्य लोकांच्या आणि त्याच्या घरच्यांच्या भावना जोडलेल्या असतात.
मी त्यांना एवढच विचारु इच्छितो की, एखाद्या झाडावर शेकडो पक्षी राहत असतात. त्यांना निवा-यासाठी ते झाड आश्रय असते. ते झाड तोडल्यावर त्या पक्षांच्या भावना दुखावल्या जात नसतील...? का तुमच्या मते माणुस सोडुन अन्य कोणत्या सजीवाला भावनाच नसतात...??
अरे पक्षांच सोडा ज्या झाडांना तुम्ही तोडता त्या झाडांनाही भावना असतात हे जगदीशचंद्र बोसांनी सिद्ध केले आहे.
"व्रुक्षवल्ली आम्हा सोयरे..." हा तुकाराम महाराजांनी सांगितलेला मंत्र हिँदु लोक जाणीवपुर्वक का विसरले...? जर तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे व्रुक्ष आपले मित्र असतील तर मानवाच्या मरणाची शिक्षा तो व्रुक्ष आपले कट्टर दुश्मन असल्यासारखे त्या मुक्या गरीब व्रुक्षांना म्रुत्युदंड देऊन का देतो...??

जर कट्टर हिँदुत्वाच बोलायच म्हटल तर ज्या भुमीवर आपण अंत्यसंस्कार करतो त्या भुमीला "स्मशानभुमी" म्हणण चुकीच ठरेल कारण "स्मशान" हा संस्क्रुत शब्द असुन त्याचा अर्थ पुरण्याची जागा असा होतो, जाळण्याची नव्हे. प्राचीन हिँदु संस्क्रुतीत जाळण्याची नव्हे तर पुरण्याची प्रथा होती. काही इतिहासकारांच्या मते ब-याच संतांना पुरले नसुन जाळण्यात आले आहे.
दफन केल्यानंतर शरीराच्या अस्थीचे जतन करणे गरजेचे होते. सदर म्रुत व्यक्तीच्या शरीराचा अवमान होऊ नये अशा प्रकारे योग्य ठिकाणी दफन करावे लागते. तो त्या व्यक्तीच्या नातलगाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनु शकतो.
महत्वाचा मुद्दा हाच आहे की, दहन केल्याने म्रुत शरीराची लगेच विल्हेवाट लागते तर दफन केल्याने त्याची विल्हेवाट लावायला उशीर होतो. त्यामुळे बरेच जण दहन करण्यास प्राधान्य देतात.


काही जण कट्टर हिँदुत्वाचे कारण देत धर्मात दिलेल्या विधीँचे पालन करण्यासाठीच अंत्यविधीत दहनाची आवश्यकता सांगताना दिसतात. मग ज्या ठिकाणी वारंवार बर्फव्रुष्टी होत असते त्या ठिकाणी दहनात व्यत्यय येत असल्याने म्रुतदेह दफन करण्यात येतो. मग त्या ठिकाणचे हिँदु कट्टर नाहीत का...? वाळवंटात लाकडांची उपलब्धता नसल्याने दहन करण्यात व्यत्यय येतो व पर्यायी पद्धत वापरावी लागते.वाळवंटी प्रदेशातील हिँदुंना मग काय म्हणाल...??

आज अंत्यविधीसाठी किँवा अन्य कोणत्याही कारणासाठी होणारी व्रुक्षतोड पाहता भविष्यात प्रेत दहनाकरीता लाकुड मिळणेच कठीण होऊन जाईल आणि त्यावेळी दफन करणे आणि विद्युतदाहीनी हे दोनच पर्याय उरतील. मी मघाशीच सांगितल्याप्रमाणे दफन करुन प्रेताची विल्हेवाट लावताना उशीर होत असल्याने विद्युतदाहीनी हाच सर्वोत्तम पर्याय ठरेल.
आताच शहरात दहनासाठी लाकडांची कमतरता जाणवत असल्याने विद्युतदाहीनीचा पर्याय अंत्यविधीसाठी वापरण्यात काहीच गैर नाही.
धार्मिक भावनांच्या बाबतीत म्हणायच तर दहनामागे म्रुत शरीराची विल्हेवाट योग्य प्रकारे सन्मानाने व्हावी एवढा एकच हेतु असतो कारण म्रुत शरीरातुन दुर्गंधी निघत असते. त्यात जीवजंतु निर्माण होऊ शकतात. जे आजुबाजुच्या प्राण्यांना मनुष्यवस्तीला हानीकारक ठरु शकतात.
सध्याच्या काळात धार्मिक चालीरिती आणि बंधन पाळायची तेवढीशी गरज राहिली नाही कारण आता पुर्वीसारखी एखाद्या कुटुंबाची त्यांच्या समाजाशी म्हणावी तेवढी नाळ जोडलेली नसते. समाजपद्धती विभक्त बनली आहे. तसही केवळ समाजाला दाखवण्यासाठी काही रिती पाळुन पर्यावरणाची हानी करण्यात काहीच व्यवहार्यता नाही.त्यासाठी मनोभावना गरजेची आहे.

काही जणांच्या मते भारतात दहनासाठी जी लाकुडतोड होते ती इतर गोष्टीँसाठी केलेल्या लाकुडतोडीच्या तुलनेत नगण्य आहे. दहनासाठी जेवढी झाडे तोडली जातात तेवढी एका कारखान्यासाठी एका दिवसात तोडली जातात.
मुंगीचे चावणे आणि सापाचे चावणे एवढा फरक या दोन ला...कुडतोडीमध्ये आहे.
त्या सर्वाँना मी एवढच सांगेन की, मानव हा एक सामाजिक घटक म्हणुन पर्यावरणात वावरत असतो. त्यामुळे त्या पर्यावरणाप्रती त्याच्या काही नैतिक जबाबदा-या असतात. पर्यावरणात फक्त मनुष्य प्राणीच नाही तर अनेक प्रकारचे पशु-पक्षी आणि किटक गुण्यागोविँदाने राहत असतात. अनेक गोष्टीँसाठी ते वनांवर अवलंबुन असतात. मग अशा वनांची तोड करुन त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा नैतिक अधिकार माणसाला कोणी दिला...? "जगा आणि जगु द्या" हे बोधवाक्य आपण पुस्तकापुरतेच मर्यादित ठेवायचे का...??
कारखान्यासाठी वनांची तोड करण केव्हाही निँदनीयच आहे आणि ते करणारा देखील माणुसच आहे. जर अंत्यसंस्कारासाठी विद्युतदाहिनीचा वापर करुन पर्यावरणाचे रक्षण करताना लाकुडतोड थोड्या प्रमाणात का होईना कमी करुन आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करण्यात खारीचा वाटा उचलता येत असेल तर सुरुवात करायला काय हरकत आहे...?
दुस-या गोष्टीँकडे बोट दाखवुन मुळ समस्या सुटत नसते ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. आज जगभर माणसाकडुन होत अमर्याद वनतोडीमुळे "ग्लोबल वार्मिँग" सारखी भीषण समस्या जगासमोर उभी ठाकली आहे. माणसाच्या या क्रुत्यांचा परिणाम त्याच्यासोबत पर्यावरणातील बाकीचे निरपराध जीव देखील मुकपणे सहन करत आहेत. सर्वशक्तिमान असल्यामुळे मानवाने इतर प्राण्यांवर केलेला हा अन्याय नव्हे का...?
आता तुम्हीच सांगा जर आपल्या धार्मिक चालीरिती थोड्याफार प्रमाणात बदलुन विद्युतदाहिनीचा वापर केल्यास आपलेच पर्यावरण सुरक्षित राहणार असेल तर मनाचा मोठेपणा दाखवुन आपल्या चालीरितीत थोडे बदल करणे आपले नैतिक कर्तव्य नव्हे का...??
शिवाय अंत्यसंस्कारावेळी दहन केल्यामुळे हवेचे जे प्रदुषण होते ते देखील आपल्याला टाळता येईल. भौतिक गोष्टीँना नियंत्रित करण्यासाठी सरकार काही संस्था नियंत्रित करु शकते. धार्मिक बाबतील स्वतः नियंत्रण करणे हाच चांगला उपाय असतो कारण धार्मिक गोष्टीत सरकारने ढवळाढवळ करु नये या मताचा मी आहे.

विद्युतदाहिनीचा वापर करु नये म्हणुन जे लोक हिँदु धर्मशास्त्राचे कारण देतात त्यांना अभिमानाने सांगेन की कट्टर हिँदुत्ववादी नेते खुद्द विनायक दामोदर सावरकरांनी असे सांगितले होते की, माझ्या निधनानंतर काहीही विधी करत बसु नका. माझ्या प्रेतावर का...ही सोपस्कार करु नका. माझे प्रेत सरळ उचलुन विद्युतदाहिनीत फेकुन द्या.कोकणचे ज्येष्ठ नेते प्रा. मधु दंडवतेँनी देखील अंत्यसंस्कारांसाठी विद्युतदाहिनीचाच मार्ग स्वखुशीने स्वीकारला होता.

मुळात आपल्या हिँदु संस्क्रुतीतच प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर हिँदु धर्माला श्रेष्ठ मानतो तर त्यामागे एकच कारण आहे की हा धर्म कोणाच्या सांगण्यानुसार किँवा एखाद्या ग्रंथाच्या उत्पत्ती बरोबर जन्माला आला नसुन पिढ्यानपिढ्या नवीन विचार आणि आचरण पद्धती घेऊन हा धर्म उत्क्रांत होत गेला आहे. कालानुरुप योग्य ते बदल यात होत गेले आहेत. निसर्ग आणि शास्त्र यांचा अपुर्व संगम या धर्माच्या चालीरितीत आढळुन येईल. आता आपण सर्व हिँदुधर्मवासियांनी निसर्गाची आणि काळाची गरज समजुन विद्युतदाहिनी प्रक्रियेचा अंत्यसंस्कारासाठी वापर करत इतर धर्माँपुढे एक नवीन आदर्श घालुन दिला पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या हिँदुना पाहुन इतर धर्माच्या लोकांमध्ये आपल्या हिँदु धर्माविषयीचा आदर कित्येक पटीने वाढेल आणि आम्ही पुढारलेले हिँदु आहोत हे आपण सर्व हिँदु अभिमानाने सांगु शकु...!!!

एका लग्नाची, दुसरी गोष्ट …

"एका लग्नाची दुसरी गोष्ट" मालिकेच्या शेवटच्या भागासोबत घना-राधाच्या फेमस जोडीने आपणा सर्वाँचा निरोप घेतला. आजच्या धावपळीच्या जगात घना-राधा आणि काळे कुटुंबीय नकळत कधी आपल्याच कुटुंबाचा भाग बनुन गेले ते समजलेच नाही. पाश्चात्यांचे अनुकरण करुन स्वतःला MODERN समजणा-या तरुण पिढीला विभक्त कुटुंबपद्धतीत एक संकुचित आनंद वाटु लागला होता पण या मालिकेने थोड्या फार प्रमाणात का होईना तरुणाईला पुर्वीच्या काळी मो
ठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेल्या एकत्रित कुटुंबपद्धतीचे महत्व पटु लागले. तरुण स्वतःला कितीही शहाणे समजत असले तरी आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आपल्यापेक्षा चार पावसाळे अधिक बघितलेल्या जाणत्यांची म्हणजेच माई आजीँची गरज वाटु लागली.

आपण प्रत्येक वेळी बुद्धीला पटेल तो निर्णय घेऊन स्वतःला कितीही PRACTICAL म्हणवुन घेत असलो तरी बुद्धिने घेतलेला आयुष्यातील प्रत्येक निर्णय योग्य असतोच असे नाही. जेव्हा प्रश्न भावनांच्या गुंतागुंतीचा असतो तेव्हा बुद्धीपेक्षा आपल्या मनाला जे पटेल तेच करावे. करियर, करियरच्या मागे अधाशासारखे लागुन कमावलेला पैसा आपल्याला आयुष्यात क्षणिक आनंद मिळवुन देतो पण सुख-शांती देऊ शकत नाही. खर समाधान तर आजी-आजोबांच्या वटव्रुक्षाच्या छायेत, आई-वडीलांच्या आशीर्वादात आणि बायकोच्या नजरेतुन व्यक्त होणा-या भावनेमध्ये असते. कितीही पैसा खर्च केल्या, करियरच्या बढाया मारल्या तरी ते मिळु शकत नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे या मालिकेने तरुणांना प्रेमाची नवी परिभाषा शिकवली. प्रेमापुढे जगातील बाकी सर्व गोष्टी क्षुल्लक असतात हे सप्रमाण सिद्ध केले. शिवाय प्रेम हा कन्सेप्ट फक्त नवरा-बायको किँवा प्रियकर-प्रेयसीपुरता मर्यादित नसुन आई-वडीलांचे मुलावर, आजीचे नातवावर आणि काका-काकुंचे पुतण्यावर असते ते प्रेमच असते. आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व नात्यांची किँमत ही करियरपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते.
तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जसे ठरवुन प्रेम करु शकत नाही तसेच तिच्यावर कळत-नकळत करत असलेले प्रेम नाकारु पण शकत नाही. फक्त एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी की ते असलेले प्रेम योग्य वेळी व्यक्त होणे अत्यावश्यक असते कारण उगाच उशीर करुन अव्यक्त राहिल्यास ती व्यक्ती कायमची गमावण्याची शक्यता दाट असते. शिवाय जी व्यक्ती तुम्हाला मनापासुन आवडत असते तिला तुमच्या या दिरंगाईमुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. भावार्थ असा की, एखादी व्यक्ती तुम्हाला खरच मनापासुन प्रेम करत असेल आणि त्याने आपले प्रेम तुमच्यासमोर अगोदरच व्यक्त केले असेल तर कोणताही उशीर न करता त्याच्या प्रेमाचा स्वीकार करा. गेले 8 महिने तरुण पिढीला हसत-खेळत नवनवीन शिकवण देणा-या दिग्दर्शक सतीश राजवाडेँनी जाता जाता सुद्धा आपण प्रसिद्धीच्या शिखरावर असताना पाठिँबा देणारे लोक कंटाळण्या अगोदर सन्मानाने निरोप घेण किती आवश्यक असत याची देखील शिकवण दिली.


मी आजच्या लेखासोबत कमेंट मध्ये मी या मालिकेबद्दल लिहिलेल्या सगळ्या लेखांची LINKS देत आहे...
•    "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मालिका मी पहिल्या भागापासुन बघायचो कारण माझ्या मते तरी सतीश राजवाडे हा आजच्या काळातील सर्वोत्क्रुष्ट मराठी दिग्दर्शक आहे. त्याने दिग्दर्शित केलेले मुंबई-पुणे-मुंबई, गैर यांसारखे चित्रपट किँवा कशाला उद्याची बात, अग्निहोत्र, असंभव, गुंतता ह्रुदय हे, या सुपरहिट मालिका रोज पाहत असल्याने "एका लग्नाची दुसरी गोष्ट" या मालिकाचा दर्जा अत्युत्क्रुष्ट असणार याबाबत मनात तसुभरही शंका नव्हती आणि झालही तसच...! रोजची सासु-सुनांची भांडणे, कटकारस्थाने, विवाहबाह्य संबंध या सगळ्या गोष्टी दुर ठेवत सतीश राजवाडेँनी अत्यंत वेगळ्या धाटणीचा पण एकदम हलकाफुलका विषय निवडला. मुंबई-पुणे-मुंबईची सुपरहिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे मुख्य भुमिकेत असल्याने संवादाची नैसर्गिक शैली अभिप्रेत होती. घना आणि राधा हे दोघेही फार PRACTICAL दाखवले. लग्न किँवा प्रेम या भावनिक गोष्टी ते दोघ मानत नाही किँवा त्यांना आपल्या करियरपेक्षा त्या महत्वाच्या वाटत नाही. घरातल्यांच्या दबावापुढे एक तडजोड म्हणुन ते लग्न करतात आणि सहा महिन्यांनी घटस्फोट घेऊन विभक्त व्हायच हे आधीच ठरवुन ठेवतात. मुळातच स्वभाव PRACTICAL असल्याने इतर नवरा-बायकोपेक्षा त्यांच नात थोडस वेगळ असत. ते एकमेकांच्या खाजगी गोष्टीत लक्ष देत नाहीत किँवा शारिरीक जवळीक निर्माण होऊ नये या कारणास्तव एक दिवस आड बेड आणि जमिनीवर वेगवेगळे झोपतात. लग्न हे फक्त दोन जीवांच मिलन नसत तर ते दोन कुटुंबांना देखील एकत्र आणत. राधाचीही साहजिकच सासरच्या लोकांशी जवळीक वाढु लागते.तिच घरातल्या प्रत्येकाशी असलेल गोड नात दिग्दर्शकाने अगदी अचुक दाखवलय. घटस्फोटानंतर या सर्व माणसांशी ताटातुट होईल यामुळे राधाच्या मनात घालमेल सुरु होते परिणामी भावनिक मन PRACTICAL विचारांवर वरचढ ठरु लागत. करियरपेक्षा नाती जास्त महत्वाची वाटु लागतात.

माझ्या एका जवळच्या व्यक्तिने मला सांगितल होत की, प्रेम कधी ठरवुन करता येत नसत पण ही मालिका पाहिल्यावर मला अजुन एक साक्षात्कार झाला की, मनावर जबरदस्तीने बंधन लादुन एखाद्यावर ठरवुन प्रेम न करण देखील शक्य नसत. जेव्हा स्त्री-पुरुष एकमेकांच्या संपर्कात येतात, रोज गप्पा मारतात, खाजगी गोष्टी शेअर करतात त्यावेळीच त्यांच्यात असलेल्या त्या मैत्रीच्या नात्यामध्येच दोघांच्याही नकळत प्रेमाचे अंकुर रुजु लागतात. या मालिकेमध्ये देखील राधाच्या मनात तिच्या नकळत घनाबद्दल प्रेम निर्माण होऊ लागत. घना जेव्हा ट्रेनिँग निमित्त 8 दिवस बाहेरगावी जातो तेव्हा त्याच्या सहवासाशिवाय तिचा जीव कासावीस होतो. राधा जरी घनाच्या प्रेमात पडली असली तरी घनान आपल PRACTICAL वागण अजुनही सोडलेल नसत. घरी आल्यावर घना पाठदुखीने बेजार होतो त्यावेळी त्याच्या उघड्या पाठीवर जेल लावुन मालिश करणे अत्यंत गरजेचे असते पण राधा आणि घनाच लग्न ही एक तडजोड असल्याने तिच्यासमोर शर्ट उतरवुन मालिशच्या निमित्ताने शारिरीक जवळीक करण्यास तो तयार नसतो. घनाचा जीव अगदीच मेटाकुटीस येतो तेव्हा राधाच पुढाकार घेऊन त्याला शर्ट उतरवायला लावुन त्याच्या पाठीच मालिश करते. एवढ्यावरच थांबत नाही तर संपुर्ण रात्र त्याच्या शेजारी बसुन आपल्या प्रियकराची काळजी घेते आणि पहाटे एका क्षणी नकळत ती त्याच्या कुशीत झोपते. लग्न झाल्यापासुन प्रथमच ते एकत्र झोपतात. थोड्या वेळाने घनाला जेव्हा जाग येते तेव्हा तो सुद्धा तिल्या आपल्या अजुन जवळ घेतो. राधाबद्दल प्रेमाच्या नाजुक भावना त्याच्याही मनात जागरुक झालेल्या असतात. अशा प्रकारे PRACTICAL REQUIREMENT म्हणुन केलेल्या लग्नाच्या तडजोडीच रुपांतर ख-या प्रेमात होत.


आजच्या जमान्यात हिँदी चित्रपटस्रुष्टीत प्रेमाच्या नावाखाली जो नंगानाच चालु आहे त्यामुळे आमच्या पिढीला "खर प्रेम" आणि "फ्लर्टिँग" यामधला फरकच कळेनासा झालाय. इम्रान हाश्मीसारखे देव आणि मल्लिका शेरावतसारख्या देवी तथाकथित प्रेमाच्या कला पडद्यावर दाखवत असल्याने तरुण पिढी 'त्या' गोष्टीँनाच खर प्रेम समजु लागली आहे. किसीँग हे प्रेमाच प्रमाण ठरु लागल आहे. पुर्वीच्या काळात लग्नापुर्वी मुल-मुली फार क्वचितच एकमेकांना भेटत असत त्यामुळे लग्नानंतर प्रियकर किँवा प्रेयसीला पहिल्या स्पर्शाची ओढ असायची. पहिल्या स्पर्शानंतर एखाद्या उन्हाने तापलेल्या भुमीवर पावसाचे थेँब पडावेत असा आनंद व्हायचा. लग्नानंतर मधुचंद्राला प्रथमच नव-याच्या मिठीत जाण हा अनुभव एका स्त्रीच्या कायमस्वरुपी लक्षात राहायचा परंतु आता या हिँदी चित्रपटांच्या प्रभावामुळे लग्नाअगोदरच हातात हात घेऊन फिरण, मिठ्या मारण, इत्यादी गोष्टी COMMON होऊ लागल्या आहेत. सध्याच्या FAST FORWARD युगात पहिला स्पर्श किँवा पहिल अलिँगन या गोष्टी खुप मागे पडु लागल्या आहेत. त्यामुळेच पुर्वीच्या काळी आयुष्यभर साथ देणारी लग्न आता वेगाने घटस्फोतात परिवर्तीत होऊ लागली आहेत. ही मालिका बघुन कदाचिक काही जोडप्यांमध्ये बदल झाला तर ते सतीश राजवाडेच फारच मोठ यश मानाव लागेल.


"एका लग्नाची, दुसरी गोष्ट" या मालिकेचा आजचा भाग ज्यांनी आयुष्यात कोणावर तरी जीवापाड प्रेम केलय त्यांनी नक्कीच पहावा एवढा अप्रतिम होता. प्रेम ही आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पाप, पुण्य अशा जगातील बाकीच्या गोष्टी प्रेमासमोर शुल्लक आहेत. "I LOVE YOU" या तीन शब्दांमागील खरा अर्थ, त्यांची खरी किँमत तुम्हाला माहीत असेल तरच त्यांचे प्रकटीकरण तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर करा. एखाद्याला I LOVE YOU म्हणायच आणि लग्न करुन प्रेमाच्या बंधनात अडकायच्या वेळी एखाद संकट आल तर पळ काढायची व्रुत्ती असलेल्यांनी या तीन शब्दांचा उल्लेख कधीच करु नये. जर तुमच्या प्रेमाच्या आड समाज किँवा अगदी तुमचे पालक जरी येत असतील तर तुमच्या ह्रुदयावर हात ठेवुन स्वतःला एकच प्रश्न विचारा, "ज्या व्यक्तीवर तुम्ही खर प्रेम केलय त्याच्याशिवाय उर्वरित आयुष्य तुम्ही जगु शकाल का...?" आणि या प्रश्नाच प्रामाणिक उत्तर मिळाल्यावर तुमचा पुढील निर्णय घ्या कारण तुमच्या आयुष्यावर फक्त आणि फक्त तुमचा अधिकार आहे, तुमच्या पालकांचा किँवा समाजाचा नाही. जर तुम्ही तुमच्या मनातील उत्तराशी अप्रामाणिक वागुन समाज किँवा पालकांच्या हट्टापायी आपल्या आवडत्या व्यक्तीशी प्रेमसंबंध तोडले तर ती व्यक्ती पुढील आयुष्यात बरबाद होईल कि दुस-याशी सुखाने संसार करेल याची मला खात्री देता येत नाही पण एवढ मात्र नक्की तुम्ही तुमच्या आयुष्यात 101% बरबाद व्हाल. प्रेम तुम्हाला चांगल आयुष्य जगायला शिकवते. आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याच्या ध्यासापायी आयुष्यातील कठीणातील कठीण शिखरे तुम्ही सर करता. बाकी कोणत्याही गोष्टी मिळाल्या तरी आयुष्यात समाधान मिळत नाही कारण आपल्याला भरपुर गोष्टीँचा हव्यास असतो पण प्रेम मिळाल्यावर माणुस सुखी आणि समाधानी होतो कारण त्याला प्रेमासमोर बाकीच्या गोष्टी खुपच फिक्या वाटतात. आयुष्यात कोणावर तरी मनापासुन प्रेम करा आणि ते अर्ध्यावर सोडुन न देता पुर्णत्वास न्या. आपल सगळ आयुष्य पणाला लावत जर खरच कोणी तुमच्याकडुन कोणतेही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर मनापासुन प्रेम करत असेल आणि तुमची खात्री असेल की ती व्यक्ती पुढील आयुष्यात तुमचा चांगल्या रितीने सांभाळ करु शकते तर कोणत्याही खोट्या स्वाभिमानाला किँवा समाजाच्या भितीला बळी न पडता त्या व्यक्तीच्या प्रेमाचा स्वीकार करा आणि आपले आयुष्य सुखकर बनवा.

• काही खुप जवळचे मित्र मला नेहमी एक प्रश्न विचारतात की, 'तिचे प्रेम' मिळवण्यात एवढ्या अडचणी येत असतील तर तिचा विषय कायमचा का नाही सोडुन देत...?
एकाच गोष्टीचा सारखा विचार करुन मनस्ताप करण्यापेक्षा एव्हाना दुसरी शोधली देखील असतीस...!
त्यांच्या या प्रश्नांवर, तिच्यासारखी दुसरी कधी सापडलीच नाही, हे उत्तर मी सामान्यतः देत असलो तरी खरी गोष्ट हिच आहे की, आजपर्यँत तिच्या जागी दुसरी शोधण्याचा कधी प्रयत्नच क...ेला नाही.

माझ एक ठाम मत आहे की, आयुष्यात प्रत्येक गोष्टीला 'पर्याय' मिळत नसतो आणि ती गोष्ट जर दस्तरखुद्द 'प्रेम' असेल तर मग नाहीच नाही...!! बुट, चपला, कपडे या गोष्टी आपल्याला हव्या तशा मिळतात. जर मिळाल्याच नाहीत तर आपण त्या हव्या तशा तयार करुन घेऊ शकतो पण प्रेमाच तस नसत.

प्रेमाची अजुन एक गंमत असते, ती म्हणजे... ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच्याशीच सर्वात जास्त भांडतो. ज्या माणसाने आपल्या आयुष्यातुन कधीही निघुन जावु नये किँवा जो माणुस आपल्या आयुष्यातुन निघुन गेला तर आपल्याला खुप त्रास होईल अस वाटत... आपल्याला जाणवत... त्याच्याशीच आपण खुप भांडतो...!!!

प्रेमाची पुढची पायरी असते ती म्हणजे लग्न...! पुर्वी देवदेवतांच्या साक्षीने, नातेवाईकांच्या सानिध्यात एक पवित्र सोहळा पार पाडला जायचा तो म्हणजे लग्न...!! त्यानंतर 'हनीमुन' नावाची एक संकल्पना असायची परंतु आताची पिढी इतकी पुढारलेली आहे की हल्ल...ी लग्नाआधीच एकमेकांच्या खुप जवळ येऊन त्या नात्यातील गोडवा घालवतेय.

"नात्यांची खरी मजा ती उलगडण्यात आहे...!!!"

तो हनीमुनचा पहिला स्पर्श... पहिली मिठी... त्या रुममधील ते दोघे नवरा बायको... दोघे अनोळखी असले तरी एकमेकांना समजुन घेण्याची सुरुवात लग्नानंतरच व्हायची... गर्दीतुन चालताना नकळत होणारा तो हातांचा स्पर्श... ते लाजण... वाट बघण... शिँकण्याच्या सवयीपासुन ते जेवणाच्या चवीपर्यँत एकेक गोष्ट हळु हळु समजत जायची. ती मजा आजकाल हरवत चाललीय. त्यावेळी 100 लग्न झाली तर त्यातील 80 टक्के लग्न टिकायची पण आता 80 टक्के लग्न मोडुन घटस्फोटात परिवर्तीत होत आहेत कारण आताची पिढी नात्यांना उलगडुच देत नाही.

नामदार नारायण राणे साहेबांना जाहीर पत्र....

पत्रास कारण की, गाडगीळ अहवालाला समर्थन आणि जैतापूरच्या विनाशकारी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी माझ्याकडून जे लेख लिहिले गेले त्यावरून नकळत का होईना माझी प्रतिमा कट्टर राणे विरोधक अशी बनली. हल्ली तर अगदी रस्त्यावर माझ्या ओळखीचे लोक मला इंजिनीरिंग सोडून राजकारणात पडलास का अस विचारू लागले, त्यामुळेच सर्वांसमक्ष जाहीररित्या मी सांगू इच्छितो,माझा नारायण राणे या व्यक्तींना कधीच विरोध नव्हता आणि पुढेही कधी नसणार. मुळातच विरोध हा कधी कोणत्या व्यक्तीला असूही नये, विरोध हा त्या व्यक्तीच्या विचारांना असावा, त्याने राबविलेल्या धोरणांना असावा.
सिंधुदुर्गची रत्नागिरीपासून वेगळा बनवून एक जिल्हा म्हणून निर्मिती झाल्यावर सर्वात जास्त काळ मंत्रिपद राणे साहेब तुमच्याकडेच होते, तुम्ही किती विकास केला आणि किती विकास होणे अपेक्षित होते यावर मत-मतांतरे असू शकतात पण एक गोष्ट नक्की की महाराष्ट्राच्या राजकारणात सिंधुदुर्गला जी काही ओळख आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे. बाकी आमदार शंडासारखे गप्प बसून विधानसभेत बाक तापवत असताना आपल्या आक्रमकतेचा वापर करून जिल्ह्यासाठी निधी आणलात तो तुम्हीच...! कोकणसाठी ५००० कोटी रुपयांचे "कोकण पेकेज" तुमच्या याच आक्रमकतेमुळे आमच्या पदरात पडले पण पुढे त्या निधीचे वाटप करण्यात मात्र तुम्ही थोडे कमी पडला आणि त्यामुळेच कोकणचा हवा तसा विकास आपण करू शकलो नाही.
हल्लीच एक शिपाई भेटला होता तो सांगत होता, मंत्रालयात काम होत नाही म्हणून जीव मेटाकुटीस आलेला, तेवढ्यातच राणे साहेब समोरून येताना दिसले आणि त्यांना पाहून फक्त लांबूनच सलाम केला. कदाचित त्यांनी सुद्धा ओळखले की आपल्या कोकणातला कोणी तरी बांधव दिसतोय आणि स्वतः येऊन चौकशी करत काय काम होते ते विचारले. काम होत नाही हे लक्षात आल्यावर तिकडच्या अधिकाऱ्याला त्यांनी फोन करून खडसावले आणि १ तासात काम झाले. कोकणातल्या अशा कितीतरी अडलेल्या-नडलेल्यांची कामे तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालून केल्याचे कित्येक किस्से मी ऐकले आहेत. तुमचे राजकीय गुरु बाळासाहेबांकडूनच तुम्ही हा गुण घेतलेला असणार याबाबत खात्री आहे आणि त्यामुळेच तुमच्याबद्दल वैयक्तिक आदर आहे. कोकणातली माणस फणसासारखी असतात, वरून कितीही कडक दिसत असली तरी मनातून खूप गोड असतात आणि त्याच कोकणी मांसाच प्रकटीकरण तुम्ही करता याचा अभिमान वाटतो.

मला आक्षेप आहे तो तुमच्या विकासाच्या संकल्पनेवर...! तुमच अस ठाम मत आहे की सिंधुदुर्गातील लोकांच दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे तरच त्यांचा विकास झाला अस म्हणता येईल पण याबाबत तुम्ही सिंधुदुर्गातल्या लोकांची मते जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाहीत किंवा त्यांची मानसिकता देखील कधीच विचारात घेतली नाही. सिंधुदुर्गातल्या लोकांची जडण-घडण ही सुरवातीपासूनच हिरव्यागार अशा निसर्गात झाली आहे. त्यांना त्या पर्यावरणाविषयी ओढ आणि आपुलकी असणे स्वाभाविकच आहे. सिंधुर्गातील लोक शेतीतून आणि रोजच्या कामधंद्यातून मिळणाऱ्या थोडक्या पैशात "समाधानी" आहेत आणि कोणत्याही दरडोई उत्पन्नापेक्षा हे समाधान महत्वाच असत आणि पैशांचे ढीगच्या ढीग रचून अंबानी सारख्या धनदांडग्यांना पण हे समाधान विकत घेता येत नाही. कोकणच्या माणसाच्या सुखी आणि समाधानी आयुष्याचे रहस्य त्याच्या आजूबाजूच्या शांत पर्यावरणात आहे. शहरातील वाहनांच्या आणि इतर कर्ण-कर्कश आवाजाला कंटाळून आजही तिकडचे लोक कोकणच्या याच शांत पर्यावरणात कोकिळेची कुहू-कुहू आणि चिमण्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी इकडे ४-५ दिवस येऊन राहतात आणि जाताना फ्रेश होऊन जातात. यालाच पर्यावरणातून मिळणारे समाधान म्हणतात आणि कोकणात राहणाऱ्यांना ते वर्षाचे ३६५ दिवस मिळते. आता विकासाच्या नावाखाली तुम्ही जर हेच पर्यावरण नष्ट करू पाहणार असाल तर स्थानिक लोक त्या विकासाला सुद्धा विरोध करणारच ना...? तुमच्या दृष्टीने जो विकास आहे तो सामान्य लोकांच्या दृष्टीने विनाश आहे आणि या विकास आणि विनाश यांच्या दरम्यान जी पुसटशी रेषा आहे ती जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत वाद होतच राहणार. जर कोकणच्या लोकांना विनाशकारी प्रकल्पांद्वारे केलेला विकास नकोच असेल, "ठेविले अनंते तैसेची राहावे" अशीच त्यांची मानसिकता असेल तर त्या लोकभावनेचा आदर करून ते सर्व प्रकल्प सरकारला मागे घ्यायला लावणे हे कोकणचा नेता म्हणून तुमचे प्रथम कर्तव्य आहे. लोक तुम्हाला आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठीच विश्वासाने मते देऊन निवडून देतात. जर खरच तुम्हाला विकास करायचा असेल तर सिंधुदुर्गचा पर्यटनातून विकास करा. पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी "सिंधुदुर्ग गाईड" ही भन्नाट कल्पना तुम्ही अस्तित्वात आणली. खर तर १ वर्ष अगोदर जिल्ह्यातील दुसऱ्या एका आमदारासमोर मीच ती कल्पना सर्वप्रथम मांडली होती पण अशी विकासकामे त्वरित करायची असतील तर ती फक्त नारायण राणेच करू शकतील अस माझ आता ठाम मत बनल आहे. तिचा जास्तीत जास्त विस्तार करा जेणेकरून कोकणातल्या तरुणांना रोजगार मिळतील. विरोधी पक्षाचे आमदार प्रमोद जठारांनी कोकण दुध, फळांवर प्रक्रिया करणारा कारखाना, गुळाचा कारखाना असे नवीन उद्योग जिल्ह्यात आणले आणि त्यांना कोणीही विरोध केला नाही. कोकणच्या लोकांना विकास पाहिजे आहे पण तो पर्यावरण पूरक पाहीजेय. तुम्ही पर्यावरणाला पूरक असे कोणतेही उद्योग आणाल तर लोक त्यांचे स्वागतच करतील मात्र औष्णिक प्रकल्प किंवा अणुउर्जा असे विनाशकारी प्रकल्प आणून त्याला वर विकास असे संबोधणार असाल तर त्याला विरोध होणारच....!
माननीय नामदार नारायण राणे साहेबांना जाहीर विनंती आहे की आता तरी नालायक कोंग्रेस पक्षाचा नाद सोडा आणि ज्या कोकणच्या लोकांनी तुम्हाला राजकारणात एवढे मोठे केले त्या कोकणी लोकांसाठी पुन्हा एकदा सरकारशी दंड थोपतुन उभे रहा. ती पांढऱ्या पायांची इटालियन अवदसा कोकणच्या लोकांचा सत्यानाश करू पाहत आहे आणि तिच्या नादाला तुम्ही लागू नका. बालासाहेबांच्या तालमीत तयार झालेले तुम्ही एक सच्चे शिवसैनिक आहात. मागे एकदा कोंग्रेस मधून बाहेर पडल्यावर तिला कोकणच पाणी दाखवला होता. नारायण राणे फक्त बालासाहेबाना साहेब मानतात बाकी कुणाला नाही हे तुमच वाक्य तेव्हा सगळ्या देशाने ऐकल होत. कोंग्रेसच्या १२५ वर्षाच्या इतिहासात त्यांच्या पक्षाध्यक्षाला सबंध देशासमोर शिव्या देत लायकी काढायची हिम्मत आजपर्यंत कोणालाच झाली नाही ती कोकणच्या वाघाने करून दाखवली याचा एक कोकणी म्हणून माला सार्थ अभिमान आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तुम्ही सिंधुदुर्गात कोंग्रेसविरोधी लावलेली "रक्तालालेले हात" ही पोस्टर सर्वांच्या अजुनही लक्षात आहेत.


माझा विरोध नारायण राणेंना नव्हे तर कॉंग्रेसला आहे कारण माझ्या मते तरी कॉंग्रेस एक राजकीय पक्ष नसून ती एक लुटारूंची संघटना आहे. त्यांच्या टोळीत जो कोणी नेता जातो तो आपोआपच बदलू लागतो. शिवसेनेत असताना जे नारायण राणे होते ते कधीही जनविरोधी निर्णय घेत नसत कारण तो पक्षच लोकांसाठी होता. शिवसेना सोडताना तुमची राजकीय अपरिहार्यता मी समजू शकतो त्यामुळे पुन्हा त्या पक्षात जा अशी अवास्तव अपेक्षा मी तुमच्याकडून करणार नाही. फक्त कॉंग्रेस मध्ये राहून त्या पक्षाला खुश करण्यासाठी आमच्या लोकांवर जैतापूर सारखे विनश्काअरि प्रकल्प लादु देऊ नका.

उद्या या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर होणारा कोकणचा विनाश बघायला कदाचित तुम्ही नसाल आणि मी सुद्धा नसेन पण किरनोत्साराने मतीमंद, कर्करोगाने ग्रस्त झालेल्या कोकणच्या पुढच्या पिढ्या आपल्याला जाब विचारतील आणि त्यावेळी ते त्यांच्या बरबादीस तुम्हाला जबाबदार धरतील. ज्या नारायण राणेंनी कोकणच्या विकासाचा पाया घातला त्याच नारायण राणेंच्या माथी एका इटालियन बाईमुळे लाग्लीला हा कलंक मला तरी पाहावणार नाही. राणे साहेब तुम्ही एका गरीब कुटुंबातून पुढे आले आहात. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्या राजकारण्याला गरिबांच्या व्यथा कधी समजत नाहीत पण तुम्हाला नक्कीच समजतात असे मी तरी मानतो. त्या गरिबीत तुम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असायची. उद्या जर हा जैतापूर प्रकल्प पूर्ण झाला तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील गरीब मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल. आंबा बागायतदार देशोधडीला लागतील. या सर्वांसाठीच मी तरी या प्रकल्पाला विरोध करतोय. त्यांची पोटे उपाशी ठेऊन माझ्याने तरी अन्न खाववणार नाही. बाकी माझा राजकारणाशी काडीचाही संबंध नाही. मी एक इंजिनीर आहे आणि माझ्या क्षेत्रात मी खुश आहे. शक्य असेल तर या गरिबांचे संसार वाचवण्यासाठी जैतापुर्च्या विनाशकारी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आमच्यासोबत या. जैतापूर प्रकल्प रद्द केलात तर हा कोकण सदैव तुमचा ऋणी राहील. तुमची देव रामेश्वरावर खूप श्रद्धा आहे आणि तुम्हाला त्या रामेश्वराचीच शप्पथ आहे. देव रामेश्वर तुम्हाला सुबुद्धी देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे पत्र इथेच थांबवतो

कोकणचा विकास प्रदुषणकारी प्रकल्पातुन नव्हे तर पर्यटनातुन शक्य...


जैतापुर अणुऊर्जा प्रकल्प कोकणात का नको, या लेखात शास्त्रीय कारणे देऊन सुद्धा प्रकल्पाच्या समर्थकांनी मला खेकडा प्रव्रुत्तीचा म्हटले. काहीँनी मी विरोधासाठी विरोध करतोय अशा वल्गना केल्या.
कोकणातील एक अडाणी नेता ज्याला अणुऊर्जेतला '' कळत नाही तो लोकांना प्रकल्प कोकणवासियांच्या भल्यासाठी आहे अशी खात्री देतो आणि आपली अक्कल गहाण ठेवुन कोकणची जनता त्याच्या भुलथापांना फसते याच मला आश्चर्य वाटत.
आजचा लेख मी माझ्यावर झालेल्या आरोपांचे प्रत्युत्तर म्हणुन लिहीत आहे.
कोकणवर मी जिवापाड प्रेम करतो आणि कोकणच्या विकासाची "BLUE PRINT" तुमच्यासमोर ठेवत आहे.
यापुढे मी फक्त प्रकल्पांचा विरोधक आहे आणि कोकणच्या विकासाचे कोणतेही PLANS माझ्यापाशी नाहीत अशी टिका होणार नाही एवढी अपेक्षा करतो.

कोकणच्या विकासावर बोलण्याआधी सर्वप्रथम माझ्या कोकणच्या भुमीविषयी जाणुन घेणे महत्वाचे आहे.
कोकण ही परशुरामांची भुमी म्हणुन ओळखली जाते. सारी स्रुष्टी दान केल्यानंतर स्वतःला राहायला जागा उरली नाही म्हणुन समुद्र मागे हटवुन परशुरामांनी ही भुमी तयार केली अशी आख्यायिका आहे.
कोकण म्हणजे निसर्ग आनंद, प्रसन्नता लाभलेले वैभवसंपन्न प्रदेश आहे. हिरव्यागार वनस्पतीँनी बहरलेले सदाहरीत डोँगर, तितक्याचा अंगावर शहारा आणणा-या खोल द-या, त्यातुन वाहणारी नदीची पात्र, त्यांनी सम्रुद्ध केलेली भाताची खाचरे, इथल्या खाड्या, रुपेरी वाळुचे सागरकिनारे या सा-यांनी कोकणला स्वर्गरुप देखणेपण दिले आहे. या देवभुमीत काजु, फणस, आंबा आणि कितीतरी झाड मुक्तपणान डोँगरात वाढतात. मनाला भुरळ पडावी अशा हिरव्यागार मखमली झालरीची शाल घेऊन इथली प्रत्येक वस्ती वसली आहे. निसर्गनिर्मात्याच्या कुंचल्यातुन विविध रंगाच्या फुलांची उधळण, लाल पिवळी जास्वंद, गुलमोहोर आणि त्यांच्या साथीला आहेत पक्षीरुपी देवदुत. इथल्या निसर्गसौँदर्याबरोबर गड,किल्ले, लेणी, गुहा, प्राचीन मंदिरे, बंदरे अशी ऐतिहासिक स्थान ही आपल्याला पाहता येतात. कोकणचा परिसर आपल्या निसर्गामुळे पाहणा-यांच्या नजरेला सौंदर्याचे निराळेच परिणाम देतो. स्वर्गसुखाचा अनुभव नाही नाहीतर तीच उपमा दिली असती. खरच माझ कोकण म्हणजे जणु काही परमेश्वराला पहाटेच पडलेल एक गोड स्वप्न...


 महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर देशावरच्या काही शहरांनी कात टाकुन विकासास हातभार लावला. त्या द्रुष्टीने कोकण तस मागेच पडल. छोट्या छोट्या वाड्यावस्तीँमध्ये विखुरलेल्या कोकणात ना वीज होती ना उद्योगधंदे होते. ना रस्ते होते ना वाहतुकीची साधन. शेती... आणि मासेमारी हाच पोट भरण्यापुरता उद्योग, डोँगरद-यांचा दुर्गम प्रदेश, त्यात वाट रोखुन पसरलेल्या नद्या आणि भरपुर पाऊस अशा परिस्थितीत कस येणार कोण वर...???
त्या वेळी चाकरमान्यांच्या MONEYORDER वर जगणारा कोकण अशी एक उपहासात्मक पण सत्य परिस्थिती होती. जलवाहतुक हा प्रवासाचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. कोकण रेल्वेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकण पुर्ण देशाशी जोडल गेल आणि MONEYORDER वर जगणारा हा शिक्का पुसत कोकणाने आपले अस्तित्व ठळकपणे दाखवायला सुरुवात केली.

 "स्वर्गीय सौँदर्याचा अविष्कार" असलेल्या भारतीय राजकरणातील विक्रुतीने संपुर्णतः नासवुन टाकण्याचा विडा उचलला आहे. कोकणातील रासायनिक उद्योग, तत्सम वीज प्रकल्प यांतुन होणा-या प्रदुषणाची पाहणी कराल तर कोकण विनाशाकडे वाटचाल करत असल्याच जाणवेल. क...ोणत्याही परिस्थितीत कोकणातील कष्टकरी उपाशी मरणार नाही याची काळजी स्वतः निसर्गानेच घेतली होती पण कोकणचा विकास केवळ 'वाढ म्हणजे विकास' या संकल्पनेवर झाल्याने कोकणचे मुळ सौँदर्य हरवले आणि सिमेँट वाळुच्या क्रुत्रिम सौँदर्याला महत्व प्राप्त झाले. ज्या कोकणकडे शांत, निसर्गसुंदर, प्रदुषणविरहीत वातावरणासाठी पाहिले जात असे त्याच कोकणात आज प्रदुषणकारी रासायनिक कंपन्यांच्या आकाशात धुर सोडणा-या चिमण्या दिसु लागल्या. प्रचंड प्रमाणात होणारी व्रुक्षतोड आणि प्रदुषणकारी प्रकल्प यांमुळे कोकणची राखरांगोळी झाली तरी शासनाचे कोकणात प्रकल्पावर प्रकल्प आणायचे धोरण काही थांबायला तयार नाही. त्यामुळे शासनाच्या विरोधात आज आम्हाला चळवळी उभाराव्या लागत आहेत. अत्यंत गलितगात्र होऊन स्थानिकांना प्रदुषणाविरोधात संघर्ष करावा लागत आहे.
श्वासोच्छवासासाठी लागणारी शुद्ध हवा आणि पाणीसुद्धा विकत घेण्याची पाळी कोकणवर येऊन ठेपली त्यावेळी कोकणी माणुस जागा झाला आहे. स्वतःच्या हक्कासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार झाला आहे. जैतापुर आंदोलनात बळी पडलेला तबरेज त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्याचप्रमाणे शासनाने कोकणवर आजपर्यँत केलेल्या अत्याचाराबाबत कोकणी माणसात शासनाविषयी असणा-या असंतोषाचे देखील हे उदाहरण आहे.


 आज कोकणामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या औष्णिक व अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध रास्त आहे. जरी वीज महत्वाची असली तरी श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा त्यापेक्षा कितीतरी पटीने महत्वाची आहे. जनतेचा लढा चालु असताना जैतापुर प्रकल्प कोणत्या...ही परिस्थितीत करणारच असे म्हणणा-या शासनाकडुन जनतेने काय आदर्श घ्यावा...?
स्थानिकांबरोबरची चर्चा चालु असताना निर्णय होण्यापुर्वीच प्रकल्पाचे बांधकाम सुरु असेल तर आंदोलकांचा असहकारावरचा तोल सुटला तर त्याला सरकार जबाबदार आहे त्याचा दोष आंदोलकांचा कसा काय असु शकतो...??
कायदा हातात घेतला म्हणुन तबरेजवर गोळी झाडुन त्याचे प्राण घेतले जातात आणि बंदुक हातात घेऊन शेकडो निरपराध्यांची हत्या करणारा कसाब बिर्याणी खातो. त्याला जर शासनाचे संरक्षण मिळत असेल तर आपल्या मागण्या लोकांनी कशा मान्य करुन घ्याव्यात...???
गाडगील समितीने सरकारी दबावाला बळी न पडता कोकणवरील अन्यायाचा पर्दापाश केला तर त्या समितीचा अहवालच डावलण्यात येतो. चुकांच्या दुरुस्ती करण्याची तयारी दाखवण्याची ताकद जर सरकारमध्ये नाही तर शासनाच्या नवीन चुकांसाठी जनतेने सरकारला का साथ द्यावी...???


 उर्वरित महाराष्ट्रात वा देशात ज्या भागात ऊस, कापुस वा तत्सम पिके मजबुत प्रमाणात घेतली जातात तिथेच नजीक असे रासायनिक प्रदुषण करणारे प्रकल्प किती प्रतिशत आहेत हे शासनाने सप्रमाण जाहिर करायला हवे.
कोकणातल्या वसईची केळी यापुर्वीच जळगावला गेलीत.... डहाणुचा चिकु गायब झाला. उद्या हापुस निकालात निघाला तर आश्चर्य वाटायला नको. या सर्वाना शासनाइतकेच आपण कोकणवासिय जबाबदार आहोत. बिघडत्या पर्यावरणीय समतोलामुळे मच्छीची आवक घटलेली आहे. रत्नागिरीतील मच्छीमारांनी तर मत्स्यदुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली आहे.

देशातील पहिले प्रक्रीया उद्योग प्रशिक्षण क्रुषी विद्यापीठ कोकणातील दापोली येथे उभे राहिले परंतु आम्हाला एकही मोठा प्रक्रिया उद्योग उभारता आला नाही.

48 बंदये आणि त्यांना जोडणारे 210 हुन अधिक धक्के यांच्या साक्षीने असंख्य मच्छिमारांचा संसार उभा आहे. त्यांना याच व्यवसायात स्थिरावण्यासाठी हजार कोटी रुपये टाकायला शासन तयार नाही कारण त्यातुन भुधारक स्थानिकांचा मुलतः विकास होणार आहे. कोकणबाबत हा दुजाभाव का...???

एकुणच या स्थितीमुळे कोकणात होऊ घातलेला विकास काहीँना अर्थकारणामुळे सम्रुद्ध भासतो आहे त्याचवेळी काहीँना आपली जीवनशैली उद्धस्त करणारा सापळा वाटतो आहे.


 1980 च्या दशकात कोकणचा कँलिफोर्निया करण्याचे स्वप्न त्यावेळच्या राज्यकर्त्याँनी पाहिले पण त्याद्रुष्टीने आवश्यक असलेला विकास आराखडा मात्र तयार झाला नाही. तेव्हापासुन आजपर्यँत "कोकणचा कँलिफोर्निया" या दोन शब्दातच कोकणातील जनतेला अक्षरशः गुंडाळले आहे.

जैतापुरप्रमाणे कोकणात 500 कि.मी. च्या परिसरात 14 औष्णिक ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात एवढ्या उर्जाप्रकल्पांची आवश्यकता आहे का? आणि ते सामावुन घेण्याची कोकणची ताकद आहे का?? याचा विचारही शासनाने केला नाही हे दुर्देव...!

कोकणचे भौगोलिक स्थान हे या प्रकल्पांमागचे मुख्य कारण आहे. ऊर्जाप्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. ती गरज किनारपट्टीच्या भागात भागवली जाऊ शकते. या एकमेव कारणामुळे 14 औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोकणच्या माथी मारण्यात आले आहेत. महाराष्ट्राची सध्याची वीजेची गरज 5000 M.W इतकी आहे. कोकणातील प्रस्तावित उर्जाप्रकल्पातुन 33000 M.W. इतकी ऊर्जानिर्मिती पुढील 10 वर्षात होणार आहे. म्हणजेच भारतातील जास्त औष्णिक वीज प्रकल्प असलेला प्रदेश म्हणुन कोकणची ओळख प्रस्थापित होणार आहे.


 एकीकडे वीजप्रकल्पांसाठी कोकणचा वापर केला जात आहे पण स्वतः कोकण जाणीवपुर्वक विकासाच्या बाबतीत शासनाकडुन मागास ठेवले जात आहे.
मुंबई गोवा महामार्गाला पर्याय ठरणारा सागरी महामार्ग दोन दशकांहुन अजुनही प्रलंबित आहे. कोकण रेल्वेचा एकेरी मार्ग कधी ...दुपदरी होणार हा प्रश्न आहे. त्यातच कोकण रेल्वे कोल्हापुरला जोडण्याची घोषणा गेल्या अर्थ संकल्पात केली होती त्याच्या सर्वेक्षणाचे पुढे काय झाले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यावर्षी राजापुर-कोल्हापुर रेल्वे मार्गाची घोषणा झाली.
मुंबईची भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी सुद्धा कोकणातील वशिष्ठी नदीचे पाणी वापरण्याची नामी कल्पना आली आहे. कोयनेच्या या अवजलाच्या प्रकल्पावर कोकण क्रुषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु श्रीरंग कद्रेकर यांनी ब-याचवेळा सुचना करुन देखील काही विचार झाला नाही. कोयना जलविद्युत प्रकल्पातुन सोडले जाणारे हे अवजल वशिष्ठ नदीतुन पुढे समुद्राला मिळते. त्याचा वापर कोकणात जलसिँचनासाठी झाला असता तर शेती विकास झाला असता. कोकणातील प्रश्नावर कोकणचे स्थानिक आमदार एक होत नाहीत हेही कोकणचे दुर्देव...!


 कोकणचा कँलिफोर्निया करण्याचे मनसुबे सरकारचे असु शकतात पण कोकणी माणसाला तसे वाटत असेलच असे नाही. विकासाच्या बाबतीत स्थानिक लोक व सरकार यामध्ये भिन्न मतप्रवाह असु शकतात. याचा अर्थ कोकणी माणुस विकासविरोधक किँवा "ठेविले अनंते तैसेची रहावे" या पव्रुत्तीचा आहे असा होत नाही. परंतु त्याच्या संकल्पनेतील विकास हा चिरकाल टिकणारा व प्रदुषणविरहीत असा असेल तर तो त्याचा दोष आहे असे म्हणता येणाय नाही. पाश्चात्य संस्क्रुती निसर्गाला ओरबाडुन जगण्याची चंगळवादी व्रुत्ती शिकविते तर भारतीय संस्क्रुती निसर्गाने आपल्याला दिलेला ठेवा पुढच्या पिढीकडे आहे तसा हस्तांतरित करायला शिकवते.कोकणी माणुस याच संस्क्रुतीला मानतो परिणामी कोकणचा विकास करताना विकासाच्या संकल्पना मुंबई पुण्यासारख्या शहरातील AC त बसुन न ठरवता त्या स्थानिकांना विचारात घेऊनच ठरवाव्यात जेणेकरुन शासन व स्थानिक जनता यांच्यामध्ये वादाचे प्रसंग न उद्भवता कोकणचा विकास शांततेच्या मार्गाने होईल त्यातुन कोकणचे मुळ सौँदर्य कायम टिकेल.


 शेती आणि मासेमारी व्यतिरिक्त इतर काही किरकोळ व्यवसाय वगळता पर्यटन व्यवसायाचा एक समर्थ पर्याय आत्ता कोकणच्या विकासासाठी खुला झाला आहे. कोकणात पर्यटन रुजवण्यामागे सर्वात महत्वाचा घटक हा तेथील निसर्ग, समुद्र अन् संस्क्रुती हाच आहे.मात्र त्याला... शिस्तबद्ध तिलांजली दिली जात आहे. कोकणात पर्यटनाची लाट आली आहे. दिवसागणीक ती वाढतच जाणार आहे. मुळात पर्यटन क्षेत्राची खुप मोठी व्याप्ती आहे. त्याचे KNOWLEDGE असणारी मंडळी जाणीवपुर्वक ग्रामस्तरापासुन देशस्तरापर्यँतच्या विविध नियोजनात सहभागी असायला हवीत मात्र गलिच्छ राजकरणात ते घडताना दिसत नाही. बारामती, लातुर या शहरांचा गेल्या काही वर्षातील विकास कोकणातील विकसित मेँदुला प्रश्न विचारतो.
कोकणच्या विकासाचा बिघडणारा समतोल अनेक समस्या जन्माला घालतो आहे.
आपला राष्ट्रीय महामार्ग क्र 17 हा सुद्धा असाच एक प्रश्न बनुन राहिला आहे. कोकणच्या विकासाला हातभार लावणारे "क्रषी पर्यटन प्रकल्प" सध्या आकाराला येत आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातुन तेवढ्या परिसरात का होईना सम्रुद्ध पर्यावरणाचा सुखद अनुभव घेता येणार आहे. कोकणातील भौगोलिक रचना धरणांना जन्म देऊ शकणारी आहे. त्या शेजारी तितक्याच प्रमाणात जैवविविधता नांदु शकते. निसर्ग, जंगल, क्रुषी आदि पर्यटन बहरु शकते. आपल्या सर्वाँच्या हातात तेवढेच शिल्लक आहे. आपापला परिसर जरी हिरवागार राहिला तरी कोकणची पर्यटनात्मक वाटचाल कायम राहिल.


 मी ज्या जिल्ह्यात राहतो तो "सिँधुदुर्ग जिल्हा" 30 एप्रिल 1997 रोजी पर्यटन जिल्हा म्हणुन घोषित करण्यात आला. सावंतवाडीपासुन अवघ्या 30 किलोमीटरवर आंबोलीसारखे हिलस्टेशन आणि अवघ्या 20 कि.मी. वर वेँगुर्लेचा समुद्रकिनारा अशी निसर्गाची विविधता 50 क...िलोमीटरमध्ये अजुन कुठेही पाहता येणार नाही. सह्याद्रीपासुन समुद्रापर्यँतचे अलौकिक स्रुष्टीसौँदर्य, 121 कि.मी. चा नयनरम्य समुद्रकिनारा आणि 32 किल्ल्यांचे वैभव अंगाखांद्यावर खेळवणा-या सिँधुदुर्गची पर्यटन विकासातुन सुवर्णभुमी व्हायला वेळ लागणार नाही.येथे सह्याद्रीपासुन समुद्रापर्यँतची विशालता आणि हत्तीपासुन डाँल्फिनपर्यँतची जैवविविधता एकाच ठिकाणी पाहता येते.
सिँधुदुर्ग जिल्ह्यातील सागरकिनारी वसलेल्या मालवण, देवगड, वेँगुर्ले या प्रत्येक तालुक्यामध्ये बघण्यासारखे किमान 6 ते 7 बीच, जलदुर्ग, सागरकिनारे, कोटकिल्ले, ऐतिहासिक मंदिरे आहेत. मालवण समुद्रात शिवाजी महाराजांनी बांधलेला सिँधुदुर्ग किल्ला स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असुन त्यात महाराष्ट्रातील एकमेव 'शिवराजेश्वर मंदिर' आहे.
मराठी साम्राज्याचे आणि इतिहासाचे हे शिलेदार आता मात्र ढेपाळु लागले आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यटन जिल्ह्यातील काही गडकिल्ले तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

 मुंबईच्या समुद्रात 300 कोटी खर्चुन भव्य शिवस्मारक नजीकच्या काळात उभ राहतय. अभिमान आणि आनंद आहे. विदेशी पर्यटक मुंबईत उतरले की त्यांच्यासाठी ते एक आकर्षण असेल. आता थोडा पुढे विचार करु, ते भव्य स्मारक पाहिल्यावर त्यांनी जर किल्ले पाहायची इच्छ...ा व्यक्त केली तर त्यांना आपण काय दाखवणार? पडक्या तटबंद्या, ढासळलेले बुरुज, त्यातल्या इमारतीँचे भग्नावशेष, किल्लाभर माजलेली गच्च झाडी आणि शेकडो वर्षे झुंजलेल्या पत्थरांना वेढणारा हिरवा कँन्सर? कशाच्या आधारावर वैभवशाली इतिहास सांगणार? तो इतिहास घडविणा-या युगपुरुषाचचं स्मारक आपण उभारतोय ना!
दस्तरखुद्द शिवाजी महाराजांनी मोठ्या दुरद्रुष्टीने उभा केलेला मालवण समुद्रातील सिँधुदुर्ग किल्ला ढसळत असताना शासनस्तरावरुन किल्ला संवर्धनासाठी काही तातडीने उपाययोजना होताना दिसत नाहीत. तीच अवस्था देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याची आहे. जिल्ह्यातील 32 गड किल्ल्यांचे जरी शासनाने योग्य प्रकारे संवर्धन केले तरी सिँधुदुर्गच्या विकासाला वेगळीच उंची प्राप्त होईल. मात्र पुरातत्व विभाग आपल्या ताब्यात असलेल्या गड किल्ल्यांच्या बाबतीत स्वतः काहीही करत नाही आणि दुस-यांनाही काही करु देत नाही. समुद्रकिनारे आणि निसर्गसौँदर्य जगात सर्वत्र आहे. आपल्या सिँधुदुर्गाच वेगळेपण आणि इतिहास यांच्या सुंदर मिलाफात आहे.


 मालवण समुद्रतळाखालीच 10 K.M. परिसरात जागतिक स्तरावर दुर्मिळ अशी जैवविविधता आहे. विविध प्रकारचे प्रवाळ, जलचरांच्या विविध दुर्मिळ प्रजाती या ठिकाणी आहेत. माशांच्या पुनरुत्पत्तीचे हे सर्वोत्तम ठिकाण आहे. त्यामुळेच केँद्र शासनाने 19 एप्रिल 1987... च्या शासनपत्रकात मालवण येथे सागरी अभयारण्याची घोषणा केली होती. ते अद्याप झालेली नाही. विजयदुर्गापासुन रत्नागिरीतील नाटेपर्यँतच्या समुद्रकिनारी भागात आंग्रिया नावाचे अदभुत बेट आहे. विविध प्रकारचे प्रवाळ आणि माशांच्या प्रजाती या ठिकाणी पाहता येतात. येथील पर्यटन विकास अजुनही प्रलंबितच आहे. तसेच शिरोड्यानजीकचा समुद्रकिनारी पाण्याचा भाग अगदी पारदर्शक आहे. स्वच्छ, सुंदर, निर्मनुष्य समुद्र किना-यामुळे या ठिकाणी "सी-वर्ल्ड"चा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला. मात्र सागरी पर्यटन आणि पर्यावरण विकासाशी संबंधित बहुतेक सर्वच प्रकल्प शासनस्तरावर मागे पडले आहेत. त्याउलट ग्रामस्थांचा विरोध असले खनिज आणि औष्णिक प्रकल्प पर्यटन जिल्ह्यातील पर्यावरणाला घातक असले तरी शासन पुढे रेटत आहे. सिँधुदुर्गाच्या विकासाचा खेळखंडोबा करण्यापेक्षा सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील काही भाग इकोसेँसेटीव्ह जाहीर करावा अशी मागणी पुढे येत आहे.
जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ब-याच घोषणा झाल्या. 4500 कोटीँचे पँकेज जाहिर झाले. सिँधुदुर्गचा पर्यटन विकास गतीने व्हावा म्हणुन पर्यटन विकास कंपनी स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. या घोषणांचे पुढे काय झाले हे तपासुन बघण्याची गरज आहे. या पँकेजमधील कोट्यावधीचा निधी कोठे आणि कसा खर्च झाला याचा अनुभव फारसा चांगला नाही. त्यामुळे निधीची कोटीच्या कोटी उड्डाणे होऊनसुद्धा जिल्हा पर्यटन विकासाच्या बाबतीत असलेला अनुशेष आणि यामागील झारीतील शुक्राचार्य शोधुन काढल्याशिवाय सिँधुदुर्गची सुवर्णभुमी शापमुक्त होणार नाही.


 कोकणात पर्यटनाबाबत गेल्या 5-7 वर्षात वेगाने वाढ होत आहे. हा वेग अनियंत्रीत होण्याआधीच त्यास योग्य दिशा द्यायला हवी. वाढ आणि विकास यांच्यामध्ये मुलभुत फरक आहे. वाढ ही प्रसंगी उद्देशहीन, दिशाहीन व बेशिस्त असु शकते तर विकास हा एका निश्चित दिशे...ने केलेला ठोस प्रवास असतो. एखाद्या ठिकाणी प्रचंड संख्येने पर्यटक येतात म्हणजे त्या स्थानाचा विकास झाला ही समजुत करुन घेणे संकुचित ठरेल.
केवळ मौजमजा म्हणजे पर्यटन या संकल्पनेला डोळस आणि सजग जाणीवांचा आधार दिला तर ते विकासाच्या दिशेने पडलेले दमदार पाऊल असेल. यामध्ये पर्यावरण, स्थानिकांचे हित, ऐतिहासिक व सांस्क्रुतिक वारशाचे जतन व संवर्धन आणि स्थानिकांसाठी रोजगार या बाबी प्रामुख्याने यायला हव्यात.
मालवणचा सिँधुदुर्ग किँवा मुरुडचा जंजिरा पाहायला गेली अनेक वर्षे लाखो पर्यटक येत आहेत. ते येत आहेत म्हणुन त्यांच्या गरजा पुरवणारे छोटे मोठे व्यावसायिक तिथे उभे राहिले आहेत. अशा शेकडो ऐतिहासिक वस्तु या किनारपट्टीवर उभ्या आहेत ज्यामुळे खरतर त्या परिसरातल्या पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे.
एखाद्या ठिकाणच पर्यटन महत्व केवळ सोयी सुविधांनी वाढत नाही तर मुळात जिथे निसर्ग आणि इतिहास यांची सांगड घातली जाते त्या ठिकाणी पर्यटनाच्या विकासाचे कसदार बीज रोवले जाऊ शकते.

 रायगड,रत्नागिरी आणि सिँधुदुर्ग जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त समुद्रकिनारे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी पर्यटनाचा बहर का दिसत नाही? जिथ ऐतिहासिक वास्तु किँवा धार्मिक स्थळ आहेत तिथे त्या केँद्रस्थानी ठेऊन पर्यटनात वाढ होत आहे. ज्या मुळ वारश्यांच्या... आधाराने पर्यटन व्यवसायाचे बीज रोवले गेले आहे त्या स्थानांच्या जतनाचे काय? त्या वास्तु उन्हापावसात, वादळवा-याच्या तडाख्यात नष्ट होत आहेत. शिवाजी महाराजांनी एका प्रसंगी म्हटले होते की, गड कोट ही पिढ्यांची मिरासदारी... हाच विचार पुढे चालायला हवा. कोकण पर्यटनात स्थानिकांच्या पुढच्या पिढ्यांचाही विचार व्हायला हवा. त्यांना अधिकाधिक संख्येने पर्यटन व्यवसायात येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करायला हवे. त्यासाठी ऐतिहासिक वस्तुंचे महत्व स्थानिकांच्या मनी ठसाला हवे. ही स्थाने स्फुर्तीदायी ठरायला हवीत. त्यापासुन योग्य फायदाही करुन घ्यायला हवा.
अनेक दुर्लक्षित दुर्ग आणि वास्तु या किनारपट्टीवर आहेत. त्यांचे संवर्धन करुन पुरेशा सोयी सुविधा निर्माण करुन त्याच योग्य मार्केटिँग करायला हवे.
शिवस्मारकासाठी मंजुर केलेल्या 300 कोटीँबरोबरच कोकण किनारपट्टीवरील सुमारे 70 किल्ल्यांपैकी 30 किल्ले निवडलेले आणि त्या प्रत्येकांच्या जतन संवर्धनासाठी प्रत्येकी काही कोटी सुरुवातीला खर्च केले तर कोकण पर्यटन विकासाच्या कक्षा नक्कीच रुंदावतील.


 आणखी एक विषय नेहमी चर्चेत येतो की, कोकणचा गोवा व्हायला पाहिजे. मुठभरांच्या फायद्यासाठी गोव्यात काही ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली चाललेला चंगळवाद स्वैराचार आपल्याकडे आणायचा आहे का? रेव्ह पार्ट्या हळुहळु सिँधुदर्गाकडे सरकु लागल्या आहेत. याला व...ेळीच पायबंद घातला गेला पाहिजे. कोकणच्या आणि गोव्याच्या संस्क्रुतीत फरक आहे तो समजुन घ्यायला हवा. गोव्याकडुन केवळ पर्यटनाची मानसिकता स्वीकारावी.

संपुर्ण कोकण दर्शनाची एक भोज्या सहल काही ट्रँव्हल एजन्सीज आयोजित करत असतात. वास्तविक 5-6 दिवसांच्या कमीत कमी 5-6 सहली आयोजित करता येतील इतकी ऐतिहासिक व नैसर्गिक संपन्नता आपल्या कोकणात आहे. अशा वेळी एकाच सहलीमध्ये संपुर्ण कोकणचे धावते दर्शन घडवुन मिळणा-या आर्थिक फायद्याच्या एक चतुर्थाँश फायदाच पदरात पडतो.

बहुतेकांच्या मते कोकणात जायच, समुद्रकिनारी मनसोक्त खेलायच, आकंठ पिऊन झुलायच आणि त्यावर मच्छीच भरपेट जेवण जेवायच एवढीच मर्यादित संकल्पना असते. स्थानिकांनी याचा विचार करावा. सर्वाँगिण विकासासाठी कल्पक आणि ठोस उपाययोजनांची गरज आहे. विकासाच्या ओघात निसर्ग, पर्यावरण आणि ऐतिहासिक ठेव्यांची जपणुक करणे आवश्यक आहे.
कोकणवासियांना त्यांच्या भुमीचा योग्य मोबदला तर जाऊ देत पण तोँडचा घास काढुन घ्यायचे प्रयत्न काही ठिकाणी होताना दिसत आहेत. जोपर्यँत स्थानिक भुमिपुत्र मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यँत सर्वँकष विकासाचे प्रयत्न अपुरे आहेत. निश्चित ध्येय धोरणे ठरवुन पर्यटन व्यवसायास जाणीवपुर्वक दिशा दिल्यास हे साध्य होऊ शकते.



कोकण पर्यटन विकासाच्या द्रुष्टीकोनातुन काही प्रस्ताव...


1) किल्ले व ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन व संरक्षणाची दिर्घकालीन व्यवस्था करुन त्यांचे महत्व पर्यटकांपर्यँत पोहोचवण्यासाठी प्रभावी यंत्रणा असावी त्यासाठी काही योजना राबवता येतील.
a) संबंधित खात्यातर्फे संपुर्ण डागडुजी व दुरुस्ती करुन ती वास्तु एखाद्या संस्थेला दत्तक द्यावी.ती संस्था स्वखर्चाने अथवा स्वप्रयत्नाने निधी उभारुन त्या वास्तुची देखभाल, स्वच्छता हे सर्व पाहिल.
b) त्या वास्तुचा इतिहास सांगणारे स्लाईड शो तयार केले जावेत. तेही सशुल्क दाखवता येतील.
c) महामार्ग व राज्यमार्गावर बोर्ड उभे करुन त्यावर त्या वास्तुची संपुर्ण माहिती लिहावी.
d) मुंबई ते मालवण अशी किनारे किनारे जलसफर करावी.
e) मध्यवर्ती ठिकाणी कोकणचा इतिहास आणि संस्क्रुती सांगणारी म्युझिअम्स उभारली जावीत.
f) महाराष्ट्रातील महाविद्यालयातुन या विषयांवरचे प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांना दिले जावेत.
g) स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रशिक्षित गाईड्स तयार केले जावेत.
h) S.T. बरोबर छोट्या खाजगी वाहनांना पर्यटकांच्या मर्यादित वाहतुकीचा परवाना दिला जावा.
i) त्या वास्तुच्या परिसरात फक्त स्थानिक खाद्य पदार्थ उपलब्ध करुन देणारे स्थानिकांचेच स्टाँल्स असावेत.
j) महत्वाचे म्हणजे सर्व ठिकाणी स्वच्छताग्रुहांची सोय असायला हवी.
j) समुद्रकिना-यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जँकेट्स उपलब्ध करणे गरजेचे आहे.
k) या सर्व पर्यटनाभिमुख योजना राबवताना स्थानिक भुमीपुत्रांना प्राधान्य मिळुन रोजगार वाढेल याची काळजी घ्यायला हवी.

2) कोकणात अनेक प्रकारच्या दशावतारासारख्या लोककला आहेत पण अशिक्षित कलाकारांमुळे त्या व्यावसायिक द्रुष्टीने सादर केल्या जात नसल्याने त्यांना प्रतिसाद मिळत नाही. शासनाने कलाकारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन उत्तेजन दिल्यास लोककलेच्या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

3) परदेशातील पक्षी अभयारण्यांप्रमाणे एखाद्या दिड दोनशे एकर जमिनीवर नैसर्गिकरित्या असलेल्या व्रुक्ष लागवडीवर नायलाँनचे जाळे पसरवुन पक्षांना अभय दिल्यास पक्षी अभयारण्य विकसित होईल.

4) कोकणातील एखादे पारंपारिक खेडे आहे तसेच ठेवण्याच्या द्रुष्टीने (उदा. अंगण, चि-याच्या अरुंद विहीरी, माडापोफळीच्या बागा, गावातील कच्चे रस्ते, बैलगाड्या) कायदा करण्यात यावा. जिल्ह्यात 1-2 ठिकाणी अशी पारंपारिक खेडी जपल्यास पर्यटक नक्कीच ती पाहायला येतील.

5) मुंबई गोवा महामार्गानजीक 8 ते 10 K.M. चा प्रभाग अविकासित क्षेत्र म्हणुन आरक्षित करण्यात यावा जेणेकरुन पुरातन कोकण फक्त पुस्तकात चित्ररुपाने पाहायची वेळ येणार नाही.

6) गणपतीपुळे हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासारखे आहे.... किमान 2000 पर्यटक दिवसभर गणपतीपुळे येथे थांबुन श्रीँचे दर्शन व समुद्रकिना-याचा आनंद लुटुन परत जातात. गणपतीपुळे पर्यटक निवासात एक कायमस्वरुपी हेलापँड उतारल्यास 1 तासात मुंबईतुन पर्यटक येथे येऊ शकतात. यासाठी ही जबाबदारी खाजगी हेलिकाँप्टर कंपनीवरती सोपविण्यात यावी. अशा प्रकारची सेवा तारकर्ली. हरिहरेश्वर, आंबोली इत्यादी ठिकाणी करता येऊ शकेल.

7) भविष्यात कोकणातील पर्यटन स्थळे अधिकाधिक देशी व विदेशी पर्यटक पाहुण्यांपर्यँत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, खाजगी पर्यटन उद्योजक यांची एकत्रितपणे मोट बांधणे आवश्यक आहे.

8) कोकण ही नररत्नांची खाण आहे. टिळक, साने गुरुजी, आंबेडकर, सावरकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, अनंत कान्हेरे, वासुदेव बळवंत फडके, विनोबा भावे, गोळवल गुरुजी याशिवाय अनेक नररत्ने या कोकणात जन्मली आहेत. त्यांच्या कार्याची ओळख पुढच्या पिढीकडे संक्रमित होण्यासाठी त्यांची मुळ गावे सामाजिक तीर्थक्षेत्रे म्हणुन विकसित होणे गरजेचे आहे.


 9) ब्रिटीशांनी ब्रम्हदेशाचा राजा थिबा यास नजरकैदेत ठेवण्यासाठी भव्य राजवाडा बांधला. या राजवड्यात सध्या पुरातत्व खात्याचे वस्तु संग्रहालय आहे. हा राजवडा पर्यटन महामंडळाकडे हस्तांतरित केल्यास तेथे हेरिटेज हाँटेल बांधता येईल. त्यात मँनेजमेँट ...व ट्रँव्हल आणि टुरिझम सारखे अल्प कालावधीचे कोर्सेस सुरु करुन सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. कोकणातील विद्यार्थ्याँना पुणे मुंबईला न जाता रत्नागिरी येथेच हाँटेल मँनेजमेँट आणि कँटरिँगचे शिक्षण उपलब्ध होईल.

10) देवबाग व मोबार या गावात स्थानिकांशी चर्चा करुन संपुर्ण मालकी हक्क जमिन मालकाकडे ठेवत त्यांची घरे तळमजला व 1ला मजला अशी बांधावीत. 1 मजला घरमालकाकडे देऊन 1 मजला महामंडळाकडे ठेवत पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी वापरावा. त्यामुळे पर्यटन क्षेत्र म्हणुन देवबाग, मोबारचा विकास होईल आणि स्थानिकांना भाड्यातुन उत्पन्न मिळेल.

11) पर्यटन महामंडळाने सन 1995 पासुन शिरोडा, वेळाघर, मिठबाव, मोचेमाड इत्यादी ठिकाणच्या जागा खाजगी उद्योजकांना दिल्या. दुर्देवाने त्यांनी गेल्या 15 वर्षात अजुन काहीच विकास केला नाही. यासाठी एकतर या खाजगी उद्योजकांना या जागेचा विकास करण्यासाठी प्रव्रुत्त करावे अन्यथा या जागा पर्यटन महामंडळाने परत घेऊन त्यांचा विकास करावा.

12) सिँधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात वनस्पती मिळाल्याने स्नाँर्कलिँग व स्कुबा ड्रायविँग हा प्रकल्प राबविण्यात यावा. तीवरी बंदर येथे अतिशय चांगले समुद्रतळातील जैविक विविधता आढळुन आली आहे.

13) ज्यासाठी पर्यटक पाहुणे कोकणात येतात ते प्रामुख्याने सागरकिनारी माडापोफळीच्या बागा, येथील प्रदुषणमुक्त हवा शांतता व निवांतपणा या गोष्टी जपुन ठेवण्यासाठी सर्व सागरकिनारे स्वच्छ व अतिक्रमण मुक्त ठेवणे गरजेचे आहे.

14) कोकणमध्ये सध्या नैसर्गिक व भौगोलिक सुबत्ता आहे. या पार्श्वभुमीवर सिँधुदुर्ग पर्यटन जिल्हा तसेच रत्नागिरी क्रुषी व फलोत्पादन जिल्हा म्हणुन जाहीर झाला आहे.
या दोन्ही जिल्ह्यात फक्त पर्यटनविषयी प्रकल्प राबविण्यात यावे.

 15) पर्यटन महामंडळाने महाप्रयासाने कितीही पर्यटन स्थळे विकसित केली परंतु त्यांची जर प्रसिद्धी केली नाही तर ही पर्यटन स्थळे विकली जाणार नाहीत व त्यातुन महामंडळ व एकुणच कोकणला काहीच आर्थिक फायदा होणार नाही.

16) शालेय अभ्यासक्रमातुन पर्यटन व... पर्यटन संस्क्रुती याचे धडे देणे गरजेचे आहे. याबाबत शासनस्तरावरुन विचार व्हावा. देशी विदेशी पर्यटकांचे स्वागत 'अतिथी देवो भव' या जाणीवेतुन होणे गरजेचे आहे.

17) कोकणातील प्रत्येकाला आपल्या स्वतःबाबत व आपल्या पर्यटन स्थळांबाबत अभिमान निर्माण केला गेला पाहिजे. कोकणातील प्रत्येक ग्रामस्थाने कोकण पर्यटनाचे मार्केटिँग केले पाहिजे. पर्यटनाशी संबंधित विकासाचे स्वागत केले पाहिजे.

18) सध्या रत्नागिरी जिल्ह्यात 110, सिँधुदुर्ग जिल्ह्यात 68 आणि रायगड जिल्ह्यात 73 निवासी न्याहारी योजना उपलब्ध आहेत. ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही ठराविक निकष लावुन लाभार्थीँना 40 ते 50% अनुदान दिल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी तयार होऊ शकतात. एकाच उद्योजकाने 200 खोल्यांचे पर्यटक निवास बांधण्याऐवजी 200 लोकांनी आपापल्या घरी निवासी व न्याहारी योजना राबविल्यास 200 कुटुंबांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.


19) सध्या कोकणमध्ये काही ठिकाणे वगळता फेरीबोट सेवा उपलब्ध नाहीत. सागरी मार्गावर खाजगी तत्वावर सागरी फेरीबोट सेवा सुरु केल्यावर फार मोठे आकर्षण निर्माण होईल.

20) रत्नागिरी येथे कोकण महोत्सव आयोजित करण्यात यावा. यामध्ये इतर महोत्सवांप्रमाणे...च जागतिक किर्तीचे कलाकार निमंत्रित करण्यात यावेत. जेणेकरुन कोकणातील पर्यटन स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळेल व कोकण पर्यटन विकासाला वेगळीच झळाळी प्राप्त होईल.

21) खाद्यमहोत्सव पर्यटकांना मोठी पर्वणी ठरु शकेल व त्यायोगे कोकणामध्ये अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील व स्थानिक महिला वर्गाना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल.

22) कोकण रेल्वेला 'कोस्टल टुरिझम ट्रेन' सुरु करण्यात यावी. ज्याप्रमाणे माथेरानची ट्रेन जगप्रसिद्ध आहे त्याप्रमाणे कोस्टल टुरिझम ट्रेन देखील जगप्रसिद्ध होईल.

22) गोवा व केरळ राज्यात पर्यटनाने फार मोठी क्रांती केली आहे. कोकणात पर्यटनाची क्रांती करण्यासाठी रत्नागिरी, सिँधुदुर्ग जिल्ह्यात चौपदरी रस्ते, पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय, दळणवळणाची साधने, चौवीस तास वीजपुरवठा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुलभुत सुविधा शासनाने पुरवणे क्रमप्राप्त आहेत.
* कोकणात पर्यटन उद्योगासाठी सुरुवातीला 3 ते 5 वर्षे बिगर व्याजी कर्जपुरवठा उपलब्ध व्हावा
* पर्यटन प्रकल्पासाठी पुर्वीप्रमाणे 25 ते 30% राज्य शासनाचे अनुदान व 10 ते 15% केँद्र शासनाचे अनुदान मिळाल्यास आर्थिकद्रुष्ट्या कमकुवत असलेल्या उद्योजकांना आपापले पर्यटन प्रकल्प सुरु करणे शक्य होईल.
* आवश्यक ती सगळी कागदपत्रे पर्यटन उद्योजकाने सादर केल्यानंतर त्यांना सर्व परवानग्या एकाच कार्यालयातुन उपलब्ध करुन द्याव्यात. त्यामुळे उद्योजकांची वेगवेगळ्या कार्यालयाकडे होणारी धावपळ कमी होऊन त्यांचा वेळ व पैसा वाचेल.

 23) आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ झाल्यास कोकणात पंचतारांकीत प्रकल्प येऊ शकतील. त्यानंतरच कोकणचा खरा विकास शक्य आहे. यासाठी सिँधुदुर्गातील चिपीचे विमानतळ लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे.

24) प्रत्येक पर्यटन स्थळाची पर्यटन क्षमता लक्षात घेण...े गरजेचे आहे. पर्यटन क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक त्या पर्यटनस्थळी आल्यास पर्यटकांची संख्या असह्य होते. त्याचप्रमाणे कोकणच्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात यावी.

25) सध्या पर्यटन स्थळांच्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न फारसे नसल्याने पर्यटन स्थळी सार्वजनिक स्वच्छता ग्रुहे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, सागरी सुरक्षितता, आरोग्य सेवा ग्रामपंचायतीँना पुरवणे शक्य होत नाही. यासाठी पर्यटन स्थळांच्या ग्रामपंचायतीँना विशेष आर्थिक अनुदान देऊन व पर्यटन कर लावल्यास अनुमती देऊन ग्रामपंचायतीँचे उत्पन्न वाढु शकते. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.


जगभरात पर्यटन व्यवसायाला प्रचंड चालना आहे. काही राष्ट्रे तर फक्त पर्यटन व्यवसायावर चालवली जातात इतकी या क्षेत्राची ताकद आहे. आज गोवा राज्याचे अर्थकरण मुख्यतः पर्यटनावर आधारलेले आहे. निसर्गाने भरभरुन दिलेले असुनही आपला महाराष्ट्र मात्र पर्यट...नाने मागासलेला म्हणुन परिचीत आहे. खरतर भारत देशाच्या भौगोलिक रचनेमुळेच आपण उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतु अनुभवणा-या जगातील मोजक्याच राष्ट्रांमध्ये येतो. निसर्ग रचनेचे काम करणा-या युनेस्को सारख्या संस्थांनी कोकणातील वनांना 'जागतिक संरक्षित वनांचा' दर्जा दिला आहे. येथील काही प्राण्यांच्या प्रजाती, काही वनस्पतीँची जैविकता प्रुथ्वीतलावर फक्त येथेच पहावयास मिळते. निसर्ग अबाधित राखुन जर विकासाचा चतुःसुत्री अराखडा जर कार्यान्वित केला तर पर्यटनाच्या माध्यमातुन कोकणच्या विकासाला सर्वाँगिण चालना मिळेल.

निसर्गाने भरभरुन दिलेल्या कोकणात जर नियोजनबद्ध आराखडा मांडत विकास कार्यक्रम राबवला तर पर्यटनाच्या उद्योगातुन कोकण अर्थकरणाचा एक चांगला पर्याय महाराष्ट्राच्या आर्थिक सुबत्तेला मिळवुन देईल. शिवाय पर्यटनामुळे येणा-या पुरक व्यवसायामुळे कोकणी मा...णसाच्या अर्थार्जन क्षमतेला नवीन बळ मिळुन त्या प्रांतात सम्रुद्धी येईल. बर हे सगळ करत असताना ग्लोबल वार्मिँग सारख्या जागतिक समस्येत भर घालण्याऐवजी निसर्ग संवर्धनातुन त्या समस्येत एक सक्षम पर्याय निर्माण केल्याचे माँडेला तयार करता येईल ज्यात अखिल मानवजातीचे कल्याण लपले आहे.
तेव्हा समाजसुधारणी राज्यकर्त्याँनी, शासनाने व सामान्य जनतेने या सा-याचा विचार करुन निसर्गाने भरभरुन दिलेल्या या कोकणचा पर्यटनाच्या माध्यमातुन विकास करायचा की विनाशकारी प्रकल्पांच्या दुराग्रही हट्टापायी कोकणचा सत्यानाश करायचा हे ठरवण्याची ही योग्य वेळ आहे. अजुनही ही वेळ गेलेली नाही.

खरोखर कोकणला परमेश्वराने मोठ्या प्रमाणात भरभरुन खुप काही दिले आहे. मात्र गरज आहे ती मानवी प्रयत्नांची! अशा प्रकारे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन उद्योजक व कोकणातील सर्व जनता यांनी एकमेकांच्या हातात हात दिल्यास श्री समर्थाँनी सांगितल्यानुसार-

"सामर्थ्य आहे चळवळीचे !
जो जो करील तयाचे !!"

या उक्तीनुसार सर्वाँनी चळवळ केल्यास पर्यटन ही "कोकण विकासाची गुरुकिल्ली" ठरल्याशिवाय राहणार नाही.