सोमवार, १ जुलै, २०१३

भारताला स्वातंत्र्य खरच अहिँसक मार्गाने मिळाले...?

आजच्या जगात अहिँसक आंदोलने दंडुकेशाहीने चिरडली जातात. अण्णा हजारेँनी तर याच अहिँसक आंदोलनाच्या विश्वासावर जनलोकपाल विधेयकासाठी पुर्ण देशाला एकत्रित केल तरी खुद्द अहिँसेच्या तत्वाचा पुरस्कार करणा-या काँग्रेसने त्या आंदोलनाला झुगारुन जनलोकपाल विधेयकाला केराची टोपली दाखवली. अहिँसक आंदोलनांच्या या अपयशानंतर देखील अहिँसा तत्वाचा उदोउदो करणारे समर्थक फक्त अहिँसेमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले असा अर्धवट इतिहास सांगुन स्वतःच लंगड समर्थन करुन घेताना दिसतात.
"दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल.
साबरमती के संत तुने कर दिया कमाल..."
हे गाण देखील ते अभिमानाने म्हणुन दाखवतात.

काँग्रेसने मतांच्या राजकरणासाठी भारतीय स्वातंत्र्याचा जो इतिहास देशातील भोळ्याभाबड्या जनतेपासुन लपवत भारताला केवळ गांधीजी आणि त्यांच्या अहिँसक मार्गाँनीच स्वातंत्र्य मिळाले अशी दवंडी पिटवुन जे पाप केले त्या पापाचा पर्दापाश करण्याची वेळ आता आली आहे.

क्रुपया मी खाली देत असलेल्या मुद्द्यांचा नीट विचार करुन मनन करा.

1) 1942 चे 'चले जाव' आंदोलन ब्रिटीश सरकारने काही आठवड्यातच तुडवले.

2) 1945 साली दुस-या महायुद्धात ब्रिटीश विजयी झाले होते.

3) ब्रिटीशांनी फक्त आझाद हिँद सेनेलाच इंफाळ कोहिमा सीमेवर पराभुत केल नाही तर जपानच्य सेनेला सुद्धा बर्मा मधुन हाकलुन लावल. एवढ्यावरच न थांबता ब्रिटीशांनी पुढे जाऊन सिँगापुरवर आपला कब्जा मिळवला.

4) एवढा रक्तपात भारताला स्वातंत्र देण्यासाठी ब्रिटीशांनी नक्कीच केला नसेल. उलटपक्षी भारतापासुन सिंगापुर पर्यँत सत्तेचा जम बसवण्याचा त्यांचा हेतु होता.

5) मग 1945 ते 1946 च्या मध्ये एकाएकी असा कोणता चमत्कार झाला ज्यामुळे घाबरुन जात ब्रिटीशांनी भारत सोडायचा निर्णय घेतला...???


 आपल्याला शाळेत जो काँग्रेसने लिहीलेला "काँग्रेसी इतिहास" शिकवला जातो त्यात या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळणार नाहीत. अरे हे काँग्रेसचे चोर N CERT च्या पुस्तकात देशासाठी फाशी स्वीकारणा-या भगतसिँग, सुखदेव, राजगुरु या शहिदांना "देशद्रोही" म्हणत असतील तर ते कसला इतिहास शिकवणार आहेत तुम्हाला...?
आपण सुद्धा झापड लावलेल्या घोड्यांप्रमाणे काँग्रेसने सांगितलेल खर मानत गेलो आणि या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.

1922 साली जे असहकार आंदोलन गांधीनी केले होते त्यामुळे जर भारताला स्वातंत्र्य मिळाले असते तर स्वातंत्र्याचे पुर्ण श्रेय नक्कीच गांधीँचे असते.
जेव्हा इंग्रज भारतीयांसमोर शरणागती पत्करणार असते तेव्हाच चौरीचौरा मध्ये झालेल्या हिँसेने व्यथित होऊन गांधीनी आपले अहिँसात्मक आंदोलन मागे घेतले.


 गांधीजी महापुरुष असले तरी आयुष्यात कायमच त्यांनी "सिद्धांत" व "व्यवहार" यात फार मोठी गफलत केली. हटवादी दुराग्रही गांधीजीँनी स्वतःला बाजुला करुन घेत जर दुस-या कोणाकडे आंदोलनाची कमान सोपवली असती तर भारत तेव्हाच स्वतंत्र झाला असता पण अहिँसेचे तत्व भारताच्या स्वातंत्र्यावर भारी पडले.
1945-46 च्या घटनाक्रमांवर लक्ष द्याल तर समजेल की ब्रिटीशांची भारतावर अजुन शेकडो वर्षे राज्य करण्याची इच्छा होती. ब्रिटीशांद्वारे बनवल्या गेलेल्या पुढील 500 ते 1000 वर्षापर्यँत टिकणा-या संसदभवन, अंदमान काराग्रुह या वास्तु या गोष्टीचा पुरावा आहे पण त्या एका चमत्कारामुळे ब्रिटीशांना भारतातुन काढता पाय घ्यावा लागला.लालकिल्ल्यावरील कोर्ट मार्शल विरुद्ध देशातील नागरिकांनी जी उग्र आंदोलने केली त्यावरुन आझाद हिँद सेनेला जनतेची सहानुभुती होती हे स्पष्ट झाले. त्यामुळेच भारतीय सेनेतील जवानसुद्धा द्विधा मनःस्थितीत पडले.
'महान ब्रिटीश साम्राज्यवादाचे' रक्षण करण्यासाठी फाटलेला पोषाख, अर्धपोटी जेवण करुन तापाने फडफडत असताना सुद्धा हातात बंदुक घेत भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढणा-या आझाद हिँद सैनिकांना हरवुन बंदी बनवणारे भारतीय जवानच होते.
जर हे जवान योग्य होते तर देशातील जनता चुकीची होती आणि जर देशातील जनता योग्य होती तर हे जवान चुकीचे होते कारण दोघेही योग्य नाही असु शकत.
भारतीय सेनेच्या जवांनांच्या द्विधा मनःस्थितीचा ज्वालामुखी विद्रोहाच्या रुपाने उद्रेकीत होऊ लागला.
लालकिल्ल्यात खटला चालु असतानाच फेब्रुवारी 1946 मध्ये ROYAL INDIAN NAVY च्या एका बंदाचे रुपांतर विद्रोहात झाले. कराचीपासुन मुंबईपर्यँत आणि विशाखापट्टणमपासुन कोलकातापर्यँत जहाजांना आगीच्या हवाली करण्यात आल. देशभरात भारतीय जवान ब्रिटीश अधिका-यांचा आदेश धुडकारुन देऊ लागले. मद्रास, पुणे, जबलापुरसारख्या शहरात विद्रोहाचे लोण पसरले. पुढील दोन आठवड्यात ते दाबुन टाकण्यासाठी 45 चा कोर्ट मार्शल करावा लागला.
लाल किल्ल्यावरील आझाद हिँद सैनिकांच्या कोर्ट मार्शलने फक्त भारतीय लोकांनाच नव्हे तर ज्या भारतीय सैन्याच्या राज्यभक्तीवर ब्रिटीश सरकार उभे होते त्यांना सुद्धा देशप्रेमाने पेटवुन सोडले. मार्च 1944 मध्ये जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिँद सेना घेऊन इंफाळ-कोहिमेच्या सीमेवर पोहोचले तेव्हा त्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी जशी आझाद हिँद सेना भारताच्या सीमेवर पोहोचली की देशातील लोकांनी आंदोलन करावे आणि भारतीय जवानांनी विद्रोह करावा असे आवाहन केले होते. एवढ तर नेताजींनासुद्धा माहित होत की,

1) फक्त 30-40 हजार सैनिकांच्या जोरावर आपण दिल्लीपर्यँत पोहोचु शकत नाही.

2) जपानी सैन्याचे अमेरिकेद्वारा बनवली गेलेली लीडो रोड नष्ट करणे हे प्रथम उद्दीष्ट आहे आणि भारताचे स्वातंत्र्य हे दुसरे उद्दीष्ट आहे. अशाही परिस्थितीत नेताजीँचा विश्वास होता तो भारतात नागरिकांद्वारे होणा-या आंदोलनावर आणि भारतीय सैन्याच्या विद्रोहावर पण दुर्देवाने हे दोन्ही पण होऊ शकले नाही कारण सरकारने प्रेस वर बंदी घातली होती आणि जपानी सैन्याने भारतावर आक्रमण केलय असा गैरसमज सैन्यात पसरवला होता.
त्याचप्रमाणे नेताजीँच्या फाँरवर्ड ब्लाँक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याने सामान्य जनतेत या गोष्टीचा प्रचार झाला नाही की, इंफाळ-कोहीमा सीमेवरील जपानी सैनिक नेताजीँच्या नेर्तुत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यासाठी युद्ध करत आहेत.

3) भारतीय सैनिकांचे मनोबल राखण्यासाठी ब्रिटीशांनी प्रसिद्ध भारतीयांना सेनेमध्ये कमिशन देण्यास सुरुवात केली.

4) भारतातील प्रभावशाली पक्ष काँग्रेस गांधीजीँच्या अहिँसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवु इच्छित होता. नेताजीँच्या समर्थनार्थ भारतीय जनतेला एकत्र करुन काँग्रेसने कोणतच आंदोलन केल नाही. अर्थात ब्रिटीशांविरुद्ध विद्रोह करायची हिँमत काँग्रेसमध्ये कधीच नव्हती. त्यासाठी नेताजीँसारखा तेजस्वी नेता लागतो गांधीजीँसारखा शंड नाही. पुर्ण जगाला माहित होते की, केवळ भारतीय जवानांच्या राज्यभक्तिमुळे इंग्रज भारतावरच नाही तर अर्ध्या जगावर राज्य करत होते.

5) भारतातील कम्युनिस्ट पार्टीसारखे दुसरे पक्ष ब्रिटीशांना साथ देत नेताजीँबद्दल अपशब्द वापरत होते आणि आझाद हिँद सेनेला जपानची सेना म्हणायचे.
ज्या आंदोलनाची किँवा विद्रोहाची अपेक्षा नेताजीँनी 1944 साली केली होती तो जरी तेव्हा झाला नसला तरी दिड दोन वर्षांनी झाला. ज्या भारतीय सैन्याच्या राज्यभक्तीवर इंग्रज अर्ध्या दूनियेवर राज्य करत होते त्याचा क्षय व्हायला सुरुवात झाली आणि आता भारतातुन काढता पाय घेण्यातच ब्रिटीशांची भलाई आहे हे त्यांच्या लक्षात आले.
नाहीतर ज्या प्रकारे भारतीय सैनिकांनी जहाज पेटवून दिली होती त्याप्रमाणे त्यांनी भारतात उरल्यासुरल्या इंग्रजांना सुद्धा म्रुत्यु दिला असता.
लंडनमध्ये सत्ताहस्तांतरणाची योजना बनवली गेली. भारताची तीन भौगोलिक आणि दोन धार्मिक हिस्स्यात विभागणी करुन भारताला कायमस्वरुपी शारिरिक व मानसिकद्रुष्ट्या विकलांग करण्याची ही चाल होती.
लाँर्ड माऊण्टबेटनची पत्नी एडविना खुप मादक व सुंदर होती. कमला नेहरुंच्या निधनानंतर विधुर बनलेल्या आणि जगात स्त्रीलंपट म्हणुन प्रसिद्ध असलेल्या जवाहरलाल नेहरुंची कामवासना शमवण्यासाठी माऊंटबँटनची पत्नी एडविनाचा उपयोग होईल या चालीनुसार वावेलच्या जागी माऊंटबँटनला भारताचा व्हाँईसराँय बनवण्यात आला. आपल्या सवयीप्रमाणे कामातुर नेहरु एडविनाच्या जाळ्यात अडकला आणि माऊंटबँटनने सहजपणे आपल्या अटी मान्य करुन घेतल्या. नेहरुने एका विदेशी बाईच्या नादी लागत भारताच्या भविष्याचा सत्यानाश केला.

आता तरी लहानपणापासुन शिकत आलेली गांधीँच्या अहिँसक मार्गामुळे भारताला स्वातंत्र मिळाले ही धारणा बदला कारण नेताजी आणि त्यांनी तयार केलेली आझाद हिँद सेना भारतीय स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार आहेत. अजुनही तुमचा विश्वास बसत नसेल तर दस्तरखुद्द ब्रिटीशांची भारताच्या स्वातंत्र्याविषयी काय मते आहेत ते सांगतो.
 सर्वात प्रथम मायकेल एडवर्डच्या शब्दात ब्रिटीशांच्या भारतातील अंतिम दिवसांचे वर्णन-
"भारत सरकारने आझाद हिँद सैनिकांवर खटले दाखल करुन भारतीय सैन्याचे मनोधर्य वाढवण्याचे प्रयत्न केलेले. पण त्याच्या उलट प्रतिक्रिया उमटली आणि भारतीय जवानांना ब्र...िटीश सरकारला साथ दिल्यामुळे शरम वाटु लागली. पुढे त्याचीच परिणीती सैन्यातील असंतोषात वाढण्यास झाली. भारतीय सेना ब्रिटीशांना साथ देणार नाही हे लक्षात आले. नेताजीँचे भुत हेम्लेटच्या बापासारख लाल किल्ल्याच्या आसपास फिरु लागल आणि स्वातंत्र्याचा रस्ता प्रशस्त होऊ लागला.

ब्रिटीश संसदेत जेव्हा विरोधकांनी ब्रिटन भारत का सोडत आहेत हा प्रश्न विचारल्यावर प्रधानमंत्री एटलीने उत्तर दिले की-

1) पगार घेऊन काम करणारी भारतीय सेना आता ब्रिटीशांच्या प्रति इमानदार राहिली नाही.

2) दुस-या महायुद्धातील हानीनंतर इंग्लंड भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःच्या सेनेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर संघटन करण्याच्या स्थितीत नाही.

हेच पंतप्रधान एटली जेव्हा 1956 साली भारताच्या दौ-यावर आले तेव्हा पश्चिम बंगालच्या राज्यपाल निवासात दोन दिवस थांबले होते. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी.बी.चक्रवर्ती यांनी एटलीँना दोन प्रश्न विचारले-
1) गांधीजीँचे चले जाव आंदोलन काही दिवस पुर्वीच ब्रिटिशांनी दडपल होत आढि 1947 साली मजबुर करणारी कोणती परिस्थिती नसताना देखील ब्रिटीशांनी घाईगडबडीत भारत का सोडला...?
त्यावर एटली म्हणाले, नेताजीँच्या आझाद हिँद सेनेवर झालेल्या कारवाईने भारतीय पगारी भुसेना व जलसेना यांमध्ये ब्रिटीश राजवटीप्रती पसरलेला असंतोष आम्हाला परवडणारा नव्हता. त्यामुळेच आम्ही भारत घाईघाईने सोडला कारण अजुन काही दिवस थांबलो असतो तर आमच्या जीवावर बेतले असते.

2) ब्रिटीश भारत सोडुन जाण्यामागे गांधीजीँचा वाटा किती?
तेव्हा एटलीँनी ओठात स्मितहास्य आणत एका शब्दात उत्तर दिले "NOTHING..."


 निष्कर्ष म्हणुन आपण एवढच सांगु शकतो की,
1) ब्रिटीशांच्या भारत सोडण्यामागे भरपुर कारणे होती पण प्रमुख कारण हेच होते की भारतीय पगारी सैन्यांमध्ये ब्रिटीशांप्रती निष्ठा किँवा इमानदारी कमी झाल्यावर भारतात फक्त ब्रिटीश सैनिकांच्या जोरावर राज्य करणे ब्रिटीशांना अशक्य होते.

2) भारतीय पगारी सैनिकांच्या मनात ब्रिटीशांविषयी निष्ठा कमी होण्यास प्रमुख कारण होते ते नेताजी सुभाषचंद्र बोस, लालकिल्ल्यात आझाद हिँद सैनिकांवर चाललेला खटला आणि आझाद हिँद सैनिकांना भारतीय लोकांकडुन मिळत असलेली अभुतपुर्व सहानुभुती...

3) ब्रिटीशांनी भारत सोडुन जाण्यास गांधीजी किँवा काँग्रेसच्या अहिँसक धोरणांचा वाटा नगण्य
होता.

यापुढे "दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल..." गाण गाताना पुर्नविचार करा आणि अहिँसेसारख्या निरर्थक तत्वाचा उदोउदो करणे बंद करा.

२ टिप्पण्या:

  1. Gandhiji He Dusare koni nasun Talu varil loni khanare ek vyaktimatvta hote..kase ahe aplayaa deshat padhat ahe naa...ekhdyachi puja karayachi tyatun apan kadhi shahane nahi honaar ree...aplaya freedom milalae yache mukhya karan hote world -war 2 ,,nor Gandhiji..Common thats a Common Sense..Jar war zalenasate tar ajun parayant british gele nasaatee..so we have to think about it 100 times before we making man like him a Super-hero....!!!!!

    उत्तर द्याहटवा
  2. As per all the books I read regarding Indian History all the above writing is absolutely correct.

    उत्तर द्याहटवा