बुधवार, ३ जुलै, २०१३

एक था टायगर…

काळाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना आपल्यातून हिरावून नेल.स्वतः बाळासाहेब ठाकरे एक विचार आहेत आणि विचार कधीच मरत नाहीत. मराठी माझा श्वास आहे आणि हिंदुत्व माझा प्राण आहे, या एकाच विचाराने बाळासाहेब झपाटलेले होते. महाराष्ट्रात नव्हे तर देशात शिवरायांची शिवशाही अस्तित्वात यावी, यासाठीच बाळासाहेब शेवटच्या श्वासापर्यंत लढले. त्यांच पूर्ण आयुष्यच एका लढाऊ योद्ध्यासारख होत.आजपर्यंत कित्येक नेत्यांनी स्वताच्या स्वार्थासाठी पार्टी स्थापन केली, लोकांना फसवून सत्ता देखील उपभोगली, फक्त बाळासाहेब एकटेच असे होते कि ज्यांनी सामान्य लोकांसाठी 'शिवसेना' स्थापन केली, सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन प्रसंगी रस्त्यावर उतरले, आणि जेव्हा सत्ता उपभोगायची वेळ आली तेव्हा स्वतः मात्र बाजूला गेले आणि शिवसैनिकांच्या हातीत मुख्यमंत्रीपद दिले. यालाच म्हणतात निस्पृह राजकारणी...! बाळासाहेब काटेरी फणसासारखे होते, बाहेरून कितीही कठोर दिसत असले तरी आतून खूप गोड होते. त्यांनी विरोधाला विरोध कधीच केला नाही, त्यांचा विरोध विचारांना होता. या आधी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला होता; आज पुन्हा एकदा महाराष्ट्र पोरका झाला असेच खेदाने म्हणाव लागेल. मंत्रालयावर भगवा फडकावणे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते, आता बाळासाहेबांच्या निधनानंतर तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करतील आणि मंत्रालयावर सन्मानाने भगवा फडकवतील अशी अपेक्षा करू. माझ्या या लाडक्या लढवय्या नेत्याला माझा अखेरचा सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली....!! आता दुसरे बाळासाहेब होणे नाही....!!
"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा..."

बाळासाहेब फक्त तुमच्यासाठी....

"जगाने सर्कशीतील वाघ खूप पहिले असतील,
पण जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब...

मान खाली घालत दिल्लीत मुजरा करणारे महाराष्ट्रातील भरपूर नेते असतील,
पण हिंदूंना ताठ मानेने जगायला शिकवणारे बाळासाहेब...

शिवाजी पार्कला सभा घेऊन नंगानाच करणारे खूप जन बघितले,
पण शिवाजी पार्कचे 'शिवतीर्थ' म्हणजे बाळासाहेब...

नाकाला करणारे कितीतरी नकलाकार असतील,
पण आक्रमकतेची ओरीजनल कॉपी म्हणजे बाळासाहेब....

हिंदुस्तानातील सगळ्याच नेत्यांनी आतापर्यंत साहेब म्हणून मिरवले,
पण सामन्यातील सामन्याने अगदी मनापासून ज्यांना 'साहेब' मानले ते म्हणजे बाळासाहेब...

गुंडगिरी थांबवा म्हणायची सवय अनेक पांढरपेश्या नेत्यांना होती,
पण आय-बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी प्रसंगी गुंड झालेत ते म्हणजे बाळासाहेब...

स्वतःला सम्राट म्हणवणारे कित्येक जण पाहिले,
पण तब्येत खालावल्यावर रात्री १२ वाजता लाखो लोक जमवणारे हिंदूहृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब....

पक्षादेश देऊन स्वतः पळ काढणारे अनेक पक्षप्रमुख असतील,
पण स्वतः दिलेला आदेश पक्षादेश एक शिवसैनिक म्हणून तंतोतंत पाळणारे म्हणजे बाळासाहेब....

पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेणारे कितीतरी जण असतील,
पण शिवसैनिकांसाठी मातोश्रीवरचे 'विठ्ठल' म्हणजे बाळासाहेब....

हौसे, नौसे, गौसे भरपूर जण असतील,
पण त्या सर्वांचा 'बाळ' नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब...."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा