शुक्रवार, १९ जुलै, २०१३

वैद्यकीय अधिका-याला मारझोड करणारी राणेसमर्थकांची 'काँग्रेसी लोकशाही'...!

सिँधुदुर्गात निरवडे प्राथमिक आरोग्य केँद्राचे अधिकारी प्रभाकर पवार यांना मारहाण केल्यानंतर राणेसमर्थक सभापती प्रियांका गावडे यांनी जी सारवासारव केली ती ऐकुन मला 'डोंबिवली फास्ट'मधील माधव आपटे आठवला. फरक फक्त इतकाच होता की, माधव आपटेची तळमळ असहाय्य अशा व्रुद्ध जोडप्याला रुग्णालयात योग्य ते उपचार मिळावेत यासाठीच होती आणि इकडे सभापती महोदया प्रियांका गावडे यांची धडपड खोट्या अहंकाराला जपण्यासाठी होती.

अगदी डोँबिवली फास्टमध्ये जेव्हा माधव आपटेची भुमिका साकारणारा संदिप कुलकर्णी डाँक्टरच्या डोक्याला पिस्तुल लावुन गरीब आजी-आजोबांचे काम करायला सांगतो, तेव्हा त्याच्या या क्रुत्याने चिडलेली आजीच त्याला जे सांगते, ते खरच प्रियांका गावडेँसारख्या सत्तेचा माज येऊन मुजोर बनलेल्या सभापतीँनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
"ज्या डाँक्टरला आम्ही देव मानतो, त्यालाच तु धमकी देतोयस...? परमेश्वरानंतर नाडीवर बोट ठेवणारा फक्त डाँक्टरच असतो. जीव वाचवणा-यालाच तु जीवे मारण्याची धमकी कशी काय देऊ शकतोस...?"आजीच्या या संतापानंतर माधव आपटेच्या चेह-यावर आलेले अपराधीपणाचे भाव पाहुन बाजुला उभे असलेले आजोबा त्याची समजुत घालताना म्हणतात-
"तुमचा राग बरोबर आहे पण मार्ग चुकीचा होता. दमबाजीन प्रश्न निकालात निघतील अस वाटत पण ते फक्त वाटतच. प्रत्यक्षात त्यामुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात. समजुतदारपणा दाखवल्यानेच प्रश्न सुटु शकतात आणि हा समजुतदारपणा ज्याच्या अंगी आहे, तो जनावरांपेक्षा वेगळा आहे ,म्हणुन त्याला 'माणुस' म्हणतात."

आता डोँबिवली फास्ट आणि निरवडे आरोग्य केँद्रातील प्रकरणाची तुलना होऊ शकत नाही कारण माधव आपटे अन्यायाने पेटुन उठलेला एक सामान्य तरुण होता तर प्रियांका गावडे या सावंतवाडीच्या सभापती आहेत. एका लोकप्रतिनिधीकडुन असे बेजबाबदार वर्तन अपेक्षित नसते, नव्हे ते अक्षम्यच आहे. त्यासाठीच या घटनेची पार्श्वभुमी जाणुन घेणे महत्वाचे आहे.
"निरवडे प्राथमिक आरोग्य केँद्रातील डाँ.प्रभाकर पवार हे आठ दिवस रजेवर असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. लोकांनी सभापती प्रियांका गावडे यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी डाँ.पवार यांना मोबाईलवर संपर्क साधला."
इथपर्यँत सभापतीँनी जे केले ती एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीस साजेस आहे आणि त्यासाठी त्या कौतुकास पात्र आहेत.

त्यानंतर डाँ. पवारांनी मोबाईलवर उद्धट उत्तरे दिली, असे सभापतीँचे म्हणणे आहे. (त्यात तथ्थ्य किती हा संशोधनाचा विषय आहे.)
दरम्यानच्या काळात डाँ. पवार आरोग्यकेँद्रात आले तेव्हा सभापती गावडे डाँक्टरांच्या खुर्चीत बसल्या होत्या आणि डाँक्टरांनी त्यांना तात्काळ आपल्या खुर्चीवरुन उठण्यास सांगितले. त्यामुळे अपमानित झालेल्या प्रियांका गावडेँनी काँग्रेस समर्थकांना सांगुन डाँ. पवारांना मारहाण केली.
डाँ. पवारांनी पोलिसात तक्रार नोँदवताच, प्रकरण अंगावर शेकेल याची जाणीव झाल्याने, आपण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच  अशी मारहाण केल्याचे सभापती म्हणाल्या.
काही वेळासाठी मान्य करु की प्रियांका गावडे यांच्या म्हणण्याप्रमाणे डाँ. पवार त्यांच्याशी मोबाईलवर उद्धटपणे बोलले किँवा स्वभावतःच हा माणुस उर्मट आहे, तरी देखील काही प्रश्न अनुत्तरीत राहतात.

1) उर्मट वर्तन करणा-या डाँ.पवारांची सभापती वरिष्ठांकडे तक्रार करु शकल्या असत्या. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी किँवा बडतर्फ केले जावे, अशी मागणी केली असती तर ती देखील रास्त म्हणता येऊ शकली असती. पण वैद्यकीय अधिकारी उद्धटपणे वागला म्हणुन सभापती देखील सगळ्या लोकशाही मुल्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारणार का...?
जर काँग्रेस कार्यकर्ते डाँ. पवारांना उद्धट म्हणणार असतील तर त्यांनी मारामार करुन कोणत्या सभ्यतेचे प्रदर्शन केले आहे...??
की आपण राणेसमर्थक आहोत, आपल्याला सिँधुदुर्गात कोणाच्या बापाची भिती नाही, अशीच स्वतःची समजुत काँग्रेसच्या कार्यकर्त्याँनी करुन घेतली आहे...???
तसे असेल तर येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सिँधुदुर्गातील जनताच तुम्हाला तुमची खरी लायकी दाखवेल. दादागिरी करणा-यांचे काय हाल होतात याचा प्रत्यय वेँगुर्ला नगरपालिका निवडणुकीत आलाच असेल.

2) जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गेलेल्या सभापतीँना वैद्यकीय अधिका-याच्या खुर्चीत बसायचे कारणच काय...?
वैद्यकीय अधिकारी म्हणजे कार्यालयातला शिपाई नव्हे तर तो एक राजपात्रित अधिकारी असतो आणि पंचायत समितीचा सभापती म्हणजे भारताचा राष्ट्रपती नसतो. सभापतीपदावर असताना आपण कोणत्या खुर्चीत बसावे आणि कोणत्या खुर्चीत बसु नये या गोष्टीँची जर माहिती नसेल तर अशा व्यक्तिला सभापतीपद देणा-या काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. अगोदर स्वतःच चुकीच्या खुर्चीवर बसायचे आणि नंतर कोणी उठवले की अवमान झाला म्हणुन बोँब मारत फिरायचे, याला काय अर्थ आहे...?
मुळात प्रश्न हाच आहे की सभापतीला मान-अवमान हा प्रश्नच कुठे येतो...? तुम्ही सभापती असाल, आमदार वा खासदार परंतु लोकांनी निवडुन दिलेले सेवकच आहात. पाच वर्षाँनी लोकांकडे मतांची भिक मागताना तुम्हाला मान-अपमान बरे नाही आठवत...?? याला मान-अपमान नाही तर सत्तेचा माज म्हणतात आणि सिँधुदुर्गातील सुशिक्षित जनताच तो उतरवणार.

3) वैद्यकीय अधिकारी प्रभाकर पवार यांनी खाजगी कामासाठी 8 दिवस रजा घेतली, त्यात त्यांनी कोणती चुक केली...?
वैद्यकीय अधिका-यांनी रजा न घेता अविरत कामच करत राहावे असा नियम राणेसमर्थकांनी बनवला आहे का...??
निरवडेच नव्हे तर सिँधुदुर्गातील कित्येक आरोग्यकेँद्रात अपु-या कर्मचा-यांमुळे रुग्णांना तात्काळत राहावे लागत आहे आणि रुग्णांच्या गैरसोयीला डाँ. पवार जबाबदार नसुन सत्ताधारी काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. आता कुठे गेले उठसुठ सिँधुदुर्गाच्या विकासाच्या बाता मारणारे कोकणचे तथाकथित विकासपुरुष...?? शासकीय रुग्णालयात 30% जागा रिक्त आहेत, लोकांची पावलापावलावर गैरसोय होतेय, मग कसला डोँबलाचा विकास केलात...???
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या लोकांच्या मुलभुत गरजा आहेत आणि त्या पुर्ण करण्यात काँग्रेस आणि नामदार नारायण राणे साहेब अपयशी ठरणार असतील तर खड्ड्यात गेला तो विकास...!

इकडे प्रश्न कोणा एका प्रभाकर पवारांचा नाही तर सिँधुदुर्गात बळावत चाललेल्या राडासंस्क्रुतीचा आहे, त्यांना मारणा-या प्रव्रुत्तीचा आहे. नामदार नारायण राणेँसारख्या ताकदवान व्यक्तीचा पाठिँबा असेल तर आम्ही जिल्ह्यात कोणालाही लाथाबुक्यांनी तुडवु हिच प्रव्रुत्ती यामागे दिसुन येते. नाथ पै, दंडवतेँच्या कारकिर्दीत सिँधुदुर्ग जिल्हा विद्वान लोकांचा मतदारसंघ म्हणुन ओळखला जायचा आणि आज राणेसमर्थकांनी केलेल्या राडेबाजीमुळेच सिँधुदुर्गची तुलना बिहारशी केली जातेय. महाराष्ट्रात नक्षलवाद्यांनी त्रस्त असलेला गडचिरोलीसारखा जिल्हा सोडला तर दहशदीच्या बाबतीत सिँधुदुर्गचाच नंबर लागतो आणि हा साधासुधा दहशतवाद नसुन 'राजकीय दहशतवाद' आहे. देवाला प्रतिवर्षी बक-याचा बळी द्यावा त्याप्रमाणे कोणी अंकुश राणे प्रत्येक निवडणुकीला बकरा ठरतोय, विधानसभा निवडणुकीदिवशी विरोधी उमेदवार वैभव नाईकवर बंदुक रोखली जातेय. अजुनपर्यँत हा दहशतवाद राजकीय आखाड्यापुरताच मर्यादित असायचा परंतु आता त्याची झळ सामान्य लोकांनाही बसतेय. वेँगुर्ल्यासारख्या सुसंस्क्रुत शहरात स्वाभिमान उतु गेल्यानेच विलास गावडे घरी नसुन त्यांची बायकापोरे आणि व्रुद्ध आईवडील घरात असताना दारावर लाथा मारल्या गेल्या. आता वैद्यकीय अधिकारी प्रभाकर पवारांवर खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठीच हल्ला केला गेला.
मला कीव येते ती जिल्हाधिका-यांवर मुकमोर्चा काढणा-या डाँक्टर्सची...! दोन दिवस या मारहाणीच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिका-यांनी कामबंद आंदोलन केले गेले आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन कोणत्याही ठोस कारवाईशिवाय आंदोलन का मागे घेण्यात आले...? कोणतीही नितीमत्ता नसलेल्या सभापती प्रियांका गावडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतील अशी अपेक्षा करणेच मुर्खपणाचे आहे पण वैद्यकीय अधिका-यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही...?? आजच्या वर्तमानपत्रात डाँक्टर्स फँटर्निटी क्लब व इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे सर्व राजकीय पक्षांना प्रोटोकाँलबाबत माहिती द्यावीत अशा सुचना देण्यात आल्या, ही बातमी वाचुन हसाव की रडाव तेच कळेना. सिँधुदुर्गात काँग्रेससारख्या राजकीय पक्षांना राजकरणातील प्रोटोकाँलच माहित नसतील तर ते राजकरणात झग मारायला आलेत का...??
बर या डाँक्टर्स असोसिएशनमध्ये डाँ.जयेँद्र परुळेकर आणि डाँ.मिलिँद कुलकर्णीँचा समावेश आहे. यातील डाँ.परुळेकर आता काँग्रेसचे अधिक्रुत प्रवक्तेच आहेत आणि डाँ. कुलकर्णीँच्या राणेभक्तीबाबत मी वेगळ लिहायची गरज नाही. ज्या लोकांनी आपली मते, आपले विचार, आपली निष्ठा काँग्रेस आणि राणेँना विकली आहे, अशा लोकांकडुन जिल्ह्यातील डाँक्टर्सना न्याय मिळणे म्हणजे पाकिस्तान दाऊद किँवा डी कंपनीवर कारवाई करील, अशी अपेक्षा ठेवण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत सामान्य लोकांनी डाँक्टर्सच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे गरजेचे होते पण कोणालाच त्यांच्याशी काही देणेघेणे नाही.
अजुन किती दिवस असा निमुटपणे लाथाबुक्यांचा मार खाणार आहात...??? आज डाँ. प्रभाकर पवारांवर जी वेळ आली तीच वेळ तुमच्या-आमच्या पैकी कोणावरही येऊ शकते आणि ते टाळायचे असेल तर काँग्रेस कार्यकर्त्याँच्या आणि राणेसमर्थकांच्या या मुजोरीला विरोध व्हायलाच हवा. सगळीकडुन मार्ग बंद झाले आहेत तरीही सिँधुदुर्गातील सुज्ञ मतदारांनी या राजकीय दहशतवादाला खतपाणी न घालता येत्या निवडणुत अद्दल घडवणे गरजेचे आहे. आता येणारा काळच ठरवेल की दंडवते, नाथ पै यांच्याकडुन शिकलेल्या लोकशाही मुल्यांची आजही आपणाला जाणीव आहे, अभिमान आहे की काळाच्या ओघात आपण कोकणच्या स्वाभिमानालाही तिलांजली दिली आहे...???

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा