बुधवार, ३ जुलै, २०१३

'कप' आला पण 'सचिन' गेला….

गेले पाच सीझन आयपीएलच्या ट्राँफीसाठी अगदी चातकासारखी वाट बघितली. आमचे मालक चेन्नई सुपरकिँग्जच्या गुरुनाथ मय्यपनसारखे फिक्सरकिँग नसल्याने मुंबई इंडियन्स प्रत्येक सीझनला काही फायनलमध्ये पोहोचली नाही मात्र तरीही एका कट्टर समर्थकांप्रमाणे नेहमी मुंबई इंडियन्सच्या मागे ठामपणे उभे राहिलो कारण याच मुंबई इंडियन्स टीममध्ये माझा लाडका खेळाडु आणि क्रिकेटचा देव सचिन तेँडुलकर खेळायचा. यंदा सर्वप्रथम महाराष्ट्रात दुष्काळाच्या धर्तीवर आयपीएल खेळवली जात असल्याने सगळ्यांनीच आयपीएलवर टिकेची झोड उठवली. माझ्याकडुनही ब-याच लोकांनी आयपीएलवर टिकेची अपेक्षा केली होती पण सचिन तेँडुलकर आणि मुंबई इंडियन्सशी असलेल्या बांधिलकीमुळे मी आयपीएल बघणार हे पहिल्याच दिवशी घोषित करुन टाकले. काही जणांनी मला क्रिकेटवेडा ठरवुन आपल्या फ्रेंडलिस्टमधुन काढुन देखील टाकले. तरीही मी माझ्या निर्णयाशी अखेरपर्यँत ठाम राहिलो. मला क्रिकेटचे वेड अजिबात नव्हते. आयपीएलचे दोन महिने सोडले तर भारताचे आंतरराष्ट्रीय वनडे सामने मी ढुंकुनही बघत नाही कारण त्यात माझा लाडका सचिन नसतो. फक्त टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनची फलंदाजी तेवढी बघतो. मी आयपीएलमध्ये सुद्धा फक्त मुंबई इंडियन्सचे सामने न चुकता पाहायचो कारण त्यात वनडे मधुन निव्रुत्त झालेल्या रंगीत कपड्यात खेळताना पाहायची संधी मिळायची. मला आयपीएल मध्ये फिक्सिँग होते का नाही यात काडीचाही रस नव्हता. सचिनला मैदानात खेळताना पाहण्याचा अनुभवच काही और असायचा. काल कोणी एकाने कमेँट केलेली की आयपीएलमध्ये भ्रष्टाचार असुन ती पाहताना तुम्हा लोकांना लाज कशी वाटत नाही...?
त्या सर्व तथाकथित सभ्य लोकांना मी एवढच विचारु इच्छितो,
2G स्पेक्ट्रम मध्ये घोटाळा झाला मग मोबाईल वापरताना तुम्हाला लाज का वाटत नाही...?
कोळशात घोटाळा झाला मग वीज वापरताना तुम्हाला लाज का वाटत नाही...??
राष्ट्रकुल स्पर्धेत कलमाडीने घोटाळा केला मग त्या स्पर्धा बघताना तुम्हाला लाज का वाटली नाही...???
एवढच कशाला, अरे तुमच्याच मतातुन निवडुन गेलेले शेकडो मंत्री भ्रष्टाचारी म्हणुन कुख्यात आहेत मग तुम्हाला मतदान करताना का लाज वाटत नाही...????

फक्त आयपीएल या संकल्पनेबद्दल द्वेष असल्याने त्यांना भ्रष्टाचारी म्हणुन आपला संताप व्यक्त करायचा.अगदी काल सुद्धा काही लोक सामना फिक्स होता म्हणुन ओरडत होते. मला एकच प्रश्न पडतो यांना आयपीएलकडुन सामना आवर्जुन बघा अस कोणी निमंत्रण पाठवलेल का...? की आयपीएलवाले नारळ घेऊन घरी आलेले...??
तुम्हाला आवडत नसेल तर चँनेल बदलुन दुसरा कार्यक्रम बघण्याचा पर्याय उपलब्ध असताना आयपीएलच कशाला झक मारायला बघत होता...? इकडे घरात तंगड्या वर करुन आयपीएल सामने बघायचे आणि फेसबुकवर येऊन ते सामने फिक्स असतात, आयपीएल पाहण्यात आपला अमुल्य वेळ वाया घालवु नका अशी तत्वज्ञाने झाडायची. हा कसला दुटप्पीपणा...?
आयपीएल फिक्स आहे आणि तुम्ही सत्यवादी राजा हरिश्चंद्र आहात तर बंद करुन टाका ना तुमचा टी.व्ही. सेट...!
उगाच आयपीएल बघणा-यांना तुमचे अमोघ असे तत्वज्ञान पाझरुन कशाला पिडता...?
तुम्हाला अगोदर कोणी सांगितल की इकडे सगळेजण आयपीएल सामन्याच्या निकालासाठी उत्सुकतेने बघतात...??
ज्यांना चीअर लीडर्स आवडतात ते चीअर लीडर्ससाठी आयपीएल बघतात, ज्यांना धोनी आवडतो ते त्याची फलंदाजी पाहण्यासाठी, ज्यांना मलिँगा आवडतो ते त्याची गोलंदाजी पाहण्यासाठी आणि माझ्यासारखे कित्येक जण फक्त सचिनला मैदानात पाहण्यासाठी आयपीएल बघतात.
आता इकडे फिक्सिँगचा संबंध कुठे आला...? 3 तासाचा पिक्चर बघण्याऐवजी 3 तासाचा सामना एवढा सरळ साधा हिशोब आहे मग तुमचे तत्वज्ञान नक्की कशासाठी...? आयपीएल मध्ये फिक्सिँग असेलही तरीही प्रत्येक चेँडु फिक्स करता येतो का...? काल मलिँगाने हसीला जो अप्रतिम याँर्कर टाकला तो फिक्सच होता का, CSK विरुद्ध पहिल्या सामन्यात जीवाचा आकांत करुन पोलार्डने सीमारेषेवर टिपलेला तो धोनीचा अशक्यप्राय झेल फिक्सच होता का...? फक्त काही नालायक खेळाडु आणि टिमसाठी एवढ्या अत्त्युच्च दर्जाच क्रिकेट पाहायचच नाही हे मला पटत नाही आणि पटणारही नाही. फिक्सिँगमध्ये जे कोणी आढळतील अगदी तो मुंबईचा खेळाडु किंवा मालक असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. असो, तर मी सचिनच्या निव्रुत्तीबद्दल बोलत होतो. काल मुंबई इंडियन्स सहा वर्षानंतर पहिल्यांदाच चषक उचलणार आणि ते पाहण्याच्या मी घाईत होतो. तेवढ्यातच हर्ष भोगले विजयावर सचिनची प्रतिक्रिया विचारायला गेला आणि ही माझी शेवटची आयपीएल आहे असे सांगुन सचिनने अक्षरशः आमच्यावर बाँम्बगोळाच टाकला. आनंदावर विरझण टाकण्यासाठी एवढे एकच कारण पुरेसे होते. धक्क्यातुन सावरायला खुप वेळ लागला.नंतर विचार केल्यावर सचिनने दिलेली कारणे पटु लागली. 40 व्या वर्षी आयपीएलच्या फोरमँटला शरीर साथ देत नाही. वर्ल्ड कप जिँकल्यानंतर सचिनने वन-डे तुन निव्रुत्ती घेतली नाही आणि त्याने खुप मोठी चुक केली या मताचाच मी होतो कारण सचिन सारख्या 'देव'माणसाला त्याच सन्मानात निव्रुत्ती मिळायला हवी. मुंबई इंडियन्सने जिँकलेली आयपीएल ट्राँफी ही अगदी योग्य वेळ होती त्याच्या आयपीएल निव्रुत्तीसाठी...! सचिनने आयपीएलमध्ये खेळलेल्या आपल्या शेवटच्या चेँडुवर षटकार मारला आहे आणि तो ही थेट सचिन तेँडुलकर स्टँडमध्ये हे ही नसे थोडके...!! तुम्हा-आम्हा सचिनप्रेमीँना सचिन असाच आयुष्यभर खेळत राहावा असे वाटत राहिल पण उगवलेल्या सूर्याला मावळतीकडे झुकावेच लागते हा निसर्गनियमच आहे. गेली 23 वर्षे क्रिकेटविश्वात तेजाने तळपणा-या सचिनरुपी सूर्यास माझा त्रिवार प्रणाम ___/\___

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा