गुरुवार, ४ जुलै, २०१३

एका लग्नाची, दुसरी गोष्ट …

"एका लग्नाची दुसरी गोष्ट" मालिकेच्या शेवटच्या भागासोबत घना-राधाच्या फेमस जोडीने आपणा सर्वाँचा निरोप घेतला. आजच्या धावपळीच्या जगात घना-राधा आणि काळे कुटुंबीय नकळत कधी आपल्याच कुटुंबाचा भाग बनुन गेले ते समजलेच नाही. पाश्चात्यांचे अनुकरण करुन स्वतःला MODERN समजणा-या तरुण पिढीला विभक्त कुटुंबपद्धतीत एक संकुचित आनंद वाटु लागला होता पण या मालिकेने थोड्या फार प्रमाणात का होईना तरुणाईला पुर्वीच्या काळी मो
ठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेल्या एकत्रित कुटुंबपद्धतीचे महत्व पटु लागले. तरुण स्वतःला कितीही शहाणे समजत असले तरी आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आपल्यापेक्षा चार पावसाळे अधिक बघितलेल्या जाणत्यांची म्हणजेच माई आजीँची गरज वाटु लागली.

आपण प्रत्येक वेळी बुद्धीला पटेल तो निर्णय घेऊन स्वतःला कितीही PRACTICAL म्हणवुन घेत असलो तरी बुद्धिने घेतलेला आयुष्यातील प्रत्येक निर्णय योग्य असतोच असे नाही. जेव्हा प्रश्न भावनांच्या गुंतागुंतीचा असतो तेव्हा बुद्धीपेक्षा आपल्या मनाला जे पटेल तेच करावे. करियर, करियरच्या मागे अधाशासारखे लागुन कमावलेला पैसा आपल्याला आयुष्यात क्षणिक आनंद मिळवुन देतो पण सुख-शांती देऊ शकत नाही. खर समाधान तर आजी-आजोबांच्या वटव्रुक्षाच्या छायेत, आई-वडीलांच्या आशीर्वादात आणि बायकोच्या नजरेतुन व्यक्त होणा-या भावनेमध्ये असते. कितीही पैसा खर्च केल्या, करियरच्या बढाया मारल्या तरी ते मिळु शकत नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे या मालिकेने तरुणांना प्रेमाची नवी परिभाषा शिकवली. प्रेमापुढे जगातील बाकी सर्व गोष्टी क्षुल्लक असतात हे सप्रमाण सिद्ध केले. शिवाय प्रेम हा कन्सेप्ट फक्त नवरा-बायको किँवा प्रियकर-प्रेयसीपुरता मर्यादित नसुन आई-वडीलांचे मुलावर, आजीचे नातवावर आणि काका-काकुंचे पुतण्यावर असते ते प्रेमच असते. आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व नात्यांची किँमत ही करियरपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते.
तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जसे ठरवुन प्रेम करु शकत नाही तसेच तिच्यावर कळत-नकळत करत असलेले प्रेम नाकारु पण शकत नाही. फक्त एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी की ते असलेले प्रेम योग्य वेळी व्यक्त होणे अत्यावश्यक असते कारण उगाच उशीर करुन अव्यक्त राहिल्यास ती व्यक्ती कायमची गमावण्याची शक्यता दाट असते. शिवाय जी व्यक्ती तुम्हाला मनापासुन आवडत असते तिला तुमच्या या दिरंगाईमुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. भावार्थ असा की, एखादी व्यक्ती तुम्हाला खरच मनापासुन प्रेम करत असेल आणि त्याने आपले प्रेम तुमच्यासमोर अगोदरच व्यक्त केले असेल तर कोणताही उशीर न करता त्याच्या प्रेमाचा स्वीकार करा. गेले 8 महिने तरुण पिढीला हसत-खेळत नवनवीन शिकवण देणा-या दिग्दर्शक सतीश राजवाडेँनी जाता जाता सुद्धा आपण प्रसिद्धीच्या शिखरावर असताना पाठिँबा देणारे लोक कंटाळण्या अगोदर सन्मानाने निरोप घेण किती आवश्यक असत याची देखील शिकवण दिली.


मी आजच्या लेखासोबत कमेंट मध्ये मी या मालिकेबद्दल लिहिलेल्या सगळ्या लेखांची LINKS देत आहे...
•    "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मालिका मी पहिल्या भागापासुन बघायचो कारण माझ्या मते तरी सतीश राजवाडे हा आजच्या काळातील सर्वोत्क्रुष्ट मराठी दिग्दर्शक आहे. त्याने दिग्दर्शित केलेले मुंबई-पुणे-मुंबई, गैर यांसारखे चित्रपट किँवा कशाला उद्याची बात, अग्निहोत्र, असंभव, गुंतता ह्रुदय हे, या सुपरहिट मालिका रोज पाहत असल्याने "एका लग्नाची दुसरी गोष्ट" या मालिकाचा दर्जा अत्युत्क्रुष्ट असणार याबाबत मनात तसुभरही शंका नव्हती आणि झालही तसच...! रोजची सासु-सुनांची भांडणे, कटकारस्थाने, विवाहबाह्य संबंध या सगळ्या गोष्टी दुर ठेवत सतीश राजवाडेँनी अत्यंत वेगळ्या धाटणीचा पण एकदम हलकाफुलका विषय निवडला. मुंबई-पुणे-मुंबईची सुपरहिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे मुख्य भुमिकेत असल्याने संवादाची नैसर्गिक शैली अभिप्रेत होती. घना आणि राधा हे दोघेही फार PRACTICAL दाखवले. लग्न किँवा प्रेम या भावनिक गोष्टी ते दोघ मानत नाही किँवा त्यांना आपल्या करियरपेक्षा त्या महत्वाच्या वाटत नाही. घरातल्यांच्या दबावापुढे एक तडजोड म्हणुन ते लग्न करतात आणि सहा महिन्यांनी घटस्फोट घेऊन विभक्त व्हायच हे आधीच ठरवुन ठेवतात. मुळातच स्वभाव PRACTICAL असल्याने इतर नवरा-बायकोपेक्षा त्यांच नात थोडस वेगळ असत. ते एकमेकांच्या खाजगी गोष्टीत लक्ष देत नाहीत किँवा शारिरीक जवळीक निर्माण होऊ नये या कारणास्तव एक दिवस आड बेड आणि जमिनीवर वेगवेगळे झोपतात. लग्न हे फक्त दोन जीवांच मिलन नसत तर ते दोन कुटुंबांना देखील एकत्र आणत. राधाचीही साहजिकच सासरच्या लोकांशी जवळीक वाढु लागते.तिच घरातल्या प्रत्येकाशी असलेल गोड नात दिग्दर्शकाने अगदी अचुक दाखवलय. घटस्फोटानंतर या सर्व माणसांशी ताटातुट होईल यामुळे राधाच्या मनात घालमेल सुरु होते परिणामी भावनिक मन PRACTICAL विचारांवर वरचढ ठरु लागत. करियरपेक्षा नाती जास्त महत्वाची वाटु लागतात.

माझ्या एका जवळच्या व्यक्तिने मला सांगितल होत की, प्रेम कधी ठरवुन करता येत नसत पण ही मालिका पाहिल्यावर मला अजुन एक साक्षात्कार झाला की, मनावर जबरदस्तीने बंधन लादुन एखाद्यावर ठरवुन प्रेम न करण देखील शक्य नसत. जेव्हा स्त्री-पुरुष एकमेकांच्या संपर्कात येतात, रोज गप्पा मारतात, खाजगी गोष्टी शेअर करतात त्यावेळीच त्यांच्यात असलेल्या त्या मैत्रीच्या नात्यामध्येच दोघांच्याही नकळत प्रेमाचे अंकुर रुजु लागतात. या मालिकेमध्ये देखील राधाच्या मनात तिच्या नकळत घनाबद्दल प्रेम निर्माण होऊ लागत. घना जेव्हा ट्रेनिँग निमित्त 8 दिवस बाहेरगावी जातो तेव्हा त्याच्या सहवासाशिवाय तिचा जीव कासावीस होतो. राधा जरी घनाच्या प्रेमात पडली असली तरी घनान आपल PRACTICAL वागण अजुनही सोडलेल नसत. घरी आल्यावर घना पाठदुखीने बेजार होतो त्यावेळी त्याच्या उघड्या पाठीवर जेल लावुन मालिश करणे अत्यंत गरजेचे असते पण राधा आणि घनाच लग्न ही एक तडजोड असल्याने तिच्यासमोर शर्ट उतरवुन मालिशच्या निमित्ताने शारिरीक जवळीक करण्यास तो तयार नसतो. घनाचा जीव अगदीच मेटाकुटीस येतो तेव्हा राधाच पुढाकार घेऊन त्याला शर्ट उतरवायला लावुन त्याच्या पाठीच मालिश करते. एवढ्यावरच थांबत नाही तर संपुर्ण रात्र त्याच्या शेजारी बसुन आपल्या प्रियकराची काळजी घेते आणि पहाटे एका क्षणी नकळत ती त्याच्या कुशीत झोपते. लग्न झाल्यापासुन प्रथमच ते एकत्र झोपतात. थोड्या वेळाने घनाला जेव्हा जाग येते तेव्हा तो सुद्धा तिल्या आपल्या अजुन जवळ घेतो. राधाबद्दल प्रेमाच्या नाजुक भावना त्याच्याही मनात जागरुक झालेल्या असतात. अशा प्रकारे PRACTICAL REQUIREMENT म्हणुन केलेल्या लग्नाच्या तडजोडीच रुपांतर ख-या प्रेमात होत.


आजच्या जमान्यात हिँदी चित्रपटस्रुष्टीत प्रेमाच्या नावाखाली जो नंगानाच चालु आहे त्यामुळे आमच्या पिढीला "खर प्रेम" आणि "फ्लर्टिँग" यामधला फरकच कळेनासा झालाय. इम्रान हाश्मीसारखे देव आणि मल्लिका शेरावतसारख्या देवी तथाकथित प्रेमाच्या कला पडद्यावर दाखवत असल्याने तरुण पिढी 'त्या' गोष्टीँनाच खर प्रेम समजु लागली आहे. किसीँग हे प्रेमाच प्रमाण ठरु लागल आहे. पुर्वीच्या काळात लग्नापुर्वी मुल-मुली फार क्वचितच एकमेकांना भेटत असत त्यामुळे लग्नानंतर प्रियकर किँवा प्रेयसीला पहिल्या स्पर्शाची ओढ असायची. पहिल्या स्पर्शानंतर एखाद्या उन्हाने तापलेल्या भुमीवर पावसाचे थेँब पडावेत असा आनंद व्हायचा. लग्नानंतर मधुचंद्राला प्रथमच नव-याच्या मिठीत जाण हा अनुभव एका स्त्रीच्या कायमस्वरुपी लक्षात राहायचा परंतु आता या हिँदी चित्रपटांच्या प्रभावामुळे लग्नाअगोदरच हातात हात घेऊन फिरण, मिठ्या मारण, इत्यादी गोष्टी COMMON होऊ लागल्या आहेत. सध्याच्या FAST FORWARD युगात पहिला स्पर्श किँवा पहिल अलिँगन या गोष्टी खुप मागे पडु लागल्या आहेत. त्यामुळेच पुर्वीच्या काळी आयुष्यभर साथ देणारी लग्न आता वेगाने घटस्फोतात परिवर्तीत होऊ लागली आहेत. ही मालिका बघुन कदाचिक काही जोडप्यांमध्ये बदल झाला तर ते सतीश राजवाडेच फारच मोठ यश मानाव लागेल.


"एका लग्नाची, दुसरी गोष्ट" या मालिकेचा आजचा भाग ज्यांनी आयुष्यात कोणावर तरी जीवापाड प्रेम केलय त्यांनी नक्कीच पहावा एवढा अप्रतिम होता. प्रेम ही आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पाप, पुण्य अशा जगातील बाकीच्या गोष्टी प्रेमासमोर शुल्लक आहेत. "I LOVE YOU" या तीन शब्दांमागील खरा अर्थ, त्यांची खरी किँमत तुम्हाला माहीत असेल तरच त्यांचे प्रकटीकरण तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर करा. एखाद्याला I LOVE YOU म्हणायच आणि लग्न करुन प्रेमाच्या बंधनात अडकायच्या वेळी एखाद संकट आल तर पळ काढायची व्रुत्ती असलेल्यांनी या तीन शब्दांचा उल्लेख कधीच करु नये. जर तुमच्या प्रेमाच्या आड समाज किँवा अगदी तुमचे पालक जरी येत असतील तर तुमच्या ह्रुदयावर हात ठेवुन स्वतःला एकच प्रश्न विचारा, "ज्या व्यक्तीवर तुम्ही खर प्रेम केलय त्याच्याशिवाय उर्वरित आयुष्य तुम्ही जगु शकाल का...?" आणि या प्रश्नाच प्रामाणिक उत्तर मिळाल्यावर तुमचा पुढील निर्णय घ्या कारण तुमच्या आयुष्यावर फक्त आणि फक्त तुमचा अधिकार आहे, तुमच्या पालकांचा किँवा समाजाचा नाही. जर तुम्ही तुमच्या मनातील उत्तराशी अप्रामाणिक वागुन समाज किँवा पालकांच्या हट्टापायी आपल्या आवडत्या व्यक्तीशी प्रेमसंबंध तोडले तर ती व्यक्ती पुढील आयुष्यात बरबाद होईल कि दुस-याशी सुखाने संसार करेल याची मला खात्री देता येत नाही पण एवढ मात्र नक्की तुम्ही तुमच्या आयुष्यात 101% बरबाद व्हाल. प्रेम तुम्हाला चांगल आयुष्य जगायला शिकवते. आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याच्या ध्यासापायी आयुष्यातील कठीणातील कठीण शिखरे तुम्ही सर करता. बाकी कोणत्याही गोष्टी मिळाल्या तरी आयुष्यात समाधान मिळत नाही कारण आपल्याला भरपुर गोष्टीँचा हव्यास असतो पण प्रेम मिळाल्यावर माणुस सुखी आणि समाधानी होतो कारण त्याला प्रेमासमोर बाकीच्या गोष्टी खुपच फिक्या वाटतात. आयुष्यात कोणावर तरी मनापासुन प्रेम करा आणि ते अर्ध्यावर सोडुन न देता पुर्णत्वास न्या. आपल सगळ आयुष्य पणाला लावत जर खरच कोणी तुमच्याकडुन कोणतेही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर मनापासुन प्रेम करत असेल आणि तुमची खात्री असेल की ती व्यक्ती पुढील आयुष्यात तुमचा चांगल्या रितीने सांभाळ करु शकते तर कोणत्याही खोट्या स्वाभिमानाला किँवा समाजाच्या भितीला बळी न पडता त्या व्यक्तीच्या प्रेमाचा स्वीकार करा आणि आपले आयुष्य सुखकर बनवा.

• काही खुप जवळचे मित्र मला नेहमी एक प्रश्न विचारतात की, 'तिचे प्रेम' मिळवण्यात एवढ्या अडचणी येत असतील तर तिचा विषय कायमचा का नाही सोडुन देत...?
एकाच गोष्टीचा सारखा विचार करुन मनस्ताप करण्यापेक्षा एव्हाना दुसरी शोधली देखील असतीस...!
त्यांच्या या प्रश्नांवर, तिच्यासारखी दुसरी कधी सापडलीच नाही, हे उत्तर मी सामान्यतः देत असलो तरी खरी गोष्ट हिच आहे की, आजपर्यँत तिच्या जागी दुसरी शोधण्याचा कधी प्रयत्नच क...ेला नाही.

माझ एक ठाम मत आहे की, आयुष्यात प्रत्येक गोष्टीला 'पर्याय' मिळत नसतो आणि ती गोष्ट जर दस्तरखुद्द 'प्रेम' असेल तर मग नाहीच नाही...!! बुट, चपला, कपडे या गोष्टी आपल्याला हव्या तशा मिळतात. जर मिळाल्याच नाहीत तर आपण त्या हव्या तशा तयार करुन घेऊ शकतो पण प्रेमाच तस नसत.

प्रेमाची अजुन एक गंमत असते, ती म्हणजे... ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच्याशीच सर्वात जास्त भांडतो. ज्या माणसाने आपल्या आयुष्यातुन कधीही निघुन जावु नये किँवा जो माणुस आपल्या आयुष्यातुन निघुन गेला तर आपल्याला खुप त्रास होईल अस वाटत... आपल्याला जाणवत... त्याच्याशीच आपण खुप भांडतो...!!!

प्रेमाची पुढची पायरी असते ती म्हणजे लग्न...! पुर्वी देवदेवतांच्या साक्षीने, नातेवाईकांच्या सानिध्यात एक पवित्र सोहळा पार पाडला जायचा तो म्हणजे लग्न...!! त्यानंतर 'हनीमुन' नावाची एक संकल्पना असायची परंतु आताची पिढी इतकी पुढारलेली आहे की हल्ल...ी लग्नाआधीच एकमेकांच्या खुप जवळ येऊन त्या नात्यातील गोडवा घालवतेय.

"नात्यांची खरी मजा ती उलगडण्यात आहे...!!!"

तो हनीमुनचा पहिला स्पर्श... पहिली मिठी... त्या रुममधील ते दोघे नवरा बायको... दोघे अनोळखी असले तरी एकमेकांना समजुन घेण्याची सुरुवात लग्नानंतरच व्हायची... गर्दीतुन चालताना नकळत होणारा तो हातांचा स्पर्श... ते लाजण... वाट बघण... शिँकण्याच्या सवयीपासुन ते जेवणाच्या चवीपर्यँत एकेक गोष्ट हळु हळु समजत जायची. ती मजा आजकाल हरवत चाललीय. त्यावेळी 100 लग्न झाली तर त्यातील 80 टक्के लग्न टिकायची पण आता 80 टक्के लग्न मोडुन घटस्फोटात परिवर्तीत होत आहेत कारण आताची पिढी नात्यांना उलगडुच देत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा