बुधवार, ३ जुलै, २०१३

एक हॉकी दूंगा मै रख के....

गुंडांची यथेच्छ धुलाई करणारा 'सिंघम' तुम्ही रुपेरी पडद्यावर बघितला असेल. पण वास्तवातही असाच एक पोलीस अधिकारी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. कुठेही छापा मारायला तो अधिकारी मागे पुढे पहात नाही. खबर मिळताच तो आपल्या सहकाऱ्यांसबोत घेऊन धडक कारवाई करतो. त्यामुळे अवैध धंदे करणा-यांनी त्याचा चांगलाच धसका घेतला असून त्याचं नाव आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे

2011 मधील कारवाई
अटक - 4500
'पिटा'च्या केसेस - 80
अल्पवयीन मुलींची सुटका - 650

ढोबळेंची 2012 मधील कारवाई
अटक - 1500
'पिटा'च्या केसेस - 36
अल्पवयीन मुलींची सुटका -३२६

मुंबई पोलीस दलात ढोबळे हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी डान्सबारपासून ते पब आणि श्रीमंतांच्या आलिशान पार्ट्यांवरहीछापा कारवाई केलीय. त्यामुळेच चोरीछुपे डन्साबार चालविणा-यांचे धाबे दणाणले असून ढोबळेंच नाव ऐकताच पब आणि डिस्कोथेकमध्ये मदीरेच्या कैफात मस्ती करणा-या धनदांडग्यांची झिंग क्षणात उतरल्याशिवाय राहात नाही. एसीपी ढोबळेंच्या धडाकेबाज कारवाईमुळे मुंबई पोलीस दलात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ढोबळेंची कारवाई करण्याची खास पद्धत आहे. पोलीस कारवाईसाठी काठीचा वापर करतात पण एसीपी ढोबळे कारवाईसाठी हॉकी स्टीकचा वापरतात. एखाद्या ठिकाणी कारवाई केल्यानंतर ते तिथ असलेल्या सर्वांना थेट पोलीस स्टेशन दाखवतात. कुणाचा ही निरोप आला तरी ते मागे हटत नाहीत आणि त्यांची कारवाई थांबत नाही…
डान्सबार, हुक्का पार्लर आणि पबवाल्यांनी जसा ढोबळेंचा धसका घेतलाय तसचं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही धास्ती वाटतेय…
मुंबईतील समाज सेवा शाखेच्या पथकाने वांद्र्यातील एका हुक्का पार्लरवर छापा मारला होता. या छाप्यात पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचा मुलगा क्षितीजचाही समावेश होता. य़ा हुक्का पार्लरमध्ये हे तरुण-तरुणी हुक्का पित असतांना पोलिसांना आढळून आले होते. आरोग्यमंत्र्यांनी मात्र आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला होता. दोन महिन्यापूर्वी हुक्का पार्लरवर करण्यात आलेली ही कारवाई एसीपी वसंत ढोबळेंच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. या कारावईनंतर ढोबळेंच्या नावाची बरीच चर्चा सुरु झाली. कारण त्यांनी हुक्का पार्लवर बेधकपणे कारवाई केली होती. मंत्र्यांचा मुलगा छाप्यात सापडला असतानाही त्यांनी कारवाई करण्यात कुचराई केली नाही. हुक्का पार्लर असो की बार ढोबळेथेट कारवाई करायला कचरत नाहीत.
रात्रीच्या आत घरात या अशा काहीशा तत्वाने वागणारे हे ढोबळे ... यांचा हा नियम अनेकांच्या नाईट लाईफ च्या मध्ये येतोय त्यामुळे लोक भलतेच चिडलेत. ढोबळे यांची हि स्वच्छता मोहीम अनेकांच्या वर्मावर घाव घालू लागलीये, अशावेळी अनेकांना पाश्चात्य देशातील नाईट लाईफ आठवू लागले. आपले स्वातंत्र्यावर गदा घातली जातीये असेही अनेकांचे मत बनले. त्यात भर म्हणून काय तर सलमान खान हि ढोबलेंवर चिडला, का तर म्हणे ढोबळेच्या कायद्यामुळे नाईट क्लब , बार , पब रात्री १२ - १२.३० नन्तर बंद होतात. त्यामुळे या पठ्ठ्याला रात्रीच्या वेळी लागणारे जेवण / ज्यूस / पिझा / बर्गर मिळत नाही. बॉलीवूड चा दबंग बोलला मग काय रात्री अपरात्री हिंडणारे गाड्या उडवणारे दारू पिऊन दंग करणरे सगळेच सलमानची री ओढू लागले, सगळ्यांनाच आपल्या स्वातंत्र्याची आपल्या नाईट लाईफ ची जाणीव झाली, आपल्या जीवन मरणाच्या गोष्टी मुकातायेत या ज्ञाने ते धोबलेंचा विरोधात आरडा ओरड करू लागले.प्रीतीश नंदी, अर्षद वारसी , सोनं कपूर नेहा धुपिया यासारख्या अनेकांनी ढोबळे हटाव मुंबई बचाव मोहीम चालू केली. त्यांचेही बरोबर कारण जेव्हा सर्वसामान्यांनाच दिवस संपतो तेव्हा यासारख्या असमान्यांचा दिवस चालू होतो. नाईट लाईफ च्या नावाखाली स्वरचार करायला यांना हवे असलेला प्लेताफोर्मच ढोबळे बंद करू पाहतायेत तर कसे होईल ? गेल्या डिसेंबर मध्ये तर महाराष्ट्राचे संस्कृतीरक्षक म्हणवणाऱ्या सेनेच्या एका बड्या नेत्याच्या पत्नीच्या नवे चालणाऱ्या बार वरच धोबलेनी कारवाई केली .. मग काय सेनेवाले सोडतील का त्याला ... त्यांनीही त्यांच्याविरोधात उघडपणे बोलायला सुरुवात केली ... जी तर्हा सेनेची तीच अन्य पक्षांचीही .. अनेक्नाच्या साते लोत्याने चालणारे हे नाईट लाईफ ढोबळे बंद करू पाहतायेत.
पण अशा या समाजसेवा शाखेतील धोबलेना पाठींबा देणारे पोलिस आयुक्त अरुप पटनायक...त्यांनी देखील धोबालेंच्या कृतीचे समर्थनाच केले , "जे नियमबाह्य असेल ते बंद झालेच पाहिजे, ढोबळे हा अत्यंत साधी राहणी असणारा दारू मासे मटन यापासून लांब राहून स्वताचे एक साधे जीवन जगताना नियमांची अंमलबजावणी करणारा ऑफिसर आहे, मनात आणले तर सर्व गोष्टी कशांत थांबवून बक्कळ पैसे कमावता येतील पण तरीही सर्वांचा विरोध स्वीकारून काम करणार्याला मी पाठींबा देणार नाही तर कोण देईल ?? समाजातील उच्चभ्रू लोकांसाठी सर्वसामान्यांचे जीवन हैराण होताना ढोबळे यांनी उचलेला बडगा स्वागतार्हच आहे" असेही पटनायक म्हणाले.
परवा तर कोणत्यातरी दोन बहिणींना अटक करून सुधार गृहात पाठवल्याने धोबालेविरुद्ध अब्रुनुकसानीचा आणि बदनामीचा आरोप करून एक कोटीची परतावा मिळावा अशी तक्रार यादोघींनी केली पण न्यायालयानेही हे आरोप खोडून धोबालेंच्या कृतीचा समर्थनच केले आहे.
तर असेहे ढोबळे ... एकीकडे सर्वसामान्यांसाठी खरी दाबंगागिरी करू पाहतायेत .. पण त्याचवेळी समाजातील उच्चपदस्थ म्हणवून घेणारे अनेक यांचा कडाडून विरोध करतायेत .
ड्रग्स , वेश्याव्यवसाय , मध्यपान ,धिंगाणा घालणाऱ्या लोकांचा एक वेगळाच वर्ग आपल्या देशात वाढत चाललाय .....
नाईट लाईफ म्हणजे सर्वस्व मानणाऱ्या अशा या महान विचारांच्या मानवांचा कोणत्या शब्दात गौरव करावा.....???

वसंत ढोबळे सारख्या कर्तव्यदक्ष पोलिसाला माझा सलाम...!!!

वसंत ढोबळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा