बुधवार, ३ जुलै, २०१३

नारायण राणेँच्या वस्त्रहरणाला माझे प्रत्युत्तर...

मा.मु. (फक्त 8 महिन्याचे माजी मुख्यमंत्री) नारायण तातु राणे यांनी काल चांगल्या प्रकारे "राजकीय वस्त्रहरणाचा" दशावतार सादर केला.
त्यांच धुमशान बघुन यापुढे राजकरण करण्यापेक्षा त्यांनी एखाद्या दशावतारी नाटकात काम कराव असा सल्ला मी त्यांना देईन.

दुस-याच वस्त्रहरण करायच म्हटल्यावर अगोदर स्वतःची वस्त्रे जाग्यावर असावी लागतात. नाहीतर "आपण हसे लोकाला आणि शेँबुड आपल्या नाकाला" अशी गत होते.
राणेँच्या कालच्या सभेच वर्णन एका शब्दात करायच झाल तर, उघड्याच वस्त्रहरण करायला नागडा गेला आणि दोघाही नागव्यांचा तमाशा झाला, असच कराव लागेल.

या वस्त्रहरणातील प्रश्नांच उत्तर देतोय म्हणजे मी राष्ट्रवादीसारख्या पक्षाचा समर्थक आहे असा गैरसमज करुन घेऊ नये.
अजित पवार सारख्या टग्याला अद्दल घडवण गरजेच होत आणि राणेँनी ते करुन दाखवल त्यामुळे त्यांचा विरोधक असलो तरी त्यांच अभिनंदन करण गरजेच आहे.
मला नाइलाजान उत्तर द्याव लागतय कारण राणेँनी त्या भाषणात ज्या नेत्यांना मी आदर्श मानतो, ज्या नेत्यांनी अवघ आयुष्य फकिराप्रमाणे जगत कोकणच्या लोकांची राजकरण न करता समाजकरण करुन सेवा केली त्या प्रा. मधु दंडवते आणि बँ. नाथ पै सारख्या नेत्यांचा उल्लेख केला. एवढच नाही तर राणे आणि त्यांचे दोघे पोर आम्ही दंडवते आणि नाथ पैँ चा वारसा चालवतोय असे म्हणाले. आज दंडवते हयात असते तर आपली तुलना राणेँशी होत असल्याचे पाहुन खरच त्यांनी आत्महत्या केली असती. नारायण राणे एक लक्षात ठेवा दंडवते आणि नाथ पै सारख्या सभ्य आणि सज्जन लोकांच नाव तोँडात घ्यायची तुमची आणि तुमच्या पोरांची लायकी नाही. पैसा फेकुन अधाशी लोक आजुबाजुला गोळा कराल पण दंडवते आणि नाथ पैँ सारखा मानसन्मान आणि इज्जत कोकणातच काय जगाच्या कुठल्याही कानाकोप-यात तुम्हाला मिळणार नाही. नारायण राणे काल तुमच्यासारख्या माणसाच्या तोँडुन माझ्या आदर्श नेत्यांचे नाव निघाल्यावर त्या महान आत्म्यांचा जो काही अपमान झाला त्यासाठी तुमच्या वस्त्रहरणातील आरोपांना आज मी प्रत्युत्तर देत आहे.


1) सिँधुदुर्गात दहशतवाद नाही हे पटवुन देण्यासाठी तुम्ही काल पुणे आणि सांगली या शहरातील गुन्हेगारीची आकडेवारी आणि सिँधुदुर्गातील गुन्हेगारीची आकडेवारी यांची तुलना केली.
ती तुलना किती हास्यास्पद होती ते मी तुम्हाला सांगतो.

मुळात 'दहशतवाद' आणि 'राजकीय दहशतवाद' या दोन शब्दांचा अर्थच किँवा त्यातील फरक तुम्हाला समजलेला दिसत नाही. त्यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेबद्दलच मला दाट शंका आहे किँवा नगरपालिकेतील पराभवानंतरच्या नैराश्याने तुमचे मानसिक संतुलन बिघडलेले दिसतेय.
"राजकीय दहशतवाद" हा एखाद्या जिल्ह्यातील किँवा प्रांतातील प्रमुख नेत्याकडुन निर्माण केला जातो. बिहारमध्ये राजकीय नेत्यांकडुन जो दहशतवाद चालतो त्याला राजकीय दहशतवाद म्हणतात. सध्या तुम्ही आणि तुमच्या समर्थकांनी सिँधुदुर्गात जे काही दिवे लावलेत त्यामुळे सिँधुदुर्गची तुलना बिहारशी होऊ लागली आहे. यावरुनच स्पष्ट होते की, तुमच्यामुळे देशपातळीवर सिँधुदुर्गाची किती बदनामी होत आहे...?

तुम्ही जी काल आकडेवारी दिली ती एवढ्यासाठीच हास्यास्पद आहे कारण तुम्ही पुणे आणि सिँधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधील गुन्हेगारीची तुलना करुन आपला मुद्दा पटवुन देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.
आबा पाटील किँवा अजित पवार सिंधुदुर्गातील राजकीय दहशतवाद जो तुम्ही आणि तुमच्या समर्थकांनी गेल्या काही वर्षाँपासुन चालवला आहे त्याबद्दल बोलत होते, सिँधुदुर्गातील गुन्हेगारीबाबत नाही. कारण चोर आणि दरोडेखोर यांची गुन्हेगारी देशात सर्वत्रच पाहायला मिळते. सिँधुदुर्गात ती तुलनेने खुप कमी आहे पण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत तुमची आणि तुमच्या समर्थकांची राजकीय दहशत फार मोठ्या प्रमाणात आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगु इच्छितो की सिँधुदुर्ग जिल्हा हा पहिल्यापासुनच शांत, संयमी आणि सज्जन माणसांचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुळातच इथे गुंडप्रव्रुत्तीचे लोक तुलनेने कमी असल्याने गुन्हेगारी पहिल्यापासुनच कमी आहे. जी काय गुन्हेगारीत वाढ झाली असेल तर ती तुमच्या सिँधुदुर्गातील राजकीय उदयानंतरच झाली. त्यामुळे दंडवते आणि नाथ पैँ च्या कारकिर्दीत गुंडगिरीच प्रमाण किती आणि तुमच्या कारकिर्दीत गुंडगिरीच प्रमाण किती याची तुलना करा आणि आकडेवारी सांगा. तुलना करताना पण काही तारतम्य पाळायची असतात.

विरोधी पक्ष नारायण राणेँनाच राजकीय दहशतवादासाठी कारणीभुत का धरतात त्याची सविस्तर चर्चा करु.

नारायणराव सिँधुर्गात जेव्हा श्रीधर नाईकांची राजकीय कारणात्सव हत्या झाली आणि कोकणची माती ख-या अर्थाने लाल झाली तेव्हा त्या हत्याकांडात प्रमुख आरोपी म्हणुन तुम्ही स्वतः सामील होता. त्याचबरोबर तुमचा उजवा हात समजले जाणारे तुमचे सहकारी आमदार राजन तेली देखील या हत्याकांडात प्रमुख आरोपी म्हणुन सामील होते.
यालाच राजकीय दहशतवाद म्हणतात.

त्यानंतर तुम्ही शिवसेनेत असताना सत्यविजय भिसेँची हत्या झाली.

तुम्ही काँग्रेसमध्ये आल्यावर शिवसेनेच्या रमेश गोवेकरांचे अपहरण करण्यात आले. त्यांच अपहरण झाल की म्रुत्यु झाला देवालाच ठाऊक...!

तुमचा मुलगा निलेशच्या खासदारकीच्या निवडणुकीवेळी अंकुश राणे सारख्या गरिबाची अपहरण करुन हत्या करण्यात आली.
अंकुश राणेँच्या अपहरणाचा पोलिस तपास करत असताना तुम्ही अगोदरच हे अपहरण नसुन हत्याच आहे असे बेधडक विधान अंकुशचा म्रुतदेह सापडण्याअगोदरच करुन मोकळे झालात. नंतर नांदगावमधुन पोलिसांना निनावी फोन आल्यावर अंकुशचा म्रुतदेह सापडला. राणे साहेब यावरुन एकच गोष्ट सिद्ध होते, एक तर तुमचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास दांडगा दिसतोय किँवा अंकुशच्या हत्येविषयी काहीतरी तुम्हाला नक्कीच माहित आहे.

त्यानंतर लगेचच आमदारकीच्या निवडणुकीच्याच दिवशी तुमचा शिवसेनेचा प्रतिस्पर्धी उमेदवार वैभव नाईकच्या डोक्यावर पिस्तुल रोखण्यात आली. तो नशिबाने बचावला.

प्रमोद जठारांकडुन पराभुत झाल्यावर आपले उमेदवार रविँद्र फाटक यांचे कार्यकर्ते बाळा वळंजु यांचा भाजुन म्रुत्यु झाला आणि त्याला कारण काय देण्यात आल तर बाळा वळंजुंच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाला.

नगरपालिका निवडणुकीच्या तोँडावर आपले दुराभिमानी पुत्र नितेश राणेँच्या मुंबईतुन खास प्रशिक्षण देऊन आणलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्याँनी वेँगुर्ल्यात विलास गावडेँसारख्या सज्जन माणसाच्या घरावर विलास गावडे स्वतः उपस्थित नसताना त्यांच्या बायकापोरांना धमकावण्याचा भिमपराक्रम करत तुमच्याच भाषेत सांगायच तर जी मर्दुमुकी दाखवली त्याची प्रतिक्रिया म्हणुन पित्त खवळलेल्या वेँगुर्ल्यातील ग्रामस्थांनी त्यांना चोप दिला. तेच ग्रामस्थ जेव्हा काँग्रेस कार्यालयात तुमच्या पराक्रमी पुत्राला जाब विचारायला आलेत तेव्हा त्यांना पाहुन तो बाबा मला वाचवा करत तिथेच दडुन बसला याला देखील तुम्ही विरोधी पक्षांचे षडयंत्र कसे काय म्हणता...?
नारायणराव राणे ज्या माणसावर खुनाचा गुन्हा दाखल आहे त्या माणसाला दहशतवादावर बोलायचा नैतिक अधिकारच नाही हेच तुम्ही विसरताय.

2) निलेश राणे आपल्या भाषणात काल म्हणाला की, जेव्हा जैतापुर पेटत होते तेव्हा फक्त आम्हीच तिकडे उपस्थित होते.
अरे जैतापुर पेटण्यास तुम्ही राणे कुटुंबियच कारणीभुत आहात आणि तु एप्रिलमध्ये जैतापुरला गेलाच नाहीस तर रत्नागिरीमध्ये जाळपोळ होत होती ती पाहुनच पळ काढलीस. जैतापुरच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत नारायण राणेँचा ज्या प्रकारे हुर्यो उडवला ते तुझ्या चांगलच लक्षात असणार त्यामुळे जैतापुरात पाय ठेवायची सुद्धा तुला हिँमत होणार नाही.
निवडणुकांमध्ये फायदा करुन घेण्यासाठी कोणतेही मुद्दे घेता. जनाची नाही पण मनाची तरी बाळगा. तुझ्या माहितीसाठी सांगतो जैतापुरचे लोक तुम्हाला तोँड फोडुन शिव्या घालतात. कारण राणे कुटुंबच जैतापुरच्या ग्रामस्थांचे खरे गुन्हेगार आहेत. सर्व ग्रामस्थांचा कडाडुन विरोध असताना वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही जैतापुरचा विनाशकारी प्रकल्प कोकणवर लादु पाहताय.
जर तुमच्या रक्तात खराच स्वाभिमान शिल्लक असेल तर त्या इटालियन बाईला जाऊन बाणेदारपणे सांगा की, आमच्या ग्रामस्थांचा विरोध असल्याने जैतापुर प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.
रस्त्यावर हाणामारी करुन हिमतीच्या आणि स्वाभिमानाच्या गोष्टी करण खुप सोप असते. जर खरीच हिँमत असेल आणि स्वाभिमान शिल्लक उरला असेल तर जैतापुर प्रकल्प रद्द करुन दाखवा. आम्ही सर्व कोकणचे लोक पुन्हा राणेँच्या पाठीशी उभे राहतो. पण हे काम तुम्हाला कधीच जमणार नाही. स्वतःला दंडवतेँचा वारसदार म्हणवतोस पण दंडवते कोकणच्या लोकांसाठी संसदेत लढले. छत्रपती शिवाजी महाराजांच तर तुम्ही नाव पण तोँडात घेवु नका. महाराज दिल्लीतील औरंगजेबाचे पाय चाटुन आपल्या जनतेला पिडत नव्हते. महाराज तर स्वराज्यासाठी लढत होते. तुम्ही सोनिया गांधीच्या आदेशाचे पालन करुन आणि एका इटालियन बाईची गुलामी करुन कोकणच्या जनतेला नाडत आहात.

‎3) नारायण राणे तुमच्या मते तुमचा मुलगा निलेश हा Phd & M.Com GOLD MEDALIST असल्याने तो विद्वान आहे. त्याच्या पदव्या कितपत ख-या आहेत आणि तो किती विद्वान आहे हा खरच संशोधनाचा विषय आहे. तुम्हाला एवढच सांगेन "विद्वान सर्वत्र पुज्यते." अस एक बोधवाक्य आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचा मुलगा जर खरच विद्वान असेल तर लोक त्याला नक्कीच आदर देतील. त्यासाठी बोँब मारुन सांगायची गरज नसते. नारायणराव तुम्ही दिपक केसरकरांचे वडील स्मगलर आहेत असे सांगत एका स्मगलर देशद्रोह्याच्या मुलगा माझ्यावर काय टिका करणार इतक्या खालच्या पातळीवरुन दिपक केसरकरांचे संस्कार काढायला गेलात त्यामुळे तुम्हाला सांगतो की,जर संस्कारांचीच गोष्ट असेल तर तुमचा मुलगा निलेश त्याच्यापेक्षा दुप्पट वयाच्या केसरकरांचा "तो बायल्या" असा उल्लेख करतो.
ज्येष्ठांचा आदर करावा असे संस्कार कोकणात तरी दिले जातात मग तुम्ही तुमच्या मुलाला कसले संस्कार दिलेत...? की मुळात तुमच्यावरच लहानपणी तुमच्या वडिलांनी संस्कार केले नाहीत...??
कारण पुष्पसेन सावंतांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला तुम्ही व्रुद्ध म्हणत हिणवता यावरुन ज्येष्ठांचा आदर करायचा नाही हे संस्कार राणे कुटुंबावर पिढीजात झालेले दिसत आहेत. त्यामुळे यापुढे तरी संस्कारांचा विषय तुमच्या भाषणात काढु नका कारण नारायण राणे संस्कारांबद्दल बोलले तर तो संस्कार या शब्दाचा अपमान ठरेल.

4) नारायण राणे काल तुम्ही जे काय सांगत होता त्याचा अर्थ तुम्हाला तरी समजत होता का...???
तुमच्या मते उपमुख्यमंत्री हा नामधारी असुन त्याला काहीच अधिकार नसतात. तुमच्याच शब्दात सांगायच तर नव-या शेजारी बसणारा तो धेडा असतो. दुसरीकडे तुम्ही सांगता की अजित पवार कोकणला जाणीवपुर्वक कमी निधी देण्याचा प्रयत्न करतात...? जर तुमच्याच म्हणण्याप्रमाणे अजित पवारांना मंत्रिमंडळात काहीच किँमत नसेल तर ते कोकणला देत असलेल्या निधीमध्ये हस्तक्षेप तरी कसा करतील...??
पायाखालची वाळु सरकली की माणसाचा तोल ढासळतो. नारायण राणेँची सद्यस्थिती तशीच झाली आहे

5) काँग्रेसने देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करुन देताना तुम्ही इंदिरा गांधी आणि राजीव गांधीँच उदाहरण दिलात. पण याच इंदिरा गांधीनी देशातील लोकशाहीचा खुन करुन आणीबाणी घोषित केली होती हे कसे विसरलात...? राजीव गांधीनी तर बोफोर्स घोटाळा करुन भ्रष्टाचाराची उच्चतम पातळी गाठली होती. काळ्या पैशांच्या यादीत ते जगात 14 व्या क्रमांकावर होते.

‎6) नारायणराव दिपक केसरकरांना तुम्ही मायनिँगसाठी कारणीभुत म्हटले. मग मी तुम्हाला विचारतो की, जर तुम्ही सिँधुदुर्गातील सर्वशक्तिमान नेते असाल तर केसरकरांना तुम्ही आळा का घालत नाहीत...? की मायनिंग करण्यात तुम्ही पण तितकेच सहभागी आहात हे स्पष्ट करा.

आज निवडणुकांच्या तोँडावर तुमचा मुलगा निलेश राणे जैतापुरच्या ग्रामस्थांना समर्थन देतो म्हणजेच जैतापुर प्रकल्पाला विरोध करतो.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नारायणराव तुम्ही स्वतः मायनिँगला विरोध करताना दिसता पण कळण्यात जेव्हा ग्रामस्थ मायनिँगविरोधी आंदोलन करता तेव्हा त्यांना बदडुन काढण्यासाठी पोलिसांचा वापर करता.

एक पर्यावरणवादी म्हणुन तुमची भुमिका आम्हाला स्पष्ट सांगवी ही अपेक्षा करतो. जर जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाला आणि मायनिँगला खरच तुम्ही विरोध करणार असाल तर तुम्हाला पाठिँबा द्यायला मी तरी तयार आहे. जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी तुमची एक भव्य सभा आयोजित करु.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा