सोमवार, १ जुलै, २०१३

सचिन तेँडुलकर खरच 'भारतरत्न' पुरस्काराचा मानकरी आहे...?

‎सचिन तेँडुलकरवर आंधळेपणाने प्रेम करणा-या मुठभर क्रिकेटप्रेमी समर्थकांच्या मागणीला भिक घालत आणि निव्वळ मतांच्या राजकरणासाठी या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नियमावलीत बदल करुन सचिनला 'भारतरत्न' पुरस्कार देणे कितपत योग्य आहे...? सचिनसाठी भारतरत्नची मागणी करणा-या किती समर्थकांना त्या पुरस्काराची संपुर्ण माहिती आहे...?? खास सचिनला आंधळेपणाने समर्थन करणा-यांसाठी मी भारतरत्न पुरस्काराची माहिती खाली देत आहे.

“भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करुन घेण्यात आली. त्यानंतर १२ जणांना मरणोपरांत भारतरत्न दिले गेलेले आहे. आत्तापर्यंत ४१ जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत.

सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतीमा, त्याच्या वरच्या बाजूला हिंदी भाषेत ‘भारतरत्न’ असे लिहिलेले असे व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी. तसेच पदकाच्या दुसर्यात बाजूस संबंधित राज्याचे प्रतिकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात सद्ध्या दिले जाणारे स्मृतीचिन्ह पक्के करण्यात आले. सध्याचे ‘भारतरत्न’ पुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतीमा व तिच्याखाली ‘भारतरत्न’ असे शब्द व दुसर्याा बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह “चौमुखी सिंहाची प्रतीमा’ अशा प्रकारचे पदक आहे. हा पुरस्कार मिळवणार्यांबना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये स्थान मिळते.”

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता.



सन्मानित व्यक्तींची यादी-:

१ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन  (१८८८-१९७५) १९५४ भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ

२ चक्रवर्ती राजगोपालचारी  (१८७८-१९७२) १९५४ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल

३ डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण  (१८८८-१९७०) १९५४ प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

४ डॉ. भगवान दास  (१८६९-१९५८) १९५५ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

५ डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या  (१८६१-१९६२) १९५५ पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना

६ जवाहरलाल नेहरू  (१८८९ -१९६४) १९५५ भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते

७ गोविंद वल्लभ पंत  (१८८७-१९६१) १९५७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री व भारताचे दुसरे गृहमंत्री

८ डॉ. धोंडो केशव कर्वे  (१८५८-१९६२) १९५८ समाजसुधारक, शिक्षणप्रसारक

९ डॉ. बिधान चंद्र रॉय
  (१८८२-१९६२) १९६१ पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक

१० पुरूषोत्तम दास टंडन  (१८८२-१९६२) १९६१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

११ डॉ. राजेंद्र प्रसाद  (१८८४-१९६३) १९६२ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले राष्ट्रपती

१२ डॉ. झाकिर हुसेन  (१८९७-१९६९) १९६३ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती

१३ डॉ. पांडुरंग वामन काणे  (१८८०-१९७२) १९६३ शिक्षणप्रसारक

१४ लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर)  (१९०४-१९६६) १९६६ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान

१५ इंदिरा गांधी  (१९१७-१९८४) १९७१ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

१६. वराहगिरी वेंकट गिरी  (१८९४-१९८०) १९७५ कामगार युनियन व भारताचे चौथे राष्ट्रपती

१७. के. कामराज (मरणोत्तर)  (१९०३-१९७५) १९७६ भारतीय स्वतंत्रता चळवळीत भाग, मद्रास जाज्याचे मुख्यमंत्री

१८ मदर तेरेसा  (१९१०-१९९७) १९८० ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

१९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)  (१८९५-१९८२) १९८३ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक

२०. खान अब्दुल गफार खान  (१८९०-१९८८) १९८७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

२१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर)  (१९१७-१९८७) १९८८ चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

२२. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर)  (१८९१-१९५६) १९९० भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

२३. नेल्सन मंडेला  (जन्म १९१८) १९९० वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

२४. राजीव गांधी (मरणोत्तर)  (१९४४-१९९१) १९९१ भारताचे सातवे पंतप्रधान

२५. सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर)  (१८७५-१९५०) १९९१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

२६. मोरारजी देसाई  (१८९६-१९९५) १९९१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

२७. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर)  (१८८८-१९५८) १९९२ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

२८. जे. आर. डी. टाटा  (१९०४-१९९३) १९९२ उद्योजक

२९. सत्यजित रे  (१९२२-१९९२) १९९२ बंगाली चित्रपट निर्माते

३०. ए. पी. जे. अब्दुल कलाम  (जन्म १९३१) १९९७ भारताचे ११वे राष्ट्रपती

३१. गुलझारीलाल नंदा  (१८९८-१९९८) १९९७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान

३२. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)  (१९०६-१९९५) १९९७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

३३. एम.एस. सुब्बुलक्ष्मी  (१९१६-२००४) १९९८ कर्नाटक शैलीतील गायिका

३४. चिदंबरम् सुब्रमण्यम् (१९१०-२०००) १९९८ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे माजी कृषीमंत्री

३५. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर)  (१९०२-१९७९) १९९९ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

३६. रवी शंकर  (जन्म १९२०) १९९९ प्रसिध्द सितारवादक

३७. अमर्त्य सेन  (जन्म १९३३) १९९९ प्रसिध्द अर्थतज्ज्ञ

३८. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर)  (१८९०-१९५०) १९९९ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

३९. लता मंगेशकर  (जन्म १९२९) २००१ पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान  (१९१६-२००६) २००१ शहनाईवादक

41. भीमसेन जोशी  (१९२२-२०११) २००८ हिंदुस्थानी शास्त्रीय गायक


सचिन तेंडुलकर हा जगातील एक सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. तो अतिशय उत्तम प्रकारे क्रिकेट खेळतो. याचा अर्थ असा होत नाही की त्याला भारतातील सर्वात प्रतिष्ठीत 'भारतरत्न' पुरस्कार देऊन टाकावा.




* सचिनला भारतरत्न पुरस्कार का दिला जाऊ नये यासाठी मी पुढे काही कारणे देत आहेत.




1) भारतात खेळाच्या क्षेत्रात सर्वोत्क्रुष्ट कामगिरी करणा-यांचा सन्मान करण्यासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्काराची तरतुद करण्यात आली आहे.
सचिनच्या क्रिकेटमधील कामगिरीचा सन्मान करण्यासाठी त्याला शासनाकडुन 1994 साली "अर्जुन पुरस्कार" आणि त्यानंतर 1997 साली खेळाच्या क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा "खेलरत्न पुरस्कार" देण्यात आला.
एका सर्वोत्क्रुष्ट खेळाडुला जेवढा सन्मान देणे आवश्यक आहे तेवढा सन्मान शासनाने अगोदरच दिला असताना सचिनच्या आंधळ्या समर्थकांच्या हट्टापायी भारतरत्नसारख्या प्रतिष्ठित पुरस्काराच्या नियमांमध्ये बदल करत खेळाडुंचा समावेश करणे कितपत योग्य आहे...?
जर खेळांचा समावेश करायचा होता तर पहिल्यांदाच करायला हवा होता. कारण सचिनच्या अगोदर ध्यानचंद सिँग यांनी हाँकीच्या क्षेत्रात अभुतपुर्व कामगिरी केली होती. त्यांना "हाँकीचा जादुगार" असे संबोधले जाई. ध्यानचंदच्या अथक प्रयत्नांमुळेच भारताला हाँकीमध्ये आँलिँपिकला सुवर्णपदके भेटली. तरीसुद्धा त्यांना 'भारतरत्न पुरस्कार' मिळावा म्हणुन सरकार कधी नियमात बदल करण्यात उत्सुक दिसले नाही पण जेव्हा सचिनसाठी त्याचे समर्थक भारतरत्नची मागणी करु लागले तेव्हा मतांचा विचार करुन नियमांमध्ये लगेच बदल करण्यात आले.
2) सचिनच्या भोळ्या आणि मुर्ख समर्थकांना मी एवढच सांगेन, ज्याप्रमाणे खेळाडुंना 'खेलरत्न' आणि 'अर्जुन पुरस्कार' त्यांच्या सर्वोत्क्रुष्ट कामगिरीसाठी दिले जातात, त्याचप्रमाणे भारतीय सैन्यातील जवानांना 'परमवीरचक्र', 'वीरचक्र' आणि महावीरचक्र' हे अवार्ड दिले जातात.
त्यामुळेच खेळ आणि लष्कर ही क्षेत्रे भारतरत्न पुरस्कारापासुन वेगळी ठेवली होती.
आपले जवान तर आपल्या देशासाठी म्हणजेच तुमच्यासाठी आपले प्राण कुर्बान करतात मग त्या जवानांना सुद्धा 'भारतरत्न' देण्यासाठी नियम बदलायला तुम्ही ओरड मारणार आहात का...?
तस करण तुम्हाला व्यवहार्य वाटत नसेल तर तुमच्या एका लाडक्या सचिनसाठी भारतरत्नसारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराचे नियम सरकारला का बदलण्यास भाग पाडले...??
'भारतरत्न' हा अजुनही देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो कारण तो उगाच कोणाला पण दिला जात नाही. (आजपर्यँत फक्त 41 जणांनाच दिला गेला आहे.)जर अशाच प्रकारे मुर्ख समर्थकांच्या मागणीपायी हा पुरस्कार सर्वांना देत सुटले तर तो भारतरत्न सारख्या सर्वोच्च पुरस्काराचाच अपमान ठरेल


3) भारतरत्न पुरस्काराचा महत्वाचा नियम हाच आहे की, या पुरस्कारासाठी कोणत्याही व्यक्तीसाठी लाँबिँग करता कामा नये. पण सचिनसाठी मिडीया आणि खासकरुन त्याचे समर्थकच लाँबिँग करताना दिसत आहेत.


4) सध्या देशात आपण "पद्मश्री" सारख्या पुरस्काराची जी केविलवाणी अवस्था झाली आहे ती पाहतच आहोत.पद्मश्री पुरस्कार भालचंद्र नेमाडेँसारखा थोर साहित्यिक, पंडित ह्रुदयनाथ मंगेशकारांसारखा उत्क्रुष्ट संगीतकार यांना दिला जातो. त्याच वेळी तो सैफ अली खान, इरफान खान, अक्षयकुमार यांसारख्या नट्यांच्या मागे नाच करत फिरणा-या नटांना आणि हरभजन सिंग सारख्या भारतीय संघातुन काढुन टाकण्यात आलेल्या 3rd क्लास खेळाडुला पण देण्यात येतो.हा पद्मश्री पुरस्काराचा अपमान आहे. त्याचप्रमाणे नेमाडे आणि मंगेशकरांसारख्या थोर लोकांना पद्मश्री पुरस्काराच्या निमित्ताने सैफ अली खान, अक्षय कुमार या नाच्यांच्या लायकीवर आणल्याने त्यांची शोकांतिका आहे.काही दिवसांनी राखी सावंतसारख्या बयेला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यास कोणीही  आश्चर्य वाटुन घेऊ नये.



5) सचिनच्या ज्या विक्रमांचा आधार घेत त्याचे समर्थक भारतरत्न देण्यासाठी ओरड मारत आहेत त्या विक्रमांविषयी थोड बोलु.
* सचिनने आजपर्यँत (02 JULY 2013) सर्वात जास्त धावा आणि शतके केली असे म्हटले जाते.त्यांना एवढच सांगेन की वनडे मध्ये जर त्याने सर्वाधिक 18426 धावा जमवल्या असतील तर सर्वाधिक 463 सामने तोच खेळला आहे आणि टेस्टमध्ये सर्वाधिक 198 सामने खेळुन सर्वाधिक 15837 धावा जमविल्या आहेत.एक साधा सरळ हिशेब आहे की
जो खेळाडु सर्वाधिक सामने खेळतो साहजिकच त्याच्या धावा आणि शतके इतरांपेक्षा जास्तच असणार. यात सचिनचे मोठेपण कोणते...?

* कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकाला अनन्यसाधारण महत्व असते पण सचिनला आजपर्यँत कधीच त्रिशतक करता आले नाही. त्याचा प्रतिस्पर्धी लाराने तर एका डावात 400 धावा पुर्ण केल्या.सचिनची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 248 बांगलादेशसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध आहे.यावरुन एक गोष्ट सिद्ध होते की, मोठा डाव खेळण्यासाठी लागणारी चिकाटी, एकाग्रता आणि क्षमता सचिनकडे नाही.

* सचिनला त्याचे वेडे समर्थक "क्रिकेटचा देव" मानतात. देव ही उपाधी त्यालाच दिली जाते ज्याच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते. विश्वकप 4 वर्षात एकदाच येतो. असे असताना सचिनला दोनदा विश्वकपाचा अंतिम सामना खेळायची संधी मिळाली. पण 2003 मध्ये मँकग्रा आणि 2011 मध्ये मलिंगा सारखे गोलंदाज समोर पाहुन या देवाचा दगड झाला असावा. दोन्ही सामन्यात सचिन अपयशी ठरला. त्याच्या मर्यादा सर्वाँसमोर उघड झाल्या. मोठ्या सामन्यांचा  तणाव हा देव सहन करु शकत नाही हेच सिद्ध होते. जर धोनी कप्तानी इनिँग खेळला नसता तर सचिनची कारकीर्द विश्वकपाविना राहीली असती याची त्याच्या समर्थकांनी नोँद ठेवावी.

* सरासरीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर टेस्ट आणि वनडे या दोन्ही प्रकारांमध्ये KALLIS ची सरासरी सचिनपेक्षा जास्तच आहे.शिवाय त्याने दोन्ही प्रकारात 550 विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी सचिनने फक्त 199 विकेट घेतल्या आहेत.क्रिकेट या खेळातील फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीन प्रकारांमध्ये फक्त फलंदाजीत सचिन सरस ठरतो. त्याला तुम्ही "सर्वोत्क्रुष्ट फलंदाज" म्हणु शकता पण "सर्वोत्क्रुष्ट खेळाडु" म्हणु शकत नाही.मग अशा खेळाडुला भारतरत्न पुरस्कार का म्हणुन द्यायचा...???

सचिनचे ज्या क्रिकेटमध्ये प्राविण्य आहे मुळात तो खेळच जगात 10 ते 15 देशात खेळला जातो.जगात ताकदवर समजल्या जाणा-या जर्मनी, रशिया, जपान, अमेरिका, चीन अशा अनेक देशात हा खेळ खेळलाच जात नाही.आँलिँपिक सारख्या प्रतिष्ठीत स्पर्धेत देखील क्रिकेटचा समावेश नाही.ध्यानचंदच्या अलौकिक कामगिरीमुळे भारताने आँलिँपिकला सुवर्णपदके पटकावली.भारताच्या लौकिकात त्यामुळे भर पडली. सचिनच्या क्रिकेटमधील नैपुण्यामुळे भारताला आँलिँपिकमध्ये सुवर्णपदक मिळणार नाही.त्यामुळे त्याच्या गुणवत्तेचा देशाला काहीच फायदा नाही.फक्त सचिनच्या खेळामुळे त्याचे समर्थक खुष होतात आणि त्याला भारतरत्न द्यायची मागणी करतात म्हणुन शासनाला नियमात बदल करण्याची काहीच गरज नाही.

उद्या एखादा माणुस चांगला विटीदांडु खेळुन लोकांचे मनोरंजन करत असेल तर हेच मुर्ख लोक त्याला पण भारतरत्न द्या म्हणुन मागणी करतील.
मग सरकारने त्याला पण भारतरत्न द्यायचे का...???
विटीदांडुची अतिशयोक्ती अशासाठी केली की आज जगात 10-15 देश सोडले तर बाकीच्या देशात क्रिकेटची किँमत विटीदांडुपेक्षा कमी आहे.
भारतात क्रिकेटवेड्यांची संख्या जास्त असल्यामुळे क्रिकेट जागतिक खेळ होऊ शकत नाही,हे सत्य आपणाला स्वीकारावच लागेल.


6) आता सचिनच्या वैयक्तिक आयुष्यातील काही वादळांबद्दल बोलु.

* 2002 मध्ये सचिन जेव्हा मायकल शुमाकरला भेटला तेव्हा शुमाकरने त्याला "फेरारी" गाडी भेट म्हणुन दिली. या गाडीवर किँमतीच्या 120% म्हणजे 1.1 कोटी रुपये एवढा कर भरावा लागणार होता.आपल्या प्रतिष्ठेचा गैरवापर करुन कराची रक्कम थकवण्यासाठी सचिनने तत्कालीन अर्थमंत्र्यांना पत्र लिहीले आणि कर थकवण्यात तो यशस्वी पण झाला.  त्याचे समर्थक त्याच्या या घ्रुणास्पद क्रुत्याचे लंगड समर्थन करताना सांगतात की, त्याला ती कार भेटवस्तु म्हणुन मिळाली होती त्यामुळे त्याला करमाफी द्यायलाच हवी. मी त्यांना एक सांगेन, सचिनने कर माफ करुन सुद्धा ती कार जुन 2011 मध्ये विकली. आणि सचिन एवढा दानवीर तर नक्कीच नाही की त्याने कार विकुन पैसे घेतले नसतील. सचिनच्या या क्रुत्यामुळे शासनाचा 1.1 कोटी रुपये कर बुडाला. मित्रांनो हा कर आपल्यासारख्या सामान्य माणसांकडुनच घेतला जातो  आणि आपण तो प्रामाणिकपणे भरतो. मी वर नमुद केलेल्या 41 भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्यक्तीनी शासनाकडे कर माफ करावा म्हणुन याचना केली नाही. 1.1 कोटी रुपये आपणा सामान्य लोकांसाठी खुप वाटत असतील पण सचिनसारख्या अब्जाधीश श्रीमंत क्रिकेटपटुला ते नगण्य होते तरी शासनाला गंडा लावायचा या स्वार्थी हेतुने त्याने कर सवलत मागितली.1.1 कोटी रुपये भरुन सचिन बेघर होणार नव्हता.इथे प्रश्न सचिनला कर माफ करण्याचा नाही तर सचिनच्या व्रुत्तीचा आहे. माझ्या द्रुष्टीने सचिन 'महाठग' आहे.


* सचिनने पुन्हा एकदा आपल्या प्रतिष्ठेचा गैरवापर करत आपल्या इमारतीसाठी महाराष्ट्र सरकारकडे वाढीव FSI मागितला. (शहरात इमारतीसाठी जी कमाल उंचीची मर्यादा असते त्यापेक्षा जास्त उंचीची इमारत बांधण्यासाठी परवानगी मागणे.)प्रतिष्ठेचा गैरवापर करुन नियम धाब्यावर बसवण्यात सचिनला स्वारस्य दिसतेय.




* सचिनचा उन्मतपणा हल्ली पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळाला. आपल्या नवीन  घरात प्रवेश करताना महानगरपालिकेचे O.C. प्रमाणपत्र घेणे सचिनने जरुरीचे  समजले नाही. महापालिका प्रशासनाने मात्र यावेळी कडक कारवाई करत सचिनला  दंड ठोठावला.



7) भारतरत्न सारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराचा सन्मानित व्यक्तीने गैरवापर करु नये यासाठी तो पुरस्कार निर्वुत्तीनंतर दिला जातो. सचिन अजुन खेळत आहे आणि वेगवेगळ्या जाहिराती देखील करतोय. उद्या सचिनने भारतरत्न सारख्या पुरस्काराचा जाहिरातीसाठी वापर करुन अपमान केला तर त्याला जबाबदार कोण...?एकंदरीत प्रतिष्ठेचा गैरवापर करणे आणि सचिनचा ठग व स्वार्थी स्वभाव पाहिल्यावर तो भविष्यात या पुरस्काराला अपमानित करणारे वर्तन करणार नाही  याची खात्री कोणी द्यायची...??सचिनचे समर्थक त्याच्यावर असलेल्या आंधळ्या प्रेमापोटी त्याला लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार दिला जावा म्हणुन उतावीळपणा करत आहेत.
पण सरकारने आपली अक्कल गहाण ठेवली आहे का...???


8) सचिनच्या स्वार्थी स्वभावाचा आणि प्रतिष्ठेच्या जोरावर सगळे नियम धाब्यावर बसवण्याच्या व्रुत्तीचा हल्ली पुन्हा एकदा अनुभव आला.आपल्या पश्चात आपली टिममधील जागा आपल्या मुलाला ( अर्जुनला) देण्यात यावी अशी सचिनची सुप्त इच्छा आहे.त्यासाठीच त्याने आतापासुनच कोणतीही परवानगी नसताना टिम इंडियाच्या सराव सत्रात अर्जुनला समाविष्ट करुन घेतले आहे.

सराव सत्रात भाग घेण्याचा अधिकार फक्त ज्यांचा टिममध्ये समावेश करण्यात आलाय त्यांनाच असतो. आपल्या प्रतिष्ठेच्या जोरावर जो हे करु पाहतो त्यालाच घराणेशाही म्हणतात.
राजकरणात जे ठाकरे आणि राणेने केलय तेच क्रिकेटमध्ये सचिन करतोय



9) 24 एप्रिल 2011 रोजी सत्यसाईबाबा नावाच्या एका भोँदुबाबाचे निधन झाले आणि त्यानंतर T.V. वर सचिनच्या रडण्याचा किळसवाणा कार्यक्रम आपण सर्वाँनी पाहिला.खरच त्यादिवशी सचिन तेँडुलकर या माणसाची मला किव येत होती.भारत हा पहिल्यापासुनच अंधश्रद्धेने ग्रासलेला देश आहे.भोँदुगिरीच्या नावाखाली सत्यसाईँसारखे अनेक भोँदुबाबा देशातील गरीब जनतेला लुबाडत आहेत. सत्यसाईँच्या म्रुत्युनंतर त्यांच्याकडे असलेल्या खजिन्याचा आपण सर्वाँनी अनुभव घेतला. Dr.नरेँद्र दाभोलकरांसारखे लोक प्रयत्नांची पराकाष्टा करत भारतातील लोकांना या बाबांच्या विळख्यातुन बाहेर काढायचा प्रयत्न करत आहेत. त्यात ते काही प्रमाणात यशस्वी देखील झाले आहेत. अशा वेळी सचिन तेँडुलकर सारखा माणुस ज्याच्याकडे देशातील लोक एक आदर्श म्हणुन पाहतात जर त्या भोँदुबाबाच्या पार्थिवाजवळ बसुन ढसाढसा रडत असेल तर लोकांचा या बाबांवरील विश्वास अजुन द्रुढ होत जाईल.कोणताही सामान्य माणुस काही विचार न करता एकच निष्कर्ष काढतो की, जर सचिनला सत्यसाईँचा भक्त असल्याने आयुष्यात एवढे यश मिळाले म्हणजे मी त्या बाबांचा भक्त झालो की मला पण नक्कीच मिळेल. सचिनच्या या क्रुत्यामुळे देशातील अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. परिणामी भोँदुबाबांना प्रोत्साहन मिळुन दाभोळकरांसारख्या माणसांचे अंधश्रद्धा निर्मुलन करण्याचे सर्व प्रयत्न फुकट जात आहेत.तुम्ही याच अंधश्रद्धाळु सचिनला भारतरत्न द्या अशी मागणी करताय.उद्या भारतरत्न मिळाल्यावर सचिन कोणत्याही भोँदुबाबाच्या पार्थिवाकडे जाऊन रडत बसला तर तो त्या सर्वोच्च पुरस्काराचा अपमान ठरेल हे लक्षात घ्या.


10) मित्रांनो, सचिनच्या खेळावर मी पण तुमच्याएवढच प्रेम करतो. फरक फक्त इतकाच आहे माझ प्रेम आंधळ नाही.सचिनशिवाय भारतात अशी कितीतरी व्यक्तिमत्वे आहेत जे आपल संपुर्ण आयुष्य एक व्रत म्हणुन जगले.फक्त महाराष्ट्राचाच विचार केलात तर थोर समाजसेवी अण्णा हजारे, मेधा पाटकर, सिँधुताई संपकाळ, बाबा आमटे, जयंत नारळीकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशी कितीतरी नावे भारतरत्न पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार आहेत.देशाच्या पातळीवर विचार केलात तर मोबाईल क्रांतीचे जनक SAM PITRODA,तबलावादक झाकीर हुसेन, OSCAR पुरस्काराने सन्मानित संगीतकार ए.आर.रेहमान यांसारखी कित्येक नावे भारतरत्नच्या शर्यतीत सचिनपेक्षाही खुप पुढे जातील.


मित्रांनो, माझे सगळे मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवले.
आता तुम्हीच ठरवा खरच सचिन तेँडुलकर भारतरत्न सारखा सर्वोच्च पुरस्कार देण्याच्या लायकी योग्य आहे...???

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा