सोमवार, १ जुलै, २०१३

अशी ही बनवाबनवी…

दादांच्या मुठीत,
मधुभाई बसले...
"जैतापुरच्या बत्तीने",
आग लावीत सुटले...!!!

मधुभाई म्हणती,
कोकणी माणसा उठ...
कोकणच्या विकासासाठी,
निसर्गाची करु लुट...

जैतापुर अणुप्रकल्प,
दादांच्या कोकणात होणार...
विकासाचा परिमल,
दहा दिशांना दरवळणार...

सुरु होताच अणुभट्टीतील,
किरणोत्साराचा मार...
आंबे, काजु, नारळ,
दिसायचे नाहीत फार...

अणुभट्टीतील गरम पाणी,
समुद्रात जाणार...
माशांची संख्या मात्र,
शतपटीने घटणार...

अणुभट्टी पहायला,
कोठुन पर्यटक येणार...
गावक-यांच्या घरी आता,
भिकेचे डोहाळे लागणार...

कोकणी लोक मेले तरी,
आपले 'दादा' मात्र चमकणार...
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत,
सगळ्यात पुढे असणार...

बनु नकोस करंटा,
करु नकोस विरोध...
मधुभाई कर्णिकांकडुन,
घे थोडा बोध...!

( मधुभाईँच्या प्रवचनावर कोकणी माणुस भडकला...)

मधुभाई मधुभाई,
झालय तरी काय...?
दादांकडुन पैशाचा डोस,
तुम्हालाही मिळाला काय...??

किरणोत्सार महाभयंकर,
अल्लाउद्दीनचा राक्षस...
भट्टीतुन सुटला तरफ,
कोकण करील नष्ट...

मधुभाई पैशाची लालच,
उतारवयात बरी नाय...
कोकणशी केलेली गद्दारी,
तुम्हाला शोभत नाय...!!!


( कोणत्याही प्रकारचे अणुशास्त्रातील ज्ञान नसताना "जैतापुरची बत्ती" पुस्तक लिहुन जैतापुरच्या विनाशकारी प्रकल्पाला समर्थन करत इतकी वर्षे कोकणच्या लोकांनी दिलेल्या आदरसन्मानाचा वापर आपल्याच लोकांची दिशाभुल करण्यासाठी करणा-या ज्येष्ठ कवी मधु मंगेश कर्णिकांचा जाहीर निषेध मुद्दामच मी स्वतः बनविलेल्या या तोडक्यामोडक्या कवितेद्वारे व्यक्त करतो.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा