बुधवार, ३ जुलै, २०१३

निखील वागलेंसाठी माझा आजचा सवाल....

निखील वागळे मराठीतील एक उत्कृष्ठ समाजवादी पत्रकार आहेत आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात पुरेपूर आदर आहे. आजपर्यंत कितीतरी संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी आपली रोखठोक मते मांडून सामान्य लोकांच्या हितासाठी नेतेमंडळीना निरुत्तर केले आहे पण आज मला निखील वागलेंनाच काही खटकणारे प्रश्न विचारायचे आहेत.

हल्लीच त्यांच्या आयबीन या वाहिनीवर महात्मा गांधीजी नंतरचा ग्रेटेस्ट इंडियन कोण अशी स्पर्धा ठेवली होती. मला वागलेना एवढंच विचारायचं आहे "गांधीनंतरचा ग्रेटेस्ट इंडियन कोण" हे शीर्षक देण्यामागे प्रयोजन काय...? देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग करणा-या किँवा योगदान देणा-या इतर क्रांतिकारकांचा आणि नेत्यांचा हा जाणीवपूर्वक केलेला अपमान नव्हे...??
मुळात गांधीजीना मतदाना अगोदरच ग्रेटेस्ट इंडियन ठरवणारी निखील वागळे आणि कंपनी आहे तरी कोण...???


सुभाषचंद्र बोसांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी उसळत्या समुद्रात पाणबुडीतुन जीवघेणा प्रवास केला होता तसा गांधीनी कधी केला होता ते वागळेँनी अगोदर स्पष्ट करावं.
काळ्या पाण्याच्या शिक्षेने सावरकरांनी कित्येक वर्षे अंदमानात नरकयातना भोगल्या त्या तुलनेत गांधीनी किती वेळा कारावास भोगला तेही सांगाव...?
भगतसिँग, सुखदेव, राजगुरुने हसत हसत फाशी स्वीकारली पण या गांधीँची देशाच्या सत्यानाश करण्याच्या द्रुष्टीने थेडं इतकी वाढली की देशहितासाठी नथुराम गोडसेँना गांधीँची हत्या करावी लागली.
निखिल वागळे अशा माणसाला तुम्ही कोणत्याही प्रकारचे मतदान न घेता प्रथम क्रमांकाचा ग्रेटेस्ट इंडियन करताच कसा...?? आणि लोकांची मते घेऊन जो माणुस निवडून येतो तो दुस-या क्रमांकाचा ग्रेटेस्ट इंडियन बनतो ही कसली डोंबलाची निवड...??? हा देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचा आणि तुमच्या या शो साठी मत दिलेल्या लोकांचा अपमान नव्हे...???? तिकडे पाकिस्तानात ही स्पर्धा भरवली असती तर जीनांना मागे काढुन गांधीजीनी "द ग्रेटेस्ट पाकिस्तानी" ही पदवी मिळवली असती कारण गांधीजीनी जेवढे कार्य पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आणि त्यानंतरही केले ते जीनांनासुद्धा जमले नाही.

गांधीना "भारताचा राष्ट्रपिता" ही उपाधी कोणी दिली दस्तरखुद्द काँग्रेस सरकारलाच माहित नाही. आम्ही तर म्हणतो गांधीना "पाकिस्तानचा राष्ट्रपिता" म्हणा. गांधीना "महात्मा" तर मतांचे राजकरण करण्यासाठी या काँग्रेसवाल्यांनीच बनवले. आणि आता जेव्हा "ग्रेटेस्ट इंडियन" ठरवण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा या गांधीना प्रथम क्रमांकाची जागा बापजाद्यांची अमानत असल्यासारखी फुकटच बहाल केली आणि लोकांनी दिलेल्या मतांमधुन निवडुन आलेल्या आंबेडकरांना "दुस-या क्रमांकाची" जागा मिळाली,पहिल्या क्रमांकाची नव्हे...!
"द ग्रेटेस्ट इंडियन बाबासाहेब आंबेडकर" अशा मथळ्याखाली आरपीआयच्या अर्धवटांनी सगळीकडे शहरात पोस्टर लावली आहेत पण त्यांना एक गोष्ट समजत नाही की वागळे आणि कंपनीने आंबेडकरांना गांधीनंतर दुस-या क्रमांकावर ठेवुन त्यांचा जाणीवपुर्वक अपमान केला आहे. रामदास आठवले आणि अक्कल या गोष्टीँचा दुरान्वयेही संबंध नसल्याने त्यांना उपदेश करणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोँधळ बरा होता अशी परिस्थिती होईल

अरे या गांधीना थेट स्पर्धेत उतरवायला तुम्ही तथाकथित बुद्धिवादी लोक घाबरता का...?
जर खरच त्या गांधींची "ग्रेटेस्ट इंडियन" म्हणवुन घ्यायची लायकी असेल किँवा अजूनही लोक त्याना त्या कुवतीचा मानत असतील तर नक्कीच ते निवडुन येतील.
दुध का दुध, पानी का पानी...! पण लोकांच्या मतांचा विचार न करता त्याना अगोदरच ती उपाधी बहाल करायची हे म्हणजे गाढवाला रंग थापुन घोडा बनवण्यासारखे आहे. आताची पिढी बाप दाखव नाहीतर श्राध्य घाल या प्रकारात मोडते. जर गांधी खरच "ग्रेटेस्ट इंडियन" म्हणून निवडून आले तर त्यांना तुम्ही म्हणाल तेवढा आदर द्यायला तयार आहोत पण निवडून आल्यावरच... त्या अगोदर नाही. कोण निखील वागळे आणि कंपनीला वाटत म्हणून गांधीजी आंबेडकर किंवा सावरकारांपेक्षा ग्रेट होत नाहीत.

बर वीर सावरकरांना कट्टर हिँदुत्वावाद्यांची मते मिळुन ते "ग्रेटेस्ट इंडियन" होतील या भीतीपायी तुम्ही त्यांना पहिल्या 50 जणात देखील जागा दिली नाही. हा कोणता दुटप्पीपणा...? या मागचे कारण अगोदर आमच्यासमोर स्पष्ट करा आणि कारण नसेल तर समस्त जनतेची माफी मागा.निखील वागळे तुमच्यासारख्या सामाजिक भान असलेल्या पत्रकाराला हा दुटप्पीपणा शोभत नाही. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा,तुम्ही गांधीवाद्यांनी कोँबडी झाकलात म्हणुन सूर्य उगवायचा राहणार नाही.
वागळे तुम्हाला याची खात्री पटलीय का की, गांधीची कुकर्मच इतकी आहेत की हिँदुस्थानातील लोक त्याना पहिला क्रमांक सोडाच पण TOP 50 मध्येही येऊ देणार नाहीत...??? आम्हाला याच उत्तर हवय. एकतर पुन्हा हीच स्पर्धा घेऊन त्यात गांधी, आंबेडकर आणि मुख्य म्हणजे सावरकर या तिघानाही यादीत स्थान द्या मग जो काही निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. नाहीतर असली स्पर्धा घेऊन तमाशाचे फड चालवायचे प्रकार पुर्णपणे बंद करा...!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा