बुधवार, ३ जुलै, २०१३

कर्तुत्ववान राजकीय नेता बनण्यासाठी शिक्षण आवश्यकच आहे का...?

"कर्तुत्ववान राजकीय नेता बनण्यासाठी शिक्षण आवश्यकच आहे का नाही...?"
या विषयावर एकदा वादविवादात मी भाग घेतला होता.
अर्थातच दुबळ्या बाजुची वकीली करणे जास्त आव्हानात्मक असल्याने आणि नेहमीच शब्दांचे खेळ करत आव्हानांचा सामना करणे माझा छंदच असल्याने मी "राजकीय नेता बनण्यासाठी शिक्षण आवश्यक नाही" या बाजुची वकीली करत मी खालील मुद्दे उपस्थित केले. तुम्ही सुद्धा तुमची प्रतिक्रिया नोँदवत माझी मते खोडुन काढलीत किँवा पाठिँबा दिलात तर खुप आनंद होईल. विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी वादविवाद हे उत्तम माध्यम आहे असे मी तरी मानतो.

1) कोणाच्याही मनाला वाटले किँवा सगळ काही नियोजीतपणे ठरवुन किँवा नातलगांच्या वारसाहक्काने कोणी कर्तुत्ववान राजकीय नेता बनु शकत नाही, गल्लीबोळात चार मित्रांसोबत पोस्टर लावुन स्वयंघोषित नेता बनु शकतो.
मी एका मतावर ठाम आहे की, खरा कर्तुत्ववान नेता सभोवतालची परिस्थितीच घडवते. इतकेच नव्हे एखादा नेत्याची जडणघडण होण्यास तीच परिस्थिती कारणीभुत ठरते. त्यासाठी मी खालील उदाहरणे देतो.

2) आज ज्या हिटरला मी आदर्श मानतो त्याला ज्यू हत्याकांडापायी असुर, राक्षस अशी दुषणे लावली जातात. प्रत्येकाची स्वताची अशी काही ठरलेली मते असतात त्यामुळे मला या विषयावर काही बोलायचे नाही पण काही वेळापुरता तो विषय बाजूला ठेवत आपल्या सदसदविवेकबुद्धीला जाग करून काही प्रश्न विचारा आणि काय उत्तरे मिळतात ते पहा. हिटलर लहानपणीच पोरका झाल्याने तो फुटपाथवर राहायचा. आता फुटपाथवर राहणारा पोरगा कितीही कर्तुत्ववान असला तरी स्वताची राष्ट्राध्यक्ष बनण्याची हौस भागवायला जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष बनू शकत नाही ना...? त्याला लोकांचा पाठींबा असणे आवश्यकच आहे. त्यामुळे तुमच्या लेखी असुर किंवा राक्षस असणारा हिटलर थेट आकाशातून खाली पडला नव्हता तर त्याला जर्मनीच्या लोकांनीच भरघोस मते देत आपला चान्सेलर बनवला होता. मग फुटपाथवर राहणारा पोरगा कसा काय चान्सेलर बनला असेल...? याला कारण होती जर्मनी मध्ये असणारी त्यावेळची राजकीय परिस्थिती...! पहिल्या महायुद्धात पराभव पत्करल्यावर जर्मनीचा सम्राट कैसर विल्यम्स आपला जीव वाचवण्यासाठी शरणागती पत्करून पळून गेला होता, लोकांमध्ये या गोष्टीचा प्रचंड संताप होता, शिवाय व्हर्सायच्या तहाने जर्मनीची सगळी विजयी राष्ट्रे एकत्रितपणे लुट करत होते. हीच परिस्थिती हिटलरच्या उदयाला कारणीभूत ठरली. देशभक्तीने पेटून उठलेला हिटलर तेव्हा प्रक्षोभक भाषणे देत, आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर जर्मन जनतेसमोर आला. सर्व बाजूंनी येणाऱ्या संकटांनी हताश झालेल्या जर्मन लोकांना अशाच एका आक्रमक नेत्याची गरज होती. त्याने मेलेल्या मुडद्यांना पुन्हा अमृत पाजून जिवंत करावे त्याप्रमाणे जर्मन लोकात आपल्या तुफान भाषणांनी नवसंजीवनी आणली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आत्मविश्वास भरला आणि जर्मन लोकांनाही त्याच्या बद्दल विश्वास वाटू लागला. म्हणूनच सांगतो सभोवतालची परिस्थिती नेता घडवते. जर पहिल्या महायुद्धात जर्मनीचा दारुण पराभव झाला नसता तर हिटलर फुटपाथवर आयुष्य जगुन जगासमोर आलाच नसता.

3) 1920 साली भारताच्या राजकीय पटलावर महात्मा गांधीँचा उदय झाला. तोपर्यँत लोकमान्य टिळकांसारखे पुढारी स्वातंत्र्यचळवळीची धुरा सांभाळत होते. ब्रिटीशांनी तोडा, फोडा आणि राज्य करा ही निती अवलंबत भारतीय समाजात प्रचंड तेढ निर्माण केली होती. जाती-धर्मात दुभंगलेल्या भारतीय समाजाला एकसंध करण्यासाठी गांधीजीँचीच गरज होती. गांधीनी अख्खा देश पिँजुन काढला. सत्याग्रह, अहिँसा ही ब्रिटीशांना नवीनच असणारी तत्वे प्रथमच अवलंबत विखुरलेल्या सामान्यातील सामान्य लोकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रित आणले. गांधीविरोधकांना एक नम्र विनंती की एवढे दिवस गांधीना विरोध केल्यावर आज मी त्यांचे गोडवे गातोय याकरता त्यांनी मला दुटप्पी समजु नये. अगदी नथुराम गोडसेँनीसुद्धा गांधीना याच देशकार्यासाठी गोळी मारण्याअगोदर प्रणाम केला होता. मग आपण तरी एवढा द्वेष का करावा...? गांधीनी अखेरच्या काळात केलेली क्रुत्ये (देशाची फाळणी, मुस्लिमप्रेम, पाकिस्तानला दिलेले 55 कोटी, भगतसिँगची फाशी, सुभाषबाबुंशी केलेला असहकार, इत्यादी) तसेच त्यांचा हट्टी स्वभाव (हट्टाग्रह) यांवर आपली मते असु शकतात पण त्यांनी केलेली देशसेवा नाकारणे हे घोर पाप ठरेल.

4) शरद पवारांचे शिक्षण काय आपणा सर्वाँनाच माहित आहे पण आजतागायत त्यांच्यासारखे राजकीय डाव खेळणारा दुसरा नेता जन्माला सुद्धा आला नाही.

5) नरेँद्र मोदीँचा आज संपुर्ण देशात उदोउदो होतोय तो त्यांनी केलेल्या गुजरातच्या विकासामुळे आणि कट्टर हिँदुत्वामुळेच...! गोध्र्यात मुस्लिमांनी हिँदुनी भरलेला रेल्वेचा डबा जाळला नसता तर मोदी कदाचित देशाला कळालेच नसते. याचाच अर्थ परिस्थिती नेत्याला घडवते. आज मुस्लिमांच्या वाढत्या अत्याचारांमुळे भयभीत झालेल्या हिँदुंना एका कट्टर हिँदुत्ववादी पंतप्रधानाची गरज आहे आणि त्याच परिस्थितीमुळे मोदीँनी लोकप्रियतेची अत्त्युच्च पातळी गाठली आहे.

6) मनमोहन सिँग फार मोठे अर्थतज्ञ म्हणुन ओळखले जातात. 1991 च्या सुमारास सोने तारण म्हणुन ठेवायची पाळी आलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेस त्यांनीच पुनरुत्जीवीत केले होते पण एवढे शिक्षण घेतलेल्या या विद्वान माणसाकडे फक्त राजकीय नेता होण्याचे कौशल्य नसल्याने एक पंतप्रधान म्हणुन ते सपशेल अपयशी ठरले.
1$ ची किँमत 50 रुपयावरुन 56 रुपये झाली तर एवढ्या नावाजलेल्या अर्थतज्ञाला महागाई आवरता आली नाही. मग 1$ ची किँमत 4 MARKS असलेल्या जर्मनीत जेव्हा आर्थिक मंदीमुळे 1$ ची किँमत 10000 MARKS एवढी झाली तेव्हा कमी शिक्षण असलेल्या हिटलरने देश कसा काय चालवला असेल...? याचे एकच उत्तर देता येईल की, हिटलर शिक्षणात कमी असला, तो मनमोहन सिँगांसारखा नावाजलेला अर्थतज्ञ नसला तरी कठीणातील कठीण परिस्थिती राजकीय कौशल्याच्या बळावर कशी हाताळायची हे तो अगदी नीटपणे जाणुन होता. म्हणुनच सांगतो-
"एक कर्तुत्ववान राजकीय नेता बनण्यासाठी जास्त गरज शिक्षणाची असते असे म्हणणे चुकीचे ठरेल."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा