रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

तत्वांपलीकडील प्रेम...

आपल आयुष्य विशिष्ट तत्वांशी प्रामाणिक राहुन जगणा-या माणसांना समाज नेहमीच आदरयुक्त नजरेने पाहतो पण सगळेच तत्ववादी लोक वैयक्तिक आयुष्यात यशस्वी किँवा सुखी होतातच असे नाही. कित्येकदा तत्वांनी तडजोड न केल्याने त्यांचे आयुष्य तारेवरच्या कसरतीचा खेळ बनुन जाते आणि कित्येकदा या तत्वांच्या खेळात त्यांना अनेक गोष्टी गमवाव्या लागतात. एवढेच काय तर काही वेळा कधीकाळी जीव ओवाळुन टाकत प्रेम केलेली आपली माणसे देखील त्यामुळे दुर जातात. सुखाचे क्षण पाहता पाहता आटतात आणि हाती येते ते वाळवंटासम शुष्क बनलेले रखरखीत आयुष्य...!आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, तत्वांना तळहातावरील फोडापेक्षा जास्त जपणा-या राजची...! माझ्या कथेचा नायक राज एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला. लहानपणापासुनच राजला नाटक, सिनेमांची खुप आवड होती. तो शाळेत असल्यापासुनच नाटकात अभिनय करु लागला. कालांतराने त्याला अभिनयापेक्षा दिग्दर्शन करणे अधिक आव्हानात्मक वाटु लागले आणि पुढील आयुष्यात आपण एक चांगला दिग्दर्शक बनुन दाखवायचे त्याने मनाशी पक्के केले. राजचे काका सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांचे वाचन दांडगे होते. त्यांच्या सहवासात राहुन राजही अनेक प्रकारची पुस्तके अधाशासारखा वाचु लागला. परिणामी सामाजिक प्रश्नांशी तो नकळत जोडला जावु लागला. त्याचे मन आजुबाजुच्या समाजाप्रती संवेदनशील बनु लागले. एकीकडे सर्वोत्क्रुष्ट दिग्दर्शक बनायचे ध्येय आणि दुसरीकडे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची तीव्र इच्छा, अशा दुहेरी कत्रीत राज अडकला.शेवटी सुवर्णमध्य काढताना दिग्दर्शक बनुन, सामाजिक विषयांवरील कलाक्रुती दिग्दर्शित करुन, त्याद्वारे विविध सामाजिक प्रश्नांना समाजासमोर आणायचा त्याने चंग बांधला. काँलेज जीवनात शिक्षणाबरोबरच कला अकादमीत त्याने दिग्दर्शनाचे धडे गिरवले. काँलेजच्या शेवटच्या वर्षात राजने दिग्दर्शित केलेल्या एकांकिकेला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आणि राज ख-या अर्थाने प्रकाशझोतात आला. राजचा स्वभाव फारच एककल्ली होता आणि त्यामुळेच त्याच्या मित्रमैत्रीणीँची संख्या फारच कमी होती. तो सहसा मित्रांमध्ये मिसळत नसे. त्याच्या मोजक्याच मैत्रीणीँपैकी एक असलेल्या राधिकावर त्याचे मनापासुन प्रेम होते. राधिकालाही राज खुप आवडायचा पण राधिकाचा स्वभाव राजच्या नेमका विरुद्ध होता. बाँलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री होण्यासाठी ती काहीपण करायला तयार होती.अगदी सर्वोत्तम अभिनय जमत नसला तरी आकर्षक देहयष्टी, गोरा रंग अशा बाह्यसौँदर्यामुळे बाँलिवुडमध्ये बस्तान बसवणे राधिकाला अजिबात कठीण नव्हते. राज आणि राधिका दोघांचेही ध्येय एकाच क्षेत्राशी संबंधित असल्याने प्रेमयुगुलांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही एकमेकांची खुप काळजी घ्यायचे, प्रेम करायचे आणि एकंदरीतच राजा-राणीचा सुखी संसार सुरु होता. इकडे करियरची अवस्था मात्र परस्परविरोधी होती. राजने मनाशी ठरवल्याप्रमाणेच सामाजिक आणि राजकीय विषयांशी संबंधित चित्रपट दिग्दर्शित केले. अपेक्षेप्रमाणे समीक्षकांची वाहवा मिळवली, त्याच्या एका चित्रपटाला तर मानाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला मात्र मायबाप समजल्या जाणा-या प्रेक्षकांनी अशा गंभीर विषयाकडे पाठ फिरवली. राजच्या चित्रपटांचे शो असलेली थिएटरे ओस पडु लागली आणि निर्माते राजच्या चित्रपटावर पैसे लावायला तयार होईनात.राधिकाने हलकेफुलके विषय हाताळत एक नटी म्हणुन विषय हाताळत सिनेस्रुष्टीत चांगला जम बसवला. आता अन्य अभिनेत्रीँना मात देत जास्तीत जास्त चित्रपट मिळवायचे असतील तर निर्मात्यांच्या मागणीप्रमाणे चित्रपटात भडक प्रणय द्रुश्ये द्यावी लागतील हे एव्हाना राधिकाच्या लक्षात आले होते. राधिका स्वतः प्रोफेशनल होती. करियर आणि संसार या वेगळ्या गोष्टी एकत्र करु नये या आधुनिक मताची होती. पडद्यावर दुस-या नटांसोबत प्रणयद्रुश्ये दिल्याने ख-या आयुष्यातील नवरा-बायकोच्या नात्यात काहीच फरक पडणार नाही कारण तिचा नवरा राज चित्रपटस्रुष्टीतच काम करत असल्याने तो नक्कीच प्रोफेशनल असणार अशी तिची धारणा होती.राज एकविसाव्या शतकात वावरत असला तरी त्याच्या मनावर विसाव्या शतकातील विचारांचा पगडा जास्त होता. करियर म्हणुन पडद्यावर बायकोने दुस-या पुरुषाच्या शरीराशी केलेली लगट त्याच्या तत्वात बसत नव्हती. दुसरीकडे एकाच क्षेत्रात असुनही बायको यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान आणि स्वतः मात्र अपयशी दिग्दर्शक ही सल राजच्या मनात कुठेतरी बोचत होती. प्रणयद्रुश्य असलेल्या चित्रपटात काम न करण्याचा आदेश त्याने राधिकाला दिला. प्रथमतः राधिकाने राजचा हात हातात घेऊन त्याला समजुतदारपणे विचारले की, "पडद्यावरील प्रणय पाहुन तुझ्या मनात संशय निर्माण व्हवा एवढे आपले प्रेम कमकुवत झाले का...? तुझ्या लेखी तुझी बायको व्याभिचारी आहे का...??" राधिकाच्या या उद्गारांनी हळवा झालेला राज तिला जवळ घेत म्हणाला, "इकडे प्रश्न प्रेमाचा नाही तर तत्वांचा आहे. माझ आजही तुझ्यावर खुप प्रेम आहे पण प्रेमासाठी तत्वांशी तडजोड करण मला जमणार नाही. माझ्या बायकोला माझ्याखेरीज अन्य पुरुषाने केलेला स्पर्श मला खपणार नाही. तु चित्रपटात काम करणे त्वरित बंद कर. या इंडस्ट्रीत एका स्त्रीकडे फक्त कामवासना शमवण्याची वस्तु एवढ्याच संकुचित नजरेने बघितल जात."हताश झालेली राधिका राजला म्हणाली की, "संकुचित द्रुष्टीकोन चित्रपटस्रुष्टीचा नव्हे तर तुमचा स्वतः आहे. तत्वांची ढाल पुढे करुन तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेत आहात. नात्यामध्ये जेव्हा संशयाला जागा निर्माण होते तेव्हा विश्वास कधीचाच संपलेला असतो आणि विश्वास नसलेल नात टिकवण्यापेक्षा तोडलेल केव्हाही चांगल...! मी चित्रपटात अभिनेत्री म्हणुन काम करणार आहे. तुम्ही दिग्दर्शक म्हणुन अपयशी झालात आणि म्हणुनच माझ करियर संपवु पाहताय. त्यापेक्षा आपण घटस्फोट घेऊन एकमेकांपासुन कायमचे दुर जाऊ."

रडक्या आवाजात शेवटचे खडे बोल सुनावुन राधिकाने राजचे घर सोडले. एकमेकांवर प्रेम करणारे नवरा-बायको करियर आणि संसार या गोष्टीँची सांगड घालु शकत नसल्याने लग्नाचे पवित्र नाते घटस्फोटाचे लेबल लावुन कोर्टाच्या पायरीपर्यँत घेऊन आले. घटस्फोटानंतर राधिकाने आपले मन कामात गुंतवुन स्वतःला सावरले खरे पण राधिकाच्या विरहानंतर राज मानसिकद्रुष्ट्या खचु लागला. निर्मात्यांनी राजच्या चित्रपटास पैसे पुरवण्यास नकार दिल्याने राजला पुढची 4-5 वर्ष चित्रपट मिळेनासे झाले आणि तो आर्थिकद्रुष्ट्या देशोधडीला लागला.एकीकडे अपयशाचे दुष्टचक्र तर दुसरीकडे बायकोच्या विरहाने आलेला एकाकीपणा वयाच्या चाळीशीत राम सहन करु शकला नाही. तो दारु, सिगारेटच्या आहारी जाऊ लागला. घटस्फोटाच्या केसची कोर्टात तारीख असायची तेव्हा राज-राधिका समोरासमोर यायचे पण नजरेला नजर मिळवणे टाळत असत. नात शिल्लक नसल तरी राधिकाच्या मनात राजविषयीच प्रेम अजुनही तसच होत. राजची हालत तिला पाहवेना. आपल्या ओळखीच्या निर्मात्याला गळ घालुन तिने राजला नवीन फिल्म मिळवुन दिली. आपल्या बायकोमुळे मिळालेली फिल्म स्वाभिमानी राज कोणत्याही परिस्थितीत करणार नाही याची खात्री असल्याने तिने निर्मात्याला स्वतःच नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली.रखरखत्या उन्हात अचानक पावसाची थंड धार येऊन अनपेक्षित गारवा मिळावा अशी राजच्या मनाची अवस्था झाली. नवीन फिल्म मिळाल्याने राज पुन्हा एकदा नवीन उत्साहाने कामाला लागला. सामाजिक विषय आपल्या पद्धतीने हाताळणा-या एका लढवय्या टीव्ही पत्रकार तरुणीची ती गोष्ट होती. फिल्मसाठी एका तरुण नटीची गरज होती आणि त्यासाठी राजने आँडिशन घ्यायचे ठरवले. जवळपास 50 ते 75 तरुणीँची काळजीपुर्वक आँडिशन घेतल्यानंतर राजला भावली ती साक्षी...! साक्षीच्या डोळ्यात एक वेगळेच तेज होते. तिचा चेहरा बोलका होता. शब्दाशब्दात अंगार होता. राजने तिची निवड करुन तिला पुढील बोलणीसाठी आपल्या केबिनमध्ये बोलवले.एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी एकांतात भेटुन बोलायची ही काही साक्षीची पहिली वेळ नव्हती. या अगोदरही साक्षी 4-5 वेळा आँडिशनमध्ये निवडली गेली होती आणि पुढे जाऊन कास्टिँग काऊचच्या घाणेरड्या प्रकाराला सामोरे जावे लागले होते. सुरुवातीला एकंदरीतच या प्रकाराबद्दल घ्रुणा वाटत असल्याने तिने चित्रपटाच्या आँफर धुडकारने पसंत केले होते मात्र आता दिग्दर्शकाचे मुलाखतीवेळी एका नटीच्या शरीरावर वखवखलेल्या नजरेने पाहणे तिला परिचयाचे झाले होते. कास्टिँग काऊच शिवाय चित्रपटात प्रवेश मिळुच शकत नाही या निष्कर्षाप्रत ती पोहोचली होती. यावेळच्या चित्रपटाचे कथानकही स्त्रीप्रधान असल्याने आपल्या भुमिकेला प्रसिद्धी मिळेल याची तिला खात्री होती आणि त्यासाठीच तिने कास्टिँग काऊचला सामोरे जायचे ठरवले. मुलाखतीवेळी राज एकटाच होता पण साक्षीला त्याची नजर इतर दिग्दर्शँकाप्रमाणे अजिबात नाही वाटली. त्या नजरेतच एक विश्वास होता, प्रामाणिकपणा होता आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास होता.राजने साक्षीला तिचा पुर्ण रोल समजावुन सांगितला. तिचा अभिनय राजच्या करियरकरीता किँवा एकंदरीतच समाजातील अपप्रव्रुत्तीँविरोधातला आवाज तीव्र करण्याकरीता किती महत्वाचा आहे याची जाणीव करुन दिली आणि दोनच दिवसात चित्रपटाच्या शुटिँगला उपस्थित राहण्यास सांगितले. आँफिसमध्ये अन्य कोणीही उपस्थित नाही, समोर 21 वर्षाची गोरीपान तरुणी आणि राजने परिस्थितीचा अजिबात गैरफायदा घेतला नाही, याचे साक्षीला आश्चर्यच वाटले आणि राजविषयी कमालीचे कुतुहल निर्माण झाले. राजच्या टेबलवर समोरच त्याने ठेवलेला त्याच्या बायकोचा फोटो त्याचे बायकोप्रती असलेले प्रेम आणि निष्ठा दर्शवत होता. आताच्या जमान्यात राजसारखे दिग्दर्शक अस्तित्वात आहेत यावर तिचा काही क्षण विश्वासच बसेना.आपल्याला देखील राजसारखा प्रामाणिक नवरा मिळावा अशी मनातल्या मनात प्रार्थना करुन ती घरी गेली. शुटिँग सुरु झाल्यानंतर थोड्याच दिवसात साक्षीला समजले की राजच्या बायकोने घटस्फोटासाठी कोर्टात केस केली आहे. राजच्या बायकोला दुर्देवी म्हणाव की मुर्ख हेच तिला समजेना. राजसारखा नवरा दुस-या कोणाला शोधुन सापडणार नाही तिथे राजची बायको त्याच्याकडे घटस्फोट कसा काय मागु शकते...? पुढील काळात कामाच्या निमित्ताने साक्षी आणि राजची मैत्री वाढु लागली तेव्हा तिने त्याला यासंदर्भात विचारले. त्यावेळी आपल्या पत्नीला अजिबात दोष न देता घटस्फोटासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार असल्याचे राजने नम्रपणे कबुल केले. घटस्फोटानंतरही आपल्या बायकोचे गोडवे गाणा-या राजचा साक्षीला हेवा वाटु लागला.राजविषयी तिच्या मनात असलेला आदर द्विगुणीत झाला. या सर्व प्रक्रियेत ती राजकडे आकर्षिली जात होती. तिला राजचा सहवास हवाहवासा वाटु लागला होता. राजच दिग्दर्शनातील अदभुत कौशल्य या आकर्षणात आणखीनच भर टाकायच. शुटिँग संपल्यानंतरही तासनतास त्या दोघांच्या गप्पा रंगु लागल्या. राधिकाच्या जाण्यानंतर राजच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी साक्षीच्या येण्याने भरुन येऊ लागली. एव्हाना राजला साक्षी आवडु लागली होती पण तो स्वतःशीच भांडत होता. मन आणि बुद्धीमधील वाद त्याला भंडावुन सोडु लागला. साक्षीशी प्रेम केल तर आपण राधिकेशी केलेल्या प्रेमाशी बेईमानी करत आहोत अस राजच मन त्याला सांगत होत. तर दुसरीकडे जी राधिका आता आयुष्यातच नाही तिच्यासाठी थांबुन काय उपयोग असा इशारा बुद्धी देत होती. राजला आपले वय चाळीशीच्या घरात पोहोचल्याचे ठाऊक असल्याने 21 वर्षाच्या साक्षीला प्रपोज तरी कसे करावे, हे उमजत नव्हते. राजच्या नजरेत साक्षीलाही आपल्याप्रती असणा-या प्रेमाच्या भावना दिसत होत्या पण राजसारखा तत्वांशी बांधला गेलेला माणुस ते व्यक्त करु शकणार नाही याची जाणीव तिला झाली. शेवटी साक्षीने स्वतःच राजला प्रपोज करायच नक्की केल.एकदा असेच शुटिँग संपवुन राज आणि साक्षी रोजच्या प्रमाणे आँफिसमध्ये रात्री गप्पा मारत बसलेले असताना अचानक आभाळात ढग दाटुन आले आणि अनागोँदीचा पाऊस पडु लागला. रस्ते पाण्याने तुडुंब भरुन गेल्याने वाहतुक ठप्प झाली. आता आँफिसमध्ये रात्र काढण्यावाचुन दोघांसमोर पर्याय नव्हता. काही वेळानेच वीजांचा कडकडाट झाला आणि त्याच क्षणी आँफिसमधील लाईट गडब झाली. अंधाराला घाबरुन साक्षी राजच्या जवळ जाऊन बसली. काही वेळाने साक्षीने राजचा हात हातात घेतला आणि आपल्या प्रेमाची कबुली देताना म्हटले, "तुझ्यावर गेले कित्येक दिवस मी प्रेम करतेय पण आजवर तुला कधी सांगायची संधी नाही भेटली. तुझ्यासारख्या तत्वांशी प्रामाणिक राहणा-याची सहचारिणी बनुन राहण मला नक्कीच आवडेल." एवढ सांगुन साक्षीने लगेच राजला कडकडुन मिठी मारली. आजपर्यँत आपली पत्नी राधिका सोडुन कोणाही परस्त्रीला राजने कधी साधा स्पर्श देखील केला नव्हता. त्यामुळे साक्षीच्या त्या अनपेक्षित मिठीनंतर कसे रिअँक्ट व्हावे हेच त्याला कळत नव्हते.इतकी सुंदर मुलगी एका काळोख्या रात्रीत मिठीत असताना भावनांवर कंट्रोल करायला राज कोणी साधु संत नक्कीच नव्हता. शिवाय राज आता साक्षीवर प्रेमदेखील करु लागला होता. साक्षीने तर स्वतःला केव्हाच राजच्या अधीन केले होते. आता फक्त डोळे मिटुन राजचे ओठ ओठांना केव्हा स्पर्श करतात त्या रोमांचित क्षणाची ती वाट पाहत होती. तो नाजुक क्षण हाताळताना इकडे राजच्या मनात विचारांनी धुडगुस घातला होता. एका अनाहुत क्षणी पाय घसरायला साक्षी वयाने लहान होती पण राजचे तसे नव्हते. साक्षीच्या कोवळ्या वयात पुरुषांच्या शरीराविषयी आकर्षणाचा गैरफायदा घेऊन राजने त्या रात्री साक्षीशी शरीरसंबंध ठेवले असते तर ती फसवणुकच ठरली असती. कोणाचीही फसवणुक करणे राजसारख्या तत्ववादी पुरुषाला शोभणारे नव्हते. एका तरुण मुलीच्या आयुष्याशी खेळायचा आपल्याला मुळीच अधिकार नाही असे स्वतःला ठामपणे बजावत राज साक्षीपासुन अलग झाला.राजच्या स्पर्शासाठी, पहिल्या चुंबनासाठी आसुसलेली साक्षी हिरमुसल्या तोँडाने राजकडे पाहु लागली. साक्षीच्या प्रेमाने भारावुन जात गहिवरलेला राज डोळ्यात अश्रु आणुन साक्षीला म्हणाला की, "तु माझ्यावर प्रेम करतेस हे माझ सौभाग्य आहे पण आपल्या वयातील अंतर खुप असल्याने लग्न करण चुकीच ठरेल. माझ्याविषयी आकर्षण किँवा पहिल प्रेम असल्यामुळे तुझा जीव गुंतत गेला असेल परंतु तुझ्या भविष्यासाठी ते योग्य नाही. या वयात फारशी समज नसल्याने तुझा तोल ढासळतोय. स्वतःला लवकर सावर आणि तुला साजेसा ठरेल अशा तुझ्या वयाच्या तरुणाशी लग्न करा. तुझ्यासारख्या सुंदर मुलीशी लग्न करायला कितीतरी मुले एका पायावर तयार होतील."राजच्या या नकारार्थी उत्तरानंतर साक्षी ढसाढसा रडु लागली. "प्रेम करण्यासाठी वयाच बंधन आवश्यकच आहे का...? तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्यापेक्षा रुपाने सुंदर असणारे कितीतरी तरुण माझ्याशी लग्न करायला तयार होतीलही पण त्यातील किती जण तुझ्याएवढे मनाने स्वच्छ असतील...?? कितीजण काळोख्या रात्री आपल्या मिठीत आलेल्या सुंदर मुलीला तिच्या भविष्याखातर संभोगाशिवाय दुर जाऊ देतील...??? राज, तुझ वय काय किँवा तु दिसतोस कसा यापेक्षा तुझ्या नजरेत जो प्रामाणिकपणा आहे त्यावरच मी माझा जीव ओवाळुन टाकलाय. जर खरच तुझ माझ्यावर प्रेम नसेल तर ती नजर फक्त एकदा माझ्या नजरेला मिळवुन त्याची कबुली दे."राज साक्षीला जवळ घेऊन म्हणाला, "हे बघ साक्षी, मी एक घटस्फोटित तरुण आहे. तुझ्यासारख्या सुंदर मुलीने माझ्याशी लग्न केले तर समाज काय म्हणेल...?"

यावर उत्तर देताना साक्षी बोलली की, "समाज काय म्हणतो यापेक्षा मला स्वतःला काय वाटते ते महत्वाचे आहे. आजवर असे कित्येक तरुण मी पाहिलेय की ज्यांना एकाच वेळी अनेक महिलांशी संबंध ठेवताना पराकोटीचा आनंद होतो. असे लोक बायकोशी कितीही वेळा शरीरसंबंध ठेवला तरी कधीच तिचे होऊ शकत नाहीत आणि त्यांच्याशी लग्न करुन आपला पती फक्त आपलाच आहे या भ्रमात आयुष्यभर वावरण्यापेक्षा मी तुझ्याशी लग्न करेन. तुझ्या पुर्वीच्या बायकोशी तुझे नक्कीच शरीरसंबंध आले असतील पण जेव्हा आपण दोघे एकमेकांच्या मिठीत असु तेव्हा तु फक्त माझाच असशील याची मला खात्री आहे. तुझ्या होकाराची वाट बघत आयुष्यभर अविवाहित राहायला मी तयार आहे."साक्षीच्या या उत्तरावर राज निरुत्तर झाला. त्याला तिच्या बोलण्यातुन तिचे त्याच्याप्रती असणारे प्रेम जाणवले, तळमळ जाणवली. अशा परिस्थितीत शब्द सुचतच नसतात. त्याने तिला जोरात मिठी मारली. एकमेकांच्या मिठीत रडुन झाल्यानंतर दोघांनीही ओठांवर ओठ ठेवुन चुंबन घेतले, प्रेमाचा स्वीकार केला. आता चित्रपटाचे थोडेच काम बाकी राहिले होते आणि ते आटपुन लग्न करायचा निर्णय त्यांनी घेतला. कितीही झाल तरी साक्षी आजच्या जमान्यात वावरणारी मुलगी होती. चित्रपटातील पुरुष सहकलाकरांना मैत्रीत्वाच्या नात्याने मिठी मारणे, गळ्यात गळे घालुन फिरणे तिच्यासाठी नाँर्मल होते. शुटिँगच्या सुरुवातीलाही तिचा स्वभाव असाच मनमिळावु होता पण त्यावेळी ती प्रेयसी नसुन फक्त मैत्रीण असल्याने राजला ते फारसे खटकत नव्हते. आता आपल्या प्रेयसीला मित्रांसोबत या अवस्थेत पाहुन राजमधील तत्ववादी जागा झाला. त्याला जेव्हा साक्षीचे वागणे सहन होईना झाले तेव्हा त्याने तिला जवळ घेतले आणि म्हणाला-"माझी वागणे योग्य की अयोग्य हे मला माहित नाही पण माझ्या प्रेयसीला किँवा बायकोला परपुरुषाने स्पर्श केला की माझी तळपायाची आग मस्तकात जाते. माझी पहिली बायको तुझ्यासारखीच अभिनेत्री होती आणि प्रणयद्रुश्य समाविष्ट असलेले चित्रपट तिने नाकारावे एवढी एकच मागणी मी तिच्याकडे केली. या तात्विक हट्टापायीच आमच्यात कितीही प्रेम असले तरी आम्ही घटस्फोटापर्यँत येऊन पोहोचलो. योगायोगाने तुला देखील भविष्यात चांगली अभिनेत्री बनायच आहे आणि माझ्याशी लग्न केलस तर विनाकारण तुला तुझ्या स्वप्नावर पाणी सोडावे लागेल. पुढे जाऊन क्लेष करुन घटस्फोट घेत लग्न मोडण्यापेक्षा आपण अगोदरच लग्न केले नाही तर चांगले होईल. तुझ्यावर कितीही प्रेम असल तरी त्यासाठी माझ्या तत्वांशी मी नाही तडजोड करु शकत."त्यावर साक्षी राजला म्हणाली, "प्रेमात कोणा एकाला कुर्बानी द्यावीच लागते. माझ्यासाठी तुला तत्वांशी तडजोड करायची अजिबात गरज नाही. त्यापेक्षा आपल्या प्रेमाखातर मी माझ अभिनेत्री होण्याच स्वप्न सोडुन द्यायला तयार आहे. तुझ्याशिवाय आयुष्याचा विचार देखील मी करु शकत नाही. तु दिग्दर्शित केलेला माझा पहिला आणि शेवटचा चित्रपट असेल."

साक्षीचा त्याग पाहुन राजला स्वतःचीच लाज वाटली आणि रागपण आला. त्यानंतर काहीच दिवसात तो चित्रपट प्रदर्शित झाला. लोकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. राज आणि साक्षीवर पुरस्कारांची खैरात होऊ लागली. खर तर राजची पहिली बायको राधिकाने निर्मात्याला गळ घातल्याने राजला हा चित्रपट मिळाला होता. एका पुरस्कार सोहळ्याला राजचे कोडकौतुक करण्यासाठी राधिका आवर्जुन उपस्थित राहिली.त्याच पुरस्कार सोहळ्यात साक्षीला सर्वोत्तम अभिनेत्रीचे बक्षीस देताना अँकरने पहिल्याच चित्रपटात एवढे अभुतपुर्व यश मिळाल्यानंतर तिचा पुढचा चित्रपट कोणता असेल असा प्रश्न विचारला. त्यावर सर्वाँसमक्ष उत्तर देताना साक्षी म्हणाली, "मी राजवर मनापासुन प्रेम केलय. आम्ही दोघे लवकरच लग्न करतोय. लग्नानंतर मी चित्रपटात काम करु नये अशी राजची इच्छा आहे आणि त्याच इच्छेचा मान राखत मी यापुढे कोणताच चित्रपट करणार नाही. त्यांच्या प्रेमापुढे मला कोणतीच संपत्ती किँवा प्रसिद्धी कवडीमोल आहे."

साक्षीचे उत्तर ऐकुन प्रसिद्धिच्या मागे लागत, राजसारख्या नव-याला गमावुन आपण फार मोठी चुक केली याचा साक्षात्कार राधिकाला झाला. पुढील काळात तिने पैसा, मानमरातब सगळ काही मिळवल पण राजच्या प्रेमाला ती कायमची मुकली होती आणि त्यामुळेच इतक सार कमावुन आपण आपल सुखच गमावुन बसलो याचा पश्चाताप तिला आयुष्यभर सहन करावा लागला. साक्षीसारखा समजुतदारपणा दाखवत जर राजच्या आग्रहाखातर आपण चित्रपटांना रामराम केला असता तर आज राजच्या प्रेमावर आपला अधिकार असता, या भावनेने टचकन तिच्या डोळ्यात पाणी आले.नंतर मानाचा सर्वोत्क्रुष्ट दिग्दर्शक पुरस्कार राजला मिळाला त्यावेळी त्याने केलेल्या भाषणात म्हटले की, "लग्नानंतरही साक्षी चित्रपटात काम करतच राहणार. आजपर्यँत तत्व जपायच्या अट्टाहासात आपण ज्यांच्यावर मनापासुन प्रेम करतो त्यांच्याकरिता काही वेळा तत्वांमध्ये तडजोड करावीच लागते हे मी विसरुनच गेलो होतो. आज साक्षीने मला ख-या प्रेमाची आणि ते टिकवण्यासाठी कराव्या लागणा-या तडजोडीची जाणीव करुन दिली. याच तात्विक मतभेदांमुळे मी माझ पहिल प्रेम कायमस्वरुपी गमावल आहे पण देवाच्या क्रुपेने दुस-यांदा मिळालेल प्रेम गमावु इच्छित नाही. आज माझ्या पहिल्या पत्नीला या तत्वांमुळे जो मनःस्ताप सहन करावा लागला त्याबद्दल तिची सर्वाँसमक्ष माफी मागतो."

पुरस्कार सोहळ्यानंतर राधिकाने खास राज आणि साक्षीची भेट घेऊन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि डोळ्यात तरळत असलेले पाणी पदराने पुसत कधीकाळी जीवापाड प्रेम केलेल्या राजचा कायमस्वरुपी निरोप घेतला.

खुज्या लोकांच्या, लांबलेल्या सावल्या...

5 डिसेँबर ,2011...! याच दिवशी वेँगुर्ल्यात लोकशाहीच्या अधःपतनाची सुरुवात झाली. वेँगुर्ला नगरपालिका निवडणुकीत राजकीय वैमनस्यातुन झालेल्या राड्याने इतके दिवस राजकीय दहशतवादाविरोधात लोकांच्या मनात धुमसत असणा-या ज्वालामुखीचा विस्फोट झाला. निवडुन आलेले उमेदवार फार मोठे कर्तुत्ववान नसले तरी ते फक्त दहशतवादाविरोधात उभे आहेत आणि त्यांना निवडुन दिलेच पाहिजे,या भावनेने लोकांनी मतदान केले. पुढील काळात सिँधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा सांगली आणि पुणे जिल्ह्यात दहशतवाद कसा जास्त आहे, हे पटवुन देण्याचे आटोकाट प्रयत्न नेतेमंडळीँनी केले पण दुस-यावर चिखलफेक करुन आपणाला स्वच्छ होता येत नाही, ही मुलभुत गोष्ट ते विसरले. सिँधुदुर्ग जिल्हा सुरुवातीपासुनच सभ्य, सुसंस्क्रुत लोकांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे चोरी, दरोडे, बलात्कार यांचे प्रमाण इकडे मुळातच कमी आहे आणि म्हणुनच सांगली किँवा पुण्याशी तुलना करुन सिँधुदुर्गात दहशवाद नाही म्हणणे चुकीचे ठरेल. तुलना दोन समांतर गोष्टीँची होऊ शकते आणि इकडे विषय दहशतवादाचा नाही तर 'राजकीय दहशतवादा'चा आहे. राजकीय नेतेमंडळी आणि त्यांच्या समर्थकांच्या क्रुपाशीर्वादाने जो दहशतवाद चालतो त्याला 'राजकीय दहशतवाद' म्हणतात आणि तुलना करायचीच असेल तर मधु दंडवते, नाथ पै यांच्या काळात सिँधुदुर्गात किती राडे किँवा राजकीय हत्या झाल्या आणि आताच्या काळात किती झाल्या, याची करा. तुम्हाला आपोआप उत्तर मिळेल.
असो, तर वेँगुर्ला नगरपालिकेत लोकांनी धुडकारलेल्या पक्षाने, निवडुन आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांपैकी, काहीँना हाताशी धरत राष्ट्रवादी काँग्रेसचाच आपल्या मर्जीतील नगराध्यक्ष बसवला. त्यानंतर त्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाची शहरात काढलेली मिरवणुक दहशतवादविरोधी मतदान केलेल्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होते. जनतेने दिलेल्या जनादेशाची, त्यांच्या विरोधी मताची, आम्हाला काडीचीही किँमत नाही आणि आमच्या विरुद्ध निवडुन आलेल्या विरोधी उमेदवारांशीही पुढे जाऊन समझौता करत आम्हाला हव्या असलेल्या सत्तेच्या चाव्या आम्ही मिळवु शकतो, हाच संदेश वेँगुर्ल्यातील जनतेला नगराध्यक्षपदाच्या निमित्ताने मिळाला होता. लोकशाहीतील हा किळसवाणा प्रकार लोकशाहीवर मनापासुन श्रद्धा असणा-या बाबु इनामदारांच्या जिव्हारी लागला आणि भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत इनामदारांनी आपल्या भावना तरुण भारत वर्तमानपत्रात शब्दाद्वारे व्यक्त केल्या. सिँधुदुर्गात लोकशाहीची कत्तलच करु पाहणा-याना सामान्यातील सामान्य माणसाने उघडपणे बोलणे कदापि मान्य नव्हते. मग काय खड्ड्यात गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ते नागरिकांना बहाल करणारे डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान...!
दोनच महिन्यांपुर्वी डाँ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद अम्रुतमहोत्सवानिमित्त आंबेडकरी विचारांचा गाढा अभ्यास करणा-यांनी कणकवलीत वक्तव्य केले होते की- "रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांनी राजकरणात घातलेले धुमशान पाहुन बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा तडफडत असेल." जर डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्याच तत्वांचा विचार करायचे म्हटले तर मग संविधानाची पायमल्ली करत एका सामान्य नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी धिँड पाहुन बाबासाहेब आंबेडकर तडफडले नसतील का...? बाबासाहेब आंबेडकर खुप दुर राहिले पण सिँधुदुर्गची ओळख संपुर्ण देशात बँ.नाथ पै, मधु दंडवते यांसारख्या तत्वांचे पुजारी असलेल्या विद्वान नेत्यांचा मतदारसंघ अशी व्हायची. आज त्याच नाथ पै, दंडवतेँच्याच जिल्ह्यात एका व्रुद्धाची काढलेली धिँड पाहुन त्या दोन महान आत्म्यांचा 'आत्मा' लाखो वेळा मरण पावला असेल.
व्रुद्धांचा चरणस्पर्श करुन उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेणारी सिँधुदुर्गची संस्क्रुती, एका व्यथित व्रुद्धाला धिँड काढण्याइतपत कलुषित होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते पण आज या समाजकंटकांनी 'त्या' संस्क्रुतीचेच धिँडवडे उडवले आहेत. धिँड कोण काढतात आणि कशापायी काढतात याची तरी त्यांना जाणीव असायला हवी होती. आपल्या दिवाळखोर वागणुकीमुळे जे स्वतःच समाजासमोर नागवे झाले आहेत, ते दुस-या कोणाची धिँड काढुन त्याला काय नागव करणार...? एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा राजकीय आकसापोटी केलेला खुन परवडला कारण समोरची व्यक्ती त्याच क्षणी मरते, निदान पुढील परिणाम भोगण्यासाठी ती जिवंत तरी नसते पण आयुष्यभर आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहिलेल्या निरपराध व्यक्तीची जेव्हा व्रुद्धापकाळात तुम्ही विनाकारण धिँड काढता, तेव्हा त्या धिँडीतुन होणारी बदनामी त्यापेक्षाही भयानक असते. ते एक प्रकारचे मानसिक मरणच असते. त्या व्यक्तीचेच नव्हे तर त्याच्या परिवाराचेही तुम्ही मानसिक खच्चीकरण करता.
धिँडीच्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सुसंस्क्रुत समजल्या जाणा-या सिँधुदुर्गात झुंडशाही बाळसे धरु लागली आहे आणि 'समजुतदारपणा' हा शब्दच कित्येकांच्या डिक्शनरीतुन लोप पावताना दिसतोय. दमबाजीने प्रश्न कधी सुटत नसतात, उलट ते वाढतात. समजुतदारपणा दाखवल्यानेच प्रश्न सुटु शकतात आणि हा समजुतदारपणा ज्याच्या अंगी आहे, तो जनावरांपेक्षा वेगळा आहे, म्हणुनच त्याला 'माणुस' म्हणतात, या माणुसकीच्या व्याख्येची माणसांमध्ये वावरणा-या जनावरांना जाणीव करुन देणे निकडीचे बनले आहे. तथाकथित विद्वांनांनी आपली लेखणी केव्हाचीच गहाण ठेवली आहे.सामान्य लोकही या समाजकंटकांना ही जाणीव करुन देण्यास धजावत नाहीत. अशा परिस्थितीत आपण माणसांच्या वस्तीत राहतो का जिवंत मढ्यांमध्ये वावरतो, हा प्रश्न मला नेहमीच पडतो. एका व्रुद्धावर होत असलेला अन्याय पाहुन जर आज आपण पुढाकार घेत त्याच्या बाजुने ठामपणे उभे राहणार नसु तर एक समाज म्हणुन आपण किती प्रगल्भ झालो आहोत, याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा. संवेदनशीलता हरवत चाललेला समाज जिवंत लोकशाहीचे नक्कीच लक्षण नाही. जीवाच्या भीतीने अन्यायाविरुद्ध असेच गप्प राहिलात तर ही जीवघेणी शांतताच उद्या तुमचा कर्दनकाळ बनेल, यात वाद नाही. आज बाबु इनामदारांची धिँड काढली, उद्या त्यांच्या जागी तुमच्या-आमच्यापैकीच कोणीतरी असु शकतो, हे नेहमीच ध्यानात ठेवा. जिवंतपणेच मेलेली ही मढी विधानसभा-लोकसभा निवडणुकीपुरती तरी 'माणुस' बनुन माणुसकीच्या शत्रुविरुद्ध मतदान करतील आणि अमानवीपणे एका गरीब व्रुद्धाची विनाकारण धिँड काढुन सिँधुदुर्गात लोकशाहीचा खुन करु पाहणा-यांना त्यांची योग्य ती जागा दाखवतील, अशी अपेक्षा करतो. बाबु इनामदारांवरील पाशवी धिँडीची साक्ष म्हणुन 19 जुलै,2013 हा दिवस सिँधुदुर्गच्या इतिहासात नेहमीच 'काळा दिवस' म्हणुन गणला जाईल.
लेखाच्या शेवटी महान तत्ववेत्ता कार्लाइलच्या त्या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण करुन देत थांबतो-
"खुज्या लोकांच्या सावल्या जेव्हा मोठ्या व्हायला लागतात, तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आली असे समजावे."
मित्रहो, सिँधुदुर्गात खुज्या लोकांच्या सावल्या अगोदरच इतक्या वाढल्या आहेत की आता आपण अस्ताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो आहोत मात्र 'सिँधुदुर्गास्त' होऊ देणे आपल्यापैकी कोणालाच परवडणार नाही.

म्रुगजळ रोजगाराचे...

अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गरजांच्या पुर्ततेसाठी माणसाला रोजगाराची 'गरज' भासते आणि या रोजगारापायीच कोणत्याही थराला जायची त्याची तयारी असते. मात्र कधीतरी हा बुमरँग आपल्यावरच उलटु शकतो या शक्यतेपासुन तो नेहमीच अनभिज्ञ असतो.
हल्लीच कुडाळात नोकरीचे आमिष दाखवुन सहा तरुणांकडुन प्रत्येकी अडीच लाख रुपये लंपास करण्यात आले. नोकरी मिळवण्याचा शाँर्टकट किती घातक ठरु शकतो याची प्रच......ीती लोकांना आली. आता या प्रकरणात दोष तरी नक्की कोणाला द्यावा...?
नोकरीपायी तरुणांकडुन पैसे उकळुन ते लंपास करणा-या भामट्याला...?
की पैसे देत कोणाच्या तरी शिफारशीने प्रामाणिक उमेदवाराच्या नाकावर धोँडा घालुन नोकरी बळकावु पाहणा-या ऐतखाऊ तरुणांना...??
की या तरुणांना नोकरीपासुन वंचित ठेवत त्यांच्यावर अनैतिक मार्गाने नोकरी मिळवण्याची वेळ आणणा-या सिँधुदुर्गातील राजकीय नेतेमंडळीँना...???
'प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे' ही शिकवण काळाप्रमाणे आऊटडेटेड ठरु लागली आहे. प्रयत्नांना आँप्शनल ठेवुन यशाचे शिखर गाठण्याचे स्वप्न तरुणाई बाळगु लागली आहे आणि त्यांच्या या असुरी महत्वाकांक्षेला खतपाणी घालण्याचे काम आधुनिक राजकरणातील तथाकथित 'रोजगारमहर्षी'नी केले आहे. गल्लीबोळातल्या नेत्याशी ओळख असली की त्याच्या शिफारशीने आपल्याला लगेच नोकरी मिळुन जाईल, या भाबड्या आशेवर त्याच्या आसपास घुटमळणा-या मिँध्या युवकांची फौज वाढु लागली आहे. एखाद्या नोकरीसाठी दिवसरात्र एक करुन मेहनतीने आपल्याला त्या योग्यतेचे बनवण्यापेक्षा लाचार बनुन एखाद्या बड्या नेत्याची पायचाटेगिरी करण्यात युवा पिढी धन्यता मानु लागली आहे.

प्रा.मधु दंडवतेँचा काळ सिँधुदुर्गच्या राजकरणातील सुवर्णकाळ म्हणुन ओळखला जातो. तत्वांच्या या पुजा-याने कधी आपल्या कार्यकर्त्याँसाठी शिफारशी केल्या नाही. परिणामी कार्यकर्त्यांची नाराजी ओढवुन घेत दंडवतेँसारख्या आदर्श नेत्याला एकदा नव्हे तर दोनदा पराभव स्वीकारावा लागला पण दंडवतेँनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. माझ्या शिफारशीमुळे माझ्या कार्यकर्त्याचे काम होत असेल पण त्याच वेळी त्या जागेसाठी योग्य असलेल्या प्रामाणिक माणसाचे काम रखडत असेल, तर त्या प्रामाणिक माणसावर एका नेत्याने आपल्या पदाचा वापर करुन केलेला अन्याय योग्यच नव्हे तर अक्षम्य आहे. आजकाल योग्यता असलेल्या उमेदवाराला नोकरी मिळाली नाही तरी चालेल पण कोण्या बड्या धेडाच्या शिफारशीने किँवा त्याला पैसे चारुन आपली योग्यता नसतानाही ती नोकरी आपल्यालाच मिळाली पाहिजे, ही व्रुत्ती बळावत चालली आहे.त्यामुळेच पैसे घेऊन नोकरी मिळवुन देणा-या भंपक एजंटचा सुळसुळाट झाला आहे. असे एजंट लोक नोकरी देण्याचे आमिष दाखवुन लाखो-करोडो रुपये उकळतात आणि कालांतराने फरार देखील होतात. शहरांमध्ये तर नोकरी मिळेल की नाही हे सांगण्यासाठी पावलापावलावर ज्योतिषी बसलेले आढळतात. एकविसाव्या शतकात वावरणारे तरुण जेव्हा तळहातावरच्या रेषा तपासुन नोकरीची अपेक्षा करतात तेव्हा खरच त्यांची किव येते. तळहातावरच्या रेषांपेक्षा मनगटाच्या ताकदीवर विश्वास ठेवणे केव्हाही योग्य हे या पामरांना कोण समजावेल...? सिँधुदुर्गसारख्या सुसंस्क्रुत जिल्ह्यात पैसे देऊन तरुणांनी नोकरीची अपेक्षा करावी यापेक्षा वेगळे दुर्देव ते कोणते...? सिँधुदुर्गच्या विकासाच्या बाता मारणारी 'दादा'मंडळी तरुणांना रोजगार मिळवुन देण्यात सपशेल अपयशी ठरली याचा हा ठसठशीत पुरावा आहे. सिँधुदुर्गाचे दरडोई उत्पन्न वाढल्याच्या बढाया मारताना जिल्ह्यातील युवापिढी शिक्षण, रोजगार मिळवण्यासाठी मुंबई, पुण्यासारख्या बड्या शहरात स्थलांतरीत होत आहे, हे वास्तव जनतेपासुन का लपवण्यात येतेय...? लोकसंख्या स्थलांतरित झाली की दरडोई उत्पन वाढणारच हे साधे गणित आहे.स्पर्धात्मक युगात टिकुन राहायचे असेल तर पदव्युत्तर शिक्षण घेणे अपरिहार्य बनले आहे परंतु अद्यापहि सिँधुदुर्गात MBA, MCA, M.Sc, M.Com असे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालये नाहीत. सिँधुदुर्गचे दरडोई उत्पन्न वाढवुन दाखवण्यासाठीच जिल्ह्यातील विद्यार्थ्याँना पदव्युत्तर शिक्षणापासुन वंचित ठेवण्याची ही राजकीय कारस्थाने तर नाहीत ना...? चार वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये दिलेली सिँधुदुर्गातील आय.टी. पार्कची आश्वासने हवेतच विरली का...? अजुन पुढच्या किती निवडणुका सिँधुदुर्गातील लोकांना रोजगाराचे गाजर दाखवुन तुम्ही लढवणार आहात...??शहरांच्या धर्तीवर MPSC, UPSC, बँक भरती अशा स्पर्धात्मक परीक्षांचे योग्य प्रशिक्षण देणारी संस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे. जेणेकरुन जिल्ह्यात राहुनच तज्ञ मार्गदर्शक, संदर्भ ग्रंथ विद्यार्थ्याँना मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील. एकंदरीतच जिल्ह्याचे राजकीय नेत्रुत्व शैक्षणिक विकास करण्याच्या द्रुष्टीने उदासीनता दाखवत असताना सिँधुदुर्गातील महाविद्यालयांनी शहरांच्या धर्तीवर रविवारी किँवा सुट्टीच्या दिवशी स्पर्धापरीक्षांसाठी जादा अभ्यासवर्ग घेतले पाहिजेत. अभिनव फाऊंडेशन किँवा स्मार्ट अँकँडमी अशा सेवाभावी संस्था माफक दरात विद्यार्थ्याँना स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन मिळवुन देण्याचा स्तुत्य उपक्रम करत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्याँनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संस्थाचालकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नेतेमंडळी स्वतः शैक्षणिक विकासास हातभार लावु शकत नसतील तर निदान त्यांनी जे बदल घडवु पाहतायेत त्यांना आर्थिक पाठबळ देऊन सहकार्य करावे. 'आयत्या बिळात नागोबा' ही व्रुत्ती बाळगुन एका भामट्याच्या हातात अडीच लाख रुपये देत नोकरीची अपेक्षा बाळगण्यापेक्षा माफक दरात अशा स्पर्धात्मक प्रशिक्षण केँद्रात प्रवेश मिळवुन प्रयन्तांची पराकाष्ठा करत परीक्षेत घवघवीत यश मिळवण्यास प्रयत्नशील राहावे. घाम गाळुन, कष्ट करुन मिळवलेल्या यशाचे फळ कोणाच्या तरी शिफारशीने मिळवलेल्या नोकरीपेक्षा नक्कीच गोड असते. ज्याच्या यशाचा पाया सत्यावर आधारलेला असतो, त्याचे भविष्य नेहमीच मजबुत असते. बाकी हपापाचा माल गपापा होतो हे मी वेगळ सांगायला नको. समर्थ रामदासांच्या सुप्रसिद्ध वाक्यात थोडा बदल करुन लेखाचा शेवट करतो-

"सामर्थ्य आहे नोकरीचे। जो जे करील तयाचे॥"

व्यक्तीला माराल, विचारांच काय...?


विचारांना विचाराने मात देणे जेव्हा अशक्यप्राय होऊन बसते, तेव्हा त्या व्यक्तीलाच संपवुन विचार संपविण्याचा प्रयत्न माथेफिरु मंडळी करतात आणि आपण फार मोठी लढाई जिँकलो या अविर्भावात देखील वावरत असतात पण ज्याला ते विजय समजत आहेत तो विजय नसुन केवळ आभास आहे, हे त्यांना कोणी सांगावे...? गांधीजीँच्या निमित्ताने विचारांना गोळी घालुन संपवण्याचा प्रयत्न याअगोदर पुण्याच्या नथुराम गोडसेँनी केला आणि जगाच्या इतिहासतील ती भयावह राजकीय हत्या ठरली. योगायोगाने म्हणा किँवा दुर्देवाने, आज त्याच पुण्याच्या भुमीत समाजातील अंधश्रद्धांचे निर्मुलन व्हावे या एकाच विचाराने झपाटलेल्या नरेँद्र दाभोलकरांची दोन नराधमांनी गोळ्या घालुन निर्घुण हत्या केली. विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखली जाणारी पुण्याची भुमी दाभोळकरांच्या रक्ताने लाल झाली. जेव्हा दाभोळकरांसारखा समाजसुधारक अंधश्रद्धा निर्मुलनासारखा लढा एक व्रत म्हणुन जगतो तेव्हा त्यासाठी कोणतीही किँमत मोजायची त्यांच्या मनाची तयारी असते पण दाभोलकरांना आज आपले प्राण देऊन ती किँमत चुकवावी लागली.अंधश्रद्धा निर्मुलनासारख्या गंभीर विषयाला नरेँद्र दाभोलकरांनी हात घातला खरा पण जाती-धर्माची किड लागलेल्या या समाजात कट्टरवाद्यांना दाभोलकरांचा मुद्दा कितीही योग्य असला तरी कधीच पटला नाही. धर्माँध लोकांनी दाभोलकर फक्त हिँदु धर्मातील अंधश्रद्धांवर बोट ठेवतात असे बेछुट आरोप करुन त्यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न नेहमीच केला. धार्मिक रंग चढवुनही तत्वनिष्ठ दाभोलकरांना ध्येयापासुन विचलीत करणे कठीण आहे हे लक्षात आल्यावर वारकरी संप्रादायामध्ये दाभोळकरांच्या जादुटोणा विधेयकाबद्दल जाणीवपुर्वक गैरसमज पसरविण्यात आले. लोकशाहीत चर्चेने प्रश्न सुटतात यावर दाभोळकरांची श्रद्धा होती आणि त्यामुळेच वारकरी संप्रादयातील नेत्यांशी कितीही वेळा चर्चा करुन आपण आपले मुद्दे पटवुन देण्याची तयारी दाभोळकरांनी दाखवली होती. तर्काला अनुसुरुन ठामपणे मुद्दे मांडणा-या दाभोळकरांसमोर कट्टरवाद्यांचा कधीच निभाव लागला नाही कारण मुळातच दाभोलकरांच्या लढ्याचा पाया सत्यावर आधारलेला होता. धर्म किँवा श्रद्धा यांना त्यांनी कधीच विरोध केला नाही. दाभोलकरांचा विरोध होता धर्मातील अनिष्ट रुढीँना...!
आजही समाजातील फार मोठा वर्ग शिक्षणापासुन वंचित असल्याने मागासलेला आहे आणि त्यांच्या मागासलेपणाचा फायदा घेऊन जादुटोणा करणारे भोँदुबाबा गंडेदोरे देऊन त्यांना लुबाडतात. फक्त अशिक्षित लोकच नव्हे तर सुशिक्षित लोक देखील भोँदुबाबांच्या भुलथापांना बळी पडतात. ग्रामीण किँवा आदिवासी भागात नरबळीची प्रथा जोरात सुरु आहे. संतान नसलेल्या बायकांना जाळ्यात ओढुन त्यांच्याशी लैँगिग संबंध ठेवण्याचे प्रकार भोँदुबाबा करतायेत. अशा अनिष्ट प्रकारांना कुठेतरी कायद्याचा धाक दाखवुन कायमस्वरुपी बंदी घालता यावी यासाठीच 'जादुटोणा विरोधी विधेयक' सरकारने मंजुर करावे असा आग्रह दाभोलकरांनी धरला आणि त्यासाठीच लढा देखील दिला. समाजातील विषमता आणि वैर दुर करण्यासाठी दाभोलकरांनी सर्वस्व पणाला लावले, यात त्यांची नेमकी चुक कोणती...? अगदी कोणी कट्टरपंथी किँवा प्रतिगामी असला तरी धर्माचा बाजार मांडणा-या या प्रथांना कोणी कसे काय समर्थन देऊ शकतो...?? प्रतिगाम्यांच्या म्हणण्याप्रमाणे दाभोलकर चुकीचेच होते असे काही वेळासाठी मान्य करु. मग दाभोलकरांचे मुद्दे प्रतिगाम्यांना कधीच का खोडता आले नाहीत...???भारताच्या संविधानाने आणि लोकशाहीने बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करुन दाभोलकर अगदी नम्रपणे, शांत राहुन आपले मुद्दे मांडत होते. आपले तेच खरे म्हणण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. मग एखाद्याच्या अभिव्यक्तीचा खुन तुम्ही कसा काय करु शकता...? हा फक्त दाभोलकरांचा नव्हे तर महाराष्ट्रातील पुरोगामीत्वाचा खुन आहे...! भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणा-या लोकशाहीचा खुन आहे...!! संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राच्या संस्क्रुतीचा खुन आहे...!!! एवढेच नव्हे तर महाराष्ट्राला वारसा लाभलेल्या शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांचाही हा खुनच आहे...!!!! महाराष्ट्रात बघाव तिकडे महापुरुषांची नावे रस्त्यांना द्यावीत, त्यांचे पुतळे उभारावेत किँवा रेल्वेस्टेशनचे नामकरण करावे यासाठी आंदोलन करताना त्या त्या महापुरुषांचे तथाकथित समर्थक दिसतात मात्र दाभोलकरांवरील भ्याड यातील कोणीच आंदोलनासाठी पुढे का आले नाहीत...? भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक इंदुमिलसाठी आक्रमक होत असतील तर मग त्यांनी आंबेडकरांनी तयार केलेले संविधान पायदळी तुडवले जात असताना निषेध हा नोँदवलाच पाहिजे. दाभोलकरांचा गोळ्या घालुन खुन करणारे नक्कीच खलनायक आहेत पण दाभोलकरांचा खुन झाला म्हणुन जे लोक सकाळपासुन सोशल नेटवर्किँग साईट्सवर विक्रुत आनंदोत्सव साजरा करतायेत ते त्यापेक्षा विघातक आहेत. यापुढे ते दोघे हल्लेखोर पकडले जातील की नाही किँवा त्यांना कडक शिक्षा होणार का नाही या प्रश्नांपेक्षा अशा प्रव्रुत्तीँची विक्रुत माणसे पुरोगामी महाराष्ट्रात तयार होणार नाहीत याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय" असे ब्रिटीशांना ठणकावणारे लोकमान्य टिळकही आज स्वतःलाच विचारत असतील की, "माझ्या महाराष्ट्रातील लोकांचे डोके ठिकाणावर आहे का...?" एखाद्या व्यक्तीला शिक्षा होण्यापेक्षा त्यासारख्या प्रव्रुत्तीँना आळा घालणे केव्हाही चांगले...! अशाच अनिष्ट प्रव्रुत्तीँविरोधात समाजातील सज्जनांनी एकत्रित व्हावे यासाठी दाभोलकर शेवटच्या श्वासापर्यँत झटले अन् प्राणासही मुकले कारण सज्जन कधी एकवटलेच नाही उलटपक्षी देवाला न मानणा-या दाभोलकरांसारख्या सज्जन माणसाविरोधात दुर्जनांनी एकी दाखवली. दुर्जनांच्या हल्ल्यांपेक्षा सज्जनांची शांतताच या सामाजिक -हासास कारणीभुत ठरली आहे.अजुन किती दिवस आपण अशा तालिबानी क्रुत्यांचे नुसते निषेधच नोँदवत राहणार...? अशाने एक दिवस भारताचा पाकिस्तान होण्यास वेळ लागणार नाही. अशा प्रतिगामी विध्वंसक शक्तीँना वेळीच रोखले नाही तर देशात अराजक माजवुन , जातीधर्माच्या नावाखाली सामान्य लोकांचा जीव घेण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. आज प्रत्येकाने स्वतःला एक समाज म्हणुन आपण किती प्रगल्भ झालो आहोत हा प्रश्न विचारुन बघायलाच हवा. दाभोलकरांच्या म्रुत्युने मी व्यथित नक्कीच झालोय पण हताश कधीच होणार नाही. नरेँद्र दाभोलकर एकदा एका मुलाखतीत म्हणाले होते की, महाराष्ट्र किती पुरोगामी आहे यापेक्षा देशाची लोकशाही किती संवेदनशील राहिली आहे हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. दाभोलकरांनी एका वाक्यात त्यांच्या समाजाकडुन असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या.देशातील युवा पिढीला विचारवंत 'मेणबत्ती संप्रादाय' म्हणुन हिणवत असतील पण ती संवेदनशील आहे, असे मी तरी मानतो. आडात नाही तर पोह-यात कुठुन येणार अशी म्हण आहे. त्याच न्यायाने जर संवेदनाच नसतील मग मेणबत्या तरी कुठुन येणार...? आज गरज आहे ती रस्त्यावर निषेध नोँदवायला उतरणा-या युवा पिढीला योग्य दिशा दाखवण्याची...! त्यांच्या हातातील मेणबत्यांचे मशालीत कसे रुपांतर करता येईल याची खबरदारी घेण्याची...!! मला वाटत आज दाभोलकरांच्या शरीरातुन पडलेला रक्ताचा एक-एक थेँब तरुणांच्या मनात क्रांतीचे बीज रोवण्यासाठी उपयोगी येईल आणि त्यांनी समाजासाठी दिलेले हे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही. त्यांनी पेटवलेल्या क्रांतीच्या ज्योतीच्या पुढील काळात ज्वाला बनतील आणि त्यातुनच भावी सामाजिक नेते निर्माण होतील. जे जादुटोणा विरोधी बिल मंजुर करण्यासाठी दाभोलकरांनी आयुष्य झिजवले ते मंजुर करुन घेण्यासाठी आता मतभेद विसरुन सर्वाँनी एकत्रितपणे लढा दिला पाहिजे आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. देह हा कधी ना कधी त्यागावाच लागतो पण समाजात कायमस्वरुपी जीवंत राहतात ते तुमचे विचार...!आज दाभोलकर शरीराने आपल्यात नसले तरी ज्या क्षणी त्यांना गोळ्या घालण्यात आल्या त्याच क्षणी त्यांच्या विचारांचा विजय निश्चित झाला कारण ते विचार खोडुन काढण्याची ताकद प्रतिगाम्यांमध्ये कधीच नव्हती. भ्याड हल्ला करुन माणसातल्या जनावरांचे दर्शन घडवणा-या प्रतिगामी लोकांना बहिणाबाई चौधरीँच्या ओळीँची आठवण करुन देत मी लेखाचा शेवट करतो- "अरे माणसा माणसा कधी होशील रे माणुस...?"

गणेशोत्सवातील विक्रुती..

गणेशोत्सव आणि महाराष्ट्राचे नाते खुप जुने आहे. ब्रिटीशांच्या 'फोडा आणि राज्य करा' या नितीमुळे विखुरलेल्या भारतीय समाजाचे एकत्रीकरण व्हावे आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनाला पाठबळ मिळावे, या उदात्त हेतुने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली. सणाच्या निमित्ताने विविध जाती-धर्माचे लोक एकत्रित आल्याने भारतीयांच्या स्वभावात भिनलेला जातीभेद काही प्रमाणात दुर होण्यास मदत होईल, अशी टिळकांची अपेक्षा होती. पुढील काळात घराघरात गणपतीच्या मुर्तीची स्थापना होऊ लागल्याने नोकरीच्या निमित्ताने इतरत्र विखुरलेले घरातील लोक या कालावधीत एकत्रित येऊन गणेशोत्सव आनंदात साजरा करु लागले. अगदी आताच्या धावपळीच्या युगात देखील गणपती बाप्पा घराघरात विराजमान झालेले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सवाचे वेड अजुनही कमी झालेले नाही. फक्त काळाच्या ओघात सार्वजनिक गणेशोत्सावात अनेक प्रकारच्या विक्रुतीँनी जन्म घेतलाय. आता त्या विक्रुतीँची मुळे इतकी घट्ट रोवली गेली आहेत की गणेशोत्सवाचा मुळ उद्देशच भरकटु लागलाय.
चार वर्षापुर्वी गणेशोत्सवादरम्यान मिरजेत झालेली दंगल कोणी विसरु शकेल का...? निमित्त होते अफझलखान वधाच्या पोस्टरचे...! शिवरायांनी दुष्ट अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला, हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. शिवरायांची ही शौर्यकथा ऐकल्यानंतर धर्माने हिँदु किँवा मुस्लिम असलेल्या कोणाही मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगल्याशिवाय राहणार नाही. मात्र काही मुठभर समाजकंटक आणि त्यांना पोसणारे राजकीय नेते यांना हे हिँदु-मुस्लीम ऐक्य मानवत नाही. नव्हे, मतांच्या राजकरणात त्यांना ते परवडणारेही नाही. अशाच दुष्ट लोकांनी अफजलखान वधाच्या पोस्टरमुळे मुस्लीमांच्या भावना दुखावल्या गेल्या अशा बोँबा मारल्या. काही मुस्लिम समाजकंटकांना सांगुन गणपतीच्या समोर ताटात मोदकांऐवजी मटणाच्या तुकड्यांचा नैवेद्य ठेवला आणि दंगल पेटली. गणेशोत्सवाच्या पवित्र काळात तीर्थाच्या जागी सर्वत्र रक्ताचा अभिषेक झाला. कुठे सर्वधर्मीय लोकांचे एकत्रीकरण व्हावे म्हणुन सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करणारे लोकमान्य टिळक आणि कुठे त्याच गणेशोत्सवात जाणीवपुर्वक हिँदु-मुस्लीम दंगली पेटवणारे महाराष्ट्रातील नेतेमंडळी..!
टिळकांच्या महाराष्ट्रात असे तथाकथित 'अजाणते राजे' निर्माण व्हावेत, हे या मातीचच दुर्देव म्हणाव लागेल.
मुंबई, पुणे, कोल्हापुर यांसारख्या मोठ्या शहरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यासाठी गल्लीबोळात मंडळे स्थापन झाली आहेत. सण म्हटल्यावर स्पर्धेचा प्रश्न येतोच कुठे...? तुमचा देव तोच आमचा देव आणि अगदीच स्पर्धा करायचीच म्हटली तर ती निकोप असायला हवी. मात्र या मंडळामंडळांमधील वाद विकोपाला गेले आहेत की गणपतीच्या मुर्तीचा आकार, सजावट, गणेश विसर्जन मिरवणुकीतील मान-सन्मान अशा शुल्लक कारणांवरुन वाद निर्माण होताना दिसतात. पाच वर्षापुर्वी कोल्हापुरमध्ये गणपती विसर्जनाची मिरवणुक चालु असतानाच एका मंडळातील सदस्याने अन्य मंडळाच्या सदस्याचा सर्वाँसमक्ष चाकुने भोकसुन खुन पाडला.

आज गणेशोत्सवातील वादाच्या निमित्ताने एकमेकांचा खुन पाडण्याइतपत तुमची मजल पोहोचतेच कशी...? सार्वजनिक गणेशोत्सव काळात महाराष्ट्रातील लोकांचे हे खुनशी वर्तन पाहुन तो सुरु करणा-या लोकमान्य टिळकांचा आत्मा तिकडे स्वर्गात तडफडत असेल. टिळकांचा विचार सोडुनच द्या हो पण ज्या गणपतीची एवढ्या श्रद्धेने, आस्थेने तुम्ही पुजा करता त्या गणपतीला तरी तुमचे हे वर्तन आवडत असेल का...??

आता विषय वर्तनाचाच आहे मग गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीत डाँल्बीच्या तालावर बिभित्सतेचे जे किळसवाणे प्रदर्शन घडवले जाते ते विसरुन कसे चालेल...?
'गजानना श्री गणराया', 'गणनायकाय' अशी भक्तीमय गीते सणाच्या कालावधीत कुठे गडबच होतात आणि ऐन विसर्जनाच्या दिवशी 'मुन्नी बदनाम हुई', 'शीला की जवानी', 'हलकट जवानी' अशा एकापेक्षा एक कर्कश गाण्यांवर दारु पिऊन बेभान नाचणारे तरुण नजरेस पडतात. हीच का आपली भारतीय संस्क्रुती...? पुण्यासारख्या शहरात 24-24 तास विसर्जनाच्या मिरवणुका काढुन, वाहतुकीच्या समस्या निर्माण करुन, वेळेत कामावर जाणा-या लोकांना नाहक त्रास दिला जातो. एखाद्या जलाशयात गणपतीँच्या भव्य मुर्तीचे विसर्जन केले जाते. गणपती रंगवण्यासाठी वापरलेले रंग बहुधा क्रुत्रिम आणि विषारी असल्याने जलप्रदुषण होऊन पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. आपण ज्या जलाशयात गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन करत आहोत तेथील पाणी माणसे किँवा अन्य प्राणी आपली तहान भागवण्यासाठी करत असतील याचे भान असु द्यावे. निर्माल्य थेट तलावात न टाकता 'निर्माल्यकक्षात' टाकल्याने आपण पाण्याचे प्रदुषण टाळु शकतो.2
'इकोफ्रेँडली गणपती' मुर्त्या आता बाजारात उपलब्ध आहेत. पुढील काळात त्यांचा वापर केल्यास आपण ब-याच प्रमाणात पर्यावरणाची हानी टाळु शकतो. पण भव्यतेची आणि चकाचकपणाची सवय अंगवळणी पडलेले आपले मन आपल्याला इकोफ्रेँडली गणपती मुर्ती वापरण्यास मज्जाव करत राहिल.
गणपती हे हिँदुंचे आराध्य दैवत आहे आणि या लेखातुन कोणाच्या श्रद्धेला दुखावण्याचा अजिबात हेतु नाही. महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे. फक्त तो नीतीमत्ता वेशीवर टांगुन साजरा न करता, पारंपारिक पद्धतीने आणि भक्तिमय मार्गाने साजरा व्हावा एवढी एकच माफक अपेक्षा आहे. आपल्या श्रद्धेचा इतरांना त्रास होऊ नये याची आपल्याला जाणीव असावी. सगळेच नियम कायद्याच्या चौकडीत बसवुन चालत नाही. निसर्गाचेही काही अलिखित नियम असतात आणि त्यांचे पालन करणे हे माणुसकीला धरुन आहे. बुद्धीची देवता गणपती तुम्हा सगळ्यांना सुबुद्धी देवो अशीच प्रार्थना त्या गजाननाकडे करतो आणि इथेच थांबतो.

आठवणीतील बदल...!

बदल हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, हे कटु सत्य कोणालाही रुचत नसले तरी प्रत्येकाला ते पचवावेच लागते. आयुष्यात जेव्हा एकीकडुन दुसरीकडे स्थलांतरीत व्हायची वेळ येते तेव्हा त्या बदलाला सामोरे जायला आपले मन कधीच तयार होत नाही. आपल्या आसपास सावलीप्रमाणे वावरणारे जिवलग किँवा ज्या परिसरात इतकी वर्षे वास्तव्य केले तो परिसर, एकाएकी सोडुन जाणे मनाला जड होऊन जाते.लहान असताना शिकलो होतो की निर्जीव वस्तु असंवेदनशील आणि भावनाशुन्य असतात पण आज अनुभवाने समजते की जेव्हा त्या निर्जीव वस्तुंमध्ये आपल्या भावना गुंततात तेव्हा त्या निर्जीव वस्तुंचा कायमचा निरोप घेणे कठीण होऊन असते. एखाद्या घरात तुम्ही आयुष्याचा बराच काळ वास्तव्य केले असेल आणि काही कारणास्तव त्या घराला कायमचा निरोप देऊन दुसरीकडे स्थलांतर करणे तुमच्यासाठी अपरिहार्य असेल तेव्हा त्या राहत्या घरातील भिँती, दरवाजे, खिडक्या, एवढच नव्हे तर आसपासची झाडे देखील ती वास्तु कायमची सोडताना तुमच्याशी संवादच साधत आहेत, असे भास होऊ लागतात. इतक्या वर्षात त्या वास्तुमध्ये आणि आपल्यात जी नकळत भावनिक ओढ निर्माण झालेली असते तीच ओढ आपल्याला त्या वास्तुमध्येच खिळवुन ठेवण्यास कारणीभुत ठरते.निर्जीव वास्तुबाबत मनाची अशी अवघड अवस्था होत असेल तर सजीव गोष्टीँबाबत काय बोलायच...? इतक्या वर्षात अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही मित्र-मैत्रीणी एवढे जिवलग बनलेले असतात की त्यांचा कायमचा निरोप घेणे केवळ आणि केवळ अशक्यच असते पण त्याक्षणी त्याशिवाय दुसरा कोणता अन्य पर्यायही आपल्यासमोर नसतो. शेवटच्या दिवसाची मनःस्थितीच काही जगावेगळी असते. याअगोदर आपण आपल्या प्रिय व्यक्तीँना कितीही वेळा भेटत असलो तरी कायमचा निरोप देण्याअगोदरची 'ती' शेवटची भेट जीव व्याकुळ करुन टाकते. त्या भेटीवेळी मनात दाटलेल्या भावनांना अश्रुद्वारे वाट मोकळी करुन द्यावी की शेवटच का होईना, समोरच्या व्यक्तीला घट्ट मिठीत घेऊन तिचे आपल्या आयुष्यात काय स्थान आहे, याची तिला जाणीव करुन द्यावी, या द्विधा मनःस्थितीत मन सापडते. अंतिमतः यापुढे फोनवरुन तरी संपर्कात राहु अशी भाबडी आशा मनाला दाखवत, आपण मनाची समजुत घालतो खरी पण जसजसा काळ लोटतो, नव्या भागात नवे जीवलग बनतात, तसतशा या जुन्या नात्यांच्या आपल्या मनातील प्रतिमा हळुहळु धुसर होत जातात.कधीकाळी ज्यांच्याशिवाय एक क्षण घालवणे कठीण होऊन बसायचे, आता त्यांच्याशिवाय आयुष्याचा रहाटगाडा आपण नव्या मित्रांसह अगदी सहजरित्या रेटु लागतो. काळ हाच भावनिक गोष्टीँवर औषध बनुन आपल्या मदतीला धावुन येतो आणि आयुष्य आहे, ते चालतच राहणार, हा निसर्गनियम सगळ्यांनाच लागु पडतो. काळ कितीही पुढे सरकला, सहवासाची कोमल फुले कोमेजुन गेली, तरी मनाच्या कुठल्यातरी कोप-यात अजुनही शिल्लक असतात ते धुसर होत गेलेल्या हळव्या नात्याच्या आठवणीँचे काटे...! नंतर कधीतरी अचानक एकांतात जेव्हा आठवणीँच्या त्या कप्प्यावरील धुळ बाजुला होते, तेव्हा सोबत घालवलेले ते क्षण सूर्यप्रकाशाईतके स्वच्छ दिसु लागतात. त्यावेळी आपणच संभ्रमात पडतो की आठवणी आपल्यासाठी बनलेल्या असतात का आपणच आठवणीँसाठी बनलेले असतो...? काहीही म्हणा पण आयुष्याच्या दिर्घ प्रवासात आठवणीँची शिदोरीच उपयोगाला येते. जेव्हा मनात आठवणीँचा कल्लोळ साचतो तेव्हा एखाद्या चित्रपटातील फ्लँशबँकप्रमाणे एकत्रित व्यतित केलेले क्षण झपाझप नजरेसमोर पुन्हा जीवंत होऊन उभे राहतात. त्यातील काही क्षण चेह-यावर हास्याची कळी उमलवतात तर काही मात्र हसता हसता टचकन डोळ्यात अश्रु आणतात.त्याच क्षणी आपल्याला त्या खास व्यक्तीशी संवाद साधावासा वाटतो, अगदी लगेच फोनकडे हात देखील जातो पण त्याच वेळी लक्षात येते की अजुनही ती व्यक्ती आपल्या मनाच्या कितीही जवळ वाटत असली तरी मधल्या काळात दोन मनांमधील अंतरे खुप वाढलेली असतात. एकेकाळी वाटणारी ती अनाहुत ओढ कालांतराने कमी होत गेलेली असते. वेगाने बदलणा-या काळाच्या ओघात आपल्याला खास वाटत असणा-या व्यक्तीच्या आयुष्यातही आपल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढायला कोणीतरी दुसरा तयार झालेलाच असतो.आयुष्याच्या पटलावरचे काही ठसे मात्र कधीच मिटत नाहीत आणि अस्वस्थ अशा मनाला नेहमीच एक प्रश्न विचारतात की, आयुष्यात बदल इतके महत्वाचेच असतात का...? कधीकाळी आपल्याला सर्वात प्रिय असणा-या व्यक्तीला किँवा वास्तुला कायमचा निरोप देण्याची वेळ आपल्यावरच का यावी...?? आपल आयुष्य आपल्याला कायमस्वरुपी हव्या त्या व्यक्तीसोबत हव तस का जगता येत नाही...???
विचाराअंती एवढच उत्तर मिळत की आयुष्यात खुप उंच भरारी घ्यायची असेल तर बदल हे आवश्यकच असतात. कायमस्वरुपीत तलावात पोहुन स्वतःचे खरे अस्तित्व नाही दाखवता येत. जगाच्या स्पर्धेत आपण कोठे आहोत हे जाणुन घ्यायचे असेल तर तलावाला कायमचा निरोप देऊन कधी ना कधी समुद्रात उडी मारावीच लागते. अगदी चिमणीचाही आपल्या पिल्लांवर भरपुर जीव असतो पण ठराविक काळानंतर काळजावर दगड ठेवुन ती सुद्धा आपल्या पिल्लांना घरट्याबाहेर फेकुनच देते. त्याशिवाय पिल्लांना पंखांच्या बळाचे सामर्थ्य समजणार तरी कसे...?टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नसत अगदी त्याप्रमाणेच या जगात जगण्यासाठी चाललेल्या जीवघेण्या स्पर्धेत टिकुन राहायच असेल तर ह्रुदय दगडाचच असाव लागत. निसर्गात आढळणा-या दगडालाही पाझर फुटायची मुभा असते पण 'दगडाच्या ह्रुदयाला' पाझर फुटला तर तो तुम्हाला कमजोर बनवतो, तुमच्या मार्गातील अडथळा बनु शकतो. आयुष्यात सुख, दुःख, प्रेम, विरह सगळ सगळ काही सहन कराव लागत. परमेश्वराने प्रत्येक माणसासमोर ठेवलेल जगातील सगळ्यात मोठ कोड हे आयुष्यच असत आणि आयुष्याच्या या खेळाचे नियम अनुभवताना एके दिवशी आयुष्यच आपल्याला जगायला शिकवत.

तोडा, फोडा आणि 'अणुप्रकल्प' करा...

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अभ्यासताना ब्रिटीशांनी भारतीय क्रांतिकारकांची एकी तोडण्यासाठी अवलंबिलेल्या 'तोडा, फोडा आणि राज्य करा' या नीतीबद्दल ऐकुन होतो. 66 वर्षापुर्वी ब्रिटीशांच्या गुलामगिरीतुन आपल्याला स्वातंत्र्य मिळाले खरे पण अजुनही आपण वैचारिक पारतंत्र्यातच वावरत आहोत. थोडक्यात काय तर राज्यकर्ते बदलले, गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज आलेत पण एखादा कमजोर दुवा हेरत, एकजुट झालेल्या लोकांमध्ये फुट पाडुन, आंदोलनाची ताकद कमी करण्याचे कसब काँग्रेसने इंग्रजांकडुन वारसाहक्कात पदरात पाडुन घेतले आहे. काँग्रेसच्या याच व्रुत्तीचा प्रत्यय जैतापुरात आला.
जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांना कँन्सर झालाय ही गोष्ट काँग्रेसच्या धुर्त नेत्यांनी केव्हाच हेरली होती. प्रक्रुती खंगलेल्या माणसाकडे एका देशव्यापी आंदोलनाची जबाददारी देणे, हेच मुर्खपणाचे होते. फक्त शारिरिकच नव्हे तर मानसिक खच्चीकरण झालेली प्रवीण गवाणकरांसारखी माणसे अध्यक्षपदी असली की त्यांच्यावर विश्वास दाखवुन ठामपणे उभ्या असलेल्या लाखो लोकांना तोँडघशी पाडायला ती कधी मागेपुढे पाहत नाहीत.पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्य कितीही शुर असले तरी कैसर विल्यम्ससारखा पळपुटा राजा त्यांचे नेत्रुत्व करत होता. अर्थातच त्याने शरणागती पत्करल्याने झक मारत जर्मन सैन्याला शस्त्रे खाली ठेवुन शरणागती पत्करावी लागली. सद्य परिस्थितीत प्रवीण गवाणकर कैसर विल्यम्स प्रमाणे पळपुटे असले तरी जैतापुर आंदोलनाचे सर्वेसर्वा नक्कीच नाहीत. मग अशा माणसाने वैयक्तिक स्वार्थापोटी आमिषांना बळी पडत आंदोलन अर्ध्यावर सोडुन पळ काढला तर 'जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनाला पुर्णविराम' या मथळ्याखाली वर्तमानपत्रे, टीव्ही व्रुत्तवाहिन्या बातम्या का देत आहेत...? पत्रकारितेतील नितीमत्ता, शुचितता, तत्वे एवढ्या लवकर अणुऊर्जा आयोगाला विकुन मोकळे झालात का...?? एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की प्रवीण गवाणकरांना महत्व द्यायला ते कोणी जैतापुर संस्थानाचे छत्रपती नव्हते. जैतापुर अणुप्रकल्पाविरोधात आंदोलन उभे राहिले आणि त्या आंदोलनाची कमान गवाणकरांकडे सोपवण्यात आली म्हणुन त्यांचे नाव देशाच्या कानाकोप-यात पोहोचले. आज गवाणकरांची सेटलमेँट झाल्यानंतर ते आंदोलन सोडत आहेत म्हणजे जणु काही सगळे आंदोलनच संपले, असा अर्थ का काढत आहात...?गवाणकर काल म्हणाले, "गेली नऊ वर्षे आंदोलनाची धुरा सांभाळताना जनता माझ्यासोबत होती आणि मीही त्यांच्याशी 'प्रामाणिक' राहिलो."
गवाणकर, प्रामाणिक या शब्दाचा अर्थ तरी तुम्हाला कळतो का...? आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिक असाल तर मग अप्रामाणिक कोण ते सुद्धा एकदा सांगुनच टाका. प्रामाणिक शब्द तोँडातुन काढताना मनाचीही लाज वाटली नाही...? आज प्रामाणिकपणा तुमच्या या भ्याड क्रुत्यामुळे कलंकित झालाय.
जर दुर्धर आजारामुळे शरीर साथ देत नसल्याने आंदोलन पुढे चालवणे शक्य नव्हते तर अगोदरच वाट धरायची होती ना...! तुमच्याशिवाय आंदोलन अडुन पडलय हा साक्षात्कार तुम्हाला कधी आणि कसा झाला..? आंदोलनाची धुरा सांभाळुन जैतापुरच्या जनतेवर आपण फार मोठे उपकार केले आहेत, या आवेशात वावरु नका. जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करण्यासाठी तबरेज सायेकर,इरफान काझी यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या तुलनेत तुमचे कार्य शुल्लकच म्हणावे लागेल. 9 वर्षे अविरत संघर्ष घेतल्यावर निर्णायक क्षणी जास्तीत जास्त मोबदला घेऊन स्वतःची तुंबडी भरुन घेण्यासाठी आंदोलन गुंडाळण्याचा लांच्छनास्पद प्रकार तुम्ही केलात.त्यासाठी कोकणची जनता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.
शिवरायांच्या हिँदवी स्वराज्याचे स्वप्नात अडथळे आणण्यासाठी खंडोजी खोपड्यांसारख्या गद्दारानी शर्थीचे प्रयत्न केले होते पण कावळ्याच्या शापाने गाई-गुरे मरत नाहीत ना...? खंडोजी खोपड्यांनी गद्दारी केली तरी हिँदवी स्वराज्य उभेच राहिले. अगदी त्याचप्रमाणे प्रवीण गवाणकरांनी कोकणच्या मातीशी गद्दारी केली तरी आम्ही जैतापुर प्रकल्प रद्द करुनच दाखवणार. भविष्यात जेव्हा कोकणचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात जैतापुरच्या लढ्याची महती नक्कीच असणार आणि त्यावेळी तुमच्या पळपुटेपणाचे किस्से वाचुन पुढची पिढी देखील तुमचा उल्लेख 'जैतापुरचे खंडोजी' असाच करेल. प्रकल्पविरोधी भाषणांमध्ये भगतसिँगचे नाव अगदी उत्स्फुर्तपणे घ्यायचात, मग भगतसिँगने ब्रिटिशांशी सेटलमेँट न करता देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोवळ्या वयात फासावर जाणे पसंत केले ही गोष्ट कशी काय विसरलात...?जैतापुरच्या अणुप्रकल्पाचे म्हणाल तर जोपर्यँत साखळीनाटेचे मच्छिमार आणि माडबनचे शेतकरी प्रकल्पाविरोधी आहेत तोपर्यँत प्रकल्पाचे बांधकाम आम्ही होऊच देणार नाही. लोकशाहीचे बुरखे पांघरुन प्रत्यक्षात हुकुमशाही करणारे काँग्रेसचे तालिबानी सरकार असली नसती थेड करुन अणुप्रकल्प आमच्यावर लादणार असेल तर त्यांचा खरा मुखवटा जगासमोर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.प्रस्तावित जैतापुर अणुप्रकल्पासाठी लागणा-या 750 हेक्टर जमीनीत तब्बल 2300 भु-धारक आहेत आणि त्यातील 500 पेक्षा कमी लोकांनी सरकारकडुन जमीनीचा मोबदला घेतला आहे (आकडेवारीत बोलायचे झाले तर 20-25% लोकांनी.) गवाणकरांसारखे गद्दार गळाला लागुन सुद्धा या विनाशकारी प्रकल्पाला अजुनही 75 ते 80 टक्के लोक विरोधच करत आहेत.जयराम रमेश पर्यावरण मंत्री असताना त्यांनी या प्रकल्पात पर्यावरणविषयक तरतुदी धाब्यावर बसविण्यात आल्यात हे मान्य केले आणि त्यांच्या या प्रामाणिकपणाचा मोबदला म्हणुन त्यांच्याकडुन पर्यावरण खात्याचा पदभार काँग्रेसने काढुन घेतला.
कोकणी लोक (कोकणस्थ) ताठ कणा आणि कणखर बाण्यासाठीच देशात प्रसिद्ध आहेत. जैतापुर प्रकल्पानंतर आपल्याप्रमाणे कोकणातील पुढची पिढी कँन्सरसारख्या दुर्धर रोगाने त्रस्त व्हावी अशीच गवाणकरांची इच्छा दिसतेय पण ती आम्ही कदापि पुर्ण होऊ देणार नाही. डाँ. मिलिँद देसाईँच्या मते किनारपट्टीवरचे मच्छिमार प्रकल्पानंतर उपासमारीने मेले तरी चालतील पण जमिनीचा भरघोस मोबदला घेऊन यांच्या घरात भरभराट व्हायला हवी. प्रवीण गवाणकर किँवा मिलीँद देसाई अशा कुपमंडुक प्रव्रुत्तीच्या लोकांनी एक गोष्ट नीट ध्यानात घ्यावी की जैतापुर अणुप्रकल्प हा स्थानिक प्रश्न नसुन एव्हाना आंतरराष्ट्रीय प्रश्न बनला आहे.जैतापुर अणुप्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर केवळ माडबनला नाही तर मुंबईसह संपुर्ण कोकणला धोका पोहचु शकतो आणि त्यासाठीच शेवटच्या श्वासापर्यँत आम्ही हे आंदोलन सुरु ठेवु. तुमच्यासारखी दोन सडकी टाळकी कमी झाली म्हणुन आमच्या आंदोलनात तसुभरही फरक पडणार नाही. जैतापुर प्रकल्प कोकणसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे आणि तशीच वेळ आली तर जैतापुर प्रकल्प रद्द करण्यासाठी कोकणातली प्रत्येक स्त्री लढेल, प्रत्येक पुरुष लढेल, प्रसंगी लहान मुलेही रस्त्यावर उतरतील पण आता माघार संभव नाही. जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प कोकणातुन तडीपार करुनच शांत बसु.
। एकमुखाने गर्जा ।
॥ नको अणुऊर्जा ॥

बलात्कारपर्व...

नेहमी चांगल्या गोष्टी घडु लागल्या की 'पर्व' हा शब्द वापरायचे संकेत आहेत पण अपवादात्मक परिस्थितीत वाईट गोष्टी नित्यनेमाने घडु लागल्या की उपहासात्मकरित्या 'पर्व' शब्दाचा वापर करायची वेळ येते. जेव्हा इंदिरा गांधीनी देशावर आणीबाणी लादुन लोकशाहीचे धिँडवडे उडवले तेव्हा आचार्य विनोबा भावेँनी(?) 'अनुशासनपर्व' या शब्दाचा वापर केला होता. असो, तर सांगायचा मुद्दा असा की 16 डिसेँबर रोजी दिल्ली गँगरेप झाला आणि त्यानंतर एखादा साथीचा रोग यावा त्याप्रमाणे संपुर्ण देशात बलात्काराची साथ पसरली. अर्थातच 16 डिसेँबरपुर्वी देशात बलात्कर होत नव्हते अस मला मुळीच म्हणायच नाही पण 'त्या' घटनेनंतर माध्यमांमध्ये बलात्काराच्या बातम्यांना प्रसिद्धी मिळु लागली. टीव्ही मिडीया असो वा प्रिँट मिडिया, गेल्या कित्येक महिन्यात बलात्कर शब्दाचा समावेश नसलेले एक वर्तमानपत्र शोधुन सुद्धा सापडणार नाही. बलात्काराच्या चर्चा घराघरात रंगु लागल्या. रात्री टीव्हीवरील चर्चा पाहताना बलात्का-यांना भरचौकात फाशी द्यायला हवी, त्याची धिँड काढायला हवी, अशा संतप्त प्रतिक्रिया खासकरुन महिला वर्गातुन उमटु लागल्या.सोशल नेटवर्किँग साईट्सवर तर त्यापुढेही जाऊन शिवाजी महाराज असते तर त्यांनी बलात्का-यांना हत्तीच्या पायाखाली तुडवले असते किँवा कडेलोट केला असता अशा बाता मारल्या जाऊ लागल्या. काहीँनी तर बलात्का-यांचे लिँग छाटुन त्याला उर्वरित आयुष्य नपुंसक म्हणुन जगायची शिक्षा द्यावी असे स्टेटस टाकुन मित्रमंडळीँच्या टाळ्या मिळवल्या. आश्चर्य म्हणजे यातील एकही जण सभोवतालची परिस्थिती, आपली कायदेपद्धती यांचे भान न ठेवता प्रतिक्रिया नोँदवत होता आणि अशा अर्धवटांना 'होय महाराजा' म्हणुन उत्स्फुर्तपणे दाद देणारे महाभाग देखील इकडे उपस्थित होते.
बलात्का-यांना फाशी द्या म्हणणारे एक गोष्ट विसरत आहेत की कोणतीही शिक्षा देण्यासाठी सबळ पुराव्यांची गरज असते. बलात्कारासारख्या गुन्ह्यात फाशीच्या शिक्षेची तरतुद केली तर बलात्कारीत महिला प्रमुख पुरावा असेल. अशा परिस्थितीत बलात्कारानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बलात्कार करणारे नराधम बलात्कार करुन झाल्यानंतर संबंधित महिलेची हत्या करायला मागेपुढे पाहणार नाहीत. बलात्का-यांना फाशीच्या शिक्षेची तरतुद म्हणजे पिडीत महिलांना आगीतुन फोफाट्यात लोटण्यासारखे आहे.तसही शिक्षेच्या भितीने बलात्कार कमी होतील अशी भाबडी आशा बाळगणे हेच मुळी चुकीचे आहे. आजही आपल्या देशात बलात्का-यांसाठी जन्मठेपेपर्यँतच्या शिक्षेची तरतुद आहे. क्षणिक सुखांसाठी आयुष्यातील महत्वाची वर्षे तुरुंगात खितपत पडणे कोणालाच परवडणार नाही तरी देखील बलात्कार होतच असतात. त्यासाठी बलात्कारामागची कारणे आणि आपण बलात्कारांची संख्या कमी करण्यात एक समाज म्हणुन अपयशी ठरणार असु तर पिडीत महिलेवरील बलात्काराच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी काही उपाय करता येईल का, यावर मते मांडली पाहिजेत. हल्लीच आयबीएन लोकमतवर बलात्कार करणा-या अल्पवयीन तरुणांना शिक्षेत सुट द्यावी का यावर चर्चासत्र होते. त्यात एका मान्यवर महिलेने शिक्षा भोगुन बाहेर पडलेल्या तरुणांना तिने कसे योग्य मार्गावर आणले याची उदाहरणे दिलीत तर आमच्याच घरात बायकांनी त्या महिलेवर प्रखर टिका केली. समोरच्याचे म्हणणे समजुन न घेता, फुकटची भावनिक बडबड करण्यात आपणा भारतीय लोकांचा हात कोणीच धरु शकणार नाही. तरी सुद्धा अशा बिनडोक समाजासमोर मी माझे मुद्दे आता मांडणार आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहणा-यांना शिव्याच खाव्या लागतात.
माझच म्हणण खर असा दुराग्रह मुळीच नाही. त्यातही नक्कीच चुका असतील आणि त्या सुधारताही येतील पण उगाच फालतु बडबड करण्यापेक्षा नेमक्या मुद्द्यांवर बोट ठेवलेले केव्हाही चांगलेच...!

1) मला सर्वप्रथम बलात्कारासाठी कारणीभुत वाटते ती आपल्या देशातील 'मिश्र संस्क्रुती...' आपल्या देशाचे मिश्र अर्थव्यवस्थेने उडत असलेले धिँडवडे आपण पाहतच आहोत. अगदी त्याप्रमाणेच भारतीय संस्क्रुतीने वागायचे की पाश्चात्यांचे अनुकरण करायचे अशा द्विधा मनःस्थितीत भारतातील तरुण पिढी आढळते. भारतीय संस्क्रुतीला वाटाण्याच्या अक्षता दाखवताना एकविसाव्या शतकाचे कारण पुढे करत आपण पाश्चात्य संस्क्रुती स्वीकारली खरी पण निम्म्याहुन जास्त समाज अजुनही भारतीय संस्क्रुतीला धरुन चालतो. त्यातही बहुसंख्य लोक 'ना घर का, ना घाट का' प्रकारातील आहेत. त्यांना पाश्चात्यांप्रमाणे अनुकरण करायला आवडते पण त्याचे परिणाम भोगायची त्यांची मानसिकता नसते. या लोकांचा पुढारलेपणा सोयीप्रमाणे बदलत जातो.
अजुनही लैँगिकता किँवा त्याच्याशी निगडीत शब्द वापरताना आपण कुठला तरी घोर अपराध करत आहोत अशी भावना या तथाकथित पुढारलेल्या स्त्री किँवा पुरुषाच्या मनात असते. अगदी रोजच्या आयुष्यातील उदाहरण द्यायचे झाले तर मेडिकलच्या दुकानात कंडोम मागताना दुकानदाराची नजर चुकवणारे पुरुष किँवा गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी करताना काव-याबाव-या होणा-या स्त्रिया सगळ काही सांगुन जातात. इतकेच कशाला पण निसर्गनियमाने येणारी मासिक पाळी आली तरी एकविसाव्या शतकातील मुली त्याबद्दल घरात चर्चा चेह-यावर नाहक अपराधी भाव आणतात.
बहुसंख्य पाश्चात्य देशात स्त्रिया टु पीस बिकीनीवर वावरतात. आता मोर नाचतो म्हणुन लांडोरही नाचतो, त्याप्रमाणे भारतातल्या तरुणी देखील तोकडे कपडे वापरुन आपण पाश्चात्यांचे अनुकरण करतो म्हणजेच पुढारलेले आहोत हे समाजाला दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. आता त्यांना पाहुन कोणी विक्रुत तरुण वासनेच्या आहारी जात त्यांच्यावर बलात्कार करत असतील तर तोकड्या कपड्या घालणा-या तरुणीँचा त्यात काहीच दोष नाही, असे विधान करुन आपण त्या तरुणीँना पाठीशी तर घालत नाही ना...? पाश्चात्य देशात बिकीनीवर वावरणा-या तरुणीँवर बलात्कार होत असतीलही पण त्यांच्याकरीता भारतातील महिलांप्रमाणे सेक्स फार मोठी गोष्ट नसते आणि त्यामुळेच तिकडे बलात्कारांचा जास्त गवागवा होत नाही.आता काही महिला लगेच संविधानाने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याची तलवार काढुन मला गप्प करतील. खरोखरच शाब्दिक युक्तीवादात बाजी मारता येईलही पण प्रत्यक्ष आयुष्यात बलात्कारानंतर गेलेली अब्रु परत मिळवता येत नाही. शरीराचे उघडे भाग जास्तीत जास्त झाकण्यासाठी कपडे असतात, जास्तीत जास्त उघडे ठेवण्यासाठी नाही. जमाना कितीही बदलला तरी द्रौपदीच्या नशीबी नेहमीच वस्त्रहरण येते आणि सीतेला आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षेतुन जावेच लागते. पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टीँचे अनुकरण करण्यास काहीच हरकत नाही पण शरीराचा किती भाग उघडा ठेवुन समाजात वावरावे याचा निर्णय प्रत्येक स्त्रीने आपल्या सदसदविवेकबुद्धीला स्मरुन घ्यायची वेळ आली आहे.

2) निर्जन ठिकाणी आपल्या प्रियकरासोबत लैँगिक सुख घेणा-या तरुणीँच प्रमाण आपल्या देशात वाढत आहे. 'खुल्लम खुल्ला प्यार करेँगे हम दोनो' अस म्हणुन कोणत्याही झाडीत शिरुन लैँगिक चाळे करताना प्रेमीयुगुल दिसतात. अशा तरुणीँनी एक गोष्ट नीट ध्यानात ठेवावी की तुमचा प्रियकर म्हणजे कोणी 'सुपरमँन' नव्हे. पाच-सहा जणांच्या टोळक्यांनी फिरणा-या रोडरोमियोँची नजर जेव्हा झाडीत प्रणय करत असलेल्या तरुणीच्या अर्धनग्न शरीरावर पडते, तेव्हा दांडगाईच्या जोरावर प्रियकराची मारपीट करुन ते हातात आयत्या सापडलेल्या तरुणीवर बलात्कार करतात. झुंडशाहीसमोर कितीही ताकदवान असलेला प्रियकर टिकाव धरु शकत नाही. लग्नाअगोदर प्रियकर असला तरीही असले चाळे करणे कधीही योग्य नव्हे पण आपल्या कामवासनांवर नियंत्रण मिळवता येत नसेल तर अशा प्रेमीयुगुलांनी थेट हाँटेलमध्ये रुम बुक करुन खोलीच्या आत असले कार्यक्रम आटपावेत.

3) पुरुषांमधील वासनांध झालेले जनावर जेव्हा रस्त्यावर मोकाट फिरु लागते, तेव्हा ती वासना कोणीतरी शमवणे फार गरजेचे होते. त्यामुळेच वेश्याव्यवसाय जगात फार पुर्वीपासुन चालत आलाय. खर तर अशा पुरुषरुपी जनावरांना झेलुन वेश्या इतर स्त्रियांच त्यांच्यापासुन संरक्षण करत होत्या. मधल्या काळात कित्येक संसार उद्ध्वस्त झाल्याचे कारण पुढे करत सरकारने डान्सबार आणि वेश्याव्यवसाय बंद केले. शरीरावर पोट असणा-या वेश्या सरकारच्या या निर्णयाने देशोधडीला लागल्या. ज्या नराधमांना सुधरवण्याच्या गोष्टी सरकार करत होते, तेच स्त्रीलंपट लोक बाहेर पडुन बलात्कार करु लागले. आता अशा जनावरांना आवर घालायचा असेल तर वेश्याव्यवसाय कायदेशीर करावा लागेल. जेणेकरुन कामवासनेने वेड लागलेल्या पुरुषांना ती शमवण्यासाठी योग्य जागा मिळेल आणि अनेक स्त्रियांवरील बलात्कार रोखता येतील.

4) एकीकडे डान्सबार/ वेश्याव्यवसायावर सरकार बंदी घालते तर दुसरीकडे देशात सेन्साँर बोर्ड सारखी कोणती गोष्ट अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न पडतो. पाँर्नस्टार सनी लियोनला बाँलिवुडमध्ये अभिनेत्री करण्यापर्यँत या लोकांची मजल पोचतेच कशी...? भारत देशात चित्रपटात अभिनय करु शकणारी दुसरी कोणी अभिनेत्रीच शिल्लक राहिली नाही का...?? की यापुढे जास्तीत जास्त प्रणय द्रुश्ये, भडक कपडे, चुंबनद्रुश्ये हेच चित्रपटांचे प्रमुख विषय असणार आहेत...???
उगाच प्रेक्षकांवर उपकार केल्यागत नटीच्या अंगावर कपड्याचे दोन तुकडे चिकटवण्याचे नियम तरी सेन्साँर बोर्ड का ठेवतय...? त्यापेक्षा नट्यांच्या अंगावर कपडे नसलेल्या ब्लु फिल्मच थिएटरमध्ये दाखवा ना...! आणखीन चांगला धंदा होईल आणि सनीताई लियाँन आपले तिकडचे कारनामे थेट इकडे येऊन थिएटरमध्येच दाखवेल. उगाच तिला बिचारीला अभिनय करायचे कष्ट कशासाठी...! त्या एकट्या सनी लियाँनला तरी का दोष द्यावा...? आपल्या नट्यांनी काय थोडे पराक्रम केलेत...??
कुर्बान चित्रपटात संपुर्ण पाठ उघडी असलेले पोस्टर करीना कपुरने प्रसिद्ध केलेले तेव्हाच तिच्या कानाखाली सणसणीत आवाज काढायला पाहिजे होता.ती कोण काल सकाळची पुनम पांडे रोज उठुन नग्न होण्याच्या घोषणा करुन वाद ओढवुन घेते आणि आपला मिडीया बेशरमपणे तिच्या बातम्या दाखवतो. आता अशा हलकट नटीला महिलांनीच एकदा बंद काळोख्या खोलीत नागड करुन चाबकांनी चोप दिला पाहिजे. देशात कोठेही बलात्कार झाला की आपल्याला समाजाची भरपुर काळजी असल्यागत याच निर्लज्ज नट्या छातीवर 'Being human' लिहुन, हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर येतात. त्यावेळी त्यांना जाब विचारला पाहिजे की पडद्यावर उघड्या अंगाने नाचताना तुमचे सामाजिक भान कोठे गेलेले...? यांच्या पडद्यावरील बिभीत्स वर्तनाने मुळातच ताळतंत्र सोडलेली तरुण पिढी ख-या आयुष्यातही ते शारिरीक सुख घेऊ पाहतात आणि त्यात बळी जातो तो बिचा-या सभ्य मुलीँचा...! अगोदर सेन्साँर बोर्डाचे नियम कडक करा आणि पडद्यावरील नट्यांचे देहप्रदर्शन, प्रणय थांबवा. देशातील बलात्काराचे प्रमाण थोडे तरी कमी होईल.

5) सेक्स हा विषय आजही घराघरात अस्प्रुश्य मानला जातो. पुढारलेल्या समाजातील आईवडीलही आपल्या मुलांसोबत ठराविक वयात होणा-या लैँगिक बदलांबाबत माहिती देण्यास किँवा त्यांना विश्वासात घेऊन चर्चा करण्यास टाळाटाळ करतात, हे आपण 'बालक पालक' चित्रपटात पाहिलेच आहे. परिणामी तरुण वयातच मुलांच्या मनात सेक्स या विषयाबद्दल कुतुहल निर्माण होते. त्याच गोँधळलेल्या मनःस्थितीत सध्या बाजारात अत्यंत सहजपणे मिळणा-या ब्लु फिल्म्स हातात पडल्या की त्यातले भयानक प्रकार पाहुन बहुतांश मुलामुलीँच्या मनाचा थरकाप उडतो. मात्र काही मुलांचे या कामक्रिडेबद्दल औत्सुक्य कमालीचे वाढते. हे सगळे अनुभव लवकरात लवकर घेता यावेत यासाठी ती अधीर होतात आणि अशा मनःस्थितीत संधी मिळाली की मागचापुढचा विचार न करता एखाद्या सरळसाध्या मुलीवर बलात्कार करुन मोकळे होतात. आता कायद्याने यात मुले गुन्हेगार असतीलही पण त्या मुलांमध्ये टाळाटाळ करुन सेक्सविषयी कुतुहल निर्माण करणारे पालक तितकेच गुन्हेगार असतात.

6) सध्या आपल्याकडे मुलीचे लग्नाच्या वेळी वय 18 वर्षे तर मुलाचे लग्नाच्या वेळी वय 21 वर्षे असणे कायद्याने बंधनकारक आहे पण ज्या तीव्रतेने बलात्कार होत आहेत ते पाहता मुलांचे लग्नाचे वय 18 वर्षे करण्यासंबंधी विचार करायला हवा.

7) बलात्कारानंतर एका स्त्रीचे पुढील संपुर्ण आयुष्य कोणतीही चुक नसताना विनाकारण उद्ध्वस्त होते. पुर्वीच्या काळात एखाद्या स्त्रीला दुर्देवाने लवकर वैधव्य आले तर तिला बोडकी करुन घरात बसवायची अनिष्ट प्रथा होती. पुढे समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे विधवांचे पुर्नविवाह होऊ लागले. आता बलात्कार झालेल्या स्त्रीकडे वेगळ्या नजरेने पाहायची मानसिकता आपण बदलायला हवी. त्यांना सर्वसामान्य आयुष्य जगु द्यावे. बलात्कार करणा-याशीच बलात्कारित स्त्रीचे लग्न करुन द्यावे हा चांगला नियम होऊ शकतो पण त्याचे दुष्परिणामही आहेत. एकतर्फी प्रेमात मुलीकडुन होकार मिळत नसेल तर मुले बलात्कार करु शकतात. त्यामुळेच या नियमाची अंमलबजावणी करताना बलात्कारित मुलीचे मत विचारात घ्यावे. तिची इच्छा असेल तरच तिचे त्या मुलाशी लग्न करुन द्यावे.

31 जुलैला मुंबईत बलात्कार झालेल्या मुलीला तिच्या प्रियकराने वा-यावर सोडुन न देता, तिच्याशी लग्न करुन समाजापुढे नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. आपल्या प्रेयसीच्या शरीरावर प्रेम न करता, तिच्या मनावर किँवा स्वभावावर प्रेम करा, हा उदात्त संदेश यातुन मिळत आहे. बलात्कार झाल्यावर त्या मुलीला सावरण्यासाठी मानसिक आधाराची गरज असते आणि त्या परिस्थितीत प्रियकराने साथ सोडली तर तिला सावरणे कठीण होऊन जाते. त्यासाठीच बलात्कारीत तरुणीची प्रियकराने अर्ध्यावर साथ न सोडता तिला शेवटपर्यँत आधार द्यावा.

एवढ्या उपायांवर विचार केला तरीही माझ्या मनात काही प्रश्न किँवा शंका अनुत्तरितच राहतात.

1) तरुणीँच्या तंग तोकड्या कपड्याने बलात्कार करणा-या पुरुषामध्ये दडलेल्या जनावराची कामवासना चेकाळुन बलात्कार होतो असे ग्रुहित धरले तर मग 70 वर्षाच्या आजीबाईँवर बलात्कार कसा काय होऊ शकतो...? आजीबाईँनी तर तोकडे कपडे घातलेले नसतात ना...?? 4 वर्षाच्या चिमुरडीवर कोणत्या मानसिकतेतुन बलात्कार होत असतील...??? 70 वर्षाच्या व्रुद्ध आजीबाईँकडे पाहुन किँवा 4 वर्षाच्या लहान मुलीकडे पाहुन कोणाचीही कामवासना कशी काय उत्तेजित होऊ शकते...????

2) बलात्का-यांमध्ये अल्पवयीन किँवा प्रौढ असा मतभेद करण्यामागे कारण काय...? ज्याला बलात्कार करण्याचे ज्ञान आहे तो अजाण कसा काय असु शकतो...???

3) दिल्ली गँगरेपच्या वेळी बलात्कारी त्या मुलीचा बलात्कार करुन थांबले नाहीत तर त्यांनी बलात्कारानंतर त्या मुलीच्या गुप्तांगामध्ये लोखंडी राँड घुसवला. तिचे हाल हाल केले आणि नंतर त्या मुलीने प्राण सोडले. जर बलात्कारामध्ये कामवासना शमवणे हे एकच कारण मानायचे ठरवले तर एका स्त्रीचा इतका निर्घुण खुन करायची काय गरज...? यामध्ये दिवसेँदिवस मेहनत करुन पुरुषांपेक्षा पुढारत चाललेल्या स्त्रीजातीबद्दल असंतुष्ट विक्रुत पुरुषांच्या मनात दडलेला प्रचंड मत्सर किँवा द्वेष तर उफाळुन येत नसेल ना...???
असे एक ना अनेक प्रश्न आजच्या घडीला मनात आल्यावाचुन राहत नाहीत आणि त्यांची उत्तरे शोधायला गेले की मन अस्वस्थ होते. सोशल मिडीयावर आपण एकमेकांचे विचार तर जाणुन घेऊ शकतो हे झुकेरबर्गचे उपकारच मानायला हवे.

बलात्कार रोखण्यासाठी माझ्या मनात असलेले सगळे उपाय मी तुमच्यासमोर ठेवले. त्यामुळे बलात्कार 100% बंद होतील असे अजिबात नाही पण त्यांचे प्रमाण हळुहळु कमी होईल एवढे नक्की...! शेवटी समाजाला बलात्काराची किड लागली आहे आणि कोणतीही किड एकाएकी नष्ट होत नसते. त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. आपण सगळेजण मिळुन भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना नक्कीच करु शकतो. शेवटी आपल्या देशातील घाण आपल्यालाच साफ करावी लागेल ना...???
"हम होँगे कामयाब एक दिन.."

...अन्यथा सी-वर्ल्ड प्रकल्पच 'तडीपार' करु


'ठेविले अनंते तैसेचि राहावे' अशी मानसिकता असलेल्या सिँधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण हा विषय नेहमीच जिव्हाळ्याचा राहिला आहे. पर्यावरणाला बाधक ठरेल असा कोणताच प्रकल्प स्थानिक लोकांना नको असतो. आपल्या आसपासची हिरव्यागर्द झाडांवर, संथ वाहणा-या नद्यांवर, एखाद्या प्रदुषणकारी प्रकल्पाने गंडांतर येणार असेल तर त्यांच्या रक्षणाकरता लोक आंदोलनाचा पवित्रा घेतात. लोकांच्या भावना समजुन न घेता तोच प्रकल्प विकासाच्या नावाखाली लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे इकडची नेतेमंडळी करत आहेत. सत्ताधा-यांना इतर कोणत्या बाबतीत मात देता येत नसल्याने विरोधी पक्षही अशा आंदोलनांना पाठिँबा देऊन संघर्षाची धार आणखी तीव्र करतात.सत्ताधारी - विरोधक - पर्यावरणवादी यांच्यामध्ये सुरु असलेल्या या सर्व कुरापतीँमध्ये 'सी-वर्ल्ड' प्रकल्पाची चर्चा सुरु झाली. आश्चर्य म्हणजे प्रकल्पविरोधाची शापित भुमी म्हणुन कुप्रसिद्ध असणा-या सिँधुदुर्गात प्रथमच एखादा प्रकल्प कोणीही विरोध न करता सर्वानुमते स्वीकारला गेला. पर्यावरणाला 'सी-वर्ल्ड' प्रकल्पाचा कोणताही धोका नसल्याने पर्यावरणवाद्यांकडुनही सी-वर्ल्ड प्रकल्पाचे स्वागत झाले. वायंगण-तोँडवलीतील ग्रामस्थळी प्रकल्पासाठी लागणारी 250 एकर जमीन जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यास तयार झाले. मात्र नियतीला सिँधुदुर्गात कोणताही प्रकल्प विरोधाविना पार पाडणे मान्य नसावे. सी-वर्ल्डला अजिबात विरोध होत नाही याची जाणीव झाल्यावर स्थानिकांना अंधारात ठेऊन 250 एकर ऐवजी 1390 एकर जमीन लाटण्याची कारस्थाने काँग्रेस पक्षात शिजु लागली. सगळे काही सुस्थितीत चाललेले असताना केँद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी भुसंपादन विधेयक पारित करुन सिँधुदुर्गातील काँग्रेसला पेचात टाकले.राष्ट्रीय स्तरावर हातच्या बोटावर मोजता येतील असे नितीमत्ता शिल्लक असलेले नेते काँग्रेसमध्ये उरले आहेत आणि त्यातीलच एक नाव आहे जयराम रमेश यांचे...! भुसंपादन विधेयक संसदेत संमत झाल्याने स्थानिक ग्रामस्थांची 1390 एकर जमीन कवडीमोल किँमतीत लाटता येणार नाही याची जाणीव झाल्याने नेतेमंडळीँनी लवकरात लवकर भुसंपादन प्रक्रिया राबवण्याचा घाट घातला. मधल्या काळात सरकार आपली 250 एकर ऐवजी 1390 एकर जमीन लाटु पाहत आहेत हे लक्षात येताच ग्रामस्थांनी संघर्षाची भुमिका घेतली. जिल्ह्याच्या नव्हे तर देशाच्या अर्थकरणात उलथापालथ करु शकणारा सी-वर्ल्ड महत्वपुर्ण प्रकल्प राबवताना ग्रामस्थांना विश्वासात घेत, आपली बाजु पटवुन देत सरकारकडुन सामंजस्याची भुमिका घेणे अपेक्षित होते पण सामंजस्य शब्द डिक्शनरीत नसणा-या राणे साहेबांनी ही जबाबदारी स्वीकारली. वायंगण-तोँडवली गावच्या सभेत आपले सी-वर्ल्ड प्रकल्पसंबंधी विचार ऐकण्यासाठी 40 लोक देखील उपस्थित नाहीत हे लक्षात येताच पारा चढलेल्या पालकमंत्र्यांनी सी-वर्ल्ड प्रकल्पाला विरोध करणा-यांना सिँधुदुर्गातुन तडीपार करेन अशी जाहिर धमकीच देऊन टाकली.सी-वर्ल्ड प्रकल्पाला ग्रामस्थांचा असलेला विरोध योग्य की अयोग्य हा वेगळाच मुद्दा आहे पण लोकशाही स्विकारलेल्या देशात, सरकारमध्ये काम करणा-या एका मंत्र्याने तडीपारीची भाषा करणे नितीमत्तेला धरुन आहे का...? विरोधकांची बाजु समजुत घेत त्यावर चर्चा करुन तोडगा काढणे हे लोकशाहीचे तत्व एक मंत्री कसे काय झुगारुन देऊ शकतो...?? याअगोदरही गाडगीळ अहवालाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची हुकुमशाही सिँधुदुर्गाने अनुभवली होती. गाडगीळ अहवालाला समर्थन करणा-यांना घराबाहेर पडु देणार नाही अशी दांडगाईची भाषा त्यावेळी पालकमंत्र्यानी वापरली होती. आपल्याच लोकांना शत्रुसारखी वागणुक देणारा नेता खरच सिँधुदुर्ग 'जिल्ह्याचा पालक'मंत्री पदी बसण्याच्या लायकीचा आहे का...? माणसाने एकच चुक पुन्हा केली तर तो गुन्हा ठरतो आणि गुन्हा केलेल्या नेत्याला मंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार आहे का...? अगोदरच संतापलेल्या लोकांमध्ये तडीपारीचे वक्तव्य आगीत तेल ओतल्यासारखेच होते. लोकांनी प्रतिक्रियेदाखल आता 250 एकरच नव्हे तर एक इंचही जमीन मिळणार नसल्याचे मत नोँदवले.भुअधिग्रहण विधेयकात एखादा खाजगी प्रकल्प लोकांची 80% संमती असल्याशिवाय मंजुरच होऊ शकत नाही. आपल्याच पक्षाच्या केँद्रीय मंत्र्याने मांडलेल्या विधेयकातील अटी राणेँना माहित असुनही त्यांनी नाहक लोकांचा असंतोष ओढावुन घेतला. शिवाय भुअधिग्रहण कायदा मंजुर होईल म्हणुन अगोदरच 1390 एकर जमीन 1894च्या कायद्याने कवडीमोल किँमतीत लाटण्याचा प्रयत्न किळसवाणा होता. या विधेयकानुसार ग्रामीण भागातील लोकांना जमीनीसाठी बाजारभावाच्या चौपट रक्कम देण्याची तरतुद आहे. वायंगण-तोँडवलीतील लोकांना त्यांच्या जमीनीचा योग्य तो मोबदला मिळायलाच हवा. सी-वर्ल्ड प्रकल्पाने तुमचा विकास होणार अशा नुसत्याच दवंड्या पिटण्यापेक्षा स्थानिकांचा नेमका काय विकास होणार हे पटवुन देणे महत्वाचे आहे.सी-वर्ल्ड म्हणजे फक्त विकास ही दवंडी गेली कित्येक वर्षे पालकमंत्र्यांनी अशा रितीने पिटवली आहे की सिँधुदुर्गातील तथाकथित विचारवंत कोणत्याही धोक्याचा विचार न करता पालकमंत्र्यांवर अंधविश्वास ठेवु लागले आहे. आंधळेपणाने ठेवलेला हा विश्वासच एक दिवस सिँधुदुर्गचा घात करु शकतो हे नीट ध्यानात घ्या. यापैकी एकाही विचारवंताला सी-वर्ल्डने स्थानिकांचा नेमका काय विकास होणार आहे याचे उत्तर देता आलेले नाही. फक्त पालकमंत्र्यांच्या गोबेल्स प्रचारनितीला ते भुललेले दिसतात. सी-वर्ल्ड पाहायला पर्यटक येणार आणि विकास होणार असे सांगणा-यांनी ज्यांनी आपली जमिन या प्रकल्पासाठी गमावली आहे अशा स्थानिकांना पर्यटक येण्याने काय मिळणार ते अगोदर स्पष्ट करा. समुद्राखालचे विश्व पाहण्यासाठी पर्यटक तिकीट सी-वर्ल्ड कंपनीचे काढणार. म्हणजे त्यातील एक पैसाही स्थानिकांच्या खिशात जाणार नाही. आता पर्यटक सिँधुदुर्गातील हाँटेल्स वापरतील आणि स्थानिक लोकांना पैसा मिळेल अशा थापा मारल्या जात आहेत.एक गोष्ट नीट लक्षात घ्या की फक्त समुद्रतळाचे विश्व पाहण्यासाठी परदेशातुन भारतात आलेला पर्यटक मुळातच इतका श्रीमंत असणार की तो टपरीवरील वडापाव किँवा तुमच्या हाँटेलातील मच्छी जेवण नाही खाणार. अशा लोकांना 5-स्टार हाँटेलमध्ये राहायलाच आवडते. आता सी-वर्ल्ड साठी 250 एकर ऐवजी 1390 एकर जमीन घ्यायची जी थेड चालु आहेत ती त्यासाठीच आहेत. उरलेल्या जागेत पालकमंत्री किँवा त्यांचे समर्थक आपली 5-स्टार हाँटेल उभारुन पैसाच पैसा कमावणार, गब्बर होणार. स्थानिकांकडुन जमीनी हिसकावुन घेतल्या की त्यांच्यावर लाथा घालायला हे लोक मागेपुढे पाहणार नाही. गोव्याला अगोदरच एक विमानतळ असताना आणि सामान्य लोकांची विमानाने प्रवास करायची ऐपत नसताना हिच दुरद्रुष्टी ठेवुन या लोकांनी चिपी विमानतळ बनवले आहे कारण पर्यटक गोव्याऐवजी थेट सिँधुदुर्गात विमानाने उतरतील आणि पर्यटकांना पुर्णपणे लुबाडायचा ठेका फक्त आणि फक्त यांच्या समर्थकांना मिळेल. चिपी विमानतळासाठीही या मंडळीँनी लोकांच्या गरजेपेक्षा जास्त जमिनी लुबाडल्या आहेत.चिपी ते तोँडवली-वायंगण हा पट्टाच उर्वरित सिँधुदुर्गापासुन अलग करत तिकडे अलिशान हाँटेल्स, बंगले उभारुन सिँगापुरसद्रुश शहर उभारायचे. जमिनी गमालेल्या स्थानिकांचा त्यात कुठेही अधिकार नसणार किँवा सहभागही नसणार. ज्या उन्मतपणे ग्रामस्थांना तडीपारीची धमकी देण्यात आली ती पद्धत पाहता या छुप्या कारस्थानांमागील संशय आणखी बळावतो. कळण्यात स्वार्थासाठी मायनिँगसारखे विनाशकारी प्रकल्प करणारे या पट्ट्यात पुन्हा एकदा कसायाप्रमाणे झाडांची कत्तल करुन काँक्रिटची जंगले उभारतील. भविष्यात स्वतःच्या आणि समर्थकांच्या पिढ्यानपिढ्या पोसल्या जाव्यात यासाठी पालकमंत्री करत असलेली ही तरतुद आहे. जमिनी गमावणारे स्थानिक लोक किँवा उर्वरित सिँधुदुर्गातील लोक यांच्या वाट्याला काहीच येणार नाही. कळण्याप्रमाणे चिपी, वायंगण-तोँडवली भागात सुरु होणारा विध्वंस, चंगळवाद, श्रीमंतीचे प्रदर्शन उघड्या डोळ्यांनी पाहुन पश्चाताप करायची वेळ येईल. त्यामुळेच सी-वर्ल्ड प्रकल्पाने सिँधुदुर्गचा विकासच विकास होणार या पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर निदान विचारवंतानी तरी नंदीबैलाप्रमाणे नुसत्या माना न डोलावता परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा.पालकमंत्र्यांनी सी-वर्ल्डने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार अशी तत्वज्ञाने पाझरण्यापेक्षा प्रत्यक्ष जमीन, घरदार सोडणा-या स्थानिक लोकांना या प्रकल्पातुन काय मिळणार ते सांगावे. या अगोदरही कोकणात अनेक लोकांनी देशहितासाठी आपल्या जमिनी सरकारला दिल्या आणि नंतर प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाचे प्रश्न तात्कळत ठेवत याच लबाड सरकारने लोकांच्या तोँडाला पाने फुसली. असल्या भुरट्या सरकारवर लोकांनी तरी विश्वास का ठेवायचा...? एकतर बाप दाखवा नाहीतर श्राध्य घाला. प्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर येणा-या नफ्यावर भुधारकांचा तितकाच हक्क आहे. त्यामुळेच भुधारकांना सी-वर्ल्ड प्रकल्पाचे भागदार करुन घेण्यात यावे. प्रकल्पासाठी 250 एकर जमीन पुरेशी आहे आणि तेवढ्या जमीनीतच तो पुर्णत्वास न्यावा. पालकमंत्र्यांनी तडीपारीची टोकाची भुमिका घेतल्याने वाद चिघळल्याने प्रकल्प मंजुर होण्यासाठी भुसंपादन विधेयकात असलेली 80% लोकांची संमती ही तरतुद पुर्ण होणे कठीणच दिसतेय. यापुढेही पालकमंत्र्यांची भुमिका अशीच आडमुठेपणाची राहिली तर प्रकल्पविरोधकांची तडीपारी होवो न होवो पण दस्तरखुद्द सी-वर्ल्ड प्रकल्पाची तडीपारी निश्चितच आहे.

*********** समाप्त**********

(ता.क. फेसबुकवरील माझ्या मित्रांना सी-वर्ल्ड प्रकल्पविरोधाची पार्श्वभुमी अधिक माहिती देण्यासाठी पुढे काही मुद्दे मांडत आहे. मुळ लेखादरम्यान विषयांतर नको म्हणुन लेख संपल्यावर मांडतोय.

राजकीय नेते आणि स्थानिक लोक यांच्यामधील संघर्षाची पहिली ठिणगी दोडामार्गात कळणे येथे पडली. कळण्याच्या निसर्गसंपन्न भागात मायनिँग प्रकल्प करणार आहेत याची चाहुल लागताच लोकांच्या मनातील असंतोषाचा स्फोट झाला. पर्यावरण रक्षणासाठी रस्त्यावर उतरुन त्यांनी आंदोलन केले.निष्ठुर आणि निर्दयी अशा नेतेमंडळीनी आंदोलन चिरडण्यासाठी पोलीसी बळाचा वापर केला. प्रकल्पस्थळी सुरक्षारक्षकाचा खुन करुन त्याच्या खोट्या केसेस आंदोलनातील प्रमुख नेत्यांवर टाकुन आंदोलन चिरडले आणि मायनिँग करत निसर्गसंपन्न कळणे गाव भकास करुन टाकले. सिँधुदुर्गाच्या शेजारी असणा-या जैतापुरमध्ये विनाशकारी अणुप्रकल्प थाटण्याचा घाट काँग्रेस सरकारनेच घातला. अणुप्रकल्पविरोधी मच्छिमार आणि शेतक-यांचे आंदोलन चिरडण्यासाठी प्रसंगी गोळीबार करुन आंदोलकांना जीवानीशी मारले. काँग्रेस सरकार लोकशाहीचा बुरखा पांघरुन, आंबेडकरांचे संविधान पायदळी तुडवत, भारतात करत असलेल्या हुकुमशाहीचे जैतापुरातील गोळीबार हे जीवंत उदाहरण आहे. त्यानंतरही आंदोलक माघार घ्यायला तयार नसल्याने या काळ्या इंग्रजांनी ब्रिटीशांच्याच "तोडा, फोडा आणि राज्य करा" नितीचा अवलंब करत जैतापुर अणुप्रकल्पविरोधी आंदोलनातील कर्करोगाने ग्रासलेल्या अध्यक्षाला भरपुर पैसे देत फितुर करुन आंदोलन संपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. चिपी विमानतळ प्रकल्पासाठी सात-बारा मध्ये खोट्या पेन्सिल नोँदी करुन कवडीमोल किँमतीत स्थानिक लोकांची जमीन हडपली.आता उल्लेख केलेल्या प्रकल्पांपैकी जैतापुर अणुप्रकल्प आणि चिपी विमानतळ हे सिँधुदुर्गचे सर्वेसर्वा पालकमंत्री नामदार नारायण राणे साहेबांचे महत्वाकांक्षी प्रकल्प होते.
'प्रहार' वर्तमानपत्रातील स्वयंघोषित अभ्यासु, विद्वान पत्रकार संतोष वायंगणकर विरोधी पक्षांवर आरोप करताना म्हणाले, एकीकडे विरोधी पक्षातील नेते जिल्ह्याचा विकास झाला नाही अशी बोँब मारतात आणि दुसरीकडे विकासप्रकल्पांबाबत खोटेनाटे सांगुन लोकांची डोकी भडकवतात. आता या प्रतिभावन पत्रकाराच्या या आरोपात किती तथ्थ्य आहे याचा आपण आढावा घेऊ.
जर विरोधक लोकांची माथी भडकवण्यात यशस्वी होत आहेत असे वायंगणकरांचे म्हणणे आहे. याचाच अर्थ लोकांमध्ये राणे साहेबांपेक्षा विरोधकांची विश्वासाहार्ता जास्त आहे ही गोष्ट ते स्वतःहुन कबुल करतायेत. मग लोक आपल्यावर विश्वास ठेवायला का तयार होत नाही याचा विचार देखील त्यांनी स्वतःच करायला नको का...? ज्या लोकांनी गेली 23 वर्षे दादासाहेबांना भरभरुन प्रेम दिले तेच लोक आताच दादांविरोधात का आवाज उठवु लागले...??राणेँच्या आसपास पोहचु शकेल असा एकही नेता कोणत्या विरोधी पक्षात आजच्या घडीला उपलब्ध नसताना जर लोक राणेँविरोधात आवाज उठवत असतील तर ते कोणा नेत्याच्या प्रभावाखाली ओरडत नसुन नक्कीच पोटतिडकीने ओरडत आहेत, हे राणेसमर्थकांनी नीट लक्षात ठेवावे. कोणत्याही विनाशकारी प्रकल्पाला लोकांनी विरोध केला की विकासाची ढाल पुढे करण्यात येते. आता तुम्ही या विनाशकारी प्रकल्पातुन स्थानिकांचा नेमका कोणता विकास करणार जरा स्पष्ट कराल का...?
जैतापुर अणुप्रकल्पाने वीस हजार रोजगार उपलब्ध होतील आणि स्थानिक लोकांचा विकास होईल अशी वाक्ये राणेसाहेबांच्या तोँडुन कित्येकदा ऐकली आहेत. आता या घोषणेत नेमकी बनवाबनवी कुठे आहे ते मी तुम्हाला सांगतो. अणुऊर्जाप्रकल्पामध्ये रोजगार द्यायचा म्हटला तर त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा पास होणे गरजेचे असते. परीक्षा पास होणे खुप दुरची गोष्ट राहिली, त्या परीक्षेस बसण्यास पात्र ठरतील अशी एक हजार मुले स्थानिक भागात शोधुन सुद्धा सापडणार नाहीत. याचाच अर्थ जैतापुर प्रकल्पात वीस हजार रोजगार नक्कीच निर्माण होतील पण त्यांच्या जागा भरण्यासाठी येतील ते उच्चशिक्षित परप्रांतीय...!स्थानिकांच्या वाट्याला येईल ते भलेमोठे शुन्य...! अणुप्रकल्पात काम करायचे म्हटल्यावर त्यातील यंत्रणेची संपुर्ण माहिती स्थानिक विद्यार्थ्याँना असायला हवी. तुम्हाला अणुप्रकल्पातील 'अ'सुद्धा माहिती नसेल तर अणुप्रकल्पामध्ये नोकरी करुन तिकडे काय गोट्या खेळणार आहात...? मुळात अशा अर्धवटांना कोणी नोकरीच कशासाठी देईल...?? मग स्थानिकांना वीस हजार रोजगार उपलब्ध होतील अशा थापा राणे साहेब का मारत आहेत...???
आता या निमित्ताने गेल्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत कोकणचा शैक्षणिक विकास कितपत झाला हा प्रश्नदेखील उपस्थित
होतो. आजदेखील महाराष्ट्रात दहावी-बारावीत कोकण बोर्डाचा निकाल सर्वाधिक असतो. याचाच अर्थ इकडे गुणवत्तेची अजिबात कमी नाही. फक्त या विद्यार्थ्याँना पदवी किँवा पदव्युत्तर शिक्षणासाठी काँलेजची संख्या उपलब्ध नसल्याने त्यांना मुंबई-पुणे सारख्या शहरांवर अवलंबुन रहावे लागते. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे काहीजण अर्ध्यावरच शिक्षण सोडुन देतात. गेल्या 20 वर्षात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सिँधुदुर्गात मुबलक काँलेज बांधली असती तर त्या विकासाला विरोध करायची विरोधकांची हिँमतच झाली नसती.तुमच्या नाकर्तेपणामुळे आज कोकणातील मुले शिक्षणासाठी शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत आणि तुम्ही जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले म्हणजे आम्ही विकास केला अशा बढाया का मारता...? लोकांनी स्थलांतर केले की दरडोई उत्पन्न वाढणारच हा साधा हिशेब आहे.
आज सिँधुदुर्गात कोणाला ह्रुदयविकाराचा धक्का आला तर शस्त्रक्रियेसाठी बेळगाव किँवा कोल्हापुरात न्यावे लागते. मोठा अपघात झाला तर बांबुळीत न्यावे लागते. त्यात अनेकदा लोक दगावतात. 20 वर्षात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज रुग्णालय उभारले असते तर तुम्ही निदान आरोग्याच्या बाबतीत तरी विकास केलात अस लोकांनी म्हटल असत.
इतक्या वर्षात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करणे तुम्हाला जमले नाही. लोकांच्या सामान्य आयुष्याशी निगडीत रस्ते, शिक्षण, आरोग्य कोणत्याच बाबतीत तुम्हाला उत्क्रुष्ट खुप दुर राहिली पण सरासरी कामगिरीसुद्धा करता आली नाही. मग नेमका काय विकास केलात...? 20 वर्षापुर्वी सायकल वरुन फिरणारे तुमचे समर्थक आज होँडासिटीतुन फिरु लागले म्हणजे विकास झाला का...??आपलाच कंपु गोळा करुन आम्हीच विकास केली अशी भाषणे ठोकायची आणि पाठीमागुन 'होय महाराजा' म्हणायला मिँध्यांची फौज हजरच असते.
काँग्रेसचेच आमदार विजय सावंत शिडवणेत साखर कारखाना काढत होते आणि त्याला राणे साहेबांनीच कडाडुन विरोध केला. मग आता लोकांची माथी का भडकली नाही...? राणेँसोबत लोकांनीही साखर कारखान्याला का विरोध केला नाही...?? उगाच प्रत्येक गोष्टीला विरोध करायला सिँधुदुर्गातील जनता दुधखुळी नाही. साखर कारखान्यात आपण पिकवलेला ऊस विकता येईल आणि त्यामुळे उदरनिर्वाहासाठी पैसे मिळतील, हा व्यवहार त्यांना कळतो. विरोधी पक्षाचे आमदार प्रमोद जठार यांनी देवगडात फळांवर प्रक्रिया करणारा कारखाना काढला आणि त्याला लोकांनी कधीच विरोध केला नाही. जठारांच्या 'कोकण दुध' संकल्पनेला लोकांकडुन भरभरपुन प्रतिसाद मिळाला कारण या तिन्ही प्रकल्पात पैसा थेट स्थानिकांना मिळुन त्यांचा विकास होत होता.
साखर कारखान्याला विरोध करुन राणेसमर्थकांनी नेमके काय साधले...? जठारांचे 'कोकण दुध' संपवण्यासाठी सिँधुदुर्गात 'गोकुळ'चा झालेला शिरकाव सगळ्यांनी पाहिला.सामान्यांना फायदा पोहोचवुन त्यांचा खरोखरीचा विकास करणा-या प्रकल्पात कोण खडे टाकु पाहतय हे एव्हाना लोकांना सुद्धा कळुन चुकलय. त्यामुळेच अलीकडच्या काही वर्षात विरोधी पक्षातील नेतेमंडळीनी उभारलेल्या कारखान्यांना लोक पाठिँबा देत आहेत तर प्रकल्पाचे निमित्त पुढे करुन विकासाच्या नावाखाली लोकांच्या जमिनी हडपणारे अशी पालकमंत्र्यांची ख्याती झाल्याने ते करु पाहत असलेल्या सगळ्याच प्रकल्पांना लोक विरोध करतायेत. मग तो पर्यावरणपुरक सी-वर्ल्ड प्रकल्प का असेना...!)

नाते अपुले गुंतागुंतीचे...


आजकाल मुल-मुली जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा त्या नात्यावर चित्रपट किँवा डेली सोप सिरीयलचाच प्रभाव जास्त पडलेला दिसतो. प्रेमात असताना पडद्यावरील एखादी जोडी आपल्याला आदर्श वाटु लागते आणि आपल्यातील प्रेम देखील अगदी त्याच जोडीप्रमाणे फुलत जावे, अशी भाबडी आशा वाटते. दुर्देवाने पडद्यावरील जोड्या पाहणं आणि ख-या आयुष्यातील प्रेम निभावण यात जमीन आसमानाचा फरक असतो. नात हे कधीही फिल्मी असु शकत नाही. आपल नात फुलवण्यासाठी जितके शक्य असेल तितके प्रयत्न अवश्य करावे पण ते अगदी चित्रपटातील नात्याप्रमाणे आदर्शच असायला हवे हा अट्टाहास करु नये. नात आदर्श बनवण्याच्या नादात ते तुटण्याचीच शक्यता जास्त असते.चित्रपटात प्रियकर-प्रेयसीचे एकमेकांशी भांडण, नंतर प्रेयसीने रुसण आणि मग प्रियकराने तिची समजुत काढण हे पडद्यावर खुप रोमँटिक वाटत. आता तोच रोमान्स ख-या आयुष्यात अनुभवण्यासाठी तुम्ही कारण नसताना भांडण कराल तर प्रत्येक वेळी रुसल्यावर प्रियकरच येऊन समजुत काढेल ही अपेक्षा करणे चुकीचे.
काही जोडप्यांची एकमेकांमध्ये जितकी जास्त भांडण होतील तितक आपल एकमेकांवर जास्त प्रेम आहे, अशी भंपक समजुत झालेली असते. चित्रपट पाहुन असले मुर्खासारखे निष्कर्ष काढु नका. तुमच्यात सतत भांडणे होत असतील तर तुमच्या दोघांची मानसिकता पुर्णपणे विरुद्ध दिशांना जाणारी आहे आणि अशी नाती फार काळ टिकत नाहीत. अनेकदा स्वभावात साम्य नसल,अगदी परस्परविरोधी स्वभाव असले तरी काही जोडपी सुंदरपणे नात निभावुन नेतात कारण त्यांच्यात प्रेम निभावण्यासाठी लागणारे सामंजस्य असते आणि या सामंजस्यामुळेच त्यांच्यातील प्रेम उत्तरोत्तर वाढत जाते.कुठल्याही नात्यात प्रेयसीच्या मित्रावरुन किँवा प्रियकराच्या मैत्रीणीवरुन संशय घेत काही लोक विनाकरण भांडण करत स्वतःला मानसिक त्रास करुन घेतात. त्यापेक्षा अंतर्मुख होऊन अशा फालतु गोष्टीँना विनाकारण महत्व देत दोघांनाही मनस्ताप करुन घेण्यापेक्षा नात्याला जास्त महत्व देणे केव्हाही चांगले. तुम्हाला तिच्या सानिध्यात आल्यावर पुर्ण समाधानी, मोकळ, सुरक्षित आणि आनंदी वाटत असेल तर तुम्ही योग्य जोडीदार निवडला आहे अस समजायला काहीच हरकत नाही. प्रेमात आपल्यासाठी आपल्या जोडीदाराने बदलाव ही अपेक्षाच करण मुळी चुकीच असत कारण जोडीदार आहे तसा स्वीकारला जातो तेव्हा त्या नात्याचा पाया अधिक घट्ट झालेला असतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा गुणदोषांसकट केलेला स्वीकार त्या नात्याच्या खरेपणावर शिक्कामोर्तब करतो. अशावेळी ते नात आपोआप फुलत राहत. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे गुण-दोष सगळ काही माहित असत आणि त्याचमुळे प्रत्येक गोष्टीवर सामंजस्याने तोडगा काढण्यास मदत होते.एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारल्यामुळे परस्परांबाबत लागणारा आदर आपोआप मिळतो. नात्यामध्ये परस्परांबाबतची मत, जाणीवा, आचारविचार यांचा आदर राखण फार महत्वाच असत. एखाद्या प्रसंगी आपला जोडीदार कसा रिअँक्ट होईल हे ग्रुहीत धरलेल असेल तर बहुतांश वेळा तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. केवळ जोडीदारामुळे तुम्हाला तुमची स्वप्न, करिअर, प्राधान्यक्रम बदलावे लागत असतील तर तुम्ही त्या नात्यात वाहवत चालला आहात. म्हणुनच सांगतो जेव्हा तुम्हाला स्वतःला कुणासाठी बदलाव लागत नाही तेव्हा तुम्ही परमेश्वराने तुमच्यासाठी बनवलेल्या जोडीदारासोबत आहात याची खात्री बाळगावी. आयुष्यात प्रत्येकालाच ज्यांना आपल मानाव अशी माणस भेटतातच असे नाही. काही वेळा आपली माणस भेटतात पण आयुष्यभरासाठी आपली साथ न देता अर्ध्यावरच सोडुन जातात. त्यामुळे तुमच्या सुदैवाने तुम्हाला कोणी सुयोग्य जोडीदार भेटला असेल तर खुळचट फिल्मी कल्पनांनी त्याला तुम्ही गमावु नये यासाठीच हा लेख लिहायचा प्रपंच केला कारण आयुष्यात काही खास नात्यांमुळे निर्माण झालेल्या पोकळ्या कधीच भरुन येत नसतात.

प्रेमरंगांची दुनियादारी...

'दुनियादारी' चित्रपट सुपरहिट झाला कारण यात दाखवलेली श्रेयस आणि डीएसके यांची अतुट मैत्री तरुणांना खुपच भावली. श्रेयस-शिरीनची लव्ह स्टोरीही तितकीच आवडली पण मैत्रीच्या छायेत 'दुनियादारी' चित्रपटात दाखवलेल्या वेगवेगळ्या जोडप्यांमधील लव्हस्टोरीजचे विविध पैलु निश्चितच झाकोळले गेले. 'दुनियादारी' चित्रपटाचा एकंदरीत एक संपुर्ण चित्रपट म्हणुन विचार करण्यापेक्षा त्यात दाखवलेल्या श्रेयस, शिरीन, मीनु, डीएसके आणि एमके यांचा त्यांच्या त्यांच्या जागी विचार केला किँवा त्यांच्या मनात नक्की काय चालले असेल याचा विचार केला तर प्रेमाचे विविध पैलु उलगडण्यास आणि समजुन घेण्यास मदत होते. स्वतःच्या आयुष्यातही विशिष्ट परिस्थितीत आपण त्यांचा उपयोग करुन त्याप्रमाणे वागु शकतो. चित्रपटातील पात्रांच्या भावना शब्दात लिहुन दाखवणे खरच खुप कठीण काम आहे पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. चला तर मग.

1) श्रेयसचा भाबडेपणा स्वप्नील जोशीने अतिशय सुंदर पद्धतीने साकारलाय. श्रेयसच शिरीनवर प्रेम असत आणि त्याला तिच्याशीच लग्न करायच असत. मीनुच्या वडिलांचा बदला घेण्याच्या उद्देशाने श्रेयसचे मित्र त्याला मीनुसोबत प्रेमाचे नाटक करायला सांगतात. इच्छा नसताना श्रेयस यात फुकटचा भरडला जातो. कालांतराने मीनु श्रेयसमध्ये गुंतु लागते. इकडे शिरीनच श्रेयसवर प्रेम असत आणि मीनु श्रेयसच्या जवळ गेली की तिचा जळफळाट होतो. त्याच रागात श्रेयसला लहान मुलगा संबोधत ती त्याला कँडबरी चाँकलेट आणि बिस्किट यातील एकाची निवड करता येत नाही असे सांगते. त्यावेळी श्रेयसला शिरीनच दिर्घ चुंबन घेत मिठीत घेऊन आपल्या प्रेमाची कबुली द्यावी लागते. जेव्हा मीनु घरदार सोडुन श्रेयससोबत लग्न करायला येते त्यावेळी तो तिचा गैरफायदा घेऊ शकला असता पण मीनुला शिरीनवरील आपल्या प्रेमाची प्रामाणिकपणे कबुली देत तो तिला पुन्हा घरी जायला सांगतो. पुढच्या आयुष्यात शिरीन जोडीदार म्हणुन मिळणार की नाही याची श्रेयसला खात्री नसते पण त्यामुळे मीनुला खोट्या प्रेमात अडकवुन तो लग्न करत नाही.शेवटी कितीही झाल तरी मुळातच शिरीनवर प्रेम असल्यामुळे तो लग्नानंतरही मीनुवर प्रेम करु शकलाच नसता. निर्णायक वेळ येते त्यावेळी जीवावर उदार होत श्रेयस आपल्या ख-या प्रेमाला म्हणजेच शिरीनला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतो. दुनियादारीतील श्रेयस आपल्याला एवढच शिकवतो की जर तुम्ही प्रेम केलेली व्यक्ती काही अपरिहार्य कारणांमुळे तुमची जोडीदार होऊ शकत नसेल तर लगेच दुस-या कोणाला होकार कळवु नका. आपल्या प्रेमाशी प्रामाणिक राहा आणि तुमच प्रेम खर असेल तर मार्ग नक्कीच सापडतील. स्वतःला स्वतःच प्रेम मिळत नसेल तर दुस-या कोणासोबत प्रेम नसताना लग्न करुन त्या व्यक्तीचे आयुष्य बरबाद करण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही. कदाचित त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुसरा कोणी खर प्रेम करणारा भेटला तर तिच्या आयुष्याचे नंदनवन होऊ शकते. जसे मीनुवर तिच्या नव-याने खुप प्रेम केले पण स्वतःचे खरे प्रेम नसताना एखाद्याशी लग्न करुन आपण त्याचे आयुष्य बरबाद करु नये.

2) शिरीनबद्दल बोलायच तर प्रेम आणि लग्न यांच्या गुंत्यात अडकलेल्या मुलीच्या भुमिकेला सई ताम्हणकरने योग्य न्याय दिला आहे. शिरीन श्रेयसवर प्रेम करते खरी पण घरातल्यांच्या दबावाखाली किँवा इच्छेखातर तिला खलनायकाशी म्हणजेच जितेँद्र जोशीशी लग्न करायची वेळ आलेली असते. तिला श्रेयसच प्रेमही कळत असत, त्याच वेळी तिच देखील श्रेयसवर प्रेम असत पण स्वतःच्या ठरलेल्या लग्नामुळे ती श्रेयसला मीनुच प्रेम स्वीकारुन तिच्याशी लग्न करायचा सल्ला देते. वर वर कितीही दाखवल तरी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिला दुस-यासोबत बघुन जीव तुटायचा तो तुटतोच. त्यामुळेच सगळ्या परिस्थितीची जाण असली तरी मीनुसोबत श्रेयसला पाहुन शिरीनला दुःख होत. आपल्याला दुस-या कोणाशी लग्न करायच आहे याची जाण असताना ती श्रेयसच्या प्रेमात वाहत जाते. त्याला दिर्घ चुंबन घेऊ देते, त्याच्या मिठीत शिरते. डाँक्टर असल्यामुळे श्रेयसच्या आजाराबद्दल समजल्याने तो वर्षभरात मरणार याची तिला जाणीव असते पण त्यामुळे शिरीनच श्रेयसवरील प्रेम तसुभरही कमी होत नाही. शेवटी श्रेयसशीच लग्न करुन त्याच्या निधनानंतर मुलांसमवेत श्रेयसच्या आठवणीत जगण शिरीन पसंत करते.

3) मीनुची सोज्वळ भुमिका उर्मिला कानेटकरने साकारलीय. श्रेयसच्या मित्रांनी रचलेल्या सापळ्यात अडकुन ती श्रेयसच्या खोट्या प्रेमाचा स्वीकार करते पण कालांतराने ती श्रेयससारख्या गुणी मुलावर जीव उधळुन प्रेम करु लागते. त्याच्यासोबत लग्नाची स्वप्ने बघते. इतकेच काय श्रेयससाठी घरदार सोडुन लग्नासाठी पळुन देखील येते. ज्यावेळी श्रेयस मीनुला त्याच्या आणि शिरीनच्या नात्याबद्दल सांगतो तेव्हा मीनु म्हणते, "तुझ शिरीनवर प्रेम मला माहित होत पण आयुष्यात कधीतरी तु माझ्यावर देखील प्रेम करशील या भावनेनेच मी तुझ्यावर प्रेम करत होते." मीनुकडुन आपणा सर्वाँना प्रेमातील त्याग शिकता येतो. प्रत्येक वेळी तुम्हाला आवडणारी व्यक्ती तुमची होईलच असे नाही. काही वेळा जर त्या व्यक्तीच्या ह्रुदयात कोणी दुसरच असेल तर त्या व्यक्तीच्या भावनांचा सन्मान करत कोणतीही कुरकुर न करता आपण बाजुला व्हावे. जसे श्रेयसने लग्नाचे प्रपोजर नाकारल्यावर कोणतीही तक्रार न करता मीनु बाजुला गेली.

4) डीएसपी बाबत काय बोलायच...? टपोरी, दंगेखोर परंतु तितकाच हळवा, लव्हर बाँय डीएसपी अंकुश चौधरीने साकारलाय. त्याच्या प्रेयसीवर तो खुप प्रेम करतो परंतु त्याच्या गुंडगिरीमुळे तिचे वडील तिच लग्न दुस-यासोबत करुन देतात. त्यानंतर आपल्या घरच्यांना त्रास न देण्याच आणि तिने त्याला लिहिलेली पत्रे जाळुन टाकण्याच वचन ती त्याच्याकडुन घेते. डीएसपी गुंड असल्याने तो तिच्या नव-याला आरामात मारु शकला असता किँवा तिने लिहिलेली लव्हलेटर्स तिच्या नव-याला दाखवुन तिच लग्न मोडु शकला असता पण एक गुंड असुनही डीएसपी तस वागला नाही. आपल्या प्रेयसीच लग्न झाल आहे हे सत्य त्याने स्वीकारल. स्वतःला झालेल दुःख स्वतः सहन केल पण आपल्या प्रेयसीच्या संसारात खडे टाकले नाहीत. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर खर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या सुखात आपल सुख आहे याची शिकवण यातुन मिळते. फक्त आपल्या प्रेयसीच कुणा दुस-यासोबत लग्न झालय म्हणुन वेगवेगळ्या कुरापती करुन तिला त्रास देत दुःख देणार असाल तर 'प्रेम' शब्द तोंडात घ्यायची सुद्धा आपली लायकी नाही, एवढ नीट लक्षात घ्या.

5) संदीप कुलकर्णीने साकारलेला एम.के.ची भुमिका कितीही छोटी असली तरी ती दुर्लक्षित करता येत नाही. खासकरुन त्याने शेवटी श्रेयसला सांगितलेली ही वाक्ये आयुष्यातील प्रेमाबद्दलचे कटु सत्य सांगुन जातात. "जेव्हा कोणी आपल तोँड दाबत तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी आपण जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो पण हाच प्रयत्न जेव्हा आपल प्रेम वाचवण्याची वेळ येते तेव्हा आपण करत नाही."

श्रेयसच्या आईवर म्हणजेच वर्षा उसगावकरवर एम.के. खुप प्रेम करतो पण एका उद्योगपतीशी (श्रेयसच्या बाबांशी) लग्न करुन ती एम.के.चे प्रेम नाकारते. केवळ पैशांखातर आपल प्रेम नसलेल्या व्यक्तीशी प्रेम करण आणि त्यानंतर त्याच्याशी शारिरिक संबंध ठेवुन मुलांना जन्म देण म्हणजे समाजमान्य बलात्कार आहे, हे ती श्रेयससमोर मान्य करते. पैशांच्या हव्यासापोटी ख-या प्रेमाशी प्रतारणा करुन खोट्या सुखाच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यभर दुःखच वाट्याला येते कारण खर सुख तर ख-या प्रेमातच दडलेल असत ना....! ज्याच्यावर खर प्रेम असेल त्याच्याशी लग्न केल आणि पुढे कितीही खडतर दिवस आले तर आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सानिध्यात आपणाला त्या दिवसातही सुखच मिळत.

(ता.क.- काही चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच एवढे गाजतात की ते प्रदर्शनानंतर सुपरहिटच होतील याची खात्री असते. 'दुनियादारी' चित्रपट याचेच एक उदाहरण आहे. सुहास शिरवळकरांची दुनियादारी कादंबरीच इतकी गाजली होती की त्यावर आधारित चित्रपटच सुपरहिट व्हायलाच पाहिजे होता.

एखादा चित्रपट जेव्हा सुपरहिट होतो तेव्हा तो चांगलाच असतो याची खात्री देता येत नाही. आता यातील 'चांगला' शब्दाचा अर्थ व्यक्तीसापेक्ष बदलत जातो. चेन्नई एक्सप्रेस, दबंग, वाँटेड, एक था टायगर सारखे टुकार चित्रपट जेव्हा 100-200 कोटीँचा धंदा करुन सुपरहिट म्हणुन गणले जातात तेव्हा त्यांना कोणत्या नजरेने चांगल म्हणाव हाच प्रश्न मला पडतो. पुढच्या पिढीला रफी, किशोरदा, आशाताई लता मंगेशकरांपेक्षा मिका सिँग, यो यो हनी सिँगच गायक म्हणुन 'चांगला' वाटणार, या वाक्यावरुन मला काय म्हणायच ते समजुन घ्या.

असो, हल्लीच्या काळात एकापेक्षा एक मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे. अगदी श्वास चित्रपटापासुन दुनियादारी पर्यँत कित्येक चांगले चित्रपट निर्माण झाले आणि त्या सगळ्यांमध्ये मला 'डोँबिवली फास्ट' सर्वात जास्त आवडला.जेव्हा मी एखादा नवीन मराठी चित्रपट पाहतो तेव्हा त्याचे मुल्यमापन मी 'डोँबिवली फास्ट'चा तराजु लावुनच करतो. प्रेक्षकांनी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' किँवा अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'बालक पालक' चित्रपटांना भरघोस पैसे मिळवुन लोकप्रियतेची पावती दिली पण माझ्या लेखी हे दोन्ही चित्रपट 'डोँबिवली फास्ट'च्या आसपास सुद्धा पोहोचत नव्हते. अशातच दुनियादारीने 22 कोटीँचा धंदा करत मराठी चित्रपटातील एव्हरेस्ट गाठले पण तो चित्रपट तरी चांगला असेल का नाही याबद्दल मी साशंक होतो. दुनियादारी प्रदर्शित झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर काल खास वेळ काढुन बघितला. त्यावेळी खात्री पटली की 'दुनियादारी' चित्रपट 'डोँबिवली फास्ट' इतकाच चांगला आहे. नव्हे, उत्क्रुष्ट संगीत दिग्दर्शनामुळे तो डोँबिवली फास्टपेक्षाही सरस ठरतो.)