सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१३

शिवसेनेचे गत'वैभव' पुन्हा परतले...!


 'नडला त्याला फोडला' हे ब्रीदवाक्य घेऊनच शिवसेनेचा जन्म झाला आणि त्यातही कोकणी माणसाचा वाटा सिँहाचा होता. 90 च्या दशकात शिवसेना ख-या अर्थाने कोकणात पाळेमुळे धरु लागली. कोकणचा प्रांत महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात सभ्य आणि विद्वान लोकांचा मतदारसंघ म्हणुन ओळखला जायचा तरीही संयमी कोकणात शिवसेनेची 'राडा संस्क्रुती' रुजवण्यात बाळासाहेबांचे तत्कालीन खंदे शिलेदार नारायण राणेँनी यश मिळवले. 1990 नंतर राणेँनी मागे वळुन पाहिले नाही आणि बघता बघता अवघ्या कोकण प्रांतावर शिवसेनेचा भगवा फडकवला. यशाच्या धुंदीत बाळासाहेब राणेँच्या एका टेकुवर कोकणात शिवसेनेचा मनोरा उभारण्याची चुक करुन बसले आणि जेव्हा अंतर्गत मतभेदांमुळे राणेँनी आपला आधार काढुन घेतला तेव्हा शिवसेनेच्या सत्तेचा मनोरा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. एकेक मावळा गोळा करुन बांधलेला कोकणातील शिवसेनेचा गड एकाएकी कोसळणे म्हातारपणात बाळासाहेबांना सहन होणारे नव्हते. त्या वयातही आपला पट्टशिष्य राणेँना निवडणुकीत हरवण्यासाठी बाळासाहेबातील द्रोणाचार्य पुढे सरसावला. यावेळी सुद्धा महाभारताचीच पुनराव्रुत्ती होऊन अर्जुनाप्रमाणे राणेँनीही 'गुरुची विद्या गुरुला' देत बाळासाहेबांच्या उमेदवाराचा अनामत रक्कम जप्त करुन पराभव केला. पश्चाताप करण्यावाचुन बाळासाहेबांसमोर अन्य कोणता पर्याय नव्हता. अशा बिकट परिस्थितीत बाळासाहेबांची मदत करण्यासाठी काँग्रेसमधुन शिवसेनेत प्रवेश करत पुढे सरसावला तो वैभव नाईक...!
राजकरणात नशीबाचे फासेच असे पडले होते की नाथ पै, दंडवते यांच्या कर्मभुमीला ज्या शिवसेनेने श्रीधरजी नाईक यांची हत्या करुन लाल केली त्याच शिवसेनेत त्याला प्रवेश करावा लागत होता. वैभवने जिल्हाप्रमुख होताच शिवसेनेतील मरगळ झटकली आणि पुन्हा एकदा आहेत त्या शिवसैनिकांना हातीशी धरुन शिवसेनेची वज्रमुठ पुन्हा बांधायचा प्रयत्न केला. 2009 मध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघातुन विधानसभेची निवडणुक लढवण्यासाठी वैभव नाईक दस्तरखुद्द नारायण राणेँसमोर दंड थोपटत उभा राहिला. 2005 पोटनिवडणुकीतील उपरकरांप्रमाणे राणे साहेब वैभव नाईकची अनामत रक्कम जप्त करतील अशी चर्चा सर्वत्र होत होती.त्यातकरुन अगदी निवडणुकीदिवशीच वैभव नाईकवर रिव्हाँलर रोखण्यात आली पण न डगमगता वैभव ठामपणे राजकीय दहशतवादाविरोधात उभा राहिला. निवडणुकीचा निकाल आला तेव्हा एकेकाळी कोकणवर वर्चस्व असणारा नारायण राणेँसारखा मातब्बर नेता अवघ्या 25 हजार मतांनी जिँकला होता. वैभवच्या पराभवातच त्याचा खुप मोठा विजय होता. 2009 लोकसभा निवडणुकांवेळी राजकीय दहशतवादाविरोधात शड्डु ठोकणा-या वैभवलाच अंकुश राणे खुनप्रकरणात नाहक गोवण्यात आले. सत्याची कास धरणा-या वैभवने स्वतःच अंकुश राणे खुनप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. गेली 5 वर्षे त्याच्यावरील खोटे आरोप अजुन सिद्ध व्हायचे आहेत.

अशा या वैभव नाईकने कालच कणकवलीत पोलिसांसोबत राडा केला आणि निमित्त होते 'आमने-सामने'चे...!
मुळात लोकसभेसाठी शिवसेनेकडुन तिकीट मिळवुन खासदारकीची दिवास्वप्ने पाहणा-या विनायक राऊत नामक स्वयंघोषित नेत्याने 'आमने-सामने'ची फुस लावली. काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शवल्यावर आमदार राऊतांनी कारणे देत सोयीस्करपणे पळवाट काढली. कार्यकर्त्यांचे जाळे मजबुत असणा-या काँग्रेसला एकट्याने शिँगावर घेणे भातुकलीचा खेळ नव्हे.शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्यावर वैभव नाईक ढाण्या वाघाप्रमाणे डरकाळी देत 'आमने-सामने'चे आव्हान स्वीकारण्यास सज्ज झाला. 'आमने-सामने' हा असा राजकीय सामना होता, ज्याचा निकाल कोणीही कितीही लढले तरी अनिर्णित असाच लागणार होता कारण या सामन्याचा निकाल ठरवणारा पंचच कोणी नव्हता. फक्त काँग्रेस-शिवसेनेचे खेळाडु या राजकीय सामन्याच्या खेळपट्टीवर उतरण्याचे धारिष्ट्य दाखवतात का पळ काढतात, हेच पाहणे औत्सुक्याचे होते. काँग्रेसचे तीन जण सभाग्रुहात आपल्या कार्यकर्त्याँनीशी दाखल झाले. त्यानंतर थोड्याच वेळात काँग्रेस कार्यकर्त्याँनी भरलेल्या त्या सभाग्रुहात वैभव एकटाच घुसला, त्याला पोलिसांनी रोखले आणि नंतर कालचा राडा घडला. मला त्यावर भाष्य न करता एक सामान्य नागरिक म्हणुन काही मुलभुत प्रश्न केवळ उत्सुकतेपोटी विचारायचे आहेत.
1) पोलिसांना आमने-सामने होऊ द्यायचे नसेल तर अगोदरच काँग्रेसच्या पदाधिका-यांना सभाग्रुहात जाण्यापासुन रोखले का नाही...?
वैभव नाईक तिकडे आल्यावर शांततेचा प्रश्न कसा काय निर्माण होतो...??
मुळातच आमने-सामने ही विचारांची लढाई होती. ती काही कुस्तीस्पर्धा नव्हती. मग शांततेचा भंग होण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो...???
शिवाय वैभवला हाणामारी करायचीच असती तर तो शिवसैनिकांना घेऊन सभाग्रुहात गेला असता. ज्यांना हुल्लडबाजी करायची होती तेच कार्यकर्त्याँना सभाग्रुहात घेऊन येणार हा साधा हिशेब आहे आणि कार्यकर्ते घेऊन सभाग्रुहात कोण आलेले हे जगजाहीर आहे.

2) वैभवला पोलिसांनी अटक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्याँनी आमने-सामने जिँकल्याच्या आवेशात फटाके फोडले. त्यानंतर वैभवला पोलिसांनी सोडल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडले. मग फक्त शिवसैनिकांवरच लाठीमार का करण्यात आला...? कायदा फटाके फोडणा-या काँग्रेस कार्यकर्त्याँना लागु होत नाही का...??

3) पोलिसांनी लाठीमार करताना शिवसेना कार्यालयानजीकच्या हाँटेलमध्ये चहा पिणा-या ग्राहकांना विनाकारण मार का दिला...?

4) दोन दिवसापुर्वीच महिला शक्तीच्या नावे भाषणे ठोकणारे नेते शिवसेना कार्यालयात घुसुन पोलिसांनी महिलांना अमानुषपणे त्यांच्या पाठीवर वळ उठेपर्यँत मारले तेव्हा कुठे होते...? की तुमचे महिलाप्रेम फक्त निवडणुकात मते मिळवण्यापुरतीच आहे...??

5) कणकवली राडा प्रकरणाबाबत ग्रुहमंत्री आबा पाटीलांची अजुनही प्रतिक्रिया का आली नाही...? काल महिलांवर लाठीमार करण्यात पुरुषार्थ दाखवणारे आबांचे पोलिस आझाद मैदान दंगलीवेळी झोपले होते का...?? ग्रुहखात सांभाळता येत नसेल तर आबांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

7) रमेश मणचेकर खुन प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले होते. अंकुश राणेँच्या खुन्याचा पोलीस गेली पाच वर्षे तपास लागलेला नाही. होँडा शोरुम जाळकांडातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत मोकाट फिरतायेत. वैभव नाईक सातत्याने याप्रश्नी लोकांमध्ये आवाज उठवत होते. काल पोलिसांनी वैभववर केलेला लाठीमार याचीच तर प्रतिक्रिया नसेल...? अशा कठीण प्रसंगी भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन वैभव नाईकला पाठिँबा द्यायची गरज आहे. काल पोलिसांकडुन मार खाणारा वैभव होता, उद्या तो तुमच्यापैकीच कुणीतरी असेल.

या सगळ्यात एक प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतो-
"सत्तेच्या माजापुढे सामान्य लोक खरच इतका क्षुल्लक असतो का...?"

बाकी कोणी काही म्हणो पण कालच्या आंदोलनामुळे काही गोष्टी शिवसेनेकरता नक्कीच आश्वासार्ह घडल्या.

1) राणेँच्या एक्झिटनंतर शिवसेना आणि राडा यांच सिँधुदुर्गातील नात संपल्यात जमा होत पण वैभवने शिवसैनिक कसा राडा करु शकतात हे महाराष्ट्राला दाखवुन दिले.

2) बाळासाहेबांच्या निधनानंतर आणि शिवसेनेच्या मवाळ कारभारानंतर नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या शिवसैनिकांना ऐन निवडणुकांपुर्वी जोश आला.

3) राडा विरोधकांनाही करता येतो याची काँग्रेस समर्थकांनाही जाणीव झाली.

4) दस्तरखुद्द पालकमंत्र्यांना त्यांचे होम ग्राऊंड कणकवलीमध्ये शिवसैनिकांच्या उद्रेकापुढे आपल्या गाड्यांचा ताफा नाईलाजास्तव पुन्हा आपल्या बंगल्याकडे वळवावा लागला, यापेक्षा वैभवकरिता आणखी मोठे यश ते कोणते...???

आदरणीय बाळासाहेब ठाकरेँना श्रद्धांजली राज्यातील अनेक शिवसेनेच्या पदाधिका-यांनी दिली पण वैभवने काल दिलेल्या श्रद्धांजलीने बाळासाहेब नक्कीच क्रुतक्रुत्य झाले असतील.

(ता.क- कमेँटमधील प्रतिक्रियांना पोस्ट एडिट करुन उत्तर देत आहे.

सिँधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस आयोजित आमने-सामने असा फलक काँग्रेस कार्यकर्त्यांनी लिहिला होता. आदल्या दिवशी महिला मेळाव्यात आमने-सामनेला मी गेलो असतो तर कानफटात लगावली असती असे चिथावणीखोर वक्तव्य पालकमंत्र्यांनी केले होते. मग प्रतिबंधात्मक कारवाई करताना पोलिसांनी एकट्या वैभवलाच अटकेत का घेतले...? अलीकडच्याच राजापुर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राजन साळवी सिँधुदुर्गातील हाँटेलात येऊन का राहु शकत नाहीत याची सर्वप्रथम कारणे पोलीसांनी स्पष्ट करावीत. त्यांना सिँधुदुर्ग जिल्ह्यातुन तडीपारीचा कोणता आदेश आहे का...?? नसल्यास एका आमदाराला हाँटेलमध्ये घुसुन बाहेर काढण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला...??? वैभवच्या राड्याचे समर्थन होणार नसेल तर पोलिसांच्या पक्षपातीपणाचेही समर्थन कोणी करु नये. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणुन पोलिस आदल्या दिवशीच काँग्रेस-शिवसेनेच्या पदाधिका-यांना अटक करु शकली असती. पण तसे न करता आमने-सामनेच्या दिवशी पोलिसांनी काँग्रेस पदाधिका-यांना सभाग्रुहात जाऊ दिले आणि वैभवला मात्र अटक केली. आता या घटनेत कोणाचा 'हात' आहे हे न कळायला सिँधुदुर्गातील जनता दुधखुळी नाही. अशा काँग्रेसच्या पोलीस अधिक्षकाची तात्काळ बदली करण्यासाठी विरोधकांनी अधिवेशनात आवाज उठवावा.
"राडा कोणताही असो, मारणारा कार्यकर्ता असतो आणि मार खाणाराही कार्यकर्ता असतो." ही गोष्ट खरी असली तरी कालच्या राड्यात आपल्याला अटक झाल्यानंतरही वैभवमधील नेत्याने संयम बाळगला होता. पण फटाके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पक्षपाती पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठीमार केला आणि त्याच वेळी फटाके फोडणा-या काँग्रेस कार्यकर्त्याँना मात्र मोकाट सोडले हे ऐकुन वैभव चिडला. त्यानंतरच त्याने पोलीस अधिक्षकांच्या श्रीमुखात भडकावली आणि कार्यकर्त्याँसोबत आपणही पोलिसांवर वाघासारखा तुटुन पडला, लाठ्या खाऊन जखमी झाला आणि आज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. कार्यकर्त्याँना चिथावुन स्वतः रणभुमीतुन पळ काढणा-या आमदार विनायक राऊतांसारखा वैभवचा स्वभाव नाही. वाघाच कातड पांघरुन वाघ होता येत नाही हे राऊतांना एव्हाना समजलच असेल. शौर्य रक्तात असाव लागत. वैभवसारख...!!!)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा