रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३

सुरेश प्रभु - कोकणच्या विद्वान मतदारसंघाचा खराखुरा वारसदार...!

मतांच्या घाणेरड्या राजकरणात जे घडत, ते नेहमीच खर नसत. पक्ष, जात, धर्म आणि
मतांच्या राजकरणापलीकडे
गेलेला, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या विद्वत्तेने नावाजलेला, कोकणच्या विद्वान
मतदारसंघाचा खराखुरा वारसदार...!
-सुरेश प्रभु
(माजी केँद्रीय मंत्री, भारत सरकार.)

सुरेश प्रभु भारतीय जनमानसात अनेक गोष्टीँसाठी प्रसिद्ध आहेत. प्रभुंचे व्यक्तीमत्व अफाट बुद्धिमत्ता, उच्चशिक्षण, कटीबद्धता, एखाद्या विषयाची खोलवर असलेली जाण याने बांधले गेलेले आहे. त्यामुळेच आजवरच्या वाटचालीत त्यांनी अनेक मैलांचे दगड पार केले.

सुरेश प्रभु चार्टर्ड अकाऊंटटची (C.A.) परीक्षा नुसते पास झाले नाहीत तर त्या परीक्षेत देशाच्या गुणवत्ता यादीत आले. त्यानंतर त्यांनी कायदेशास्त्रात (LAW) पदवी मिळवली. त्यांनी 'वातावरणातील बदल' या विषयात जर्मनीतील बर्लिन विद्यापीठाची Phd मिळवली आणि 'अर्थशास्त्र' या विषयात मुंबई विद्यापीठाची Phd पदवी मिळवली. त्यांना भारतासमवेत लँटिन अमेरिका येथेही प्रतिष्ठीत डाँक्टरेट पदवी प्राप्त आहे. भारत सरकारमध्ये सुरेश प्रभुंनी 6 मंत्रीपदे भुषवली. त्यात महत्वाच्या अशा उद्योग, पर्यावरण आणि वने, ऊर्जा, केमिकल आणि फर्टिलायझर, जड उद्योग मंत्रीपदांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यकाळात देशातला 'सर्वोत्क्रुष्ट काम करणारा मंत्री' हा पुरस्कार प्रभुंना मिळाला.अटल बिहारी वाजपेयीँची देशातील विविध धोरणे ठरवताना निर्णय घेणारी NDA ची जी टिम होती, त्यात प्रभुंची भुमिका महत्वाची होती. दोन महत्वाच्या परराष्ट्रांशी चर्चा करताना प्रभुंनी सहभाग घेतला होता. कायदे तयार करण्यातील त्यांचा अनुभव आणि एखादे धोरण राबवण्याची प्रभुंची अफाट क्षमता या दोन गोष्टीँमुळे त्यांनी केँद्रीय मंत्री असताना देशाचा भरपुर पैसा वाचवला. संशोधन हे त्यांच्या प्रत्येक कामात ठरलेल असायच आणि त्यांनी सुरु केलेल परिवर्तन केँद्र त्याचाच एक भाग आहे. गावातील लोकांच्या फायद्यासाठी प्रभुंनी प्रयत्न केला. प्रभुंच्या सहकारी क्षेत्रातील योगदानाबद्दल काय बोलायचे...? त्यांनी सहकारी क्षेत्रात अनेक भुमिका अगदी लीलया पार पाडल्या. सारस्वत बँकेसारख्या भारतातील सर्वात मोठ्या सहकारी बँकेचे ते आतापर्यँत सर्वात तरुण चेअरमन होते. ऊर्जा, अर्थव्यवस्था, पाणी, क्रुषी सारख्या क्षेत्रात काम करणा-या अनेक संस्थात प्रभु कार्यरत असतात. अफाट वाचन आणि तितक्याच चांगल्या वक्त्रुत्वक्षमतेच्या जोरावर सुरेश प्रभुंनी जागतिक पातळीवर अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत. लोकसभा टीव्ही चँनेलवर अँकरीँग करणारे एकमेव खासदार अशी त्यांची ख्याती आहे. जगभरातील प्रतिष्ठीत प्रकाशनांसाठी प्रभुंनी कित्येक महत्वाच्या विषयांवर आपले लेख लिहिले आहेत.एमबीए, लाँ साठी नामांकित काँलेजमध्ये प्रभु विझीटीँग प्रोफेसर म्हणुन काम करतात. 56000 लोकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिल्यानंतर प्रभुंनी हा आकडा 1 लाख लोकांपर्यँत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी ग्रामविकास, शिक्षण, आरौग्य, रोजगार, संगीत, कला, शेतकरी, युथ, क्रिडा, इत्यादी क्षेत्रातील 100 संस्थांसोबत प्रभु जोडले गेलेले आहेत. जगातील 100 देशात आणि भारतातील जवळपास 80 टक्के जिल्ह्यात प्रभुंनी प्रवास केला आहे. आज त्यांच्या खात्यात कित्येक जागतिक पुरस्कार समाविष्ट आहेत.

जागतिक पातळीवर IYY संघटनेचा आशियाचा युथ लीडर म्हणुन प्रभुंची निवड झालेली आहे. युनायटेड नेशन्स (UN) सारख्या संघटनेचा सल्लागार म्हणुन प्रभुंनी भुमिका बजावली आहे. प्रभुंच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलु आहेत की एका लेखात त्यांना कैद करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. प्रभुंबद्दल लेख लिहिण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच केला की 2014 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका...!

कोकणचा राजापुर मतदारसंघ हा विद्वान लोकांचा मतदारसंघ म्हणुन महाराष्ट्रात नाही तर देशात प्रसिद्ध आहे. इकडच्या समजुतदार लोकांनी पक्षापलीकडे जाऊन नेहमीच विद्वान उमेदवाराला खासदार म्हणुन प्राधान्य दिले. नाथ पै, मधु दंडवते असे संसदपटु देशाला दिल्यानंतर कोकणच्या लोकांनी सुरेश प्रभु या विद्वान माणसाला सलग चार वेळा खासदार म्हणुन निवडुन दिले. मात्र गेल्या निवडणुकीत म्हणजे 2009 साली सुरेश प्रभुंना पहिल्यांदा पराभावाला सामोरे जावे लागले. या पराभवामागे अनेक कारणे आहेत आणि त्यांची पार्श्वभुमी जाणुन घेणे गरजेचे आहे.

शिवसेना स्थापन झाल्यानंतर 1990 साली बाळासाहेब ठाकरेँनी त्यांचा खंदा शिलेदार नारायण राणेँकडे अगदी विश्वासाने कोकणची जबाबदारी आली आणि राणेँनीही क्रुतज्ञपणे पार पाडली. 15 वर्षे शिवसेनेची सत्ता उपभोगल्यानंतर 2005 साली राणेँनी उद्धव ठाकरेँशी झालेल्या मतभेदाने शिवसेना सोडली. सुरेश प्रभु लोकनेते कधीच नव्हते. त्यात करुन बाळासाहेब ठाकरेँनी कोकणची जबाबदारी राणेँकडे एकहाती सोपवल्याने प्रत्येक निवडणुकीत सुरेश प्रभुंना निवडुन आणायचे काम नारायण राणेच करत असत. त्यामुळेच राणेँनी शिवसेना सोडल्यावर प्रभु शिवसेना सोडतील अशाच शक्यता रंगवल्या जात होत्या पण प्रभु बाळासाहेबांच्या खाल्ल्या मिठाला जागले. गद्दारी त्यांच्या रक्तात कधीच नव्हती. पाचव्यांदा मिळणा-या खासदारकीसाठी राणेँचा हात न धरता, आपल्याला चार वेळा खासदारकी मिळवुन देणा-या बाळासाहेब ठाकरेँशी ते एकनिष्ठ राहिले. परिणामी बाळासाहेबांनीही आपल्या सच्चा शिवसैनिकाला 2009 मध्ये पुन्हा उमेदवारी दिली. मात्र 2005 ते 2009 या मधल्या काळात पुलाखालुन खुप पाणी वाहुन गेले होते. राणे नावाच्या झंझावाताची ताकद इतकी होती की पोटनिवडणुकीत राणेँना मत देताना व्यासपीठावर डोक टेकवुन मत मागणा-या बाळासाहेब ठाकरेँनाही कोकणच्या लोकांनी जुमानले नाही. विरोधी उमेदवार परशुराम उपरकरांचे डिपाँझिट जप्त झाले. बाळासाहेबांच्या हा पराभव खुपच जिव्हारी लागला. त्यानंतरच्या काळात कोकणात फक्त राणेसमर्थक आमदारांची फौज होती.अशा परिस्थितीत राणेँचे शिवधनुष्यासम आव्हान पेलण्याचे धारिष्ट्य दाखवले ते बाळासाहेबांचा विश्वासु शिवसैनिक सुरेश प्रभु यांनी...! कोकणात खिळखिळी झालेली शिवसेना आणि राणेँचा वाढता दरारा या परिस्थितीत स्वतः बाळासाहेब ठाकरे जरी रिँगणात उतरले असते तरी त्यांचा पराभव निश्चित होता. राणे प्रभुंचा 3 लाख मतांनी पराभव करु अशा वल्गना करु लागले. एकीकडे राणेँनी सभांद्वारे प्रचाराचा तडाखा लावला होता तर दुसरीकडे प्रभु प्रचाराला सुद्धा फिरकत नव्हते. अशा वेळी राणेँचे 3 लाख मतांनी विजयाचे भाकित खरे ठरणार अशी खात्री वाटु लागली. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना खिरापती वाटण्याचेही प्रकार झाले. पैशांअभावी प्रभुंना यातील काहीच करणे शक्य नव्हते. प्रचारादरम्यान राणे पितापुत्रांवर अजिबात टिका करणार नाही हे सभ्य स्वभावाच्या प्रभुंनी अगोदरच जाहिर केले. कोकण हा विद्वान लोकांचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळेच एकमेकांवर घाणेरड्या भाषेत टिका करण्यापेक्षा अर्थशास्त्रात डाँक्टर पदवी संपादन केलेल्या निलेश राणेँनी एकाच व्यासपीठावर जाहीर चर्चेस यावे एवढे एकच आवाहन काय ते सुरेश प्रभुंनी केले.प्रभुंच्या बुद्धितेजाची कल्पना असल्यामुळे निलेश राणेँनी सोयीस्कररीत्या पळ काढली. नंतर निवडणुका झाल्या आणि निकालादिवशी भरपुर प्रचार करुन निलेश राणेँना फक्त 3 लाख 53 हजार मते पडली आणि प्रभुंना 3 लाख 7 हजार मते पडली. 46 हजार मतांनी प्रभुंचा पराभव झालेला असला तरी राणेँच्या पायाखालची जमीन सरकली होती. कोकणात शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवलेली नसताना प्रभुंना एवढी मते कशी काय पडु शकतात हा एकच प्रश्न राणेँना भेडसावत होता. अभ्यास केलात तर लक्षात येईल की कोकणच्या सुज्ञ मतदारांनी दंडवते, नाथ पैँच्या वारसदाराला पक्षापलीकडे जाऊन दिलेली ही मते होती. कोकणतील लोकांच्या मनावर दंडवते, नाथ पैँच्या समाजवादी विचारसरणीचा पगडा असला तरी शिवसेनेसारख्या कट्टरवादी पक्षाच्या प्रभुंना त्यांनी सभ्यता आणि विद्वत्ता या दोनच निकषांवर तब्बल तीन लाख मते दिली. त्यासाठी प्रभुंना कोणताही प्रचार करावा लागला नाही किँवा मतदानाच्या आदल्या दिवशी दारु, मटणाचे तुकडे, पैसा ही प्रलोभने या लोकांना भुलवु शकली. तत्ववादी लोकांनी तत्वांच्या पुजा-याला केलेले ते मतदान होते.

आता पुन्हा एकदा 2014 लोकसभेच्या निवडणुका उभ्या ठाकल्या आहेत.शिवसेनेकडुन प्रभुंची उमेदवारी जाहिर होण्याअगोदरच मनातुन धास्तावलेल्या काँग्रेसच्या मंडळीँनी प्रभुंविरोधात विखारी प्रचार सुरु केला आहे. यंदा लोकसभेला फक्त प्रभु उभे राहिलेत तर राजापुर मतदारसंघात त्यांचा विजय निश्चित आहे. त्यामागची कारणे जाणुन घेणे गरजेचे आहे.2009 लोकसभा निवडणुकीवेळी राणेँनी धुर्तपणा दाखवत एकाच वेळी दिपक केसरकर, प्रवीण भोसले, शंकर कांबळी, पुष्पसेन सावंत, कुलदीप पेडणेकर अशा दिग्गज मंडळीँना येणा-या विधानसभेचे तिकीट अथवा तत्सम आश्वासने देत तात्कळत ठेवले आणि या सगळ्या मंडळीँनी राणेँवर विश्वास ठेवत त्यांच्या मुलाचा प्रचार केला. सिँधुदुर्गाच्या राजकरणातील इतके सगळे दिग्गज एकाच वेळी राणेँसोबत असुनही सुरेश प्रभु या नावाचाच करिष्मा एवढा होता की त्यांना राणे फक्त 46 हजार मतांनीच हरवु शकले कारण सुरेश प्रभु हे नाव वाचुन बटन दाबणारी कोकणात जी कोणी मंडळी आहेत त्यांच्या समोर प्रभुविरोधकांनी डोकी जरी आपटलीत तरी त्यांच मत प्रभुंनाच पडणार आहे. प्रत्यक्षात मुलाच्या विजयानंतर राणेँनी आश्वासन न पाळता पुष्पसेन, केसरकर, पेडणेकर, कांबळी या सगळ्या मंडळीँचा विश्वासघात करत दुश्मनी ओढवुन घेतली आणि आज ते सगळे राणेँच्या विरोधात दंड थोपटुन उभे आहेत. या सगळ्यांची मते जरी एकत्र केली तरी 46 हजार मतांचा फरक भरुन येण्यास वेळ लागणार नाही. मधल्या काळात प्रमोद जठारांचा कणकवलीत आणि भास्कर जाधवांचा रत्नागिरीत झालेला उदय प्रभुंच्याच पथ्थ्यावर पडणारा आहे. प्रमोद जठारांनी कणकवली मतदारसंघात ब-यापैकी जम बसवलाय आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर भास्कर जाधवांनी राणेँविरोधात हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुक ही विधानसभेची रंगीत तालीम असते. लोकसभेत राणेँचा पराभव झाला तर राणे गेली 23 वर्षे सतत जिँकल्यामुळे मतदानाबाबत निरुत्साही असलेला जो एक मोठा वर्ग निर्माण झालाय तो विधानसभेत मतदानासाठी पुन्हा उत्साहाने बाहेर पडेल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा कणकवलीत साक्षात राणेँविरुद्ध विधानसभेची निवडणुक लढवणा-या प्रमोद जठारांनाच होणार आहे. त्यासाठी प्रमोद जठार पुर्ण ताकदीनीशी प्रभुंच्या प्रचारात उतरतील. अजुन एका गोष्टीची राणेँविरोधात वातावरण भडकवण्यासाठी मदत होत आहे आणि ती म्हणजे ठिकठिकाणी राणे करु पाहत असलेल्या प्रकल्पांना होत असलेला ग्रामस्थांचा कडाक्याचा विरोध...!
सिँधुदुर्गात मायनिँग, सी-वर्ल्ड, रेडी बंदर, गारमेँट पार्क अशा कितीतरी प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध आहे आणि त्या प्रकल्पबाधित गावांमधील मते नक्कीच राणेँविरोधात जातील. रत्नागिरीत ज्या प्रकारे हुकुमशाही करुन राणेँनी जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला आहे.ते पाहुन कित्येत लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर कायमचा संपुष्टात आला आहे. जैतापुरच्या अणुप्रकल्पाला प्रथम शिवसेनेने आणि आता प्रभुंनी कडाक्याचा विरोध केल्याने जैतापुर अणुप्रकल्पाबाबत असलेला असंतोष लोक प्रभुंना मत देऊन व्यक्त करण्याची दाट शक्यता आहे.

आता शिवसेनेकडुन सुरेश प्रभुंव्यतिरिक्त राजन साळवी आणि विनायक राऊत ही नावे चर्चेत आहेत. यातील राजन साळवी जैतापुर अणुप्रकल्पाला विरोध करणारे आमदार म्हणुन रत्नागिरीत प्रसिद्ध असले तरी सिँधुदुर्गात त्यांना ओळखणारे फारच कमी लोक आहेत. विनायक राऊतांना किती लोक नावाने ओळखतात याचा विचार त्यांनीच केला तर चांगले होईल...? शिवाय प्रभुंना डावलुन या दोघांपैकी एकाला शिवसेनेने उमेदवारी दिली तर सुरेश प्रभु या माणसाला सभ्य, सुसंस्क्रुत आणि विद्वान म्हणुन निःपक्ष होत देतात त्या सगळ्या मतांवर पाणी सोडण्यासारखे आहे. या मतांचा आकडा माझ्या अंदाजानुसार 1.5 ते 2 लाख एवढा आहे आणि हे लोक प्रभुंव्यतिरिक्त शिवसेनेचा कोणीही उमेदवार उभा राहिला तरी त्याला कट्टरवादी म्हणुन नाक मुरडत मत न देता नकाराधिकार बजावण्याची शक्यताच अधिक आहे.ही गोष्ट राणेँच्या पथ्थ्यावर पडणारी ठरेल कारण राणेँची अशी जी एक गठ्ठा मते आहेत ती राणेँनाच पडणार आहेत. मात्र प्रभुंना उमेदवारी दिली नाही तर प्रभुंची एक गठ्ठा मते शिवसेनेला फुकटची गमवावी लागतील. राणेँसारख्या चाणाक्ष नेत्याला याची अगोदरच जाणीव झाल्याने त्यांनी शिवसेना पक्षाला टार्गेट न करता सुरेश प्रभुंवर व्यक्तिगत टिका सुरु केली आहे कारण राणेँना एक गोष्ट चांगलीच ठाऊक आहे की एकट्या शिवसेनेची मते त्यांचा पराभव करण्यास असमर्थ आहेत पण शिवसेना अधिक सुरेश प्रभुंची पारंपारिक मते एकत्र येतील तर मात्र राणेँचा पराभव निश्चित आहे. प्रभुंवर टिका करताना तेच ते मुद्दे पुन्हा रेटले जातायेत आणि त्याबाबत स्पष्टीकरण देणे प्रभुंचा समर्थक म्हणुन मी माझे कर्तव्य समजतो.

आरोप क्रमांक 1) सुरेश प्रभु ऊर्जामंत्री असतानाच त्यांनी अणुप्रकल्प जैतापुरात आणला.
भारत देशाला ऊर्जेची गरज प्रभु ऊर्जामंत्री असतानाही होती आणि आजही तितकीच आहे. त प्रभु ऊर्जामंत्री असताना जैतापुर अणुप्रकल्पाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आला आणि कोणताही ऊर्जामंत्री देशाला वीजेची गरज असताना विनाकारण वीजप्रकल्पाचा प्रस्ताव नाकारु शकत नाही. अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी देशाचे पंतप्रधान होते आणि अणुखात नेहमीच पंतप्रधानांच्या अखत्यारित असत. वाजपेयी आपल्या निर्णयात कोणालाच लुडबुड करु देत नसत. शिवाय जैतापुर अणुप्रकल्प प्रस्तावित झाला तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी प्रभुंकडे ठोस अशी कोणतीच गोष्ट नव्हती. तरीसुद्धा ऊर्जामंत्री असताना लोकांची इच्छा असेल तरच जनसुनावणी करुनच जैतापुरात अणुप्रकल्पाची निश्चिती करावी ही अट प्रभुंनीच घातली होती. मात्र अणुप्रकल्प राबवताना काँग्रेसने लोकभावनांची कदर केली नाही. त्यानंतरच्या काळात जपानमधील फुकुशिमाच्या अपघातात अणुऊर्जेचे भयाण वास्तव जगासमोर आले. दुर्देवाने सुरेश प्रभु जैतापुरच्या अणुप्रकल्पाला रद्द करण्यासाठी त्यावेळी ऊर्जामंत्री नव्हते आणि संसदेत खासदारही नव्हते.विद्यमान खासदार निलेश राणेँनी जैतापुर अणुप्रकल्पाला विरोध करणा-या लोकांना गोळ्या घालुन ठार मारले, जाहीर सभेत लोकांना धमक्या देऊन लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही केली. त्याच वेळी माजी खासदार सुरेश प्रभुंनी एबीपी माझा वाहिनीला राजीव खांडेकरांना दिलेल्या जाहिर मुलाखतीत फुकुशिमा दुर्घटनेनंतर जैतापुर अणुप्रकल्प रद्द केला पाहिजे असे ठाम मत व्यक्त केले. नारायण राणे आत प्रभुंचा विरोध असताना सुद्धा त्यांनी जैतापुर अणुप्रकल्प आणलाय अशी बोँबाबोँब करुन विकासाच्या गोँडस नावाखाली विनाशकारी अणुप्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत आहेत कारण मनात कुठेतरी आपणही आपल्याच लोकांचा विनाश करत आहोत याची सल राणेँच्या मनात नक्कीच असणार. काही वेळेपुरते प्रभुंनीच अणुप्रकल्प आणला आणि त्यामुळेच राणे तो रेटु पाहत आहेत हे राणेँचे म्हणणे खरे धरले मग प्रभुंच्या पडत्या पायाची आज्ञा कर्तव्य समजणारे राणे आता प्रभुंच्या विरोधानंतरही जैतापुरचा अणुप्रकल्प विनाशकारी आहे हे समजल्यानंतरही तो रेटत का आहेत याच उत्तर अगोदर द्या. जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करायचा असेल तर दिल्लीत शब्दाला वजन असलेला नेता खासदार म्हणुन पाठवायला हवा.  विद्यमान खासदारांचे दिल्लीत काय वजन आहे याची जाण तुम्हाला एवढ्यात आलीच असेल. त्यामुळे जैतापुरचा अणुप्रकल्प रद्द करायचा असेल तर सुरेश प्रभुंना निवडुन दिल्याशिवाय पर्याय नाही. 2014 मध्ये एनडीएचे सरकार निश्चित आहे आणि सुरेश प्रभुच पुन्हा एकदा ऊर्जामंत्री किँवा पर्यावरणमंत्री पद भुषवुन जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करुन कोकणावरील अरिष्ट दुर करतील ही खात्री बाळगा.

आरोप क्रमांक 2) सुरेश प्रभुंनीच सिँधुदुर्गात इको सेँसिटीव्ह झोनची मागणी केल्याने गौण खनिजधारकांचा प्रश्न निर्माण झाला.
मित्रांनो, दोडामार्गात कळणेमध्ये लोहखनिजाच्या मोठ्या मायनिँग प्रकल्पांना विरोध करणा-या लोकांना अक्षरशः पोलिसांकडुन पाशवी मारहाण करत राणे-केसरकर द्वयींनीच लोहखनिज प्रकल्प सुरु करत संघनमताने निसर्गाचा विध्वंस सुरु केला. दोडामार्गच्या त्या 33 कि.मी.च्या चिँचोळ्या पट्ट्यात कळण्यासारखेच तब्बल 49 मोठे मायनिँग प्रकल्प (गौणखनिज प्रकल्प नव्हे) सुरु करण्याचा राणेँचा मानस होता. सिँधुदुर्गाच्या पर्यावरणाची काळजी असणा-या प्रभुंनी त्या विनाशकारी प्रकल्पांनाच विरोध केला. प्रभुंनी गौणखनिजाला कधी विरोध केला नाही आणि यापुढेही करणार नाही. फक्त 5 फुट खोल असलेल्या गौणखनिजाच्या खाणीँमध्ये पावसाळ्यात पाणी साचते आणि पर्यावरणाचे संवर्धन होते या मताचेच प्रभु आहेत. प्रभुंचा विरोध 250-300 फुट खोल जाऊन निसर्गाचा विध्वंस करणा-या कळण्यासारख्या मोठ्या खाणीँना आहे. गौणखनिजधारकांची माथी भडकावुन मोठ्या मायनिँग प्रकल्पांचे रान मोकळे करुन घेण्याचा काँग्रेसचा डाव होता मात्र पर्यावरणमंत्र्यांची भेट घेऊन प्रभुंनीच तो हाणुन पाडला. त्यामुळेच चरफडलेले काँग्रेसचे लोक प्रभुंवर चौफेर टिका करत आहे. एक गोष्ट नीट लक्षात घ्या की गौणखनिजधारकांचा प्रश्न सोडवणारे प्रभुच आहेत आणि त्याच वेळी मोठ्या मायनिँग प्रकल्पांना विरोध करुन त्यांपासुन पर्यावरणाचे रक्षण करणारे प्रभुच आहेत.

आरोप क्रमांक 3) खासदार झाल्यानंतर सुरेश प्रभु मतदारसंघात फिरकत नाहीत.
मित्रांनो, हा हास्यास्पद आरोप वर्षाचे 365 दिवस मतदारसंघात टवाळक्या करत फिरणारे रिकामटेक निर्बुद्ध लोकच करु शकतात. जेव्हा एखाद्या माणसावर आरोप करण्यासाठी मुद्देच उरत नाहीत तेव्हा खाजवुन खरुज काढण्याचे धंदे करणारी मंडळी विनाकारण कुसपटे काढत बसतात. आश्चर्य म्हणजे काही वर्षाँपुर्वी आदरणीय मधु दंडवतेँवर मतदारसंघात कधीच फिरकत नाही असे आरोप केले गेले. त्यावेळी दंडवतेँनी उत्तर देताना म्हटले होते की संसदेत जाऊन देशासाठी काहीतरी विधायक करण्यापेक्षा मी मतदारसंघात पुलांचे उद्घाटन करत फिती कापत फिरावे हिच तुमची इच्छा आहे तर ते माझ्याने होणार नाही. सुरेश प्रभु दंडवतेँचाच वारसा काटेकोरपणे चालवत आहेत. मित्रांनो, दंडवते आणि प्रभुंमध्ये एक गोष्टीचे साम्य आहे ती म्हणजे त्या दोघांनाही केँद्रात मंत्रीपदे भुषवली होती. त्याच वेळी त्यांच्यावर आरोप करणा-यांना केँद्रीय मंत्रीपद भुषवणे म्हणजे नेमके काय, तेथील कामाचा व्याप काय असतो याची काडीचीही कल्पना नाही. दंडवते रेल्वेमंत्री असताना रेल्वेबजेट मांडायचे किँवा अर्थमंत्री असताना देशाचा अर्थसंकल्प मांडायचे ते इकडे सिँधुदुर्गात बसुन आरोप करणा-या अडाण्यांना काय समजणार...? प्रभुंनी तर केँद्रीय मंत्रीमंडळात पदे भुषवताना वाजपेयीँच्या थिँक टँकमध्ये महत्वपुर्ण भुमिका बजावली. देशहिताची धोरणे ठरवत असताना रिकामटेकडेपणा करत मतदारसंघात फिरण एका आदर्श खासदाराला कधीच शक्य नसत. आपल्या मतदारसंघासाठी मिळणारा खासदार निधी आपल्या पक्षाकडे सुपुर्त करण याची जबाबदारी एका खासदाराची असते आणि प्रभुंनी ती काटेकोरपणे पार पाडली. जर खासदारानेच मतदारसंघात फिरावे अशी तुमची इच्छा असेल तर आमदार, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांनी काय नुसत्या खुर्च्या गरम कराव्यात अशी तुमची इच्छा आहे का...? एका केँद्रीय मंत्र्याचे कर्तव्य प्रभुंनी चोखपणे बजावले. प्रभुंनी मतदारसंघाचा काय विकास केला असा प्रश्न तोँड वर करुन विचारणा-यांची सिँधुदुर्गात कमी नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेखाली गावातील दुर्गम झालेले रस्ते आपण पाहतो.  तुमच्या माहितीसाठी सांगतो की पंतप्रधान वाजपेयीँना या महत्वाकांक्षी योजनेचा ड्राफ्ट प्रभुंनीच तयार करुन दिलेला. जर प्रभु मंत्री नसते तर फक्त सिँधुदुर्गच्या नव्हे तर देशातील गावागावात जाणारे रस्ते आजही खडकाळ असते. प्रभुंना एकदा कुतुहलाने विचारल की तुम्ही तुमच्या कार्याची ही सगळी माहिती लोकांपर्यँत का पोहचवत नाही...? त्यावर प्रभुंच उत्तर थक्क करणार होत, "माझ्या मतदारसंघातील लोकांनी हीच कामे करण्यासाठी तर मला निवडुन दिल आहे आणि ती कामे निवडुन आल्यानंतर केली तर त्या कामांच वेगळ क्रेडिट कस काय घेता येईल...? आपण काय करतो ही कुवत करण्याची क्षमता नसलेल्या नेत्यांनी छोट्या छोट्या गोष्टीँचे क्रेडिट घेतले म्हणुन आपण तसेच वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय...? त्या नेत्यांनी जनाची सोडली म्हणुन आपण मनाची सोडायची नसते. आपल कार्य अविरत सुरु ठेवायच."त्यांचे विचार ऐकल्यानंतर समजले की मोठी माणसे फक्त बुद्धीनेच नाही तर मनानेही तितकीच मोठी असतात. सुरेश प्रभु हे त्या मोठ्या माणसांच्याच पंक्तीत बसतात. यावर्षी देशाने भीषण दुष्काळ अनुभवला परंतु आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने प्रभुंनी आधीच काळाची पावले ओळखली होती. तिसरे महायुद्ध पाण्यासाठीच होणार याची खात्री पटल्यानंतर देशाच्या सगळ्या नद्या एकमेकांना जोडता आल्या तर संपुर्ण देशातील लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज आपण भागवु शकतो. त्यासाठीच प्रभुंनी महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तयार केला पण देशाचे भविष्य खाईत घालण्यासाठी जन्माला आलेल्या मनमोहन सिँगांच्या दळभद्री सरकारने एनडीए सरकार जाताच नदीजोड प्रकल्प बासनात गुंडाळुन ठेवला. परिणामी आता देशातील लोक पाण्यावाचुन तडफडुन मरत आहेत.

प्रभुंची महती सांगुन झाली. आता प्रभुंवर टिका करणा-या विद्यमान खासदारांना काही प्रश्न विचारावे लागतील. विद्यमान खासदारांचा आवेश असा असतो जणु काही विकासाची गंगा घेऊनच ते कोकणात अवतरले आहेत.
प्रभु मतदारसंघात फिरकत नाहीत मग गेली पाच वर्ष तुम्ही तर मतदारसंघातच फिरत होता मग त्या कालावधीत नेमकी काय लोकोपयोगी कामे केली...? जैतापुरच्या सभेत आपल्याला मत देणा-या लोकांनाच धमक्या देण्याचे उदात्त कार्य तुम्ही केले पण लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तिकडे दिल्लीत संसदेत कधी तोँड उघडल्याचे ऐकीवात नाही. साडेचार वर्षात संसदेत किती मिनिटे बोललात याचा अगोदर हिशेब द्या. तुम्ही मतदार संघात फिरुन स्थानिक लोकांनाच दमदाटी करत उपद्रव करणार असाल तर मग तुमच्यापेक्षा निरुपद्रवी असे सभ्य, सुसंस्क्रुत आणि विद्वान सुरेश प्रभु चांगले नाहीत का...???

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा