बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

हिमालयालाही हेवा वाटावा असा सह्याद्रीचा सुपुत्र...
15 नोव्हेँबर 1989... याच दिवशी क्रिकेटच्या क्षितीजावर सचिन नावाच्या ता-याचा उदय झाला आणि आज करियरच्या मावळतीकडे झुकत असताना या ता-याने क्रिकेटच्या क्षितीजालाचवेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेजेमतेम दहा ते वीस देशातखेळल्या जाणा-या क्रिकेट खेळाला जगन्मान्यता मिळाली तीच मुळी सचिनमुळे...! क्रिकेट म्हणजे सचिन आणि सचिन म्हणजे क्रिकेट हे समीकरण आईनस्टाईनच्या e=mc2 सिद्धांतासारखे जगप्रसिद्ध झाले.
गावात भजनाला सुरुवात करण्यापुर्वी नांदी म्हटली जाते आणि या नांदीवरुन एकंदरीत भजनाच्या दर्जाची कल्पना येतेसचिनच्या क्रिकेट करियरची कल्पना त्याच्या क्रिकेट पदार्पणाच्या नांदीवरुनच जाणकरांना आली होतीज्या संघाच नाव घेतल्यावरही भारतीयांच्या अंगावर रोमांच उभे राहतात असा पाकिस्तानचा संघ सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची नांदी करण्यासाठी मिळालापदार्पणाच्या दौ-यातच अशा दोन घटना घडल्या ज्यांनी सचिन काय चीज आहे याची जाणीव क्रिकेट जगतालाकरुन दिलीपाकिस्तानच्या गोलंदाजीच्या तोफखान्यात त्यावेळी इम्रान खान आणि वसिम अक्रम यांच्यासमवेत वकार युनुसची एंट्री झाली होती.16 वर्षीय सचिनच्या लहानग्या देहयष्टीचा वकारच्या चेँडुने थेट वेध घेतलासचिनने पहिल्यांदाच परिधानकेलेली भारताची पांढरी जर्सी रक्ताने लाल झालीअगदी कसलेला खेळाडु सुद्धा अशा बिकट परिस्थितीत 'रिटायर हर्टहोऊन तंबुमध्ये परतला असता पण रणांगणातुन पळ काढत माघार घेणे सचिनच्या रक्तातच नसावेप्रतिकुल
परिस्थितीतही झुंज देण्याची व्रुत्ती सचिनने बाजीप्रभु देशपांडेतानाजी मालुसुरेँच्या महाराष्ट्राच्या मातीतुनच वारसाहक्कात घेतली होतीएव्हाना जगालाही पहिल्याच दौ-यात सचिनच्या लढवय्या व्रुत्तीचा अनुभव आला होतात्यानंतरच्या सामन्यात पाकिस्तानचा जगविख्यात स्पिनर अब्दुल कादिरने सचिनला 'दुध पीता बच्चाअसे हिणवत खोड काढलीबिचा-या कादिरला तरी कुठे माहित होते की हा 'दुध पीता बच्चाबाळ श्रीक्रुष्णाने पुतना मावशीच्या केलेल्या वधाच्या गोष्टी ऐकुन मोठा झालेला.सचिनने पुढच्याच षटकात कादिरची गोलंदाजी फोडुन काढत त्याची हालत पुतना मावशीपेक्षाही बेकार करुन टाकलीनियतीचा खेळही असा की सचिनची हिच फटकेबाजी कादिरसाठी पुढील आयुष्यात फलदायी ठरावीपुढच्या आयुष्यात सचिन इतका मोठा क्रिकेटपटु बनला की कादिरने क्रिकेट खेळुन जितके पैसे कमावले नसतीलतितके पैसे पुढील काळात विविध
वाहिन्यांना सचिनच्या पहिल्या दौ-यातील आठवणीँच्या मुलाखती देत कमावले.
  मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे हे सचिनकडुनच शिकावेसुरुवातील वन-डेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणा-या सचिनला जेव्हा सलामीला फलंदाजी करायची संधी मिळाली तेव्हा शतकांच्या फुलांची तोरणे करुन तो जगातील सर्वश्रेष्ठसलामीवीर ठरलामधल्या काळात शेन वाँर्नच्या स्पिनने दहशत माजवली होती पण त्याच वाँर्नला सचिनने असा काही धुतला की वाँर्नला जळी-स्थळी-काष्ठी-पाताळी सचिनच सचिन दिसु लागलासचिनचे नेहमीच एक फलंदाज म्हणुन गोडवे गायले जातात पण आमचा सचिन गोलंदाजीतही तितकाच तरबेज होताहिरो कपची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सेमीफायनल कोणी कशी काय विसरु शकेल...? शेवटच्या षटकात जिँकण्यासाठी आफ्रिकेला 6 चेँडुत 3 धावांची गरज असतानासचिनने कर्णधार अझरुद्दीनच्या हातातुन चेँडु काढुन घेतला आणि आपल्या कल्पकतेतुन गोलंदाजीचा असा काही अविष्कार प्रकट केला की भलेभले गोलंदाजही तोँडात बोटे घालुन सचिनची गोलंदाजी पाहु लागलेसचिनने शेवटच्या षटकात आफिक्रेला 3धावाही करु दिल्या नाहीत आणि भारत सामना जिँकलाएका कसोटीत मोईन खानला सचिनने टाकलेला चेँडु इतका वळला की आजही त्याची तुलना 'Magic Ball' या प्रकारात होतेएक अव्वल फलंदाज असुन देखील आंतरराष्ट्रीय
क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर जमा असलेल्या 200 विकेट्स एक गोलंदाज म्हणुनही तो किती महान होता याचीच साक्ष देतात.
            जगात सर्वाधिक सहा विश्वचषक खेळणारा सचिन हा एकमेव खेळाडु आहे आणि सचिनसाठी देशाला विश्वचषक किती महत्वाच होत याची जाणीव भारत 2011 विश्वकप जिँकल्यावर भर मैदानात युवराजला घट्ट मिठी मारत सचिनच्या डोळ्यात तरळलेले अश्रु करुन देतातया 6 विश्वचषकांपैकी 1996 आणि 2003 मध्ये सचिनने सर्वाधिक धावा केल्या होत्या.त्यामुळेच भारताला या दोन्ही विश्वकपात अनुक्रमे सेमीफायनल आणि फायनलला पोहोचणे शक्य झालेभारताने जिँकलेल्या 2011 विश्वकपातही दिलशान नंतर सर्वाधिक धावा करणारा सचिनच होता.1999 विश्वचषक सुरु असतानाच सचिनच्यावडिलांचे अचानक निधन झालेदेशाची अंतःकरणाने अविरत सेवा करणा-या एका महान खेळाडुच्या मनाची परमेश्वराने घेतलेली ही अग्निपरीक्षाच असावीएकीकडे लहानपणापासुन सावलीप्रमाणे वावरणा-या वडिलांना अग्नी देऊन कायमचा निरोप घ्यायचा होता आणि दुसरीकडे देशाचे आव्हान विश्वचषकात अबाधित राखायचे होतेस्वभावतः भावनिक असणारा सचिन याभावुक परिस्थितीत मात्र स्थितप्रज्ञराहिलावडीलांना अग्नी देऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आणि त्याच मनःस्थितीत केनियाविरुद्ध दणदणीत शतक देखील झळकावलेअगदी त्या सामन्यापासुन सचिन प्रत्येकशतकावेळी आणि प्रत्येक रेकाँर्डवेळी वर बँट उंचावुन आकाशाकडे डोळे करत सगळ काही सर्वप्रथम वडिलांना समर्पित करतोसचिनच्या आयुष्यातील त्याच्या वडिलांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी हे पुरेसे आहे.अशा वडिलांना गमावल्यानंतरही सचिन राष्ट्रीय कर्तव्य बजावत विश्वचषकातील उर्वरित सामने खेळला ही गोष्ट त्याची देशाप्रती असलेली निष्ठाक्रिकेटप्रती केलेले समर्पण आणि वडिलांनी केलेले उच्च प्रतीचे संस्कार नमुद करतातकदाचित वडीलांकडुनमिळालेले हेच संस्कार सचिनला 24 वर्षाच्या करियरमध्ये निष्कलंक ठेवु शकलेएवढी वर्षे सार्वजनिक आयुष्यात प्रसिद्धीच्या अत्त्युच्च शिखरावर राहणा-या माणसावर चिखल उडवायला टपलेल्या हितशत्रुंची कमी नसतेचंद्रावरही डाग आहेत पणसचिनच्या करियरवर कोणी ठरवुनही डाग लावु शकला नाहीमँच फिक्सिँगच्या वावटळीत पुर्ण भारतीय टिम ढवळुन निघालीक्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारे भारतीय रसिक हताश झाले पण त्यांचा क्रिकेटवरचा विश्वास कायमराहिला कारण विश्वासाहार्तेचे प्रतीक असलेला सचिन क्रिकेट खेळत होतामुळात भारतात क्रिकेट खेळच धर्माच्या पंक्तीत गणला जाऊ लागला कारण सचिनला लोकांनी मनापासुन 'देवमानला होताआज धोनीकोहलीच्या कमाईशी सचिनच्यासध्याच्या कमाईची तुलना करुन त्याला कमी लेखण्याचा उपद्व्याप काही उपटसुंभ मंडळी करताना दिसतात.त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आज धोनीकोहली ज्या ताटावर बसुन पाचही बोटे तुपात घालुन जेवत आहेत ते ताट तयार करणाराच मुळी सचिन आहेक्रिकेटला भारतात मिळालेल्या ग्लँमरमुळे आज खेळाडुंना भरपुर पैसा मिळतोय पण या खेळाला हे ग्लँमर मिळण सचिन शिवाय कधी शक्यच झाल नसतअन्यथा क्रिकेटची हालतही हाँकीपेक्षा फार वेगळी नसतीअगदी सचिनच्या काळात द्रविडगांगुलीकुंबळे आणि त्यानंतर सेहवागयुवराजधोनीकोहली यांनी भारतीय क्रिकेटसाठी भरीव योगदान दिले पण क्रिकेटरसिकांसाठी ते फार फार तर 'देव-गणम्हणुन गणले गेले कारण सचिन त्यांच्यासाठी नेहमीच 'देव'पदी कायम सिँहासनारुढ राहिलासचिनच्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक खेळाडु एकदम धमाका करत आलेकाजव्याप्रमाणे काही काळ चमकले आणि नंतर लुप्तही झाले पण सचिन नावाचा सूर्य क्रिकेटच्या क्षितीजावर 24 वर्षे तळपत राहिलायश मिळवण कठीण असत पण त्याहीपेक्षा मिळवलेल यश टिकवण खुप कठीण असतचारसामन्यात यश मिळाल्यावर हुरळुन जात पबमध्ये दारुच्या पार्ट्या करत फिरणारेबाँलिवुडमधल्या ललनांवर भाळुन पेज थ्री वर अफेयर्सच्या चर्चाँनी रकानेच्या रकाने भरणारे खेळाडु काळाच्या ओघात केव्हाच नाहीसे झाले कारण यश मिळाल्यानंतर त्यांना क्रिकेटशिवाय नसते उद्योगच खुप सुचायचेमात्र गेली 24 वर्षे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला सचिन कधी पब मध्ये दारुच्या पार्ट्या करत असल्याचे निदान माझ्या तरी ऐकीवात नाहीसचिनने अंजलीवर प्रेम करुन तिच्याशीच लग्न करत क्रिकेटसारखा तिच्याशीही एकनिष्ठच राहिलाबाँलिवुडच्या नट्यांची सावली देखील त्याने आपल्या क्रिकेट करियरवर आणि सुखी संसारावर पडु दिली नाहीद्वारकानाथ संझगिरी सचिनची आठवण सांगताना म्हणतात की सचिनला झोपेत चालायची सवय होती आणि सचिन ज्या बिल्डीँगमध्ये राहायचा त्याच्या वरच्याच मजल्यावर विश्वसुंदरी ऐश्वर्या राय राहायची पण चुकुन सुद्धा रात्री झोपेतही सचिनचे पाय ऐश्वर्याच्या घराकडे वळले नाहीतसचिन फक्त 'आदर्श क्रिकेटर' नव्हे तर 'आदर्शपुरुष'ही होताआणि ही किमया होती त्याचे वडील रमेश तेँडुलकर यांनी लहानपणी त्याच्यावर केलेल्या संस्कारांची...!
      क्रिकेटच्या मैदानावार सचिनला डिवचण्यासाठी अनेक खेळाडुंनी शेरेबाजी केलीकाही प्रसंगी त्याला शिव्यादेखील दिल्या आणि त्याने मात्र या सगळ्यांना बँटने उत्तर देऊन गप्प केलेसचिनने कधी प्रतिस्पर्धी खेळाडुंना किँवा विरोधी टिमच्या पाठीराख्यांना शिवीगाळ केली नाहीविराट कोहलीसारख्या तरुण खेळाडुने अंगीभुत कौशल्य असुन मैदानावर असभ्य वर्तनकरताना सचिनचा आदर्श लक्षात घेण्याची गरज आहेराग सचिनला देखील यायचा पण त्याची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असायचीएकदा झिम्बाब्वेच्या हेन्री ओलोँगो या गोलंदाजाने एकदाच सचिनची विकेट मिळाल्यावर बढाया मारायला सुरुवात केलीत्याला पुढच्याच सामन्यात सचिनने असा काही चोपला की पुन्हा कधी तो सचिनकडे नजर वर करुन बघु शकला नाही.2003 विश्वचषकाच्या अगोदर सचिन पाठदुखीने त्रस्त होतात्यावेळी पत्रकार परिषदेत अँडी कँडीक हा इंग्लंडचा गोलंदाज सचिनवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला की सचिनला मी भारतीय संघातील बाकीच्या खेळाडुंप्रमाणेच सामान्य लेखतोपाठदुखीमुळे आता तर तो षटकार देखील मारु शकत नाहीदुस-याच दिवशी सचिनने इंग्लंडविरुद्ध 50 धावांची छोटेखानी खेळी केली आणि याच खेळीत कँडीकला पुढे सरसावत असा षटकार खेचला की चेँडु मैदानाबाहेर जाऊन पडलात्यानंतरच्याच सामन्यात सचिन कँडीकचे आव्हान स्विकारुन त्याला षटकार मारु
शकतो पण शोएब अख्तरच्या वेगाचा सामना करत षटकार खेचु शकत नाही अशा वल्गना अख्तरकडुन करण्यात आल्यात्यावेळी पायाची अप्रतिम हालचाल करुन सचिनने शोएबला लगावलेला षटकार क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात चांगल्या फटक्यांपैकी एक म्हणुन गणला जातोत्यावेळी नाँन स्ट्राईकवर असलेल्या सेहवागने अख्तरला सांगितले की"आखिर बाप बाप होता है...!"
            सचिनने शंभर शतके झळकावली खरी पण माझ्यासाठी सचिनने पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील त्या सामन्यात केलेली 98 धावांची खेळी त्याची आजपर्यँतची सर्वात चांगली खेळी आहेएकीकडे वकारअक्रमअख्तर असा जगातीलसर्वात चांगला वेगवान मारादुसरीकडे भारताला तो सामना जिँकणे अनिवार्य होते आणि त्यात भरीस भर म्हणुन पाकिस्तानने 273 धावांचा उभा केलेला डोँगर या परिस्थितही सचिन अक्षरशः तुटुन पडला आणि पाकड्यांचा फडशा पाडला.आँस्ट्रेलियन गोलंदाज ब्रँड हाँग एकदा सचिनची विकेट मिळवल्यानंतर अतिउत्साहाच्या भरात चेँडुवर सचिनची स्वाक्षरी घेण्यासाठी गेलासचिनने चेह-यावर स्मितहास्य ठेवत हाँगला स्वाक्षरी दिली पण सोबत संदेश लिहुन दिला की यापुढच्या काळाततुला पुन्हा माझी विकेट मिळणार नाही याची नक्की काळजी घेईनआश्चर्य म्हणजे त्यानंतर तब्बल 27 वेळा तेँडुलकरहाँग आमने सामने आले पण हाँग काही सचिनची विकेट घेऊ शकला नाहीएखाद्या प्रतिस्पर्धी खेळाडुचे आव्हान स्वीकारण्यात काहीच गैर नाही पण ते करताना आपली सभ्यता कधी सोडायची नसते हाच संदेश सचिनने अवघ्या क्रिकेट
जगताला दिलासचिनच्या याच सभ्यतेचा सन्मान जगाने केलाआँस्ट्रेलियात हरभजन-सायमंड्स यांच्यातील 'मंकीगेटप्रकरण गाजले तेव्हा आयसीसीच्या कोर्टात दोन्ही संघांकडुन आरोप-प्रत्यारोप करण्यात आलेमात्र अंतिम न्याय निवाडा करतानादस्तरखुद्द आयसीसीने सचिनची साक्ष प्रमाण मानुन हरभजनला निर्दोष ठरवलेरेकाँर्डच्या बाबतीत रिकी पाँटिँग सचिनच्या कितीही जवळपास पोहचत असला तरी एक खेळाडु म्हणुन सचिनच्या पायाजवळही पोहोचत नव्हता आणि सचिनच्या याच खिलाडुव्रुत्तीला आयसीसीने विश्वासार्ह ठरवलेसचिनची ही सभ्यताच त्याला संघातील इतर खेळाडुंपेक्षाच नव्हे तरक्रिकेट या खेळापेक्षाही फार मोठ्या उंचीवर घेऊन गेलीत्यामुळेच कोणत्याही प्रश्नावर कधीही एकी  दाखवणारे संसदेतील खासदार जेव्हा वेस्ट इंडिजमध्ये सचिनवर चेँडु कुरतडण्याचे आरोप झाले तेव्हा त्याचा निषेध नोँदवायला एकत्र आले.स्वभावातील सभ्यतेमुळेच क्रिकेटपलीकडे जाऊन सचिन देशाचे प्रतीक म्हणुन ओळखला जाऊ लागला आणि त्याच प्रतीकावर हल्ला झाल्याने देशाच्या जनतेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार एकवटलेभारत देशाला जाती-धर्माच्या किडीने
फार पुर्वीपासुन पोखरले आहेअगदी पुरोगामी महाराष्ट्राचा विचार केला तरी आंबेडकरसावरकरटिळक या राष्ट्रपुरुषांना देखील जाती धर्माच्या चौकटीत विभागले गेलेमात्र सचिन तेँडुलकरने जाती-धर्माच्या सीमा पार करुन सामान्यातील सामान्य माणसाचे प्रेम मिळवलेअशी काय जादु असेल सचिनच्या खेळात जी अनेकांना त्याची भुरळ पाडायची...? तंत्राच म्हणाल तर गावस्करद्रविड यांच्याएवढा सचिन नक्कीच तंत्रशुद्ध नव्हतासचिनचे गुरु आचरेकरच सांगायचे की सचिनची बँटधरण्याची पद्धत तांत्रिकद्रुष्ट्या योग्य नव्हती पण आपण ती मुद्दामच बदलली नाहीआक्रमकतेच म्हणाल तर सेहवागयुवराजधोनी यांच्याएवढा सचिन आक्रमकही नव्हता तरीसुद्धा तो या सगळ्यांना वरचढ ठरलाडाँन ब्रँडमनना सचिन खेळतानात्याच्या खेळात ब्रँडमनना आपल्या खेळाचा अंश दिसु लागलाअगदी क्रिकेटची जाण नसलेल्या सामान्य माणसालाही तो आपला वाटु लागला कारण सचिन तेँडुलकर तंत्र आणि आक्रमकता याचा मिलाफ होतासचिनचा खेळ द्रविडसारखा रटाळ वाटायचानाही आणि सेहवाग-धोनीसारखा ओबडधोबड देखील वाटायचा नाहीहीच त्याच्या खेळाची खासियत होती जी क्रिकेटरसिकांना अक्षरशः वेड लावायचीभारताचा सामना असला की भारताचा स्कोअर किती झाला या प्रश्नाला जोडुन 'तेँडल्याने किती केले...?'हा प्रश्न हमखास असायचाप्रत्येक सामन्यात सचिनने जास्तीत जास्त धावा कराव्यात अशी भाबडी भावना त्यामागे असायचीसचिनबद्दल कित्येक लोकांची आपुलकी एवढी असायची की तो त्यांना त्यांच्या घरातीलच एक सदस्य वाटायचामैदानकोणतेही असो भारताच्या प्रत्येक सामन्यावेळी 'सचिन... सचिन...' हा गजर ठरलेलाच असायचागेल्या पाच-सहा वर्षात आयपीएलमुळे प्रत्येक खेळाडु प्रांतांची लेबल लावुन खेळु लागलेकोणत्याही भारतीय खेळाडुला होम ग्राऊंडचे मैदान वगळता शक्यतो इतरत्र पाठिँबा मिळत नसेविराट कोहलीचा तर वानखेडे स्टेडियमवरप्रेक्षकांनी अक्षरशः हुर्यो उडवलामात्र या सगळ्याला अपवाद होता सचिन तेँडुलकरचा...! सचिन अगदी आयपीएललाही मुंबईबाहेर सामना खेळायला जायचा तेव्हा तिथले प्रेक्षक सचिनची बँटिँग सुरु असताना आपल्या होम टीमला काही काळापुरते विसरुन सचिननामाचा जयघोष सुरु करायचेयालाच म्हणतात प्रांतिक सीमा ओलांडुन पुढे गेलेला खेळाडु...! कुणाचीही तारीफ करण्यात कंजुषी दाखवणारे आँस्ट्रेलियन खेळाडु देखील याच कारणासाठी सचिनची तारीफ करण्यात मश्गुल असायचेमँथ्यु हेडन म्हणायचा की मी देव पाहिलाय आणि तो भारतासाठी कसोटीत चौथ्या क्रमांकावरबँटिँग करतोआँस्ट्रेलियन खेळाडुंनी सचिन पुरेपुर अनुभवला होता.100 शतकांपैकी तब्बल 20 शतके सचिनने बलाढ्य समजल्या जाणा-या आँस्ट्रेलियाविरुद्धच लगावलीशारजामध्ये सचिनने एकापाठोपाठ एक लगावलेली घणाघाती शतके आजहीआँस्ट्रेलियन खेळाडुंच्या स्वप्नामध्ये येत असतीलशारजातील त्या सामन्यात वादळ आल्यामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला होता पण नंतर जेव्हा खेळ पुन्हा सुरु करण्यात आला तेव्हा सचिन नावाच्या वादळाने आँस्ट्रेलियन खेळाडुंची दाणादाण उडवलीसचिनच्या याच वैशिष्ट्यामुळे अँडी फ्लाँवर त्याची स्तुती करताना म्हणतो की या जगात दोन प्रकारचे फलंदाज आहेतएक म्हणजे सचिन तेँडुलकर आणि दुसरे बाकीचे फलंदाजसचिनच्या संघसहका-यांमध्येही त्याच्याबद्दल असलेला आदर वेळोवेळी व्यक्त झालेला आहेविश्वचषक जिँकल्यानंतर सचिनला खांद्यावर उचलुन विराट कोहलीनेमैदानाला चक्कर मारलीत्यावेळी तुझ्या खांद्यांना सचिनच ओझ नाही का वाटलअसा प्रश्न पत्रकारातुन विचारण्यात आलात्याला उत्तर देताना विराट म्हणाला,
"ज्या माणसाने गेली 20 वर्षे विनातक्रार करोडो लोकांच्या अपेक्षांच ओझ आपल्या खांद्यावर घेतलत्याच माझ्या खांद्यांना कसल आलय ओझ...?"
खरच हे वाक्य खुप काही बोलुन जात.463 वन-डे आणि 200 कसोटी सचिन क्रिकेट रसिकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखालीभरडला गेलादेव या संकल्पनेबद्दल नक्कीच मत-मतांतरे असतील पण इतकी वर्षे करोडो लोकांच्या अपेक्षांचा भार स्वतःच्याखांद्यावर झेलुन त्यांना त्यांच्या आयुष्यातील दुःख विसरायला लावुन निखळ आनंद देणे फक्त देवालाच जमतेआम्ही हा देव माणसामध्ये पाहिलाय आणि तो सुद्धा सचिनमध्येच पाहिलाययशाच्या सातव्या आसमानावर असताना पाय जमिनीवर ठेवुनविनम्रतेचीशालीनतेची जीवंत मुर्ती असलेला सचिन 'देवमाणुस' आहे.
                सचिनच्या निव्रुत्ती देखील त्याच्यासारखीच अनन्य आहेअशी राजेशाही निव्रुत्ती क्रिकेटच नव्हे तर कोणत्याच खेळातील कोणत्याच खेळाडुच्या नशीबी आली नसेलस्वतःच्या होम ग्राऊंडवर निव्रुत्त होणारा सचिन पहिलाच क्रिकेटर
असल्याने पंढरपुरच्या आषाढी एकादशीप्रमाणे वानखेडे स्टेडियमवर अमाप गर्दी लोटतेय कारण क्रिकेटरसिकांसाठी सचिन हा क्रिकेटचा विठ्ठलच होता.विठ्ठलाच्या क्रिकेटच्या मैदानावरील अवतारसमाप्तीच्या कल्पनेनेच देशात करोडो डोळे पाणावले आहेतसचिनला निरोप देण्यासाठी प्रत्येकजण वानखेडेवर येऊ पाहतोय कारण सचिनची निव्रुत्ती हा ऐतिहासिक क्षण आहे.तुम्ही पुढच्या अनेक पिढ्यांना अभिमानाने सांगु शकता की आम्ही क्रिकेटच्या देवाला निव्रुत्त होताना पाहिलयलेखाची समाप्ती करताना मला महाभारतातील भीष्मपितामह आणि सचिनच्या निव्रुत्तीची तुलना करण्याचा मोह आवरणे कठीण होतेय.भीष्मांना महाभारतात इच्छामरणाचे वरदान होते तसेच सचिनलाही इच्छानिव्रुत्तीची सवलत बीसीसीआयने बहाल केली होतीमहाभारतातील युद्धाचा निकाल लागल्यानंतर बाणशय्येवर झोपलेल्या भीष्मांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा त्या युगपुरुषाचीनिव्रुत्ती बघायला आकाशात देव जमा झाले होतेआज देशाला विश्वचषक मिळवुन दिल्यावर आणि यशाची अनेक एव्हरेस्ट पादाक्रांत केल्यावर सचिनने देखील क्रिकेटमधुन अवतारसमाप्तीची घोषणा केली आहेक्रिकेट एक तपश्चर्या समजुन आयुष्यजगलेल्या या व्रतस्थ खेळाडुची निव्रुत्ती पाहायला स्वर्गातील देव आकाशात पुन्हा उभे राहतीलनदी-सागरपर्वतरांगा सगळे सचिनच्या क्रिकेटमधील कार्याला सलाम देण्यासाठी त्याचा शेवटचा सामना पाहतीलत्यावेळी भारताच्या उत्तर सीमेवरदिमाखात उभ्या असणा-या हिमालय पर्वताला आपल्या सह्याद्रीचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाहीहिमालय नक्कीच सह्याद्रीला साद घालुन सांगेल,
"हे सह्याद्रीतु खरच खुप नशीबवान आहेसनियतीने माझ्या पोटी लाखो गोष्टी दिल्या पण लाखमोलाचा सचिन मात्र तुझ्याच पदरी दिलासचिन खरच 'तयासम तोचिप्रकारातला खेळाडु आणि माणुस आहे.क्रिडाजगतात ऐसा सचिन पुन्हा होणे नाही."

1 टिप्पणी: