शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

शिवसेनेने उमेदवारी नाकारली तरी सुरेश प्रभु लोकसभेसाठी उमेदवार असतील...




   
गेले काही महिने मी रत्नागिरी-सिँधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन सुरेश प्रभुंनाच उमेदवारी द्यायला हवी अशी मोहिम हाती घेतली आहे. त्याच वेळी व्रुत्तपत्रात शिवसेनेकडुन विनायक राऊतांच्या नावाची औपचारिक घोषणा व्हायची बाकी आहे अशा बातम्या झळकतायेत. मध्यंतरी सुरेश प्रभुंनी स्वतःच उमेदवारी नाकारल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि लोकांनी साधा सरळ विचार करुन त्यावर विश्वास देखील ठेवला. राजकरणातील गोष्टीँचा इतका साधा सरळ अर्थ काढायचा नसतो. सुरेश प्रभुंना उमेदवारी न देता आपलच प्याद रेटण्याचा प्रयत्न शिवसेनेतील एक गट करतोय आणि प्रभुंना उमेदवारी नाकारुन लोकांची नाराजी ओढवुन घ्यावी लागेल म्हणुन प्रभुंनी स्वतःच उमेदवारी नाकारली अशा अफवा जाणीवपुर्वक पसरवतोय. प्रभुंसारखा सभ्य माणुस पुढे येऊन या अफवांचे खंडन करु शकणार नाही याची जाणीव त्यांना आहे. अशा धुमश्चक्रीत मला सुरेश प्रभुंना पुढे रेटुन नेमक काय सिद्ध करायच आहे, असा प्रश्न कित्येकांना पडला असेल.
    बाळासाहेबांशी एकनिष्ठ राहिलेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान करण्याचा ठेका शिवसेनेतील काही मंडळी करु पाहतायेत. मोहन रावलेँसारख्या वरिष्ठ आणि लायकी असलेल्या नेत्याला तिकीट डावलुन आपल्या कंपुतील कोणाला तरी उमेदवार म्हणुन लादायचे, असली थेड करुन शिवसेना पक्ष संपवायचा ठेका या मंडळीनी घेतला आहे. या साखळीतील पुढचा बळी ठरणार आहेत बाळासाहेबांशी एकनिष्ठ असलेले आणि कोकणातुन बाळासाहेबांनी सलग पाच वेळा उमेदवारी दिलेले माजी केँद्रीय मंत्री सुरेश प्रभु...!

आता प्रभुंना पर्याय कोण तर आमदार विनायक राऊत.

विधानसभेत दोन वेळा पराभव पत्करुन विधानपरिषदेतुन आमदार म्हणुन गेलेला नेता...!
ज्या तळगाव मधील ग्रामस्थ म्हणुन विनायक राऊत आपल सिँधुदुर्गशी नात सांगतात, त्या तळगावची ग्रामपंचायत पण राखु न शकलेला नेता...!!
आता, कोकणच्या ज्या विद्वान मतदारसंघाची राऊतांना उमेदवारी देऊ पाहतायेत त्या मतदारसंघाने नेहमीच विद्वान उमेदवार निवडुन दिलाय. अगदी निलेश राणेँना पण निवडणुकीआधी 'डाँक्टर' बनावच लागल. सुरेश प्रभुंकडे C.A, Phd, L.L.B. आणि B.Com  अशा एकापेक्षा एक पदव्या आहेत. विनायक राऊतांच शिक्षण शिवसेनेने आधी जाहीर कराव.
1) विनायक राऊतांकडे उच्च शिक्षण नसेल तर निदान या मतदारसंघातुन तरी खासदार व्हायची दिवास्वप्ने पाहु नयेत.

2) सुरेश प्रभु कोकणातल्या राजकरणातल अजातशत्रु व्यक्तिमत्व आहे. दिपक केसरकर, परशुराम उपरकर आणि अगदी राज ठाकरेँशी प्रभुंची असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. प्रभुंना उमेदवारी दिली तर एनसीपीचे असंतुष्ट आमदार दिपक केसरकर यांना लोकसभेला अपक्ष राहण्यापासुन रोखता येईल. एवढच नव्हे तर प्रभुंसाठी राणेँविरोधात जोमाने प्रचार करायची तयारी केसरकरांनी स्वतः दाखवली आहे. त्याशिवाय केवळ प्रभुंखातर लोकसभेला उमेदवार न देता मनसे निवडणुकीत अलिप्त राहिल. कदाचित उपरकर आपल्या जुन्या मित्राचा प्रचार देखील करतील. अशा प्रकारे केसरकरांची किमान 40000 आणि मनसेची 20000 अशी 60000 मते फुटणार नाहीत. विनायक राऊत उभे राहिले तर केसरकरांच माहित नाही पण उपरकर शिवसेनेतला वचपा काढायला नक्कीच त्वेषाने तुटुन पडतील. तिकडे रत्नागिरीत भास्कर जाधव शिवसेना पक्षाशी वैर असल्यामुळे राणेविरोधी असले तरी सक्रिय प्रचार करणार नाहीत पण प्रभुंना पक्षापलीकडील नेता मानत असल्यामुळे भास्कर जाधव राणेँना अद्दल घडवण्यासाठी प्रभुंचा प्रचार नक्कीच करतील.

3)शिवसेनेने कितीही उड्या मारल्यात तरी त्यांची मतदारसंघातील एकत्रित मते काँग्रेसपेक्षा नक्कीच जास्त नाहीत. त्यामुळे विनायक राऊत, राजन साळवी किँवा अगदी उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार म्हणुन उभे राहिलेत तरी ते निवडुन येण कठीण आहे कारण त्यांना फक्त शिवसेनेचीच मते मिळतील. सुरेश प्रभु एकमेव असा उमेदवार आहे ज्याला शिवसेनेची मते अधिक निःपक्ष मते मिळतात. ही निःपक्ष मते दंडवते, नाथ पैँची असुन ती अजुनही पक्षापलीकडे जाऊन फक्त विद्वान उमेदवारालाच मिळतात आणि थोडीथोडकी नव्हे तर कोकणात किमान 50000 लोक उमेदवार बघुन मत देणारे आहेत.

अशा अनुकुल परिस्थितीत शिवसेनेने प्रभुंना फक्त उभ करायची तसदी घेतली तरी प्रचाराशिवाय प्रभु निवडुन येवु शकतात, इतकी ताकद या नावात आहे. इतकी आकडेवारी देऊनही शिवसेनेने दळभद्रीपणा करत सुरेश प्रभुंऐवजी विनायक राऊतांना उमेदवारी दिली तर प्रभुंच राजकरण संपल का...?
या प्रश्नाच उत्तर 'नाही' असच असेल.

संदर्भ द्यायचाच झाला तर प्रतिष्ठेच्या 2005 पोटनिवडणुकीत बाळासाहेबांच्या सभेनंतरही उपरकरांचे डिपाँझिट जप्त झाले होते.नंतरच्या काळात राणेँच्या झंझावातात शिवसेना पक्ष म्हणुन लयाला गेलेला असतानाही 2009 लोकसभा निवडणुकीत प्रभुंनी तब्बल 3 लाख 8 हजार मते मिळवली आणि हा चमत्कार नसुन ती सुरेश प्रभु या माणसाची लोकप्रियता होती. आजही राजकरणातला 'र' कळत नसलेले आणि काडीचाही रस नसलेले कित्येक लोक पक्ष न पाहता सुरेश प्रभु नावापुढचे बटन दाबुन मोकळे होतात. त्यामुळे शिवसेनेने उमेदवारी दिली नाही तरी 'अपक्ष' म्हणुन उभं राहण्याचा पर्याय सुरेश प्रभुंसमोर उभा आहे.

शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही विनायक राऊतांना थेट विरोध न करता, सुरेश प्रभुंना उमेदवारी देणार नसाल तर प्रमोद जठारांना खासदारकीची उमेदवारी द्या, अशी भुमिका घेतली आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेँद्र मोदी आणि सुरेश प्रभुंची मैत्री जगप्रसिद्ध आहे. सुरेश प्रभुंसारखा विद्वान माणुस आपल्या मंत्रीमंडळात महत्वाच्या पदी असावा अशी साक्षात नरेँद्र मोदीँची इच्छा आहे. अशा प्रसंगी सुरेश प्रभु अपक्ष उभे राहिलेत तर विनायक राऊतांना भाजप किती सहाय्य करेल याचाही विचार शिवसेनेने एकदा करावा.

सुरेश प्रभु अपक्ष उभे राहिलेत तर शिवसेनेने प्रभुंसारख्या ज्येष्ठ आणि योग्यतेच्या नेत्यावर अन्याय करुन लायकी नसलेल्या राऊतांना उमेदवारी दिली, असा अर्थ शिवसैनिक काढु शकतात आणि सहानुभुती प्रभुंनाच मिळुन शिवसेनेची स्वतःचीच मते अपक्ष प्रभुंना पडु शकतात.
या त्रिशंकु गडबडीत एक तर अपक्ष सुरेश प्रभु थोडक्या मतांनी निवडुन येऊ शकतात किँवा दुफळीचा निलेश राणेँनाही फायदा होऊ शकतो परंतु विनायक राऊत पडणार हे सूर्यप्रकाशाइतक लख्ख दिसतय.

अपक्ष राहण्याच्या पलीकडे जाऊन सुरेश प्रभुंनी एका नव्या पक्षाकडुन उमेदवारी घेतली तर सिँधुदुर्गच्या राजकरणाचं काय होईल याचा कधी विचार केलात...? सुरेश प्रभुंसारखा उमेदवार हाती लागल्यावर त्या नव्या पक्षाच्या नेत्याने दोन जिल्ह्यात दोन तडाखेबंद सभा घेतल्या तर शिवसेना उमेदवाराची काय हालत होईल याचा किमान विचार राऊतांनी करावा. त्या नव्या पक्षाने अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर प्रभु त्यांच्याकडुन खासदार म्हणुन निवडुन आले तर शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत देखील नवं आव्हान निर्माण होऊ शकेल.

सुरेश प्रभुंना शिवसेनेने ग्रुहित धरण्याची चुक करु नये, हे मीच त्यांना सांगतो. विनायक राऊतांना माझा वैयक्तिक विरोध नाही. त्यांनी आमदारकीला सिँधुदुर्गात सावंतवाडीतुन उभ राहाव, त्यांना निवडुन आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करु. जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करायचा असेल तर दिल्लीत शब्दांना वजन असणारा प्रभुंसारखा नेता खासदार म्हणुन पाठवण आज कोकणची गरज आहे. विनायक राऊतांनी जैतापुर विरोधात दिल्लीत कितीही ओरड मारली तरी त्यांना तिकडे विचारणार आहे कोण...? त्यामुळे राऊतांनी लोकसभा उमेदवारीचा अट्टहास सोडुन ती प्रभुंकडे मोठ्या मनाने सुपुर्त करावी ही नम्र विनंती...!

कोकणची भुमी शापित म्हणुन प्रसिद्ध आहे आणि राऊतांना सुबुद्धी झाली नाही तर ते पुन्हा एकदा सिद्ध होईल. शिवसेनेच्या कर्मदरिद्रीपणामुळे शिवसेनेचा उमेदवार पडुन निलेश राणे निवडुन आले तर त्यावेळी सुरेश प्रभु किँवा अनुपम कांबळीच्या नावे कोणीही बोँबा मारु नयेत. अजुनही शहाणे व्हा अथवा सुरेश प्रभुंचा मुकाबला करण्याची तयारी ठेवा.

(सुचना-: ज्या लोकांना मनापासुन वाटत की सुरेश प्रभुच कोकणचे खासदार असावेत, त्यांनी जास्तीत जास्त Like करुन, Comment मध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आणि हा लेख Share करुन शिवसेना पक्षप्रमुखांना रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघात येणा-या वादळाची पुर्वकल्पना द्यावी. त्यानंतरही त्यांनी सुरेश प्रभुंना उमेदवारी दिली नाही तर तसे करणा-यांना जन्माची अद्दल घडवण्याच महान कार्य आपल्याला येणा-या लोकसभा निवडणुकीत करायचच आहे. खासकरुन कोकणच्या पर्यावरणावर प्रेम करणा-यांनी प्रभुंना उमेदवारी मिळवुन देण्यासाठी खास पुढाकार घ्यावा. केँद्रीय पर्यावरण मंत्री असताना सुरेश प्रभुंनीच "वनसंज्ञा" आणि "जनसुनावणी" हे कायदे लागु केल्याने आज किमान आपण मायनिँग लाँबीशी झुंज तरी देऊ शकलो. अन्यथा कोकणच्या निसर्गाचा विनाश निश्चित होता. प्रभु पुन्हा खासदार झाले तर कळणे मायनिँग सारखे विनाशकारी मायनिँग प्रकल्प आणि जैतापुरचा अणुऊर्जा प्रकल्प कायमस्वरुपी रद्द करुन घेण्याची जबाबदारी माझी राहिल.माझ्या पर्यावरणाप्रती असलेल्या निष्ठेवर ज्या लोकांचा विश्वास असेल त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा.

"सुरेश प्रभु आगे बढो,
हम तुम्हारे साथ है.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा