मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

"सावधान... सावधान... वणवा पेट घेत आहे...!!!"

   
कालच्या रत्नागिरी-टाईम्स मध्ये एक दुःखद बातमी वाचली की, प्रतिष्ठेच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना निलेश राणेँविरुद्ध सुरेश प्रभुंना डावलुन विनायक राऊतांना तिकीट देत आहे. जे व्हायला नको होते तेच झाले...! मध्यंतरी सुरेश प्रभुंना लोकसभेचे तिकीट देण्यात यावे म्हणुन फेसबुकवर तरुणांकडुन प्रभुंचा जोरदार प्रचार करण्यात येत होता आणि त्याच्यासमोर झुकत शिवसेना प्रभुंना राज्यसभेवर पाठवायला तयार झाली आहे.

    मित्रांनो,प्रश्न प्रभुंच्या खासदारकीचा नाहीच आहे. इकडे प्रश्न आहे तो कोकणच्या विद्वान मतदारसंघाच्या प्रतिष्ठेचा...! नाथ पै, दंडवते आणि प्रभुंची परंपरा कोकणी माणुस मोठ्या अभिमानाने सांगतो आणि प्रभुंना उमेदवारी नाकारत कोकणी अस्मितेला लाथाडण्याचे दुःसाहस शिवसेना पक्षश्रेष्ठीँनी केले आहे. नाथ पै आणि दंडवते कधीही राज्यसभेतुन (मागच्या दारातुन) निवडुन गेले नव्हते मग त्यांचा वारसदार असलेल्या प्रभुंना शिवसेना कोणत्या तोँडाने राज्यसभेतुन निवडुन जायला सांगत आहे...? एवढ्या मोठ्या विद्वान विभुतीचा अपमान करायला यांना लाज कशी वाटत नाही...?? अरे, राज्यसभेवर पाठवायचेच असेल तर त्या विनायक राऊतांना पाठवायचे ना...! जे विनायक राऊत  विधानसभेत तडाख्याचा मार खाल्ल्यानंतर मागच्या दाराने विधानपरिषदेत प्रवेश करुन आमदार होतात, त्यांना कसली आली आहे लायकी...? त्याच विनायक राऊतांना मागच्या दारातुन राज्यसभेत पाठवायचे सोडुन सुरेश प्रभुंसारख्या सलग चार वेळा लोकसभा जिँकणा-या नेत्याला राज्यसभा देणा-यांच्या अकलेची खरोखरच किव करावीशी वाटते. सुरेश प्रभु कोकणचा स्वाभिमान आहेत आणि त्यांचा अपमान करुन त्या स्वाभिमानाला ठेचण्याचा प्रयत्न शिवसेनेने विनाकारण केलाय. म्हणुनच सांगतो या धेडांना येत्या निवडणुकीत मतपेटीतुन उत्तर देत अद्दल घडवा. आम्हाला पोकळ धमक्या द्यायची सवय नाही. मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे सुरेश प्रभु लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत आणि निलेश राणेँविरुद्ध उभे राहणार आहेत. फक्त अपक्ष उभे न राहता एका नव्या पक्षाकडुन उभे राहतील. राजस्थानचा दौरा आटोपल्यानंतर त्या नव्या पक्षाच्या नेत्यांसोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन सुरेश प्रभु पुढील दिशा ठरवतील.
    राज्यसभेतुन निवडुन जायच असेल तर प्रभुंना शिवसेनेची गरजच नाही. नरेँद्र मोदी आणि वसुंधरा राजेँसारखे कित्येक दिग्गज प्रभुंसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या विद्वानाला केँद्रीय मंत्रिमडळात मानाच्या पदासाठी आपल्या राज्यातुन राज्यसभेची सीट देण्यासाठी पायघड्या घालुन बसले आहेत. एवढच कशाला, लोकसभेची सुरक्षित सीट देऊन भाजपप्रणित राज्यात ते प्रभुंना आरामात निवडुन देखील आणतील. एवढ्या विद्वान नेत्याला नाकारायला सगळेच काही तुमच्यासारखे कर्मदरिद्री नसतात पण प्रभु आमच्या कोकणच्या विद्वान मतदारसंघाचे प्रतिक आहेत. त्यांनी रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदार संघातुन मानाने निवडुन जात आमची मान अभिमानाने उंच करावी हा आग्रह कोकणवासियांच्या वतीने मीच प्रभुंकडे धरला आणि जनमताचा आदर करत मोठ्या मनाने प्रभुंनी तो मान्य केला.
    विनायक राऊतांसारख्या विद्वत्तेच्या बाबतीत अर्धवट अशा उमेदवाराला कोकणच्या सुशिक्षित लोकांची मते मिळणार नाहीत आणि त्यामुळेच प्रभुंना राज्यसभा देतो असे सांगुन प्रभुंची पारंपारिक मते राऊतांच्या झोळीत मिळवण्याचे घाणेरडे कटकारस्थान शिवसेनेने आखले होते पण त्यांचा डाव आम्ही वेळीच हाणुन पाडला. प्रभुंसारख्या सभ्य, सुसंस्क्रुत आणि विद्वान उमेदवाराला विनायक राऊतांसाठी घाणेरडे राजकरण करत बाजुला करण्याचे जे षडयंत्र शिवसेनेने केले त्यामुळे प्रभुंना कोकणच्या लोकांची सहानुभुती मिळुन निवडणुकीत घसघशीत मते मिळणार. त्यात इतकी वर्षे प्रभुंना मत देणा-या शिवसेनेच्या मतांचाही नक्कीच सहभाग असेल. याशिवाय मनसे (परशुराम उपरकर), राष्ट्रवादी काँग्रेस (खासकरुन दिपक केसरकर, पुष्पसेन सावंत आणि भास्कर जाधव) आणि जुनी काँग्रेस (विजय सावंत गट) यांची मते प्रभुंनाच मिळतील. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेँद्र मोदीँचा Right hand म्हणून प्रभुंकडे पाहिले जाते. त्यामुळे युती असली तरी मित्रपक्ष भाजप राऊतांना किती मदत करेल याची पुन्हा एकदा चिकित्सा करावी. या सगळ्या मतांच्या पुढे जाऊन कोकणातील दंडवते, नाथ पैँची निःपक्ष पारंपारिक मते (जी कोणत्याही पक्षाला मिळत नसुन फक्त विद्वान उमेदवारालाच मिळतात) ती फक्त प्रभुंनाच मिळतील. या मतांची टक्केवारी जवळपास 30 ते 35 टक्के आहे. एवढी मते मिळाल्यानंतर त्रिशंकु लढतीत एक तर सुरेश प्रभु जिँकुन येतील किँवा राणेसमर्थकांची मते वाढली आणि शिवसेनेची मते प्रभु-राऊत यांच्यात विभागल्याने निलेश राणे तरी जिँकतील पण राऊतांचा पराभव निश्चितच आहे. तेव्हा आपल्या लायकीप्रमाणे राज्यसभेवरुन खासदारकी घेत प्रभुंना लोकसभेची वाट मोकळी करुन द्यायची की प्रभुंविरुद्ध उभे राहुन अनामत रक्कम जप्त करुन घेत शिवसेना पक्ष आणि स्वतःच्या अब्रुचे धिँडवडे काढुन घ्यायचे याचा निर्णय सर्वस्वी राऊतांचा आहे.
    भरीस भर म्हणुन की काय विनायक राऊतांनी जैतापुर प्रश्नी आपल्या अर्धवट अकलेचा प्रत्यय देत वक्तव्य करुन झक मारली आहे.

जैतापुरचा लढा हा नुकसान भरपाईसाठी कधीच नव्हता हे राऊतांना माहित नाही का...? मच्छिमारांना प्रकल्पग्रस्त समजुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी असे अकलेच्या दिव्यांचा लखलखाट करुन ऐन निवडणुकीच्या तोँडावर समस्त मच्छिमार बांधवांचा रोष अंगावर ओढवुन घेत मते गमावली आहेत.
मुळातच अणुऊर्जेसारख्या गंभीर विषयाबाबत भुमिका ठरवताना शिवसेना नेत्यांच्या बौद्धिक मर्यादा सर्वाँनाच दिसत होत्या. त्यात राऊतांसारख्या कमी अकलेच्या माणसाला खासदार बनवले तर अशीच बकबक करुन जैतापुर प्रश्नी दिल्लीत हस करुन घेणार हे एव्हाना स्पष्ट झालय. जैतापुर अणुप्रकल्प दिल्लीत आवाज उठवुन रद्द करायचा आहे तर सध्याच्या घडीला सुरेश प्रभु हे एकमेव नाव समोर येतय. विरोधी पक्षाचे पंतप्रधान मनमोहन सिँग संसदेत On record म्हणाले होते की अणुऊर्जाप्रश्नी भुमिका मांडायला प्रभुंसारखा विद्वान नेता संपुर्ण देशात दुसरा कोणी नाही. यावरुन प्रभुंच्या बुद्धिमत्तेची कल्पना येते. तर याच सुरेश प्रभुंचा जैतापुर अणुप्रकल्पावर आपला विरोध प्रकट करतानाचा
"होय... जैतापुर अणुप्रकल्पाचा पुर्नविचार अत्यावश्यक" या मथळ्याखाली लिहिलेला लेख येत्या रविवारी तरुण भारतच्या अक्षरयात्रा पुरवणीत छापुन येतोय. अणुऊर्जेतला 'अ' माहित नसुन मुक्ताफळे उडवणा-या राऊतांसारख्या अर्धवट नेत्यांनी तो नक्कीच वाचावा.
    सुरेश प्रभुंनी माझ्या गेल्या फेसबुक पोस्टवरील निरनिराळ्या लोकांच्या कमेँट वाचल्या आणि त्यात प्रभुंनी कोकणच्या विकासासाठी काय केले, हा प्रश्न प्रामुख्याने आढळला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतुन कोकणातील गावागावाना जोडणारा प्रत्येक रस्ता सुरेश प्रभुंमुळे तयार झाला. या योजनेचा ड्राफ्ट प्रभुंनी तयार केला होता.आपल्याला लोकहिताची कामे करण्यासाठीच लोकांनी खासदार बनवल्याचे किमान भान ठेवत जाहिरातबाजी करायची सवय नसल्याने त्यांनी कोकणसाठी केलेली कामे कधी लोकांसमोर उघड केली नाहीत. आता त्यांच्यावर होत असलेल्या टिकेने व्यथित होत "कोकणच्या विकासात प्रभुंचे योगदान" हा लेख लवकरच निवडणुकांपुर्वी प्रकाशित करणार आहेत. सुरेश प्रभुंनीच इको सेँसिटीव्ह झोन कोकणात आणला असा प्रचार काँग्रेसवाले करत आहेत. केँद्रीय पर्यावरणमंत्री असताना प्रभुंनी कोकणात कळणे मायनिँगसारखे विनाशकारी प्रकल्प रोखण्यासाठी वेगळी नियमावली तयार केली होती. प्रभु त्या नियमांवर वेगळा लेख लिहिणार आहेत. मात्र काँग्रेस सरकारने गौण खनिज धारकांना वेठीस धरण्याचे पाप केले. त्यासाठीच प्रभुंनी काळसेकर आणि जठार यांच्या सोबत सध्याच्या केँद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्या सचिवाची भेट घेऊन गौण खनिजधारकांचा प्रश्न मार्गी लावला. येत्या निवडणुकांमध्ये विनाशकारी मायनिग प्रकल्पांना विरोध करणा-या पर्यावरणवादी आणि गौण खनिज धारकांनी शिवसेनेला मत न देता प्रभुंना मत देऊन त्यांच्या कार्याची पोचपावती द्या.आता लेखाच्या शेवटी प्रभु मतदारसंघात फिरकत नाहीत या टिकेकडे वळु. प्रभुंच्या मते रत्नागिरी-सिँधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावास त्यांनी भेट दिली आहे. विनायक राऊतांप्रमाणे महिन्यातुन 3-4 वेळा पर्यटनसफरी करायला ते रिकामटेकडे श्रेणीत मोडत नाहीत.
    मित्रहो, सांगायची गोष्ट अशी की विनायक राऊतांची उमेदवारी फायनल करताना प्रभुंना फोन करण्याची तसदी देखील शिवसेना नेत्यांनी घेतली नाही. एका वरिष्ठ आणि सभ्य नेत्याचा उन्मतपणे अपमान करणा-यांना निवडणुकांमध्ये जन्माची अद्दल घडवा.

सरतेशेवटी यांना एवढच सांगेन-
"आली रे आली,
आता तुझी बारी आली..."
प्रभु नावाचे वादळ लवकरात लवकर कोकणच्या किनारपट्टीवर येऊन धडकेल आणि ही वादळापुर्वीचीच शांतता आहे. त्या वादळात असे उडुन जाल की कोकणातुन कायम स्वरुपी सुपडा साफ होईल.

३ टिप्पण्या:

  1. अलीकडे शिवसेनेत माती खायची परंपरा सुरु झाली आहे, त्याचाच परिपाक म्हणजे प्रभूंना डावलून रडतराउत ला उमेदवारी. जनता दुधखुळी नाही. रडतराउत ला माती खायला लाऊन जनता शिवसेनेला जागा दाखवील हे निश्चित.

    उत्तर द्याहटवा
  2. anupam uttam likhan keles...yat vinayak raut yana apan target kele ahe.ann shivsene la dekhil.
    ajun shivsene ne official umedwar declared kele nahit ann apan agadi 100 takke khatri deta ki umedwari prabhu sahebana shivsena denar nahi.....krupaya evhadi utavilata dakhavu naka.prabhu sahebanchya budhimatte babat kunala hi dumat nahi agadi shivsene madhil pratek neta tyanchya kade adharane pahato.me swata prabhu ncha chahata ahe.apan te MNS madhun nivadnuk ladvatil ase thet declare karun takale.yat prabhu sahebanche nukasan hot ahe ase vatat nahi ka?rautana tkt denyaevadhi chuk shivsena karnar nahi....mazya mate prbhu sahebanch tkt milel....aplya lekhamule apan shivsene madhe think tank nahi asa bhas nirman hoto parantu tase nahi udhav sahebani atishay kalaji purvak barech nirnyay ghetale ahet ani prabhuna umedhvari devun tyanchatil chanksha panna dekhil apanas pahayala milele thoda dhir dhara...rajkaranat sayyam asava.....ani ho aple barech muddhe yogya ahet.....prabhu samor raut mhanaje.....graduate student samor preschool student......vat paha nirnay aplya manasarakha hoil.....

    उत्तर द्याहटवा