बुधवार, ३ जुलै, २०१३

प्रदीप इंदुलकर दिग्दर्शित 'HIGH POWER'

ठाण्याचे रहिवासी असलेल्या प्रदीप इंदुलकर दिग्दर्शित 'HIGH POWER' चित्रपटाला यंदाचा 'येलो आँस्कर' पुरस्कार मिळाला. जगभरात अणुऊर्जेवर प्रसिद्ध होणा-या चित्रपटांपैकी सर्वोत्क्रुष्ट चित्रपटासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो आणि यंदा हा मान प्रदीप इंदुलकर यांनी अक्षरशः भारताकडे खेचुन आणला तरी सुद्धा त्यांचे अभिनंदन करायला काही मोजकेच लोक असावेत ही इंदुलकरांची नव्हे तर संपुर्ण भारत देशाची विटंबना आहे. जागतिक मराठी भाषा दिनी, महाराष्ट्र दिनी छाती ठोकुन "मी मराठी", "गर्वच नाही तर माज आहे मला मराठी असल्याचा" अशी गर्जना करणा-या करंट्यांना एका मराठी माणसाने हा भीमपराक्रम करुन जगाला मराठी माणसाची दखल घ्यायला लावली, याची कल्पना नसावी याबद्दल आश्चर्य व्यक्त करावे की दुर्देव समजुन गप्प बसावे...?
कुठे गेली मराठीचा मक्ता जणु काही आपणच घेतलाय अशा तो-यात फिरणारी तथाकथित मराठी सेना...?? की रस्त्यावर बसुन रोजीरोटी कमावणा-या भैय्यांना चोपण्यासाठी आणि दुकानांवरील मराठी पाट्यांपुरती यांचे मराठी प्रेम अस्तित्वात आहे...???
कदाचित अनिल काकोडकरांच्या भक्तीत तल्लीन होऊन आंधळे झाल्यामुळे एका मराठी माणसाचे यश यांच्या नजरेला दिसत नसेल किँवा खुपत तरी असेल.

तुमच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा जगभरातील 150 चित्रपटातुन अंतिम 8 चित्रपटांसाठी भारताचा HIGH POWER चित्रपट निवडला गेला तेव्हा ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या "येलो आँस्कर चित्रपट महोत्सवात" सामील होण्यासाठी विमानांच्या तिकटांसह जवळपास 2 लाख रुपये अधिक खर्च अपेक्षित होता. दिग्दर्शक प्रदीप इंदुलकर हे तुमच्या-आमच्या सारखे मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने अर्थातच त्यांच्याकडे एवढी रक्कम नव्हती. त्यांनी सर्व वर्तमानपत्रात मदतीसाठी आवाहन केले पण झोपेत सुद्धा मराठी, मराठी म्हणुन नारे देणा-या नवनिर्माण सेनेला एका मराठी माणसाचे हे आवाहन नजरेस पडले नाही कारण या नजरेला काळी पट्टी बांधण्याचे काम यांच्या देवाने म्हणजेच अनिल काकोडकरांनी केले होते. जेव्हा 'सामना' वर्तमानपत्रात उद्धव ठाकरेंनी इंदुलकरांचे मदतीचे आवाहन वाचले तेव्हा लगेचच इंदुलकरांना फोन करुन मातोश्रीवर बोलावुन घेतले आणि 2 लाख रुपयांची मदत करताना सांगितले की,
"अशा समाजकार्यासाठी आर्थिक मदत हवी असेल तर मातोश्रीचे दरवाजे सदैव तुमच्यासाठी खुले असतील. शिवसेना असेपर्यँत अशा चांगल्या कामांसाठी कोणालाही मदतीसाठी वणवण भटकायची वेळ येणार नाही. इंदुलकर तुम्ही बिनधास्त ब्राझीलमध्ये जा आणि हा येलो आँस्कर पुरस्कार जिँकुन या. शिवसेना आणि उद्धव ठाकरेँच्या फक्त शुभेच्छाच नव्हे तर आर्थिक मदतही सदैव तुमच्यासोबत राहील."
आज प्रदिप इंदुलकरांनी येलो आँस्कर पुरस्कार जिँकला पण अजुनही उद्धव ठाकरेँनी या मदतीच्या बातमीचा कुठेही गाजावाजा केलेला नाही.उद्धव ठाकरेँकडे बाळासाहेबांसारखी आक्रमकता नाही म्हणुन अलीकडे काहीजण त्यांची खिल्ली उडवतात पण अडलेल्या नडलेल्या गरजवंतांना मदत करायचा गुण त्यांनी बाळासाहेबांकडुन घेतलेला दिसतो. कदाचित दानशुरपणा आनुवांशिकरित्या बापाकडुन मुलाकडे जात असावा पण तो काकाकडुन पुतण्याकडे येत नसावा.

असो, तर सांगायचा मुद्दा एवढाच की कोण कुठचा डँनी बोयल त्याच्या 'स्लमडाँग मिलेनियर' चित्रपटाला आँस्कर पुरस्कार मिळताच इकडे भारतीय लोक ओढुनताणुन त्या चित्रपटाचे भारत कनेक्शन सांगुन केविलवाणा विजयोत्सव साजरा करत होते पण इकडे भारताचे नागरिक असलेल्या आणि त्याहुनही अधिक मराठी असलेल्या प्रदिप इंदुलकरांनी 'येलो आँस्कर' किताब पटकावला तरी कोणालाच त्यांची काहीच पडलेली नाही. हेच प्रदीप इंदुलकर जर जर्मनी, अमेरिका, ब्राझील अशा देशात असते तर आज त्यांचे जाहिर सत्कार झाले असते पण आता इंदुलकर भारतात पुन्हा परतल्यावर आपला खोटारडेपणा जगासमोर आला म्हणुन तिरमिरलेल्या काँग्रेस सरकारने आणि हा खोटारडेपणा रेटण्यासाठी करोडो रुपयांची खैरात उधळणा-या NPCIL ने त्यांच्यावर खोट्या केसेस टाकुन त्यांना तुरुंगात टाकले नाही म्हणजे मिळवले.

'HIGH POWER' चित्रपटाने जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणुन मिरवणा-या भारत देशाला आणि खासकरुन काँग्रेस सरकारला जगासमोर नागडे केले आहे. आपला हाच नागडेपणा लोकांसमोर येऊ नये याकरता काँग्रेस सरकारने सेन्साँर बोर्डाला हातीशी धरुन 'HIGH POWER' हा चित्रपटच सेन्साँर करुन टाकला.मी सेन्साँर बोर्डाला जाहिरपणे विचारु इच्छितो की या चित्रपटात सेन्साँर करण्यासारखे नेमके काय होते...? अमेरिकेतील पाँर्नस्टार सनी लियोने इकडे भारतात येऊन आपले कपडे उतरवते ते सेन्साँर बोर्डाला चित्रपटाच्या पटकथेची गरज या गोड कारणाखाली चालते पण तारापुरचे गरीब
शेतकरी आणि मच्छिमार 'HIGH POWER' मध्ये आपल्या आयुष्याची अणुप्रकल्पामुळे कशी वाताहात झाली हे सांगतात ते यांच्या पचनी कसे काय पडत नाही...? आजकाल सेन्साँर बोर्ड पण सोनिया गांधी तर चालवत नाही ना...?? आता, 'HIGH POWER' चित्रपटामुळे खोटारड्या काँग्रेस सरकारची काय गोची झाली ते तुम्हाला सविस्तर सांगतो.

जैतापुर अणुप्रकल्पविरोधी लोकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याने सरकारला जमीन अधिग्रहण करणे मुश्किल झाले. हेक्टरी 22.5 लाख एवढे भरघोस पँकेज लोकांनी लाथाडल्यानंतर स्थानिकांना मुर्ख बनवण्यासाठी तारापुरात अणुप्रकल्प असुन देखील सगळ काही कस आलबेल आहे, असे नवीनच पिल्लु काँग्रेस सरकार आणि NPCIL या दोघांनीही सोडले. लोकांची द्विधा मनस्थितीत भर टाकण्यासाठी समाजात दैवत्व प्राप्त झालेल्या आधुनिक ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची गरज होती.
अनिल काकोडकर नामक आधुनिक महर्षीँची भारतरत्न किताबावर असलेली वखवखलेली नजर काँग्रेसच्या तावडीतुन सुटली नाही आणि या पापामध्ये भागिदार म्हणुन त्यांनी अनिल काकोडकरांची निवड केली. भरघोस पैसा आणि त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्रतिष्ठेचा भारतरत्न पुरस्कार नजीकच दिसु लागल्यावर चमत्कार होणे स्वाभाविकच होते. अनिल काकोडकर नामक तथाकथित व्हाईट काँलर वाल्मिकीचा वाल्या कोळी झाला आणि तो काँग्रेसचा पोपट बनुन धडधडीत खोटे बोलु लागला.
काकोडकरांनी अशी काही धुळफेक केली की त्यात सामान्य लोक सोडाच पण विचार करण्याची क्षमता असलेले निखील वागळे, राज ठाकरे यांसारखे लोक जैतापुर अणुप्रकल्प झालाच पाहिजे अशी मागणी करु लागली. लोकांचा आपल्यावर तसुभरही विश्वास नाही याची काँग्रेसला खात्री होती आणि त्यासाठीच समाजात देवत्व प्राप्त झालेल्या अनिल काकोडकरांचा उपयोग करुन घेण्यात आला. केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी हपापलेल्या अनिल काकोडकरांनी भारतरत्न पुरस्कारासाठी आयुष्यातील सगळी मुल्ये, तत्वे वेशीवर टांगली. तारापुर अणुप्रकल्पाचा तेथील स्थानिकांना फायदाच झालाय असे धडधडीत असत्य काकोडकर बिनबोभाटपणे लोकांना सांगु लागले.साक्षात तारापुरच्या लोकांनी काकोडकरांच्या या खोटारडेपणाचा पर्दापाश करुन जैतापुरातील आपल्या बांधवांचे रक्षण करण्यासाठी आवाज उठवला पण निष्ठुर काँग्रेस सरकारने पोलिसी
खाक्या दाखवुन त्यांचा आवाज दडपुन टाकला. अशा परिस्थितीत प्रदीप इंदुलकरांनी थेट
तारापुरात जाऊन तेथील लोकांच्या मुलाखती घेत HIGH POWER हा चित्रपट बनवला.
अणुप्रकल्पामुळे तारापुरच्या मच्छिमारांवर काय वेळ ओढवली आहे, तिकडच्या स्त्रियांना कोणत्या समस्यांनी ग्रासले आहे, मुले कोणती व्यंग घेऊन जन्माला येत आहेत याचा आँखो-देखा हाल आणि ग्रामस्थांच्या मनातील असंतोष इंदुलकरांनी स्थानिकांच्याच शब्दात चित्रित केलाय.
इतके दिवस काँग्रेसचे नेते नारायण राणे सांगायचे, जैतापुरला विरोध करणारे स्थानिक लोक नव्हेत तर बाहेरचे आहेत. आता तारापुरच्या बाबतीत राणेँचे काय मत आहे.
'हा सूर्य, हा जयद्रथ...'

माझी शिवसेना-भाजप नेत्यांना विनंती आहे की येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी
प्रत्येक प्रचारसभेवेळी प्रोजेक्टर लावुन 27 मिनिटांची ही फिल्म लोकांना दाखवावी. रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघातील सर्व लोकांना समजु देत की काँग् ज्या निलेश राणेँना त्यांनी निवडुन दिले ते खाल्ल्या मिठाला न जागता कोकणच्या मातीशी आणि लोकांशी कशी गद्दारी करत आहे. लाखो कोकणी लोकांचा विरोध सत्तेच्या अहंकारापोटी झुगारुन देत जैतापुर अणुप्रकल्पाला समर्थन करणा-या निलेश राणेँची इच्छा आहे की कोकणातील पुढची पिढी मतिमंद जन्माला यावी. अशा माणसाला पुन्हा लोकसभेवर पाठवायचे का नाही याचा विचार कोकणच्या लोकांनाच करावा लागेल. कु-हाडीचा दांडा गोतास काळ ठरतो हे नेहमी लक्षात असु द्या. HIGH POWER चित्रपट निर्माण करणा-या प्रदीप इंदुलकरांना माझ्याकडुन एक कोकणवासी म्हणुन कोटी कोटी धन्यवाद आणि या फिल्मवरील सेन्साँर हटवुन ती जास्तीत जास्त लोकांपर्यँत कशी पोहचवता येईल यासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा